आई वडिल, भाऊ-बहिण
यांशिवाय एक नातं असतं मित्रत्वाचं
जीवाभावाच्या मैत्रीचं.
झाडाला स्थिरावण्यासाठी
गरज असते मुळांची
समाजात जगण्यासाठी
गरज असते खर्या मित्राची.
मुळाच्या आधारावरच वृक्ष विस्तारतो
विश्वासाच्या आधारावरच मैत्री विस्तारते.
असंच नातं प्रत्येकानं जपावं
मायभूमीचं नवं रूप साकारावं.
विश्वासाचं ते नातं
गळ्यातलं ताईत बनतं
मात्र केवळ विश्वासघातामुळे
फाशीचा ते दोर बनतं.
आता तुम्हीच ठरवा
काय करायचं?
माणसातल्या माणुसकीला कसं जपायचं.
-संदिप निवृत्ती रेखडगेवाड