न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ?
सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल.
शक्य असल्यास कट्टा करू या.
*********************************************
कट्ट्याचा कार्यक्रम
तारीख : १९ जून २०१६.
वेळ : सकाळी ११ वाजता.
भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ.
कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :)
मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल.
*********************************************
प्रतिक्रिया
7 Jun 2016 - 1:43 am | लंबूटांग
बॉस्टन मधे आहे. न्यूयॉर्क पासून ४ तासांवर.
किती दिवस आहे मुक्काम?
7 Jun 2016 - 2:50 am | जुइ
सचित्र वृत्तांत येऊद्या. बाकी कधी मिडवेस्टात येण केल तर कळवा.
7 Jun 2016 - 2:56 am | रेवती
लंबूसारखेच विचारते. किती दिवस मुक्काम आहे?
भेटायचे म्हटल्यास कुठे? न्यूयॉर्कमध्ये येता जाता वाहतुकीच्या मुरांब्याचा विचार करावा लागेल. जर्सी व न्यू यॉर्मधील मंडळी काही कल्पना देऊ शकतील असे वाटते. माझ्या घरापासून साधारण साडेतीन तास लागतात (वाहतुक सुरळीत असल्यास).
7 Jun 2016 - 3:03 am | येडा अण्णा
जर्सी सिटी मध्ये करुया का? Exchange place च्या आसपास
7 Jun 2016 - 3:16 am | वाचक
मस्त कट्टा करु.
7 Jun 2016 - 3:38 am | नंदन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
(पश्चिम किनार्यावर फेरी असल्यास नक्की कळवणे, कॅलिफोर्नियास्थित मेंब्रांना जमवून एक कट्टा आयोजित करता येईल.)
7 Jun 2016 - 4:14 pm | विकास
उगाच नागपुरच्या संत्र्यांची आठवण झाली! ;)
7 Jun 2016 - 5:54 pm | ईश्वरसर्वसाक्षी
"एकदा आमच्या नागपुरला येवुन जा ना संत्र्याच्या सिझनला, काय मस्त संत्रे खाउ वाळ्या गिळ्याचे तट्टे लाउन पडलेले राहु आरामात " :))
न्युयॉर्क कट्ट्याला शुभेच्छा.
7 Jun 2016 - 11:27 pm | नंदन
:D
कळतात बरं बोलणी!
बाकी न्यू यॉर्कच्या या संत्र्यापेक्षा इथली संत्री परवडली ;)
7 Jun 2016 - 4:11 am | मिहिर
मी न्यूयॉर्क शहरातच राहतो. भेटायला आवडेल.
7 Jun 2016 - 4:28 am | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! भेटूया मग. व्यनि केला आहे.
7 Jun 2016 - 4:23 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद !
@ येडा अण्णा :
Exchange Place, जर्सी सिटी नक्की जमेल. तेवढीच 'पश्चिम' वॉल स्ट्रीटचीही भेट होईल ;) मी मॅनहॅटन मध्ये आहे. PATH ने हडसनमाईच्या पल्याडला येईन :)
@ लंबूटांग, जुइ, रेवती, वाचक आणि नंदन :
अजून दोन एक महिने इथे आहे. न्यू हेवन (CT) पर्यंत फेरी मारून झाली. पण, न्युयॉर्कपासून खूप लांबचा बेत सद्या केलेला नाही. काही ठरल्यास नक्की कळवेन.
7 Jun 2016 - 4:43 am | पिलीयन रायडर
मी आहे! जर्सी सिटी जमेल. फक्त वेळ कळवा.
7 Jun 2016 - 4:58 am | डॉ सुहास म्हात्रे
@ पिरातै व येडा अण्णाजी,
घ्या पुढाकार ! होऊन जाउंदे जर्सी सिटी कट्टा !
7 Jun 2016 - 11:18 am | दिपक.कुवेत
कट्ट्याला भरभरुन शुभेच्छा. सचित्र वृत्तांत येउ दे.
7 Jun 2016 - 3:30 pm | राघवेंद्र
Exchange Place /Newport Mall (खादाडी साठी) चांगली जागा आहे. रविवारी जुन १२ ला ११ वाजता करायचा का?? मी Edison वरुन येऊ शकेल.
7 Jun 2016 - 8:04 pm | येडा अण्णा
Exchange Place /Newport Mall (खादाडी साठी) चांगली जागा आहे. रविवारी जुन १२ ला ११ वाजता करायचा का??
मला जमेल.
7 Jun 2016 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
१२ च्या रविवारी दु ३ वाजता महाराष्ट्र मंडळाने आयोजीत केलेल्या "सेल्फी" नाटकाला जायचे आहे. तेव्हा तो दिवस जरा कठीण आहे. पण इतर रविवार अजून तरी मोकळे आहेत.
8 Jun 2016 - 12:42 am | पिलीयन रायडर
Newport Mall is perfect!
Kaka, how about this weekend?
8 Jun 2016 - 12:49 am | रमेश भिडे
पोचली का पार्सलं सुखरुप???
हिरव्या माजा साठी शुभेच्छा! :)
8 Jun 2016 - 11:10 am | बाळ सप्रे
राघवा.. अजून त्याच हापिसात आहेस का न्यूपोर्ट मॉलसमोरच्या??
8 Jun 2016 - 7:00 pm | राघवेंद्र
सप्रे साहेब,
त्या ऑफिसातील न्यूज शॉप मधील सकाळचे पोहे, दुपारची वेज बिर्याणी व चारचा समोसा आणि चहा अजून मिस करत आहे. सध्या जर्सी सिटी पासून दूर काम करत आहे.
8 Jun 2016 - 10:09 pm | अभ्या..
हायला राघवा,
नाश्त्याला पोहे, बिर्याणी, समोसा???
न्यूयॉर्क कि पुणे?
8 Jun 2016 - 10:28 pm | राघवेंद्र
जर्सी सिटी, गुजराती लोकांनी मस्त भारतीय केली आहे. नवरात्रामध्ये रस्त्यामध्येच गरबा, गल्लो गल्ली मंदिरे आणि बरेच काही ….
7 Jun 2016 - 3:57 pm | सूड
शुभेच्छा !! वृत्तांत येऊ द्या!!
7 Jun 2016 - 6:19 pm | जव्हेरगंज
+1
8 Jun 2016 - 2:06 am | सही रे सई
कुठल्या विकांताला ठरवताय ते नक्की करा म्हणजे मी येऊ शकेन की नाही ते सांगते. न्यु हेवन जवळ केला तर अती उत्तम.
पुण्यात असताना बर्याच वेळा मनात असूनही कट्ट्याला उपस्थिती लावता आली नाही. निदान अम्रिकेत तरी जमतय का ते बघू.
8 Jun 2016 - 5:10 am | डॉ सुहास म्हात्रे
न्यु हेवनला महिन्याभरात परत फेरी होईल. तिकडे लोक जमवा, तिकडेही कट्टा करू हाकानाका :)
8 Jun 2016 - 2:16 am | इन्दुसुता
वर जुई यांनी म्हटल्याप्रमाणेच, मिड्वेस्टात येणार असाल तर जरूर कळवा.
नक्की कट्टा करू येथे!
8 Jun 2016 - 2:41 am | स्रुजा
कट्ट्याला शुभेच्छा ! न्युयॉर्क ला यायला आम्ही कधी ही तयार असतो पण सध्या देश सोडुन जायला सरकारची परवानगी नाही. म्हणजे ते जा म्हणतात पण परत येऊ देणार नाहीत त्यामुळे दुरुन च शुभेच्छा.
8 Jun 2016 - 3:43 am | डॉ सुहास म्हात्रे
मंडळी, १९ चा रविवार कसा वाटतो. आताच नक्की केला तर सगळ्यांना तो कट्ट्यासाठी मोकळा ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
8 Jun 2016 - 5:00 am | श्रीरंग_जोशी
या कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!! सचित्र वृत्तांताची प्रतिक्षा राहील.
8 Jun 2016 - 8:13 am | damn
न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो.
कट्टयास येण्यास उत्सुक.
१९ ला ठरल्यास नक्की कळवा.
8 Jun 2016 - 8:13 am | damn
न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो.
कट्टयास येण्यास उत्सुक.
१९ ला ठरल्यास नक्की कळवा.
8 Jun 2016 - 8:14 am | damn
न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो.
कट्टयास येण्यास उत्सुक.
१९ ला ठरल्यास नक्की कळवा.
8 Jun 2016 - 6:54 pm | राघवेंद्र
damn या भेटायला १९ ला.
8 Jun 2016 - 8:58 am | स्पा
टिकिटाची आणि विजा ची सोय केल्यास अगत्याने येणे केल्या जाईल
8 Jun 2016 - 9:03 am | सुनील
मानधन राहून गेले की!
8 Jun 2016 - 9:19 am | स्पा
आता फुल ना फुलाची पाकळी म्हणुन काही तरी मिळेलच की, असं काय ते
8 Jun 2016 - 12:59 pm | IT hamal
१५ जून च्या दरम्यान ४ वीक साठी फिलाडेल्फिया येथे यायचे आहे...Comcast Tower पासून जवळ च्या area मध्ये राहण्याची जागा (sharing or hostel type) शोधतोय.....जवळपास असणाऱ्या मिपाकारांकडून मार्गदर्शन मिळाल्यास चांगलेच...काही पर्याय सुचवावेत ही विनंती ....
8 Jun 2016 - 6:53 pm | राघवेंद्र
१९-जुन- २०१६ रोजी सकाळी ११ वाजता Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ भेटूया. हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :)
इस्ट कोस्ट मधील सर्व मिपाकर रोमातून (Read Only Mode ) बाहेर येउन भेटायला या.
8 Jun 2016 - 9:31 pm | पिलीयन रायडर
उत्तम प्लान!
मी, नवरा आणि मुलगा येऊ.
8 Jun 2016 - 9:47 pm | येडा अण्णा
मी (शक्य झाल्यास कुटुंबा सोबत) येतो
8 Jun 2016 - 10:44 pm | राघवेंद्र
मीपण (शक्य झाल्यास कुटुंबा सोबत) येतो
9 Jun 2016 - 1:19 am | डॉ सुहास म्हात्रे
जरूर कुटुंबासह या. मी कुटुंबासह (सौ व न्युयॉर्कस्थित मुलगा) येणार आहे.
8 Jun 2016 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
ठरलं तर मग ! १९ तारखेला मिपाकरांबरोबर गप्पा मारायला मजा येईल :)
8 Jun 2016 - 11:30 pm | मिहिर
जमतंय. मी येतोय.
8 Jun 2016 - 9:21 pm | सूर्याजीपंत
मी new jersey मध्ये राहतो आणि office NYC ला आहे. मला कुठेही यायला जमेल.
8 Jun 2016 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
जरूर या १९ ला.
8 Jun 2016 - 10:14 pm | प्रचेतस
कट्ट्यास शुभेच्छा.
वृत्तांत अवश्य येऊ द्यात.
8 Jun 2016 - 11:40 pm | संदीप चित्रे
कट्ट्याला येऊ शकणार नाही जून १९ला पण कामाच्या एखाद्या दिवशी लन्च कट्टा करू शकतो.
@पिलियन रायडर - आलात का अमेरिकेत?
@राघव८२ --पोह्यांबद्दल ऐकले आहे, नक्की कुठे मिळतात?
मी जर्सी सिटीहून लांब राहतो त्यामुळे माहिती नाही.
----------------------
बाय दि वे - जाहिरात जाहिरात! :)
check out www.hidden-gems.org.
This is a music group that I'm part of, a non-profit organization.
Check 'KALP' show tribute to (Kalyanji-Anandji, Laxmikant-Pyarelal)
This is a fundraiser for non-profit organization 'Save Indian Farmers'.
-------
कार्यक्रमाला जरूर या :)
9 Jun 2016 - 1:16 am | राघवेंद्र
संदीप - भारतीय snacksसाठी Hudson News @ ४८० Washington Blvd
9 Jun 2016 - 1:18 am | संदीप चित्रे
बघतो :)
9 Jun 2016 - 1:51 am | अंतु बर्वा
बॉस्टन मधे आहे. सध्या तरी कठीण दिसतय पण ऐन वेळी जमलच तर यायचा प्रयत्न केला जाईल :-) कट्ट्याला शुभेच्छा!!!
9 Jun 2016 - 2:36 am | डॉ सुहास म्हात्रे
राघव८२ यांनी लिहिल्याप्रमाणेच...
************************************
कट्ट्याचा कार्यक्रम
तारीख : १९ जून २०१६.
वेळ : सकाळी ११ वाजता.
भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ.
कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :)
मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सर्व सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल.
************************************
9 Jun 2016 - 7:05 am | रेवती
न्यू हेवनास कट्टा होईल तेंव्हा निदान कळवून ठेवा. मला ते ठिकाण दोन तासाच्या ड्राईव्हने गाठता येईल.
आणि आता तुमचा कार्यक्रम वाचून ईनो घेते.
9 Jun 2016 - 7:50 am | डॉ सुहास म्हात्रे
न्यु हेवनला जायचा कार्यक्रम ठरला की जरूर कळवेन. बहुतेक ४ जुलैच्या मोठ्या वीकांतात ती फेरी होईल.
9 Jun 2016 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा !!! कट्याला शुभेच्छा. औरंगाबादपासून इतक्या दूर ड्रायव्हिंग करत येणे शक्य नाही. तेव्हा कट्टा इंजॉय करा. ;)
राघव ८२, कट्टा वर्णन तपशीलवार येऊ द्या. म्हणजे आज कट्टा म्हणून रात्री पासून कट्याचा विचार डोक्यात सुरु झाला. वेळेपूर्वीच पहाटे जाग आली. सुमीला (सुमिचं वय एक वर्ष) आंघोळ घालतांनाही कट्याला कोण कोण येणार हाच विचार सुरु होता. खायला काय घेऊ, कपडे कोणते नेसू सॉरी कपडे कोणते घालावेत... पासून ते एकदा परत घरी पोहोचलो इथपर्यन्त. :)
जगभर कट्टे व्हावेत ही एक कट्टर मिपाकर म्हणून इच्छा. पुन्हा एकदा राघव ८२ आणि समस्त कट्टयाकरांना शुभेच्छा...! राघव मी तुम्हाला फोन करतो। :)
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे,
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे,
-दिलीप बिरुटे
9 Jun 2016 - 10:05 am | टवाळ कार्टा
पुण्याबाहेर रहाणार्या पुणेकरांचे कट्टे एका धाग्यात होतात =))
13 Jun 2016 - 1:10 pm | आदूबाळ
हेच लिहायला आलो होतो ;)
9 Jun 2016 - 10:46 am | शान्तिप्रिय
कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा
व्रुत्तांत जरुर लिहा.
जुलै किंवा ओगस्ट मधे मी एक दिवस वेळ काढुन नवि मुंबईला कामासाठी येणार आहे.
तेव्हा कळवतो. नवी मूंबई, कल्याण भागातील मिपाकराना भेटण्याची इच्छा आहे. पाहु कसे होते ते.
मी आधी किमान ४-५ दिवस व्यनि करुन कळवेन.
13 Jun 2016 - 9:34 pm | मुक्त विहारि
मस्तच.
जरूर कट्टा करू या.
9 Jun 2016 - 1:54 pm | सिरुसेरि
नॅमॅस्टे . कट्ट्याला शुभेच्छा
9 Jun 2016 - 6:30 pm | प्रियान
आमच्या योगा टीचर ची आठवण झाली तुमचे 'नॅमॅस्टे' वाचून ;)
9 Jun 2016 - 6:35 pm | प्रियान
१९ चे नक्की जमेल कि नाही सांगता येत नाहीये, मी न्युयॉर्क पासून थोडं लांब राहते.
ऐन वेळी जमल तर यायचा प्रयत्न करेन.
कट्ट्याला शुभेच्छा !!!
Newport mall मध्ये चाट खायला विसरू नका ! :)
13 Jun 2016 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकर असून दूर आहे हे कारण पटल नाही. जे होईन ते होईन कट्ट्याला पोहोचलंच पाहिजे. :)
-दिलीप बिरुटे
13 Jun 2016 - 8:57 pm | अभ्या..
आता तर यायलाच पाहिजे. प्राडॉ सर स्वागताध्यक्ष म्हणजे काय विचारता, कट्टास्थली पिवळ्या गुलाबाचा गुच्छ घेऊन उभे असतील पहा. यायचेच हं.
सर मी पळालो.
12 Jun 2016 - 10:03 pm | स्पार्टाकस
टेक्सासचा दौरा नाही का डॉक्टरसाहेब?
डलास / ह्यूस्टन / ऑस्टीन / सॅन अॅन्टॉनिओ / कॉर्पस क्रिस्ती?
13 Jun 2016 - 9:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
तुम्हाला भेटायला नक्कीच आवडले असते. पण, सद्यातरी पूर्व किनार्यापासून दूरचा बेत नाही.
15 Jun 2016 - 9:18 pm | राघवेंद्र
रविवारचे हवामान छान आहे. संपूर्ण दिवस सूर्यप्रकाश आहे . त्यामुळे सहकुटुंब इस्ट कोस्टकर जरुर कट्याला या.
येत असलेले सदस्य -
डॉ सुहास म्हात्रे
पिलीयन रायडर
येडा अण्णा
मिहिर
राघव८२
तळ्यात-मळ्यात असलेले सदस्य -
damn
संदीप चित्रे
अंतु बर्वा
प्रियान
18 Jun 2016 - 7:56 pm | प्रियान
माझा कट्टा हुकणार !
कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!!
19 Jun 2016 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे
शक्य तेवढ्या सर्वांनी जरूर या. मी १०:३० - ११ ला तेथे पोहोचेन. भेटूया !
15 Jun 2016 - 10:31 pm | चतुरंग
सचित्र वृत्तांताशिवाय कट्टा झाला असे समजण्यात येणार नाही! :)
-(आद्यईस्ट्कोस्ट्कट्टेकरी)रंगा
15 Jun 2016 - 10:48 pm | विकास
येयला नक्कीच आवडले असते पण तुर्तास खूपच व्यस्त आहे.
त्याव्यतिरीक्त रविवारी एम आय टी त आंतर्राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामधे सहभागी आहे. ह्या योगायोगामुळे कट्ट्याला येण्याचा योग नाही! ;)
मात्र रंगाजींनी ;) वर सांगितल्याप्रमाणे सचित्र वृत्तांत येउंद्यात!
19 Jun 2016 - 12:55 am | डॉ सुहास म्हात्रे
आपण अजून एक कट्टा करू, हाकानाका !
15 Jun 2016 - 11:22 pm | खटपट्या
अरे बापरे अजून होतोच आहे होय कट्टा. मला वाटले कट्टा संपन्न होउन फोटो गीटो टाकले असतील.
लवकर करा काय ता.
16 Jun 2016 - 12:58 am | पिलीयन रायडर
आता ही मेली १९ तारीख काही येत नाही ना.. बावळट सारखं १२,१३,१४,१५,१६... अशा तारखा आधी जाऊ द्याव्या लागतील आणि मग येणार म्हणे १९... ;)
16 Jun 2016 - 1:37 am | रेवती
येईल हां पोरी............१९ तारीखही येईल. उगी उगी.
शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत नाही.
16 Jun 2016 - 7:58 am | विकास
16 Jun 2016 - 3:59 am | ब्रिटिश टिंग्या
मजा करा लेको!
शिकरण खा! मटार उसळ खा!
- टिंग्या
18 Jun 2016 - 12:50 am | damn
मला ७ तास एकट्याने गाडी चालवण्याचा प्रचंड कंटाळा येतो.
व्हर्जिनिया, DC या परिसरातून कोणी कट्टयासाठी येणार आहे का?
वाटेत तेवढीच सोबत होईल.
असल्यास कृपया व्यनिमध्ये नंबर कळवावा.
18 Jun 2016 - 1:15 am | प७९
मी प्रयत्न करेन.
18 Jun 2016 - 9:03 pm | जेपी
तेवढ आमच स्टार्क टॉवर बिल्डींग बघायच विसरु नका .!;)
19 Jun 2016 - 8:25 pm | पिलीयन रायडर
मी आलेय. चिपोतले समोर बसलेय सावलीत.
19 Jun 2016 - 8:35 pm | पिलीयन रायडर
समजा मी इथे भारतीय लोकांना "मिसळपाव?" असं विचारायला गेले तर "नही चाहिये.. आगे जाओ" असं म्हणतील का??!!
20 Jun 2016 - 1:14 am | आदूबाळ
नाही हो, आम्ही वाचनमात्र असतो
असं उत्तरही मिळायची शक्यता आहे.
20 Jun 2016 - 2:56 am | पिलीयन रायडर
हा हा हा!!
खरं वाटणार नाही पण आज मी वामा लोकांनाही भेटलेय. इतकंच नाही तर सदस्य नसलेल्या पण मिपा वाचणार्या लोकांनाही!!
20 Jun 2016 - 5:59 am | डॉ सुहास म्हात्रे
आजच्या जर्सी सिटी मिपाकट्ट्याला 'सक्रिय सदस्य मिपाकर', 'वामा सदस्य मिपाकर', 'मिपा वाचणारे पण सदस्य नसणारे मिपाकर' आणि 'मिपाचे नावही माहीत नसलेली मराठी मंडळी' अश्या अनेक मंडळींनी हजेरी लावून प्रचंड बहार आणली ! तेव्हा कट्टा जोरदार झाला हे सांगणे म्हणजे द्विरुक्तीच होईल, नाही का ?
एक मिपाकर मावळा चक्क एकट्याने ७ तासांची (चारचाकी) घोडदौड करून कट्ट्याला पूर्णवेळ हजेरी लाऊन परत जोमाने तितकीच मोठी घोडदौड करत परतीला लागला आहे. आता बोला !
इतक्या मोठ्या उत्साहाने आणि सहृदयतेने कट्ट्याला हजेरी लावणार्या सर्व जणांचे धन्यवाद मानायला माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत ! लै म्हंजे लैच मजा आली !!!
पिरातै आपल्या खास शैलीत लवकरच सचित्र वृत्तांत टाकणार आहेत. तेव्हा... लोगो, दिल थामके इंतजार करो !
20 Jun 2016 - 7:20 am | राघवेंद्र
एक्का काकाशी सहमत. खुपच मजा आली.
20 Jun 2016 - 7:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी बसलो तुमच्या फोनची वाट पाहात. :(
-दिलीप बिरुटे