***************************************
मी तरी कोठे स्वतःचे मोजतो निःश्वास आता
डाव मांडायास कोठे राहिला सहवास आता
भोवताली गारद्यांचे कृर जथ्थे केवढाले
आरशाला टाळतो, जपतोच मी जीवास आता
मरण झाले यार आता रंगते मैफल स्मशानी
जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता
ऊन्हओल्या सावल्यांचे सोसले चाळे मुक्याने
पावसाचा थेंब नाही कोरडे आभास आता
कोण येतो कोण जातो खूण ना उरते कशाची
'चित्रगुप्ताच्या' सहीला मागणी हमखास आता
***************************************
विशाल २३-५-२०१६
प्रतिक्रिया
25 May 2016 - 10:03 am | अभ्या..
मराठी गझलेचे आद्य प्रणेते सुमेरसिंग खरकसिंग होते काय? गारद्याच्या उल्लेखाशिवाय मराठी गझल अपूर्ण वाटते बहुधा.
बाकी रचना सुरेख.
25 May 2016 - 10:14 am | कानडाऊ योगेशु
रचना आवडली.
बाकी बर्याच दिवसांनी दिसलात विशालभौ!