जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्‍हाणे) - विडंबन

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
24 May 2016 - 2:07 pm

जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या
माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा'

काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी
ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी
शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना
हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना
देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो
जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो
केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना...

(इतरत्र पूर्वप्रकाशित)

हास्यकविता

प्रतिक्रिया

स्पा's picture

24 May 2016 - 3:00 pm | स्पा

=)) बेक्कार

मंदार दिलीप जोशी's picture

24 May 2016 - 3:40 pm | मंदार दिलीप जोशी

धन्यवाद

गामा पैलवान's picture

24 May 2016 - 5:07 pm | गामा पैलवान

मंदार दिलीप जोशी,

अगोदर वाचलेली तुमच्या अनुदिनीवर. तरीपण परत वाचून खूप हसलो.

आ.न.,
-गा.पै.

मंदार दिलीप जोशी's picture

24 May 2016 - 5:14 pm | मंदार दिलीप जोशी

धन्यवाद गा पै

अनिरुद्ध प्रभू's picture

24 May 2016 - 8:34 pm | अनिरुद्ध प्रभू

आपल्याला बुवा आवडली...

बुवा का आवडली म्हणे तुम्हाला?

अनिरुद्ध प्रभू's picture

24 May 2016 - 8:34 pm | अनिरुद्ध प्रभू

आपल्याला बुवा आवडली...

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 May 2016 - 9:02 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

कवितेचा आशय चांगला आहे,पण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच का? मल्ल्याकडून सगळ्यांना मलई मिळाली आहे,तो दिवसाढवळ्या पळुण जातो ही नरेंद्र मोदींना नामुष्की आणणारी गोष्ट आहे.यात सर्व पक्ष गुंतलेले आहेत.

पैसा's picture

24 May 2016 - 10:08 pm | पैसा

आलात का!

मंदार दिलीप जोशी's picture

25 May 2016 - 1:19 pm | मंदार दिलीप जोशी

तुम्ही त्यावर कविता लीहायला मोकले आहात

पैसा's picture

24 May 2016 - 10:07 pm | पैसा

=))

चांदणे संदीप's picture

25 May 2016 - 1:28 pm | चांदणे संदीप

खूपच आवडलंय!
वर्जिनल आणि हे, दोनो!

Sandy