मैत्री व प्रेमातील फरक ओळखा

पारोळेकर's picture
पारोळेकर in जनातलं, मनातलं
20 Sep 2008 - 4:20 pm

विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी. कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत. प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.

विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या सात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.

कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे. प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला ‍चिडवायचे. मात्र, प्रियाला कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात मित्र त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होते.

मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.

एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले. प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला मोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.

मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला टाळू लागला. कॉलेजातह‍ी तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला लागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग झाला नाही.

प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता. सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती..!

आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. मुलामुलींमधले भाऊ-बहिण व प्रियकर- प्रियसी याच्या व्यतिरिक्त तिसरे नाते असते ते म्हणजे मैत्रीचे..! त्या मैत्रीच्या नात्याला 'मैत्री'चेच नाव द्या, त्याला 'प्रेम' समजण्याची गल्लत करून नका.
कथाविचार

प्रतिक्रिया

वृषाली's picture

20 Sep 2008 - 4:35 pm | वृषाली

आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. मुलामुलींमधले भाऊ-बहिण व प्रियकर- प्रियसी याच्या व्यतिरिक्त तिसरे नाते असते ते म्हणजे मैत्रीचे..! त्या मैत्रीच्या नात्याला 'मैत्री'चेच नाव द्या, त्याला 'प्रेम' समजण्याची गल्लत करून नका

कथा छान आहे.पण थोडी फिल्मी आहे.

वृषाली

मृगनयनी's picture

20 Sep 2008 - 5:44 pm | मृगनयनी

७ वर्ष एकत्र फिरणारे, अभ्यास करणारे, आई-वडिलांच्या विश्वासात असलेले प्रिया-विकी जेव्हा मोठे होतात. तेव्हा निसर्गाच्या नियमानुसार त्यांच्यात आकर्षण निर्माण होणं , ही १ स्वाभाविक बाब आहे. ते दोघं (च) जर गाडीवरुन फिरत असतील, सिनेमाला जात असतील....तर त्यांच्यात थोडेफार तरी प्रेम निर्माण व्हायला हवे. कारण तो निसर्गाचा गुणधर्म आहे.

प्रिया'च्या बाबतीत विचार केला, तर किमान तिच्या आई-वडलांना तरी या गोश्टीची जाणीव हवी, की आपली मुलगी विकीबरोबर हिंडते-फिरते..... आणि विकी ही चांगला मुलगा आहे/ असेल तर.....पुढच्या दृष्टीने विचार करायला हवा....इ.इ....

त्यामुळे ही कथा टिपिकल जुन्या पिक्चरची पडीक स्टोरी वाटते.

(कृपया कुणाच्या आयुष्यात तत्सम घटना घडली असेल तर, वरील भाष्य जास्त विचारात घेऊ नका.)

:)

टारझन's picture

22 Sep 2008 - 1:02 pm | टारझन

तेव्हा निसर्गाच्या नियमानुसार त्यांच्यात आकर्षण निर्माण होणं ,
=)) =)) =))

.तर त्यांच्यात थोडेफार तरी प्रेम निर्माण व्हायला हवे. कारण तो निसर्गाचा गुणधर्म आहे.
=)) =)) =)) =))

बापरे ... नयने .. वय गं काय तुझं =)) बेक्कार हाणलाय ... स्टोरी पेक्षा तुझी प्रतिक्रिया जबरा फिल्मी =))

बाकी आम्हाला विचाराल तर विक्की एक नंबरचा येडझवा आहे.... अरे पोरींना सगळी कल्पना असते .. दाखवतात मात्र अशा की आपण त्या गावच्या नाहीत. आता विकी जसा माणून तशी ती कोण हा प्रिया .. ती पण माणूसच नां .. भावना ऑटोमॅटिक निर्माण होतात ..आणि पोरींना अंमळ सेंस असतो गोष्टींचा .. त्यामुळे प्रियाला काही माहीत नाही हे अशक्य. नाही तर मग ती एक मतिमंद मुलगी असावी ...

नैसर्गिक
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

वाहीदा's picture

2 Jan 2009 - 10:19 am | वाहीदा

जानेवारीत तिला पाहीलं आणि प्रेम करावसं वाट्ल,
फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोट्लं !
मार्च मधे "ती" माझ्याकडे पाहुन गोड हस्ली ...
अप्रील मध्ये म्हट्ल पोरगी हस्ली म्हण्जे फसली !
मे मध्ये मी तिच्याकडे ओध्ला गेलो !
जुन मध्ये तिच्याच विचांरानी वेढ्ला गेलो !
जुलै मध्ये आम्ही पावसात भिजाय्चे ठर वलं
औग्स्त मध्ये तिला बीनधास्त भिरवलं
स्पप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो.
ऑक्टोबर मध्ये दोघे माथेरानला जाउन आलो
नो व्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायच च राहुन गलं
म्हणुन ३१ डिसेंबर ला तीला पार्टिला नेलं
धाडस करुन मी तिला प्र पोज के लं
त्यावर ती म्हणते कषी ,
"बारा महीने एकत्र भिरलो, हे काय कमी झालं ?? "
अरे वेड्या,
आता नविन ब्याय फ्रेंड, नविन वर्ष नाही का आलं ??"

~ वाहीदा

ऍडीजोशी's picture

20 Sep 2008 - 6:05 pm | ऍडीजोशी (not verified)

मैत्री नी प्रेम ह्यात गफलत केली की असा लोचा होणारच. त्यामुळे श्री श्री अमीर बाबा खां साहेब ह्यांचं हे वाक्य आम्ही कायम ध्यानात ठेऊन आहोत - बस, ट्रेन और लडकी के पिछे कभी नहीं भागना चाहिये. एक गयी तो दुसरी आती है :)

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 1:51 pm | सखाराम_गटणे™

>>बस, ट्रेन और लडकी के पिछे कभी नहीं भागना चाहिये. एक गयी तो दुसरी आती है

हेच या काळाचे ब्रह्मवाक्य आहे.

--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 10:58 pm | प्रभाकर पेठकर

प्रियाला कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.
'फारसे' लक्ष देत नव्हती म्हणजे थोडेफार लक्ष होतेच.

विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला नव्हता.

ह्या बाबतीत (आमच्या काळाततरी....) मुले जरा बावळट आणि घाबरट असतात. त्यांना धाडस येण्यासाठी मुलीकडून अनेक 'सिग्नल्स' मिळावे लागतात. मुलींना ह्या विषयातील संकेत लगेच जाणवतात. असे असूनही जर प्रियाला थांगपत्ता लागला नसेल तर ती मठ्ठच असली पाहिजे. बरे झाले विकी वाचला म्हणायचा.

नीधप's picture

21 Sep 2008 - 8:44 am | नीधप

काहीपण. कोण कुठल्या नजरेने आपल्याशी वागतो हे सगळ्या पोरींना व्यवस्थित कळतं. प्रियाला कळलं नाही म्हणजे ती ठारच माठ असावी किंवा लग्न ठरेपर्यंत मैत्रीच्या नावाखाली हा दत्तू बरा असं सरळ सरळ गणित असावं तिचं.

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2008 - 8:52 am | प्रभाकर पेठकर

(कोणाशी तरी)लग्न ठरेपर्यंत मैत्रीच्या नावाखाली हा दत्तू बरा
काय 'जहाल' विचारधारा आहे (प्रियाची).....

नीधप's picture

21 Sep 2008 - 9:29 am | नीधप

अहो पेठकर अश्या कित्तीतरी मुली असतात की हो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2008 - 9:33 am | प्रभाकर पेठकर

हम्म्म! वाचलो म्हणायचो त्यांच्या पासून.

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 11:04 am | सखाराम_गटणे™

>>अहो पेठकर अश्या कित्तीतरी मुली असतात की हो!
घाबरु नका, आज कालची मुले सुद्धा तयार असतात.
असल्या मुलींची वाट लावायला

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 11:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

घाबरु नका, आज कालची मुले सुद्धा तयार असतात.
असल्या मुलींची वाट लावायला

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

काय रे, ही प्रतिक्रिया कोणा मुलीनी चारचौघात नाडी ओढली म्हणून बदला घेण्यासाठी का?

* बोळा निघाला नसेल तर नाडी काय अन् इलास्टीक काय, सगळं सारखंच! *

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 11:41 am | सखाराम_गटणे™

>>काय रे, ही प्रतिक्रिया कोणा मुलीनी चारचौघात नाडी ओढली म्हणून बदला घेण्यासाठी का?
अजुन तरी कोण्या मुलीचा माझ्या नाडीपर्यंत हात गेला नाही.

---
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

विजुभाऊ's picture

22 Sep 2008 - 12:03 pm | विजुभाऊ

केवळ संस्थळे पहाण्यापेक्षा स्थळे पाहिली तर बोळा लवकर निघतो.
नुस्ती संस्थळे पाहिलीत तर नाडी काय इलॅस्टीक काय असले नसले सारखेच

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 12:31 pm | सखाराम_गटणे™

व्यनि तुन चर्चा करुन सामुहीक माघार

---
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

टारझन's picture

22 Sep 2008 - 1:09 pm | टारझन

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
काय रे, ही प्रतिक्रिया कोणा मुलीनी चारचौघात नाडी ओढली म्हणून बदला घेण्यासाठी का?
* बोळा निघाला नसेल तर नाडी काय अन् इलास्टीक काय, सगळं सारखंच! *

=)) =)) =)) =))
आज्जे नक्की सांग तुझा टेलेस्कोप नक्की आकाशाकडे तोंड करून आहे का गटणे सरांच्या नाडी कडे .... खवाट =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 1:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टारू,

गटणेभाऊंची वरची प्रतिक्रिया वाचली नाहीस का?

(समजूतदार) आज्जी

अगदी खरं आहे तुमचं...

प्रतिक्रियेची सुरुवातही एकदम ढासू आहे काहीपण :D

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

नीधप's picture

21 Sep 2008 - 9:28 am | नीधप

बर अज्जुका हे स्त्रिलिंगी विशेषनाम आहे. >:)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 9:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अज्जुकांशी सहमत. दोनच टोकं शक्य, ठार माठ असणार प्रिया नाहीतर अतिशय लबाड.

... किंवा लग्न ठरेपर्यंत मैत्रीच्या नावाखाली हा दत्तू बरा ...
हीहीही वा! काय भारी शब्दाची आठवण करून दिलीत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2008 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण कुठल्या नजरेने आपल्याशी वागतो हे सगळ्या पोरींना व्यवस्थित कळतं.

पोरींच्या नजरा पोरांना कळायला पाहिज्या होत्या, त्यामुळे पोरांच्या मोजक्या पॉकीटमनीवर तान नसता पडला ;)

नीधप's picture

21 Sep 2008 - 9:37 am | नीधप

परस्परसंमत (म्युच्युअल) असतं हो सगळं.
सुंदर पोरींचे दत्तू बनायला पोरं पण एका पायावर तयार असतात.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

फटू's picture

21 Sep 2008 - 9:48 am | फटू

सुंदर पोरींचे दत्तू बनायला पोरं पण एका पायावर तयार असतात.

(इंजिनियरींग शिकून, इंजिनीयरींगला शिकवूनही दत्तू न झालेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अनिल हटेला's picture

22 Sep 2008 - 11:40 am | अनिल हटेला

सुंदर पोरींचे दत्तू बनायला पोरं पण एका पायावर तयार असतात.

सगळीच नव्हे !!!

काही अपवाद ही असतात .....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 2:46 pm | मनस्वी

जर आपले वागणे बदलून पण समोरची मुलगी रोजच्यासारखीच वागतीये तर दत्तू / विकी ने काय ते समजून घ्यायचे होते ना! उगाच कशाला देवदास बनून उलटं मुलीलाच लबाड किंवा माठ ठरवायचे!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

टारझन's picture

22 Sep 2008 - 2:50 pm | टारझन

तो दत्तु होता हे ठिक आहे .. अगदी मान्य.. पण पोरीने मग का त्याच्या बाइकचं प्रेट्रोल, सिनेमा टिकीटं , वेळ , भावना , अपेक्षा इइ चा चुराडा करावा ? विक्की जसा अंमळ वाय.झेड आहे तशी ती गयबानी पण अट्टल आरोपी आहे

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 2:54 pm | मनस्वी

तुला कोणी सांगितलं की विकीच्याच गाडीवरून ते जात असत? त्या मुलीची पण गाडी असू शकते. त्यामुळे गाडीचं पेट्रोल तिचंही गेलं असेल. तिकिटं विकीच काढायचा हे तुला कोणी सांगितलं.
वेळ दोघांचाही सारखाच गेला. पण दत्तूच्या 'फालतू' विचारांमुळे त्याला तो 'गेला' असं वाटतंय.
भावना आणि अपेक्षा म्हणशील तर त्याला तोच जबाबदार आहे.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

टारझन's picture

22 Sep 2008 - 3:01 pm | टारझन

का गं मने .. तुला असं म्हणायचं आहे का चुकी फक्त येडपट विक्कीची आहे ? मी फक्त साइड इफेक्ट्स सांगितले .. गाडी तिकीट एकवेळ दे सोडून ..//// आयला माणूस आहे तो .. सहवासाने भावना निर्माण होणं सहाजिक आहे ना..पण त्याच्या भावना त्याच्या बरोबर राहून अगदी काहीच कळत नाही आणि त्याला अजुन भावना वाढवून देत तिने काहीच चुक केली नाही असं तुला वाटतं ? का तु मुलगी आहे म्हणून तिला सॉफ्ट कॉर्नर ? हा पक्षपाती पणा झाला बरं ... आमच्या मते ४९% विकी दोषी आणि ५१ % ती.... जास्त डोश तिलाच

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 3:08 pm | मनस्वी

>सहवासाने भावना निर्माण होणं सहाजिक आहे ना..
व्हायला पाहिजे असं काही नाहीये.

>त्याला अजुन भावना वाढवून देत
असं तिने काहीच केलं नाहीये. उलट आपल्या 'वेगळ्या' वागण्याला काही 'प्रतिसाद' मिळत नाही याचा 'अर्थ' समजून त्यानी लायनीवर यायचे होते!

>का तु मुलगी आहे म्हणून तिला सॉफ्ट कॉर्नर ?
असं अजिबात नाहीये. याउलट तो तिच्या जागी असता तरी मी हेच बोलले असते.

माझ्यामते ती २०% दोषी. कारण तो लायनीवर येत नाहीये म्हणताना ऍटलिस्ट तिने सांगायचे होते की माझ्या मनात तसं काही नाहीये. आणि तो ८०%. जास्त डोश त्यालाच.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 3:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही टक्केवारी कशी रे काढता तुम्ही लोक? :?

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:14 pm | सखाराम_गटणे™

सहम्त

---

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:06 pm | सखाराम_गटणे™

मला वाटते की त्या पोराची जास्त चुक आहे. फिरला बिरला ठिक आहे.
पण देवदास
ही ही ही
--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 3:16 pm | मनस्वी

चांगला प्रतिसाद.
मला वाटते ४ पैकी १ स्क्रू अंमळ ढील्ला झाला असावा. आपले काय मत आहे गटणू?

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:24 pm | सखाराम_गटणे™

त्याची नाडी सतत विसरत असावी आणि इलास्टीक पण जवळ नसावी.

बाकी त्या पोरी ने मजा केली असेल.

--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 3:26 pm | मनस्वी

>बाकी त्या पोरी ने मजा केली असेल.
तुला नक्की काय म्हणायचेय?

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Sep 2008 - 3:39 pm | llपुण्याचे पेशवेll

मजा केली असेल म्हणजे दत्तूच्या पॉकेटमनी वर भेळ खाणे. दत्तूकडून असाईनमेंट करून घेणे. रात्री उशीरा कोणत्याही पार्टी वरून येत असेल तर दत्तू सोड ना रे मला घरी अशी लाडीक विनंती करणे... इ.
:) बाकी दुसर्‍याच्या पैशातून चहा पिण्याचा आनंदही अवर्णनीय असतो

(सुविचारी)
पुण्याचे पेशवे

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:48 pm | सखाराम_गटणे™

पिक्चर पाहाणे, शॉपिंग करणे इ. इ.

--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 3:51 pm | मनस्वी

कशावरून दत्तूनेच पैसे खर्च केले??

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:53 pm | सखाराम_गटणे™

जनरली मुलेच खर्च करतात.
पण शुदध मैत्री असेल तर ५० - ५०% खर्च चालतो.

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

जैनाचं कार्ट's picture

22 Sep 2008 - 5:03 pm | जैनाचं कार्ट (not verified)

जनरली मुलेच खर्च करतात.
पण शुदध मैत्री असेल तर ५० - ५०% खर्च चालतो.

जरनली मुले मुर्ख असतात मुलीच्या मामल्यात ;)

शुध्द मैत्री असली तरी खर्च हा ६०%-४०% ह्या प्रकारे होतो.. ६०% मुलगाच करतो खर्च !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 5:06 pm | मनस्वी

अरे... हवाय कशाला तुझा खर्च मी अन् माझा खर्च तू!
टी. टी. एम. एम. सगळ्यात उत्तम आणि हल्ली बरेच जण करतात!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

मृगनयनी's picture

22 Sep 2008 - 3:20 pm | मृगनयनी

वरील प्रतिक्रियांचा अभ्यासपुर्ण विचार केल्यानन्तर मी या निष्कर्षाप्रत येउन पोचले आहे, की विकी किंवा प्रिया : या दोघा जणांपैकी एकाने जरी "नाडी-जोतिषा"चा आधार घेतला असता.. तर कदाचीत आज चित्र वेगळे असते.

नाडी-शास्त्रा नुसार जर प्रियाचे विकीच्या आयुष्यात जोडीदार म्हणून येणे, जर संभव असते... तर विकी'ने तेव्हाच प्रियाला डायरेक्टली किंवा तिच्या आई-वडिलांकरवी प्रपोज करुन आपले 'मानस' सांगितले असते. आणि कदाचित त्याच्या या 'प्रपोजल' मुळे का होईना 'मठ्ठ' प्रियाच्या मनात विकीबद्दलच्या प्रेमाचा उगम झाला असता.

आणि जर नाडी-जोतिषा' नुसार विकीला असे समजले असते, की प्रिया त्याच्या आयुष्यात येणे असंभव आहे.. किन्वा आली तरी टिकणार नाही....इ.इ.... तर तो दु:खि नक्की झाला असता.... पण त्याचा 'देवदास' नक्कीच झाला नसता.

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मृगनयनी,

आपल्या ज्ञान, माहिती आणि अभ्यासाबद्दल संपूर्ण आदर बाळगून मी आपल्याला सांगू इच्छिते की नाडी हे कारण नव्हतं. जेव्हा प्रियाला बघायला मुलगा आला आणि त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं तेव्हा विकी महाराष्ट्रात होता जिथे शनी-मंगळ युती होती आणि प्रिया होती उत्तर भारतात, जिथे व्यवस्थित पाऊस पडत होता.

अदिती

टारझन's picture

22 Sep 2008 - 5:20 pm | टारझन

जेव्हा प्रियाला बघायला मुलगा आला आणि त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं तेव्हा विकी महाराष्ट्रात होता जिथे शनी-मंगळ युती होती आणि प्रिया होती उत्तर भारतात, जिथे व्यवस्थित पाऊस पडत होता.

आग्ग्गायायायायाया .... मेलो आज्जे .. हापिस्सातले सगळे लोक्स माझ्याकडे भलत्या दृष्टीने पाहून राहिलेत ... कोसळलोय ... =))
बाकी मनीच प्रियाला २०%च दोषी ठरवणं पटलं नाहीये .... आम्ही ५१-४९% असे कॅल्कुलेट केलं होतं की थोडी चुकी प्रियाची जास्त आहे. फ्रॅक्शन मधे चुका मला नाहीयेत कॅल्कुलेट करता ...

बाकी गटणे गटणे बाबा मजा मारणे कसे हो शक्य आहे ... तिला तर माहित पण नव्हतं हे वाय.झेड.च्या मनात काय आहे ते ... :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:27 pm | सखाराम_गटणे™

कदाचित तो नाडी विसरला असावा.

ह. घे.

--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

विसुनाना's picture

22 Sep 2008 - 3:36 pm | विसुनाना

एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले. प्रियालाही तो मुलगा आवडला होता.

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.

ही वाक्ये महत्त्वाची आहेत.

या गुळगुळीत कथेचा जरासा कीस काढू ;) :)

१. विकी प्रियाला मित्र म्हणून आवडत नव्हता काय?
२. 'मित्र म्हणून हवा पण पती म्हणून नको' असे विकीत काय होते?
३. जर विकीने आपले प्रेम प्रियाजवळ व्यक्त केले असते तर प्रियाने ते झिडकारले असते काय?
४. विकी आणि प्रिया यांची 'मैत्री' जर घरच्यांना मान्य असेल तर 'प्रेमविवाह' का मान्य होऊ नये?
५. ते दोघे एकमेकांना अनुरूप नव्हते काय?
६. प्रियाला पाहण्यासाठी आलेला 'तो' पहिलाच मुलगा होता काय?
७. प्रियालाही तो मुलगा आवडला म्हणजे नक्की काय झाले?
८. त्या मुलाची आणि विकीची सांपत्तिक स्थिती यांच्यात काय फरक होता?

इ.इ.
अशा प्रश्नांचा उलगडा जोवर होत नाही तोवर चूक कोणाची हे कळणार नाही.
"या पेक्षा बरा मिळाला तर पाहू नपेक्षा हा आहेच!" असाही विचार असू शकतो ना?

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 3:39 pm | मनस्वी

>"या पेक्षा बरा मिळाला तर पाहू नपेक्षा हा आहेच!" असाही विचार असू शकतो ना?
हीच्यापेक्षा बरी मिळण्याची आपली काही लायकी नाही.. त्यापेक्षा हिलाच पटवू! असाही विचार असू शकतो ना?

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

विसुनाना's picture

22 Sep 2008 - 3:42 pm | विसुनाना

मान्यच आहे! :)
पण 'समानशीले व्यसनेषु सख्यम' असे म्हटलेच आहे.

तात्या, एकडाव माफ करा...

विजुभाऊ's picture

22 Sep 2008 - 5:28 pm | विजुभाऊ

त्याने असे का झाले यावर एक प्रबन्ध लिहायला हवा होता.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवरसाखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मन's picture

22 Sep 2008 - 6:39 pm | मन

बस करा कि मास्तर, इजु भौ आणि सगळेच.
मायला मुरकुंडी वळली हसुन हसुन......
आपलाच,
मनोबा

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 3:47 pm | सखाराम_गटणे™

त्याने व्यवहारीक प्रेम करायला हवे होते.

--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

भडकमकर मास्तर's picture

22 Sep 2008 - 4:56 pm | भडकमकर मास्तर

एक जुना धागा आठवला... असेच डिस्कशन झाले होते ...
आता शोधतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

22 Sep 2008 - 5:13 pm | भडकमकर मास्तर

विकी आणि प्रियाची दर्दभरी दास्तान वाचून खूप वाईट वाटले...

त्या विकीला इतके दु:ख झाले आहे आणि इथले पाषाणहृदयी लोक विकीच्या दु:खाच्या तव्यावर स्वतःच्या करमणुकीच्या पोळ्या भाजत आहेत...पण पारोळेकर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका... तुम्ही लिहा मी वाचेन

तुम्ही इतकं मनाला भिडणारं लिहिता की खरंच डोळ्यात पाणी आणलंत...
..विकीच्या मनाला किती यातना होत असतील् याची कल्पनाच करवत नाही...

का केलंस तू असं प्रिया??फुललेली इतकी भारी वेल गळून पडली ना....
का?
का?
त्या विकी चे मन तिथे टाहो फोडत असेल ना? ....आक्रंदत असेल ना...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 5:18 pm | सखाराम_गटणे™

बास मास्तर बास,
बाजारु नाट्य कलावंतावर तुटुन पडणारे तुम्ही कसे कोमल झालात?

प्रिया नही तो और सही.
नगाला नग

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

भडकमकर मास्तर's picture

22 Sep 2008 - 5:20 pm | भडकमकर मास्तर

डोळ्यांतून अजून पाणी थांबले नाहीये आणि गटणे तुम्हीही मला....

विकी.....

विकी
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ's picture

22 Sep 2008 - 5:31 pm | विजुभाऊ

डोळ्यांतून अजून पाणी थांबले नाहीये
ते बोळ्याने पुसू शकता.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवरसाखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 5:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> ते बोळ्याने पुसू शकता.
=))

मास्तर आणि विजुभौ, काय चालवलंय हे? माझी हहपुवा झाली इथे!

भडकमकर मास्तर's picture

22 Sep 2008 - 5:41 pm | भडकमकर मास्तर

अरे देवा, दयाघना, करूणेच्या सागरा, या सार्‍यांना ही करमणूकच वाटतेय ना ?
म्हणजे माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?
........
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो विकी ....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे देवा, दयाघना, करूणेच्या सागरा, या सार्‍यांना ही करमणूकच वाटतेय ना ?
म्हणजे माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?

तुमची इमेजच तशी आहे त्याला आम्हीतरी काय करणार? तुमच्या जुळ्या, तिळ्या, .... "य"ळ्या भावांना सांगा प्रयत्न करायला, बघा काही जमलं तर!

पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो विकी ....
=))

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 5:49 pm | सखाराम_गटणे™

>>म्हणजे माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?

हीच ठकठ्क प्रियाच्या नव्या घरावर करा, काही तरी फायदा होइल.

---
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

विजुभाऊ's picture

22 Sep 2008 - 5:55 pm | विजुभाऊ

माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?

वर बेल बसवलेली असतानाही केवळ भारनियमन म्हणुन टाहो कशाला फोडता.
अवांतरः भार नियमन करायचे असेल तर रोज जॉगिंग कराना.
अती अवांतर : "प्रेमाला उपमा नाही" हे गाणे उडुपी हाटेलात लावत नाहीत. ( त्यामुळे म्हणे गिह्राईक निघुन जाते)

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

विसुनाना's picture

22 Sep 2008 - 5:19 pm | विसुनाना

हा विकी पुढल्या जन्मी कावळा होणार बहुदा... का? का हो? का वं? का वं? ;);)
-पाषाणहृदयी

पारोळेकर's picture

20 Feb 2009 - 2:23 pm | पारोळेकर

धन्यवाद..... धन्यवाद ...
भडकमकर साहेब, आपल्या प्रतिक्रियेमुळे मला खरंच धीर आला.....

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 5:30 pm | सखाराम_गटणे™

आज-काल शहरातील मुले-मुली किती दिवस एकत्र राहाय्चे हे आधीच ठरवतात.
उगाच नंतर रडा-रडी नको.
मग एकमेकांच्या मित्र-मैत्रीणी बरोबर पुन्हा तेच

--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

छोटा डॉन's picture

22 Sep 2008 - 5:35 pm | छोटा डॉन

भडकममास्तर म्हणाल्याप्राणे आधी या विषयावर मिपावर भयानक रणकंदान झाले होते.
असो.
त्यात आम्ही मुंडी तुटलेल्या मुरारबाजेच्या आवेशात लढलो होतो.
तरीही असो.

शेवटी यातुन काही निष्पन्न होत नाही कारण दोन्ही बाजु लढतच राहतात. त्यामूले या चर्चा मी " निष्फळ " समजतो.
हे असेच असणार म्हणुन असो.

ह्या लिंक पहा, काही रिपीट होत असेल तर जरासे बघा आणि होत असेल तर सोदुन द्या आणि पुढच्या मुद्दा घ्या ...
त्यापेक्षा काहीच नको कसे !

आग लागो, " तसल्या " नजरांना ..... http://www.misalpav.com/node/794
"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ... http://www.misalpav.com/node/807

असो. तुमचे चालु द्यात ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अनामिक's picture

22 Sep 2008 - 5:54 pm | अनामिक

शेवटी यातुन काही निष्पन्न होत नाही कारण दोन्ही बाजु लढतच राहतात. त्यामूले या चर्चा मी " निष्फळ " समजतो.

अगदि सहमत...

पण तरिही... ७ वर्षात एकदाहि आपलं प्रेम व्यक्त करता न येणे म्हणजे विकी लै "शेळपट" असला पाहिजे अन ति भवानी "येडपट" असली पाहिजे... ७ वर्षाची सोबत काय कमी नै... एकुण काय तर दोघांनी मिळून एक मुलगी अन एका मुलाचे जीवन बरबाद केले.... एकमेकांशी लग्न केले असते तर असे झाले नसते....

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 5:58 pm | सखाराम_गटणे™

>>७ वर्षात एकदाहि आपलं प्रेम व्यक्त करता न येणे म्हणजे विकी लै "शेळपट" असला पाहिजे अन ति भवानी "येडपट" असली पाहिजे

७ वर्ष म्हणजे खुपच झाले.

>>एकमेकांशी लग्न केले असते तर असे झाले नसते....
जर बैकअप असता तर,

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

सोनम's picture

7 Dec 2008 - 3:06 pm | सोनम

कथा चा॑गली आहे. पर॑तु
विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला नव्हता.
हे वाक्य जरा मनाला खटकते. अहो ७ वर्षापासूनची मैत्री आणि आपल्या मित्राच्या मनात काय विचार आहे हे माहित नाही. impossibale
X( X( X( X( X( X(

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

सोनम's picture

7 Dec 2008 - 5:51 pm | सोनम

<:P <:P <:P <:P तुम्ही ही कथा लिहीली ती आजकालच्या जीवनाशी स॑ब॑धित आहे. अरे मित्र आणि प्रेम यातील फरक कळला पाहिजे.पण बराच वेळा मैत्रीचे रु॑पातर प्रेमात होते. त्यान॑तर मैत्रीतही त्याच कारणाने फूट पडते. विशेष एकादी मुलगी जर जास्त प्रमाणात एखादया मुलाबरोबर बोलयला लागली तर त्याचा मुले नको तो अर्थ काढतात. त्यामुळे कोणत्याही मैत्रीत मुलाच्या मनात प्रेमाचा अ॑कुर पहिल्यादा फुटतो. त्यामुळे ही कथा आजकालच्या मुलाना साजेशी आहे.
>:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D<

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

पारोळेकर's picture

31 Dec 2008 - 6:22 pm | पारोळेकर

पुण्याच्या सोनम बाई धन्यवाद!!!!!

सुहास.'s picture

8 Jan 2009 - 6:49 pm | सुहास.

एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता

काय गरज होति काय माहित्?कशाला कूठे मरायला जायचे ????

सुहास..'s picture

19 Oct 2012 - 11:57 am | सुहास..

लई भारी चर्चा !!

विक्की ने चांगला मालमसाला डोनेट केला आहे ;)

(विक्की डोनरचा पंखा) बॅटमॅन.