हुकलेली संधी

Primary tabs

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जे न देखे रवी...
28 Nov 2007 - 9:32 am

माध्यान्हीची वेळ | जराशी निवांत | लाभतो एकांत | घरामध्ये ||

झाली सामसूम | आटोपता काम | करिती आराम | सारेजण ||

खळ्यामध्ये बैल | करिती रवंथ | बसुनी निवांत | झाडाखाली ||

गडीमाणसेही | खावया भाकरी | गेली त्यांच्या घरी | नुकतीच ||

दळ्णकांडणी | पडलासे खंड | सारे काही थंड | अंगणात ||

चिमण्याही गेल्या | आपुल्या खोप्यात | राघू पिंजर्‍यात | विसावला ||

मंदसा तेवतो | देव्हार्‍यात दीप | म्हातारीचा जप | चालू असे ||

पाणी द्यावयाचे | करून निमित्त | नार गेली आत | खोलीमध्ये ||

आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या ||

आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये ||

प्रीतिच्या नागाने | मारलासे डंख | वासनेचे पंख | आभाळात ||

तारूण्याची बाग | बीजही सुपीक | चुंबनांचे पीक | भरघोस ||

सोडता ना सुटे | कंचुकीची गाठ | अवघडे पाठ | ऐनवेळी ||

इतुक्यात आली | दारावरी थाप | उडे थरकाप | लागोलाग ||

सावरुनी केस | घेतला पदर | पुसला अधर | तळहाती ||

सुंठ मागायला | वंस आल्या दारी | खोकते म्हातारी | ढसांढसां ||

सुरू होण्याआधी | संपलासे खेळ | कशी आली वेळ | बाईवरी ?||

"नको बाई होऊ | अशी तू उदास"| सल्ला देई खास | सखी तिला ||

"रातच्याला जाग | 'त्यांना'ही जागव | हौस तू भागव | सारी तुझी "||

बाई ती बिच्चारी | करितसे धावा | "आज तरी देवा | पाळी नको "||

आपला,
(छंदबध्द) धोंडोपंत

प्रेमकाव्यप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Nov 2007 - 9:49 am | विसोबा खेचर

माध्यान्हीची वेळ | जराशी निवांत | लाभतो एकांत | घरामध्ये ||
झाली सामसूम | आटोपता काम | करिती आराम | सारेजण ||
खळ्यामध्ये बैल | करिती रवंथ | बसुनी निवांत | झाडाखाली ||
गडीमाणसेही | खावया भाकरी | गेली त्यांच्या घरी | नुकतीच ||
दळ्णकांडणी | पडलासे खंड | सारे काही थंड | अंगणात ||
चिमण्याही गेल्या | आपुल्या खोप्यात | राघू पिंजर्‍यात | विसावला ||
मंदसा तेवतो | देव्हार्‍यात दीप | म्हातारीचा जप | चालू असे ||

वा! कोकणातल्या दुपारचा निवांतपणा उभा राहिला हो डोळ्यासमोर!

पाणी द्यावयाचे | करून निमित्त | नार गेली आत | खोलीमध्ये ||
आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या ||
आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये ||
प्रीतिच्या नागाने | मारलासे डंख | वासनेचे पंख | आभाळात ||
तारूण्याची बाग | बीजही सुपीक | चुंबनांचे पीक | भरघोस ||
सोडता ना सुटे | कंचुकीची गाठ | अवघडे पाठ | ऐनवेळी ||

वा! कवितेला अचानक इतकं सुंदर वळण मिळेल असं वाटलं नव्हतं! :)

तारूण्याची बाग | बीजही सुपीक | चुंबनांचे पीक | भरघोस ||
सोडता ना सुटे | कंचुकीची गाठ | अवघडे पाठ | ऐनवेळी ||

क्या बात है धोंड्या, शब्दाशब्दाला दाद द्याविशी वाटते आहे! जियो..!!!

सावरुनी केस | घेतला पदर | पुसला अधर | तळहाती ||

ओहोहो.. खल्लास!

सुंठ मागायला | वंस आल्या दारी | खोकते म्हातारी | ढसांढसां ||

कसला खोकला आणि कसलं काय रे धोंड्या! वन्सबाईंनी आणि म्हातारीनी हे माजघरात बसून खेळलेलं एक राजकारण आहे! :)

असो, सुंदर कविता...

तात्या.

अनंत छंदी's picture

11 Nov 2008 - 1:39 pm | अनंत छंदी

तात्या
ह्या काय चल्लहा काय? पंत असा गरमागरम लिहूक लागले तर काय होतला?
आपल्यासारख्यांक आता कायतरी करुकच होया. हयसर रोशनीचो वणवो होण्याची पाळी इली हा.

सहज's picture

28 Nov 2007 - 10:32 am | सहज

चांगल सुचलय. आवडले.

मेल ब्रुक्स (ह्या माझ्या आवडत्या कलाकाराने)ने काढलेला एक सिनेमा "रॉबीनहूड- मेन इन टाइट्स" जर पाहीला असेल तर एक प्रसंग आठवत असेल रॉबीन हूडला सोडून द्यावे म्हणून मेरीयम, शेरीफ ऑफ रॉटींगह्यामच्या अटी मान्य करत असते त्यातली एक अट, "समटाइम्स अफ्टर लंच " आठवले. टीपी सिनेमा आहे. :-)

सर्किट's picture

28 Nov 2007 - 10:39 am | सर्किट (not verified)

लगे रहो धोंडोपंत !

कविता फारच आवडली !!!

- सर्किट

विजुभाऊ's picture

3 Sep 2008 - 4:18 pm | विजुभाऊ

क्या बात है धोन्डोपन्त
इस बात में भी सच मे बुजुर्ग हो आप. मान गये जनाब.
उम्र के साथ आप वाकई तजुर्बेकार हो गये हो. वा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आजानुकर्ण's picture

28 Nov 2007 - 10:50 am | आजानुकर्ण

कविता आवडली किंवा नाही तो निर्णय राखून ठेवत आहोत. मात्र धोंडोपंतांना सरस्वती प्रसन्न आहे . खूपच चित्रमय आणि छंदबद्ध शब्दरचना.

- आजानुकर्ण

केशवसुमार's picture

28 Nov 2007 - 11:45 am | केशवसुमार

धोंडोपंत !
जबरा कविता.. आवडली !!!

केशवसुमार

धनंजय's picture

28 Nov 2007 - 11:48 am | धनंजय

विडंबनाच्या अंगाने जाते.

आनंदयात्री's picture

28 Nov 2007 - 11:49 am | आनंदयात्री

बाई ती बिच्चारी | करितसे धावा | "आज तरी देवा | पाळी नको "||

ह्.ह्.पु.वा.

मात्र धोंडोपंतांना सरस्वती प्रसन्न आहे . खूपच चित्रमय आणि छंदबद्ध शब्दरचना.

हे मात्र खरे.

देवदत्त's picture

28 Nov 2007 - 9:11 pm | देवदत्त

छान...
कविता आवडली....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2007 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिनेश५७'s picture

28 Nov 2007 - 11:40 pm | दिनेश५७

आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या ||

आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये ||

वा:!! क्या बात है!

धोंडोपंत's picture

30 Nov 2007 - 10:13 am | धोंडोपंत

अभिप्राय देणार्‍या सर्व सभासदांना धोंडोपंत आपटे यांचा दंडवत आणि धन्यवाद.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

30 Nov 2007 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत ,
आपण लवकरच काव्यमय /छंदमय्/श्लोकमय/ वार्षिक भाकिते "धनुर्धारी" मासिकात लाड, साळगावकर यांची परम्परा चालवणार . आता नवीन ई दिवाळी अंक काढा "तनुर्धारी" आणी नवीन ज्योतिषवाङमयात भर टाका.
ज्योतिषप्रेमी तरीही
(ज्योतिष चिकित्सक)
प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत's picture

30 Nov 2007 - 1:39 pm | धोंडोपंत

श्री. प्रकाशराव,

'तनुर्धारी' नाव आवडले. हा हा हा हा हा

आपला,
(हसरा) धोंडोपंत

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

लबाड मुलगा's picture

20 Dec 2007 - 5:56 pm | लबाड मुलगा

छान वाटले

पक्या

प्रफुल्ल अरुण सोहोनी's picture

25 Jan 2008 - 8:07 pm | प्रफुल्ल अरुण सोहोनी

अतिशय सुरेख .खूपच छान . आशय अतिशय छन आहे.

सुनील's picture

25 Jan 2008 - 11:47 pm | सुनील

छान ही कविता | विनोदी जराशी | चालही साजेशी | अभंगाची ||
अशाच येऊदे | सुरेख कविता | आम्ही धोंडोपंतां | विनवितो ||

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पिवळा डांबिस's picture

26 Jan 2008 - 8:26 am | पिवळा डांबिस

वा, वा, धोंडोपंत, तुम्ही तर कमालच केलांस!

आमी आजवर तुमचां वाचीत होतो, पण काय लक्षात येयत तर शपथ!!

काय "गोचर" काय, "भ्रमण" काय, "फलादेश" काय! सगळा डोक्यावरून जाय होतां. मांका नेहमी प्रश्न पडां, हो शेंडिवालो, भस्मचर्चित बामण हंयसर तात्याच्या मिसळपाव टपरीवर काय करतासां? नाय म्हणजे, हंयसर जमणारे सगळे खेचर, डॉन, डांबिस वगैरे!!

आमका तुमच्या ज्योतिष्यातला कायच समजणां नाय. आणि खरां सांगू?

आमका "गुरुच्या कलां" पेक्षा "शुक्राची चांदणी" जास्त आवडतां! गालावर तीळ असलो तर आणखिनच!! :)) शाळेतलो सगळो काळ आम्ही गुरूकडे लक्ष देण्यापेक्षा, चांदण्यो हेरण्यात घालवलो. म्हणूनच आमच्या शिक्षणाचा ह्यां असां!! तां असो!

तुम्ही ही कविता तर झकासच केलिसां.

आयन्यात बाई | पाहे पुन्हा पुन्हा | गालावरी खुणा | रात्रीच्या त्या ||

आठवता सारे | दूर झाली लाज | चमकली वीज | देहामध्ये ||

प्रीतिच्या नागाने | मारलासे डंख | वासनेचे पंख | आभाळात ||

तारूण्याची बाग | बीजही सुपीक | चुंबनांचे पीक | भरघोस ||

सोडता ना सुटे | कंचुकीची गाठ | अवघडे पाठ | ऐनवेळी ||

वा, वा! तर्रीचो झटको बसल्यासारख्यां वाटलां! आसांच लिखाण करीत जांवा. मी आज तुमच्यासाठी वेतोबाक गारहाणा घालतलंय. आणि आज घरी गेल्यार बायलेक तुमची द्रिष्ट काढूक सांगा.

बरां आठवलां, धोंडोपंतानु! एक विचारू? रागांव नकास हां. ह्यां तुम्ही घरांतलां असां भायेर टपरीवर सांगतांस ह्यां तुमच्या बायलेक माहिती आसां? नाय म्हणजे जरा सांभाळून हो! तात्यासारख्या करु नकास. तात्याची गोष्ट वेगळी. त्याचो सगळो खुल्लो कारभार असां. काय "रोशनी" काय, आणि काय कांय! काल सहज गेलो होतंय तेच्या बिरहाडाक तर एक कोण शेट्टीण बघलंय. काय "अनुष्का" की कांयसांसा नांव सांगितल्यानीत. तेचा ठीक आंसा. आपली गोष्ट वेगळी. कायतरी बोलून जाशात आणि व्हयनीबाय तुमचा अंथरूण रातच्याक गोठ्यात घालीत.

नाय म्हणजे एक समदुख्खी नवरो म्हणांन माका काळजी वाटतां हो! बाकी काय नाय!!

आपलो,

(तिठ्यावरचो) पिवळो डांबिस

विसोबा खेचर's picture

26 Jan 2008 - 9:19 am | विसोबा खेचर

आमका "गुरुच्या कलां" पेक्षा "शुक्राची चांदणी" जास्त आवडतां! गालावर तीळ असलो तर आणखिनच!! :)) शाळेतलो सगळो काळ आम्ही गुरूकडे लक्ष देण्यापेक्षा, चांदण्यो हेरण्यात घालवलो.

वा! क्या बात है..

म्हणूनच आमच्या शिक्षणाचा ह्यां असां!! तां असो!

चलायचंच हो, साला शिकून कुणाचं भलं झालंय?

बरां आठवलां, धोंडोपंतानु! एक विचारू? रागांव नकास हां. ह्यां तुम्ही घरांतलां असां भायेर टपरीवर सांगतांस ह्यां तुमच्या बायलेक माहिती आसां?

अरे डांबिसा, आमच्या धोंड्याची बायको अगदी साधीभोळी हो! या धोंड्याचे बाहेर काय धंदे चालतात ते तिला बिचारीला ठाऊक नाहीत आणि आम्ही ते तिला सांगणार नाही. खूप धक्का बसेल बिचारीला....! :)

काल सहज गेलो होतंय तेच्या बिरहाडाक तर एक कोण शेट्टीण बघलंय. काय "अनुष्का" की कांयसांसा नांव सांगितल्यानीत.

काय रे डांबिसा, लेका तू कधी आला होतास माझ्या बिर्‍हाडी? :)

असो,

आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

सुचेल तसं's picture

2 Sep 2008 - 2:57 pm | सुचेल तसं

धोंडोपंत,

अभिज्ञनी ही कविता जरुर वाचावी असं सांगितलं होतं.... खरोखरच अप्रतिम कविता..........

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2008 - 2:57 pm | बिपिन कार्यकर्ते

छप्परफाड....

बिपिन.

लिखाळ's picture

2 Sep 2008 - 3:31 pm | लिखाळ

धोंडोपंत,
कविता फार मस्त ! मजा आली.

प्रकशरावांचा तनुर्धारी शब्द सुद्धा खासच :)
--लिखाळ.

अनिल हटेला's picture

2 Sep 2008 - 5:20 pm | अनिल हटेला

बढीया !!!!!!!!!!!!!!!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अभिज्ञ's picture

3 Sep 2008 - 2:24 am | अभिज्ञ

ह्या "हुकलेली संधी"नेच आम्ही मिपावर प्रवेशकर्ते झालो.
कोणीतरी विरोपाने आम्हाला हि कविता पाठवली होती.
ती वाचून कविच्या ह्या "अफाट"प्रतिभेने आम्ही चाटच पडलो होतो. :O
मिपावरची एक मास्टरपीस कविता!!!!
जियो धोंडोपंत जियो!!!!
ते ग्रह नक्षत्रे सोडून जरा साहित्या कडे आपली प्रतिभा वळवावीत असे वाटते.

अभिज्ञ.

संदीप चित्रे's picture

3 Sep 2008 - 2:27 am | संदीप चित्रे

सुरेखच की हो | जुळविल्या ओळी | घ्यावा दंडवत | धोंडोपंत ||
-----------
बाई ती बिच्चारी | करितसे धावा | "आज तरी देवा | पाळी नको "||
हहपुवा :)
-----------
(अवांतर -- आमचे एक मित्रवर्य चालीवर गातात 'सखी बंद झाल्या तारखा... आता तरी येशील का ?' ;) )

आपला अभिजित's picture

10 Nov 2008 - 2:50 pm | आपला अभिजित

धोंडोपंत,

कविता झकास आहे,

मिपावरील स्त्रीसभासदांवर विनाकारण कॉमेन्ट्स करणारा मजकूर संपादित...! भावनेच्या भरात, थट्टा मस्करीत का होईना, परंतु कुठेही मर्यादा उल्लंघल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी!

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

वारकरि रशियात's picture

10 Nov 2008 - 3:21 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
धोंडोपंत, छानच!
'हुक' चा श्लेष ही लक्षात आला!

आपला अभिजित's picture

10 Nov 2008 - 7:36 pm | आपला अभिजित

मिपा च्या कोणत्याही मान्यवर महिला सदस्याने प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही. का बुवा?

(अवांतर : `भावनेच्या भरात' आम्ही सख्ख्या पत्नीलाही `प्रिये' म्हणत नाही!)

खरा डॉन's picture

11 Nov 2008 - 8:55 am | खरा डॉन

उगाच वेड पांघरुन पेडगावला का?

बाई ती बिच्चारी | करितसे धावा | "आज तरी देवा | पाळी नको "||

हे वाचल नाही?? कुठल्या महिला सभासदाकडुन प्रतिसाद अपेक्शित आहे कळवा आता

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2008 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह डोळ्यासमोर अगदि प्रसंग उभा रहिला बघा ! अतिशय सुंदर !!

+++ प्रसाद +++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

अनंत छंदी's picture

11 Nov 2008 - 1:32 pm | अनंत छंदी

पंत
ज्योतिषाबरोबरच हे अंगही आपणाला आहे हे आजच कळलें. बाकी कविता झकासच!
आपला
अनंत छंदी

अनिरुध्द's picture

11 Nov 2008 - 2:48 pm | अनिरुध्द

ज ह ब ह -या. धोंडोपंत. मजा आणलिन तुमच्या कवितेनं.

धोंडोपंत's picture

13 Dec 2008 - 10:07 am | धोंडोपंत

सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

प्यार इश्क मौहब्बत's picture

13 Dec 2008 - 8:06 am | प्यार इश्क मौहब्बत

खत्तरनाक कविता!!! खल्ल्लास....

प्यार इश्क मौहब्बत

धोंडोपंत's picture

13 Dec 2008 - 10:07 am | धोंडोपंत

धन्यवाद धन्यवाद

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

प्रवासी's picture

13 Dec 2008 - 8:51 am | प्रवासी

वा वा धोंडोपंत!

आपल्या प्रतिभेला दंडवत.

आपल्या शैलीत| आपण लिहावे| येरागबाळ्याचे| काम नोहे||

आपला
(नतमस्तक) प्रवासी

धोंडोपंत's picture

13 Dec 2008 - 10:10 am | धोंडोपंत

पंत पंत पंत पंत पंत पंत पंत,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

तुम्ही इथे आलात हे पाहून आत्यंतिक आनंद झाला. कसं काय चाललाय? तुमच्या कविता आणि गझला इथे येऊ द्या.

बरेच दिवस विचार करतोय की आमचे पंत गेले कुठे?

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

मुचकुन्द's picture

22 Jan 2009 - 8:56 am | मुचकुन्द

भले रे शाब्बास...
'लहरदार| ' अन्भंग
कवतिक करावे तितुके थोडके.. लब्जच तोटके..

शाहिर's picture

27 Dec 2011 - 8:10 am | शाहिर

टोप्या ..फेटे उडवलं.....
मुजरा धोंडोपंत...

सन्दीप's picture

20 Mar 2013 - 12:56 pm | सन्दीप

कविता झकासच!

मार्कस ऑरेलियस's picture

20 Mar 2013 - 1:20 pm | मार्कस ऑरेलियस

लय भारी कविता !!

बॅटमॅन's picture

21 Mar 2013 - 9:02 pm | बॅटमॅन

हैन!!!!!! चित्र तं मस्तच उभं केलंय :)

शेवटच्या पाळीने अंमळ रसभंग केला असूनसुद्धा.