फार जुन्या काळा पासून दत्तक घेणे हा प्रकार आहे. राजे, सरदार किंवा अन्य तत्सम मंडळी ज्यांना मुलबाळ नाही किंवा मुलगा नाही(वंश किंवा गादी पुढे चालवन्यासाठी) ऎसे लोक दत्तक पुत्र घेत. त्याचा सांभाळ करत. पुढे जावून हेच दत्तकपुत्र मालक किंवा राजा होत...
सध्याच्या युगात मात्र एक नविन फैशन आली आहे ती म्हणजे गाव दत्तक घेण्याची, आणि ती हिंदी चित्रपट सृष्टीत जरा जास्तच आहे..
एखादा चित्रपट येणार असेल तर त्याला नजरेसमोर ठेवून गाव दत्तक घेतले, श्रमदान केले ऎसे इवेंट केले जातात आणि मीडिया ही त्याला भरपूर प्रसिद्धि देतो. चला चांगले आहे, की लोक अजूनही समाजकार्य करत आहेत. पण ह्या लोकांनी गाव दत्तक घेतले म्हणजे नक्की काय केले हे अजूनही माझ्या भाबड्या बुद्धीला कळले नाही...
जर ह्यांना गाव दत्तक घेवून कार्य करायचे आहे, तर मग ग्रामपंचायत, जिल्हापरिषद्, सदस्य तसेच आमदार आणि खासदार यांना त्या गावांसाठी मिळालेला निधी ते लोक काय करणार ??
हा सगळा निधी म्हणजे आपण सर्व सामान्य लोकांनी भरलेला कर आहे..तो जर लोकांसाठी वापरला जात नसेल तर का म्हणून आपण कर द्यायचा ???
खासदार लोकांनी ही काही गाव दत्तक घेतली होती, त्यापैकी किती जणांनी त्याचे रिजल्ट्स जाहिर केले ??
सचिन,नाना,मकरंद,सयाजी हे लोक प्रत्यक्ष जावून काम करून घेत आहेत.असेही नाही की केवळ घोषणा केली आणि एक दिवस संपूर्ण लवाजमा घेवून जावून काम करून आले. नाना आणि मकरंद यांना तर लोक प्रतिनिधि आणि त्यांच्या चमच्यांनी दंडवत घातला पाहिजे..
आम्ही गाव दत्तक घेणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही, पण दत्तक घेताना ते लोक गावांसाठी काय काय करणार आणि कैसे करणार याचे महितीपत्रक त्यांनी जाहिर केलेच पाहिजे...
जेनेकरून लोक प्रतिनिधी पुढच्या वेळेस जेव्हा मत मागायला येतील तेव्हा त्यांच्या तोंडावर मारता येइल....