सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
19 May 2016 - 6:54 pm

सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक

शहरातुन दुपारी बाराच्या सुमारास निघालेली जीवनराज ट्रॅव्हल्सची बस दिठेरी गावापाशी आली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. बसमधील प्रवासी जरा पेंगुळले होते . बसमध्ये पुढच्या सीटवर बसलेले टुर मॅनेजर श्री. कारेकर हे सर्व प्रवाशांना तत्परतेने माहिती सांगु लागले .

"मंडळी , दिठेरी नदीच्या काठी वसलेले गाव म्हणुन या गावालाही दिठेरी किंवा दिठेरीवाडी असे म्ह्णतात . आपण चाललो आहोत ते ठिकाण इथुन फार लांब नाही . फार तर अर्धा तास . आता हा उजवीकडे जाणारा रस्ता दिठेरी नदीवरील पुलावरुन जातो . हि नदी ओलांडली की ते पहा दिठेरी देवीचे मंदिर लागते. पुढे साधारण वीस मिनीटाचा घाट वळणाचा रस्ता आहे . घाट संपला की दहा मिनीटात आपण गढीपाशी येतो."

सर्व प्रवासी उत्सुकतेने बाहेरील ठिकाणे बघत होते . बस आता नदी ओलांडुन , दिठेरी देवीचे मंदिर पार करुन घाट रस्त्याला लागली . एका बाजुला उंच डोंगर तर दुसरीकडे खोल कातर दरी बघताना सर्वांना थोडी मजा तर थोडी भितीही वाटत होती . गढीकडील या रस्त्यावर एरवीही फारशी वर्दळ नसते . त्यामुळे ड्रायव्हर जोरात गाडी मारत होता .

बाहेरील घाटाची मजा बघतानाच फोटो काढणे , एकमेकांशी हसत खिदळत गप्पा मारणे हे प्रवाशांचे उद्योग चालु होते . काही प्रवासी मंडळी एकमेकांना आपल्या याआधी केलेल्या सफरींचे किस्से सांगुन भाव मारत होती . तर इतरांना काव आणत होती .

अचानक ड्रायव्हरने एकदम करकचुन ब्रेक मारुन गाडी थांबविली . आतमध्ये आपल्याच नादात असलेली गाफील प्रवासी मंडळी या अचानक बसलेल्या धक्क्याने जोरात पुढे मागे फेकली गेली . नशीब बरे की कुणाला जास्त लागले नाही .

"अरे दत्ता , तु घाटामध्ये एवढ्या स्पीडने का चालवतो ? असं चालवु नको . जरा सांभाळुन " टुर मॅनेजर कारेकर हे ड्रायव्हरवर थोडे खेकसलेच .

"अहो साहेब , माझी काय चुकी नाय . ते बघा ना . ते येडं एकदम रस्त्याच्या मधेच आलं " दत्तु समोर खुण करत दाखवत होता .

सर्वांनी तिकडे बघितले . खरोखर रस्त्याच्यामध्ये एक वेडसर वाटणारा मनुष्य उभा होता . अंगात फाटलेले , मळके , जीर्ण कपडे होते . खोल गेलेले , तांबारलेले डोळे , बेसुमार वाढलेले विस्कटलेले केस , अस्ताव्यस्त दाढी असा त्याचा अवतार होता .

तो वेडा या बसमधील सर्वांकडे बघत खदाखदा हसत होता . मधेच काहितरी पुटपुटत होता . तर मध्येच "नको , नको , कोण ? कोण ? " असे ओरडत होता . त्याचे जोरजोरात हातवारे चालले होते . जणु काही तो सर्वांना "पुढे जाउ नका" असे सांगत होता .

सगळे प्रवासी त्या वेड्याचा दंगा पाहुन पार घाबरुन गेले . अचानक तो वेडा रस्त्याच्या कडेला गेला . तिथुन पुढे खोल दरी होती . वेड्याने एकदा परत या सर्वांकडे पाहिले .एक जोरदार आरोळी मारुन त्याने स्वताला दरीमधे झोकुन दिले .

हळु हळु त्याचा ओरडण्याचा आवाज कमी होत गेला . सर्वजण धावत रस्त्याच्या कडेला गेले . आणी तो वेडा कुठे दिसतोय का पाहु लागले . पण ती दरी इतकी खोल होती कि काहिच दिसत नव्हते . हा प्रकार बघुन सर्व प्रवाशांचे हातपायच गळुन गेले .

"चला मंडळी , आपल्याला उशीर होतोय . तो कुणीतरी वेडा होता . त्याला कोण काय करणार ? आपल्याला निघालं पाहिजे" टुर मॅनेजर श्री. कारेकर यांनी सर्वांना धीर दिला आणी बसमधे बसवले . सर्वजण चुपचापपणे बसमध्ये येउन बसले . कोणच काही बोलत नव्हते .

"हा घाट संपला कि एक दहा मिनीटाचा जंगलातुन जाणारा रस्ता आहे . या जंगलाला सर्व गावकरी दिठेरी देवीचे संरक्षीत रान मानतात . त्यामुळे इथे कधी जंगलतोड होत नाही . हा खुप छान गर्द घनदाट परिसर आहे . कुणाला फोटो काढायचे असतील तर अवश्य काढा ." श्री. कारेकर यांनी गंभीर बनलेले वातावरण हलके करण्यासाठी माहिती दिली .

सर्वजण शांतपणे बाहेर बघत बसले . कुणीच काहि हालचाल केली नाही . त्या वेड्याच्या धक्क्यातुन अजुन कोणी पुरते सावरले नव्हते . तो वेडा कोण असावा ? तो जगला असेल का ? तो कसले हातवारे , खाणाखुणा करत होता ? काय सांगत होता ? असे प्रश्न सर्वांना पडले होते .

अखेर तो दहा मिनीटाचा घनदाट जंगलातुन जाणारा रस्ता संपला . सर्व प्रवाशांना हि शेवटची दहा मिनीटे दहा तासांसारखी लांबलचक वाटली होती . सर्वांनी आता मोकळा श्वास घेतला . वातावरणही थोडे हलके झाले .

एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता .

"चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली .

------ क्रमशः --------------------कथा---------- काल्पनीक ----------------

कथालेख

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

19 May 2016 - 7:00 pm | कानडाऊ योगेशु

उत्कंठावर्धक सुरवात.
पुढचे भाग लवकर लिहा आता.

प्रचेतस's picture

19 May 2016 - 7:38 pm | प्रचेतस

भारी लिहिलंय.
भाग तसा लहान झाला असला तरी चांगला झालाय. वातावरणनिर्मिती अजून हवी होती जरा.

बाबा योगिराज's picture

19 May 2016 - 11:30 pm | बाबा योगिराज

जास्त वेळ वाट पहायला लावू नका.
पुलेशु.
पुभाप्र.

छान जमलीय अगदी, पुढील लेखनास शुभेच्छा.
कोणत्याही वादात न पडता सातत्याने लिहित राहणे आणि इतर लेखकाना नियमित प्रतिसादहि देणे हा तुमचा गुण फार आवडतो.

असंका's picture

20 May 2016 - 7:25 am | असंका

सुरेख निरीक्षण!

+1

नाखु's picture

20 May 2016 - 10:09 am | नाखु

सगळ्या प्रतिसादास सहमती

पुभा प्र

रेवती's picture

20 May 2016 - 3:28 am | रेवती

भारी.

अजया's picture

20 May 2016 - 9:20 am | अजया

पुभाप्र

पद्मावति's picture

20 May 2016 - 3:10 pm | पद्मावति

मस्तं! वाचतेय.

मस्त. खतरनाक लिहा काहीतरी...मजा येतेय...

सस्नेह's picture

20 May 2016 - 5:00 pm | सस्नेह

येऊदे अजून.

सिरुसेरि's picture

20 May 2016 - 6:07 pm | सिरुसेरि

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे .

जव्हेरगंज's picture

20 May 2016 - 6:39 pm | जव्हेरगंज

उत्कंठावर्धक आहे नक्कीच!!

पुभाप्र!!!

विवेकपटाईत's picture

20 May 2016 - 8:39 pm | विवेकपटाईत

सुरवात तर मस्त आहे...

चलत मुसाफिर's picture

22 May 2016 - 7:42 am | चलत मुसाफिर

पर्यटन कंपनीची टूर होती. म्हणजे ती नियमित दिठेरीकर गढीला येतच असणार (अर्थात वेगवेगळ्या पर्यटकांना घेऊन). तो रस्ता, दरी, वेडा मनुष्य हे सर्व पर्यटकांना परिचयाचे नसले तरी चालक आणि व्यवस्थापकांना असणारच.

पुढील भागात या मुद्द्याची दखल घेतली जावी ही विनंती. :-)

सिरुसेरि's picture

22 May 2016 - 8:05 pm | सिरुसेरि

धन्यवाद . दिठेरीकर गढीला हि पहिलीच टुर होती .
==========================================================
कारेकरांनी परत सर्वांचे आभार मानले . मग सर्वांना पुढचा दिनक्रम सांगितला .

"मंडळी , हे दिठेरी गाव व येथील ऐतिहासीक गढी आजपर्यंत फारशी ऐकीवात नव्हती . आमच्या जीवनराज ट्रॅव्हल्सने या वर्षीपासुन मुद्दामुनच या कमी गर्दीच्या ठिकाणी टुर सुरु केली . येथील गढीचे जुने , ऐतिहासिक स्वरुप कायम ठेवुन , त्यामध्ये नवीन आधुनीक सुविधांचा मिलाफ केला आहे . या गढीचे एका हेरिटेज स्थळामधे रुपांतर केले आहे . तुम्ही सर्वांनी आम्हाला जो उत्साही प्रतीसाद दिला त्याबद्दल आमच्या जीवनराज ट्रॅव्हल्सतर्फे मी आपणा सर्वांचे मनापासुन आभार मानतो . "
===================================================