..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
हातात हात आले,ह्रदयात नाम झाले
ती सोबतीस आली,कामात काम झाले
शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती..
कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..
ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची..
शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले..
सारेच चोर होते,पण एकला पळाला
त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले
त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली
पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले
शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी
खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले
रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले,
गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले
+ कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
18 May 2016 - 8:53 pm | आदूबाळ
वा ये बात!
18 May 2016 - 9:26 pm | ईश्वरसर्वसाक्षी
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले
____/\____
18 May 2016 - 11:27 pm | बोका-ए-आझम
हे मस्तच!
18 May 2016 - 11:29 pm | चांदणे संदीप
सुटे सुटे केले तर भारीच झालेत शेर.
Sandy
19 May 2016 - 6:55 am | खेडूत
मस्त.
भाऊसाहेब पाट्णकरांची आठवण झाली.
19 May 2016 - 7:08 am | मोदक
+1111
19 May 2016 - 7:33 am | वेल्लाभट
आयुष्य मानवांचे त्या बेलगाम झाले
कोणी कसाब झाले कोणी कलाम झाले
छायेत रामयांच्या रावणही निपजला
वस्तीत रावणांच्या ऐसेही राम झाले
19 May 2016 - 9:47 am | कानडाऊ योगेशु
मतला बेस्टच.
हे ही सुंदरच पण रामयांच्या ऐवजी राघवांच्या जास्त गेय वाटते आहे.
19 May 2016 - 7:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली गझल.
-दिलीप बिरुटे
19 May 2016 - 7:47 am | सतिश गावडे
भारी लिहीले आहे.
19 May 2016 - 8:39 am | नाखु
लिहिले आहे
19 May 2016 - 9:03 am | आतिवास
मस्त लिहिलंय.
कसाब - कलाम अगदी पटलं.
19 May 2016 - 9:34 am | भंकस बाबा
मस्तच!
19 May 2016 - 9:36 am | स्पा
लय भारी
19 May 2016 - 9:45 am | कानडाऊ योगेशु
प्रतिसाद देणार्या सर्वांन्ना धन्यवाद!