भरोसा करावा कुणाचा जरी..
भरोसाच नाही कशाचा जरी..!
विचारेन त्यालाच कॉफी चहा
घरी दूत आला यमाचा जरी
मिळो गार माझी तुला सावली
किती त्रास मजला उन्हाचा जरी
मनी मान्य केले शशीचोर मी!
खुळा आळ आहे नभाचा जरी.
म्हणे वाघ गेल्याच जन्मातला
अता जन्म आहे सशाचा जरी
किती त्यात जो तो पुरा गुंतला
खरा खेळ होता मनाचा जरी
अरे वाकला तो कशाने असा.?
तसा भार नव्हता जगाचा जरी!
खरा भक्त त्याला मिळो एकदा
तिथे प्रश्न असला युगाचा जरी!
- कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
13 May 2016 - 11:56 pm | रातराणी
सुरेख!
14 May 2016 - 11:12 am | कानडाऊ योगेशु
धन्यवाद रातराणी.
अवांतर : तुमचा प्रतिसाद तसा नेहेमी रात्रीच येतो.!
14 May 2016 - 6:35 pm | अभ्या..
आवडली रे योगेशा.
छान आहे कविता.
14 May 2016 - 6:41 pm | किसन शिंदे
आवडली राव कविता.
16 May 2016 - 10:57 am | पथिक
काही कळली काही न कळली पण आवडली
16 May 2016 - 11:21 am | वेल्लाभट
सुरेख सुरेख !
16 May 2016 - 1:10 pm | पैसा
सुंदर कविता
16 May 2016 - 1:57 pm | नाखु
तू मला आवडतेस मधून बाहेर येऊन असंही लिहित जा रे बाबा,असं हे काल फोनवर सांगणारच होते=====
सार्वकालीन माई