आज ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले , त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते ..
ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली , मेसेज करायला विसरली . call झाल्यावर कोन्फारंस रूम मध्ये मीटिंग होती त्यात ती तिचा मोबाईल डेस्क वरच विसरून गेली . आज अजून हि पोहचली कशी नाही म्हणून याने call केला तर घेतलाच नाही म्हणून मेसेज केला r u der ? तरीही तिचा काही मेसेज नाही , आज त्या मीटिंग मध्ये तिला कळाले कि तिला ४ वाजता मीटिंग साठी client office ला जावे लागेल , तिला वाटले कि आता जेवण करून मगच डेस्कवर जावे तिने पटदिशी एक डोसा घेतला तो खात असतानाच त्याला call करून सांगावे त्यावेळी तिच्या लक्षात आले कि आपण मोबाईल तर डेस्क वरच विसरून आलो ते खाऊन तिला डेस्कवर यायला २.३० वाजले आता आवरून निघाले तर वेळेत पोहचेन म्हणून तिने घाई घाईने डेस्क आवरायला घेतला ऑफिसच्या समोरच स्टेशन होते धावत पळत तिने ट्रेन पकडली आता पोहचेन वेळेत म्हणून मोबाईल हातात घेतला पण सगळ्या ट्रेन जमिनीखालून जात असल्याने नेटवर्क नाही आता पण call करू शकत नाही आता मात्र ट्रेन मधून बाहेर आले कि लगेच फोन करायला हवा सकाळपासून एकदाही बोलणे झाली नाही हे तिचे विचार ,,, तोपर्यंत त्याने हिला परत फोन केला तर आता तिचा फोन नेटवर्क मध्ये नाही असे सांगत होते त्यामुळे तर त्याला जास्तच काळजी वाटू लागली तिला मेसेज करून ठेवले , तिच्या मैत्रिणीला फोन केला तर ती नेमकी आज सुट्टीवर , कुठे गेली असेल हि ? असे कधीच करत नाही ! काही अडचणीत असेल का ? असे एक न अनेक प्रश्न? याचे कामात लक्ष लागेना झाले कदाचित घरी गेली असेल का ? असा विचार येउन त्याने आज घरी लवकर जायचे ठरवले ….
आजचा दिवस बहुदा तिचा नसावाच कारण ट्रेन लेट झाली त्यामुळे तिला client कडे पोहचायला लेट झाला गडबडीत तिने मीटिंग पूर्ण केली , तेव्हा घड्याळात ६. ३० झाले होते , तिने मोबाईल पहिला तर याचे २०-२५ misscall आणि मेसेजस ते पाहून हिने लगेच त्याला फोन केला तिचे नाव बघताच त्याने झडप घालून फोन घेतला अग ए आहेस कुठे ? किती फोन किती मेसेज करायचे ? फोन वापरता येत नाही तर घ्यायचा कशाला ? तो तापलेलाच होता .
हिने शांतपणे सागितले कि पोहचते घरी मग बोलूच , हिच शांतपणा पाहून याला आणखीन राग आला पण हो म्हणून त्याने फोन ठेवला .
एकतर आज खूप दमल्यामुळे हिची चिडचिड होत होती आणि घरी आल्यापासून त्याची धुसफूस ! ! तो काहीतरी बोलला ती आणखी चिडली आणि म्हणाली ,"मी काय लहान कुक्कुल बाळ आहे का ? कळत नाही का मला ? " याचा त्यालाही राग आला त्याने आत जाऊन जोरात बेडरूमचा दरवाजा आपटला आणि झोपला ,हिने पण जेमतेम आवराआवरी करून जाऊन झोपली . दोघेही जागे होते पण कुणीच बोलत नव्हते .
सकाळी ती उठली तरी तो झोपलाच होता , तिला वाटत होते कि काल नाहीतर आपली चूक होतीच त्याला sorry म्हणायला हवे ! तो उठला कि पहिले काम तेच असे म्हणून ती तिच्या कामाला लागली . तर हा पूर्ण तयार होऊनच बाहेर आला आज मला डबा नको खातो बाहेरच , bye म्हणून तो दाराकडे गेला ती काही बोलायच्या आधीच दार बंद झाल्याचा आवाज आला . मग तिनेही एक कॉफी करून घेतली आणि आवरून बाहेर पडली आज तिला कसेतरीच वाटत होते , ऑफिसमध्ये पोहचल्यावर तिने पहिला कि त्याचा मेसेज नाही आला म्हणून तिने पोहचले असा केला तर त्याला काहीच उत्तर नाही , बिझी असेल करेल परत या विचाराने ती कामाला लागली पण मेसेज टोन ऐकल्यावर लगेच बघत असे पण त्याचा नसला कि निराशा सगळी सकाळ यातच गेली तिने फोन केला तरी त्याने घेतला नाही .
आता १ वाजत आला त्याचा लंच टैम म्हणून जेवण ? असा मेसेज केला तरी त्याने काहीच उत्तर पाठवले नाही , तिने फोन केला तर कट केला आणि मेसेज केला कि "बिझी" म्हणून , माझ्या प्रत्येक फोन ला मेसेज ला उत्तर देणारा हा आज असा का करतोय ? कदाचित त्याचा फोन हरवला असेल आणि दुसरेच कुणीतरी मेसेज करत असेल ? किंवा त्याला काही झाले असेल का ? अरे देवा कसले कसले विचार येत आहेत माझ्या मनात ? कामात तिचे लक्ष लागेना , मला बरे वाटत नाहीय , असे सांगून ती ऑफिस मधून बाहेर पडली ते थेट त्याच्या ऑफिस कडे जाण्यासाठीच .
त्याचे ऑफिस हे तिच्या ऑफिसच्या अगदी दुसऱ्या टोकाला ती तिकडे कधी जास्त गेलीही नाही तिला फक्त एरिया माहित होता . अर्धा पाऊण तास ट्रेन मध्ये काढल्यावर ती बाहेर आली पण तिला काहीच ओळखीचे वाटेना तिने याला फोन लावला पण त्याने तो घेतला नाही , आता शेवटचा उपाय म्हणत तिने मेसेज केला कि , तुझ्या ऑफिसच्या खाली मी थांबले आहे , हे वाचून मात्र दुसर्या मिनिटाला त्याचा call आला , अग हि काय पद्धत आहे का ? कुठे आहेस? मी आलो खाली तू दिसत नाहीय !
ती , अरे तो एक स्मित स्ट्रीट आहे न तिथे आहे मी !
कप्पाळ म्हणत त्याने डोक्याला हात लावला , अहो madam तुम्ही एक stop आधीच उतरला आहात , आता आहे तिथेच थांब मी पोहचतो १५-२० मिनिटात …. तोच पाऊस सुरु झाला , तसे हि पुटपुटली " इथला पाऊस पण कधी येईल नेम नाही ! "
यावर लगेच तो ," तो ही तुझ्यासारखाच लहरी वेडा "
ती छत्री घेऊन उभी होती , तिची नजर त्यालाच शोधत होती आणि तितक्यात तो रोडच्या पलीकडच्या स्टेशन मधून बाहेर आला , पुढे ट्राफिकमुळे तिला पलीकडे जाता येईना , तसा तोच आला हिच्याकडे पळत तसे दोघे किती वर्षांनी एकमेकांना भेटत आहेत असे भेटले . !!!
दोघे एकाच छत्रीतून चालत असताना त्याने फक्त तिला इतकेच विचारले , "आता वाटली ना काळजी ?"
प्रतिक्रिया
5 May 2016 - 9:28 pm | श्रीरंग_जोशी
प्रसंग छान रंगवलाय.
आजच्या काळात असंही घडू शकतं. फोनद्वारे उत्तर मिळत नसल्यास मी हापिसच्या इमेल सुविधेचा लाभ घेईन.
5 May 2016 - 9:51 pm | सचिन कुलकर्णी
छान लिहिलंय पण लांबी थोडी कमी ठेवावी असं वाटतं जेणेकरून लिखाण जास्त परीणामकारक वाटेल.
पुलेशु.
5 May 2016 - 10:06 pm | एक एकटा एकटाच
चांगल लिहिलय
5 May 2016 - 10:15 pm | एस
मस्त!
6 May 2016 - 1:28 am | मी-सौरभ
आवडेश
6 May 2016 - 1:32 am | वीणा३
लिहिलेलं आवडलं. आमची सुरवातीचे असे प्रेमळ संवाद नंतर आज बाळाने किती वेळा शी केली वर सरकले :D
6 May 2016 - 2:19 am | रेवती
कित्ती बरोब्बर!
आता आमचे संवाद बाळाची परिक्षा कशी झाली? इथून सुरु होतात. ;)
6 May 2016 - 2:59 am | सही रे सई
घरोघरी मातीच्याच चुली हेच खरं :)
6 May 2016 - 7:34 am | उगा काहितरीच
मस्त मस्त...!
6 May 2016 - 9:35 am | नाखु
सोपे सुटसुटीत......
मह्त्वाचे म्हणजे आहे तसे म्हणून भावले.
लहरी नाखु
6 May 2016 - 9:40 am | समीरसूर
आवडले
6 May 2016 - 10:51 am | अप्पा जोगळेकर
हे असा होतं म्हणून बायकोला सांगून टाकलय. दिवसभर एकमेकांना फोनच करायचा नाही. नाहीतरी संध्याकाळी भेटतोच.
6 May 2016 - 11:00 am | कैलासवासी सोन्याबापु
बायको प्रथमच मला भेटायला एकटी येत होती तेव्हा सकाळी ९ पर्यंत रेलवे मधे झोपुनच होती मी कॉल केले तर उचलले नाहीत मग तिच्या जॉइंट फॅमिली मधे सगळ्यांना करुन झाले फ़ोन साडे अकराला तिचा फोन आल्यावर झालेली चिड़ चिड़ आठवली एकदम
6 May 2016 - 11:03 am | अपरिचित मी
छान लिहिलंय
वीणा आणि रेवती शी पूर्ण सहमत
6 May 2016 - 11:05 am | सस्नेह
छान लिहिलंय.
7 May 2016 - 12:41 am | चौथा कोनाडा
सुरेख ! aआवडली कथा. mमस्त ओघवती आहे.
हव्या त्या ठिकाणाहुन प्रति "साद" नसेल तर काय घालमेल होते ना ?
छान लिहिताय. आणखी लेखनाच्या प्रतिक्षेत .
7 May 2016 - 4:44 am | श्वेताली कुलकर्णी
आपल्या सगळ्याच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद !!
1 Oct 2016 - 6:18 am | रुपी
मस्त.. आवडलं.