उगा हासरा
तुझा चेहरा!
भरपूर झाला
इथे आसरा
उजेडात आला
जुना कोपरा
पायात रडला
पुन्हा उंबरा
उत्क्रांत झाला
किती वानरा !!
झालास तू ही
बैल वासरा !!
वॉन्टेड आहे
तू ही ईश्वरा!
पत्ता तुझा दे
एक अंबरा!
दिसलाच अंती
मूळ चेहरा!
झाकुन घे तू
डाग पांढरा
तोडुन गेली
गाय आसरा
दुष्काळ आहे
परत पाखरा
फिरतोच आहे
अजुन भोवरा
उघडाच आहे
सोड पिंजरा!
अंधार गेला
नीघ भास्करा!
बोलुनि गेली
काय मंथरा?
वनवास आहे
थांब उत्तरा!
जवळुन गेला
हाय मोगरा
गाऊन जा तू
फक्त अंतरा!
मुलगाच आहे
मार शंकरा!
मृत्यु असावा
खास सोयरा!
- कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
4 May 2016 - 1:50 pm | चांदणे संदीप
दमलो!
परत वाचतो... लै काय काय आहे... कोलाज कामासारख!
Sandy
4 May 2016 - 2:35 pm | कानडाऊ योगेशु
धन्यवाद संदीप!
दोन फॅक्चुअल चुका आहेत कवितेत.(व्याकरणा व्यतिरिक्त.)
बघुया कोण ओळखतेय ते!
4 May 2016 - 3:40 pm | चांदणे संदीप
अडला??
(भारीये गेसिंग गेम! ;) )
4 May 2016 - 4:53 pm | कानडाऊ योगेशु
आधी अडलाच सुचले होते पण अडला म्हणजे मला जायचेच होते पण उंबरा मध्ये तडमडला असा अर्थ ध्वनित होतोय.पण रडला मध्ये त्याला मला जायला नको आहे असा अर्थ ध्वनित होतो आहे.
पण ही ती चूक नाही आहे.! (चूक फॅक्ट संदर्भात आहे. शब्द/व्याकरण संदर्भात नाही.)
4 May 2016 - 5:19 pm | चांदणे संदीप
इथे चुकीची मिष्टेक दिसत्ये!
4 May 2016 - 4:10 pm | पथिक
जळून गेला हाय मोगरा ?
4 May 2016 - 9:28 pm | कानडाऊ योगेशु
जळुन नाही तर जळवुन हा एक बदल होऊ शकतो.
पण मोगर्यावर कोण जळेल असे वाटत नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
4 May 2016 - 2:42 pm | नाखु
गाय आसरा कासरा असे हवे होते
हाय मोगरा हय ऐवजी धुंद असे हवे होते
असे मला वाटते असलेच पाहिजे असे नाही मी फक्त एक निरिक्ष्ण नोंदवले .
विसू पैजार बुवा का नीमो कोण नंबर लावेल ?
4 May 2016 - 2:49 pm | कानडाऊ योगेशु
येस. कासरा ही पहीली चूक.
और एक है!
धन्यवाद ना.खु.
4 May 2016 - 5:49 pm | चाणक्य
उत्तरा आणि वनवास ?
4 May 2016 - 5:55 pm | कानडाऊ योगेशु
येस. यु सेड इट सर!
तिथे उर्मिला हवे होते.(अर्थात त्यामुळे ती द्विपदीच ह्या पूर्ण कवितेत बसत नाही.संपादनाची सोय असली असती तर काढुन टाकता आली असती.)
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे धन्यवाद.
4 May 2016 - 9:40 pm | अभ्या..
वनावासाऐवजी अज्ञातवास करा, मग चालेल.
4 May 2016 - 10:49 pm | कानडाऊ योगेशु
अभ्या सूचना आवडली.
पण..
उत्तरा अभिमन्युची पत्नी होती आणि अभिमन्यु अज्ञातवासात गेला नव्हता. बहुदा तो तेव्हा सुभेद्रेसोबत द्वारकेला श्रीकृष्णाकडे रहात होता त्यामुळे अज्ञातवास ही घेता येणार नाही.
4 May 2016 - 10:57 pm | अभ्या..
उत्तर हा विराटाचा सुपुत्र आणि उत्तरेचा भाऊ, तोच तो बाबबाब रे, बालिश बहू बायकात बडबडला वाला. त्यांच्यमुळेच अज्ञातवासात असलेले पांडव प्रकट झाले, त्याला संबोधन उत्तरा असच होणार ना?
4 May 2016 - 11:03 pm | कानडाऊ योगेशु
येस्स्स्स!
खतर्नाक रे अभ्या.
मी बालीश उत्तरा ला कसा काय विसरलो ?
अजिबात डोक्यात आला नाही तो.!
अज्ञातवास चालतोय शब्द इथे.
प्रचंड धन्यवाद!