बेधुंद (भाग ४ ) :
(बऱ्याच दिवसाने लिहितोय, कामाचा व्याप जरा जास्त वाढलाय - टायपिंगच्या चुका पोटात घ्या :P )
मार्च २००६ :
चौघही विद्यापीठाच्या मुख्य गेट समोर बाहेर आली . रस्त्यावर मिळेल त्या गाडीची वाट बघत उभी राहिली . गेट च्या बाहेर वडापाव , मिसळ , भेळ , चहा इ . चे गाडे लागले होते . बऱ्याच विद्यार्थ्यांची वर्दळ होती , परीक्षेची वेळ असल्याने काही 'हुशार' विद्यार्थी हातामध्ये 'नोटस' घेऊन 'खाता -खाता' वाचत होते . चंद्यानेही हातामध्ये 'नोटस' आणल्या होत्या , तोही 'टोपर्स' पैकी एक होता . काही वेळाने एक वाळूचा ट्रक उभा राहिला अन ते सगळे मागे बसले . नित्या अक्षाच्या मांडीवर डोके ठेऊन वाळूवर पडला . त्याच्या हातावरील 'ब्लेड' ने कोरलेले ' H ' हे अक्षर बघून अक्षाला नित्याशी काय बोलावे हे कळत नव्हते .
'यार नित्या , समज की 'हर्षला 'आपल्या विद्यापीठात आली नसती तर …. ?
'तर काय …. ह्याने दुरारीला हर्षला बनवले असते …. हाहा ... चंद्या ने हसत उत्तर दिले .
'तू मार माझी … पण यार आज गेट वर 'पहिल्या वर्षाची ' पोर बघितली अन आपले ते दिवस आठवले …… !!!
मे २००२ :
बारावी झाल्यावर स्वप्नातलं कॉलेजच आयुष्य सुरु होत . स्वप्न अगदी साध-सुध असतं . एक सुंदर , देखणी 'मैत्रीण' असावी अन तिच्याबरोबर सगळ्या 'कॅम्पस' मध्ये सर्वासमोर छाती फुगवून फिरावं . पण 'स्वप्नात' अन 'अस्तीत्वात' अंतर असत ते 'वेदनेचं' ! त्या १८ -१९ व्या वयात ह्याची कल्पना खूप कमी असते , अन त्यात 'बॉलीवूड' ने अजूनच स्वप्नात भर पाडलेली असते . 'अक्षा' आपली सामानची पेटी घेऊन होस्टेल मध्ये पोहचला . होस्टेल मध्ये पहिल्या दिवशी सगळे अनोळखे चेहरे बाल्कनीत ओळख करण्यासाठी जमा होते . कुणी हसत बडबड करत ' 'नॉन - व्हेज ' जोक्स अन 'शेरो - शायरी' सांगत होता , तर कुणी ते गंभीर चेहऱ्याने ते ऐकत होता ! तर कूणी हसत होता !
'रैगींग' हे प्रकरण कायदेशीर बंद झालं असलं तरी ह्या विद्यापीठात चालूच होत . त्या वेळी नित्या , अक्षा , सुऱ्या , नित्या हे एकमेकांना ओळखत नव्हते ! प्रथम वर्षातील विद्यार्थ्याच्या मुलांसाठी एक विशेष 'हेअर कट ' होता . साधारण ५ सेंटीमीटर पेक्षा जास्त केस नकोत - माहित नाही कधीपासून हा नियम अस्तित्वात होता ! 'बाल्कनीत' नवीन चेहरे पाहून 'अक्षा' पुरता गडबडलेला होता . तो त्याच्या रूम मध्ये आला .
महाराष्ट्रात जिल्ह्याप्रमाणे माणसांचे प्रकार ! 'रूम्स' ची विभागणी ही बारावीत मिळालेल्या 'मार्क्स ' ने झाली होती . शिक्षण पद्धतीत मार्क्स ही ' जात 'आहे . ज्याला जास्त मार्क्स तो पहिल्यादा रूम निवडेल अन रूम पार्टनर ही मार्क्स च्या उतरत्या क्रमाने !
'मी सुजीत … सातारा , तुझा रुममेट' सुजीत ने अक्षा ला रुम मध्ये येताना पहिले अन हात पुढे करून अक्षाला स्मितहास्य केल
'मी अक्षय … सोलापूर ' - अक्षा ने मान हलवत आपले सामान खाली ठेवत उत्तर दिले
'तू कधी आलास इथं ?' -मला चार पाच दिवस उशीर झाला .कॉलेज सुरु झाला का प्रोपर ?' - अक्षा
'८-९ दिवस झाले मी आलो , घरी बोअर वाटू लागले म्हणून आलो लवकर- तर तेव्हा पासून वाट लागली आहे , १-२ दिवसापासून सुरु झालेत काही तास '
म्हणजे ? वाट ? - अक्षा
अरे इथं 'रैगींग' खूप भयाण आहे , हे बघ माझे केस , तुही उद्या कट करून ये … सुजीत डोक्यावरून हात फिरवत अक्षा शी बोलला .
अक्षा त्याच्याकडे बघत गालातल्या गालात हसला - 'पण ह्या 'हेअर स्टाईल 'च नाव काय ? '
'काय माहित यार - बाहेर गेट वर 'सलून' मध्ये जा अन त्यांना सांग 'फर्स्ट एअर' चा कट मारा , ते मारतील - 'बहुतेक सिनिअर्स ना आपल्या क्लास मधल्या पोरी 'पटवायच्या' असतील म्हणून सगळ्या फर्स्ट एअर ला हा अवतार करायला सांगत असतील बहुतेक ! - सुजीत थोडंस वैतागत बोलला .
'हाहा - पण 'रैगींग' ? आज पर्यंत पेपरमध्ये वाचाल होत . बंद झालाय ना ते कायदेशीर ?'
'कसलं बंद ? चालू आहे इथं ! पण बरेय की 'रैगींग' फक्त 'मेस' मध्ये होत . बाकी कॉलेज मध्ये नाही - रेक्टर सहसा मेस मध्ये येत नाहीत म्हणून मेस मध्ये ! , अन कुणी सिनिअर समोर आला कि त्यांना विश कर - सर म्हण त्यांना ! - सुजीत
'ह्म्म... पण 'रैगींग' म्हणजे नक्की काय करतात ? 'अक्षा च्या मनात 'धडधड' अन 'उत्सुकता' बरोबर संतुलित होती .
'कळेल तुला , संध्याकाळी मेस मध्ये गेल्यावर , चल मी बाहेर जातोय … भेटू नंतर - अन सुजीत बाहेर गेला
अक्षा ने मान हलवली अन कोण कोण इथं सोलापूर चे आहेत हे शोधायला /ओळख करायला रुम च्या बाहेर आला . तसा त्याला एक सुखद धक्का बसला . त्याने चंद्या ला पहिले . दोघंही बारावीत एकाच कॉलेज मध्ये होती -ह्या अनोळाखी जगात एक जबरदस्त विसावा मिळाला ! फरक एवढा की चंद्या ९० % पेक्षा जास्त मार्क्स घेऊन आल्याने होस्टेल मध्ये त्याची 'लॉबी' दुसरी होती . दोघांना एकमेकांना बघताच बरे वाटले . माणसाच मन हे इतकं विचित्र आहे की , आपला 'जिल्हा' सोडला कि तो आपोआपच आपल्या जिल्ह्यातील लोकं शोधायला सुरुवात करतो , अन नाही सापडली तर आपल्या जातीतील लोकांना भेटलं कि त्याला बर वाटत , आपलंस वाटत !
धकधक करत शेवटचे संध्याकाळचे सात वाजले . होस्टेल वरती खालच्या 'फ़्लोर' ला सेकंड एअर अन 'वरच्या फ़्लॊरला' सगळे First year राहत असे ! 'तिसऱ्या' अन 'चौथ्या' वर्षाचे विद्यार्थी थोडे दूर असलेल्या होस्टेल मध्ये राहत असत ! होस्टेल मध्ये राहण अनिवार्य होत . सगळे नवीन विद्यार्थी एका रांगेत खाली TV हॉल मध्ये आले ! सगळ्यांचे केस कापलेले ! सगळ्यांनी फ़ोर्मल -ड्रेस , shirting - जसे सगळे एखाद्या 'मुलाखतीला' जात आहेत ! 'TV हॉल' मध्ये 'शिवाजी महाराजांच्या' राज्याभिषेकेचा एक मोठा फोटो होता . पहिले बूट 'TV हॉल' च्या बाहेर काढायचे ! सगळ्यांनी एकेक करून रांगेत त्यांच्या फोटोला पाच वेळा मुजरा करायचा मग पाच पावले मागे जायचे अन मग मागे वळून बूट घालून , मान खाली घालून मेस मध्ये जायचे ! मेस मध्येही अजून एक 'राजेंचा' सारखाच फोटो मग सारखीच पद्धत मुजरा घालण्याची ! फोटो खाली काही सिनिअर्स जेवत असताना - ते शिवाजी महाराजासारखे बसत आणी मुजरा स्वीकारल्यासारखे करत ! हे बघून हसू आवरत नसे , पण हसता येत नव्हते ! सगळे 'गुलाम' अपोपाच झाले होते - का माहित नाही - भीती ? कॉलेजचा ह अप्रतेक्षिक नियम होता कि फक्त मेस मधेच त्रास होईल , मेस च्या बाहेर आला कि कोणी सेनिअर कुणाला काही बोलायाचा नाही . मेस मध्ये मुजरा झाल्यावर सगळे एका रांगेत आपापले जेवण घेण्यासाठी उभे !
मेस मध्ये खूप गोंधळाला उधान ! ' ये आया मेरा नया बकरा ' ये आईटम - खाली बघ - नजर pant च्या 'चैन' कढे ठेव ! असा आवाज..!
अक्षाच्या मनात धडधडायला लागलं पण उत्सुकता हि तेवढीच होती . आपले ताट घेऊन तो जेवणाच्या टेबल कडे गेला . कोणी सिनिअर समोर आला कि उभा राहून त्याला 'गुड मोर्निंग , गुड एविनिंग ' इ वेळेप्रमाणे करायचं ! पण मान खालीच ठेवायची ! काहीजण बरोबर दुपारी बारा वाजता समोर यायचे मग 'गुड मोर्निंग सर ' की ' गुड आफ्टरनून सर ' म्हणायचं कळायचं नाही - सिनिअर्स मज्जा घ्यायचे !
अक्ष्या च्या शेजारी सुऱ्या बसला होता . कोणीतरी सुऱ्या च्या समोर आला पण सुऱ्या उठला नाही !
' काय xxx … कळत नाही का उभा राहायचा … ? एक रांगडा आवाज अन त्याचा हात सुऱ्याच्या डोक्यावर, तो हाताने त्याचे डोके दाबत ' खाली XXX कडे बघ' असा ओरडत बोलला .
'हो सर … ' सुऱ्या ने घाबरत उत्तर दिले
नाव ?
'सुरेश …'
'फक्त सुरेश , बाप नाही काय ? '
सुऱ्या ने त्याच पूर्ण नाव सांगितलं
'चल मला एक अशी गोष्ट सांग कि माझी 'थम्स अप ' ची बाटली इथेच फुटली पाहिजे …
'म्हणजे … ?' सुऱ्या
काय म्हणजे … 'हैदोस' वाचला नाही का कधी ? बर सोड एक जोक सांग
सुऱ्या जोक सांगू लागला .
अक्षा गाण म्हणत नाचत होता . एक वेगळाच धिंगाणा होता मेस मध्ये ! कोणी 'चालू घडामोडींचे ' चे प्रश्न विचारात होता , कोणी एखादी 'भौतिक शास्त्रातील ' मधली एखादी थेअरी समजून सांगायला लावत होता . सेनिअरच चरित्र त्याने विचारलेल्या प्रश्नाने झळकत होत !
कोणी 'कुणाला बाईक' चालवायची नक्कल करायला लावत होता . कोणी हा तुझा नवरा अन त्याची सेवा कर असे प्रसंग देत होता !
एकजण अक्षयच्या समोर आला -अक्षय नाचता नाचता गुड 'आफ्टरनून सर ' बोलला
'तुला आत्ता राग येतोय , खर सांग ! ' - एक सीनिअर हसत बोलला
'नाही सर ' - अक्षा
'येतोय । अरे घाबरू नको … खर सांग '
हो , येतोय - अक्षा ने मान हलवून उत्तर दिले
मग आला तरी काय 'उपटणार ' आहेस काय ? - अन तो जोरजोराने एकटाच हसू लागला - 'बर राग येतोय तर बाहेर काढ ,वर बघ अन ह्या पंख्याला शिव्या दे '
अक्षा ने वर पंख्याकडे बघितले - 'सर , मी शिव्या देत नाही '
'ओये होये … राजा हरिश्चंद्र बाहेर या तुम्ही … अजून २-३ सिनिअर्स जमा झाले … यार हा शिव्या देत नाही ! 'मुव्हीस ' बघतो का ? - दुसऱ्या ने विचारले
'जास्त नाही सर - कधीकधी - वर्षात एक दोन वेळा' - अक्षा
'जास्त नाही म्हणजे , लास्ट टायम कोणता बघितला '
'चांदणी बार "
'हा हा हा' - सेनिअर्स च्या हास्याला सीमा उरली नाही - अरे ह्याच्याकडे बघा - 'हा मुव्हीस बघत नाही , वाईट शब्द बोलत नाही , अन लास्ट मुव्ही ' चांदणी बार ' 'हा हा हा' - सगळे हसायला लागले .
' सर , चांगला सिनेमा आहे तो , राष्ट्रीय पारितोषिक मिळालाय त्याला !
'आयला - हे काय कामच नाही , जा बस - ' अस म्हणून सिनिअर्स त्याच्यापासून निघून दुसरा 'बकरा ' शोधायला गेले !
अक्षाने हलकेच नजर चुकवून जेवता जेवता वर बघितले -
चंद्या बाईक चालवायची अक्टिंग करत पळत होता !
'अबे चावी कोण लावणार ? किक कोण मारणार ? चालला लगेच बाईक चालवायला , जा परत . '
चंद्या परत मागे गेला , बाईक बाहेर काढायची अक्टिंग केली , चावी लावली , किक मारली अन पुन्हा पळू लागला .
'ओये थांब , ही तुझी बायको आहे , तीला मागे बसव अन जा - एक सिनिअर मध्येच त्याला आडवत बोलला ,अन त्याने सुजीत ला चंद्या ची बायको ह्यायला सांगितले , सुजीतने बाईकच्या दोन पाय दोनीकडे ठेऊन बसतात तसं मागे बसल्यासारख केल.
'अरे , बायका बसतात तसं बसं … एका बाजूला दोन्ही पाय ठेऊन - मी तूला त्याची 'बायको' ह्यायला सांगितलंय , 'गर्लफ्रेंड 'नाही !
सुजीत एका बाजुले दोन पाय ठेऊन , थोडासा वाकून , हात चंद्या च्या खांद्यावर ठेवून - चंद्या च्या मागून पळू लागला - तबाकीचे सगळे हसत होते !
मधेच एकजन आला , 'चल मी ट्राफिक पोलिस आहे ड्रायविंग लायसन्स दाखव … '
' नाहीये माझ्याकडे सर ' - चंद्या
नाहीये तर मग - बायकोला मारणार का ? - जा जेव !
तसे दोघे परत आपल्या जागी येउन जेवू लागले !
दिवसावर दिवस जात होते , पण हे चक्र चालुच होत ! सकाळी क्लास - दुपारी मेस - नंतर क्लास - संध्याकाळी मेस - मेस मधले ते 'दोन तास' २ जन्माच्या बरोबर असत ! जुनिअर्स ची 'मान अन मन' खाली बघून बघून अवघडून जात असे ! सुरुवातीला अवघड वाटणारी अन त्रासदायक वाटणारी 'रैगींग' अजुनच त्रासदायक वाटू लागली होती ! पुण्यातल्या 'सतीश' अन 'तात्या' दररोज रडल्याशिवाय बाहेर सुटका नव्हती , अपमान सहन करण्याची ताकद प्रत्येकाची वेगळी असते ! अन सह्न नाही झाले की ते रड्त असत ! ते रडले की कोणीतरी दुसरे सेनिअर्स येयून त्यांची समजूत काढत असत - 'अरे रडतोय काय मी पण पुण्याचा आहे' - आम्हीही होतो First year ला - जास्त लोड नाही घ्यायचा !
कुणी कुणाला' नॉन -व्हेज ' जोक्स सांगायला लावे , तर मुलींचे Bio - Data आणायला सांगे ! काहीजण खरेच चांगले होते की दिखावा करत काय माहीत ? ,जास्त torture होतंय असा झाला कि समजवायला लागायचे ! तुम्ही आता-आता घर सोडलं आहे , 'होम सिकनेस' , घराची आठवण 'रैगींग' मुळे विसरून जाल ! आम्ही काय तुमचे दुश्मन आहोत का ? '
पण काहीही असो 'रैगींग ने त्यांना 'बोल्ड ' केलं होत ! काहीच्या काही प्रश्न ! 'तुझी उंची किलोमीटर मध्ये सांग ?' 'First year मध्ये सगळ्यात hot पोरगी कोण आहे ?' तिची साईज बरोबर सान्ग … अन 'अस्शीलतेलाही लाजवेल ' असले भयानक प्रश्न !
काही सिनिअर्स विचित्र होते , मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून ही द्यायचे ! अजीत त्यापैकी एक होता ! पहीलवान, रांगडा !
ह्या 'रैगींग' ने अक्षा , सुऱ्या , तात्या , चंद्या अन नित्याला जवळ आणले ! खूप कमी चित्रपट बघितलेले तात्या अन अक्षा आता गाणी पाठ करू लागले होते . काहीही केले तरी हि परंपरा बंद करता येण शक्य नव्हत ! कुणा कधी काळी एका आमदाराच्या नातेवाईकाणे पोलिसामध्ये तक्रार केली होती, मंत्र्यापर्यंत केस गेली होती , कोणत्याच सिनिअर वर काहीच परिणाम झाली नाही - उलट त्या आमदाराच्या नातेवाईकाला विद्यापीठ सोडून जावे लागले होते - अशी गोष्ट इथं बऱ्याचदा ऐकायला मीळत असे ! ' विद्यार्थी परिषेदेत ' खूप ताकद होती , विद्यार्थ्यांची एकता अफाट ! त्यामुळे तक्रार करून तरी उगाच आपल्याला त्रास अन सगळे सिनिअर्सशी 'दुश्मनी' कशाला ? सगळे आपल्याविरुद्ध उभे राहिले तर आपल्यालाच कॉलेज सोडून जावे लागेल - काही दिवसांनी हे बंद होईलच ! - अस बोलून सगळे आपल्या मनाची समजूत काढून दिवस सारत होते!
कधी कधी मेस मध्ये ' रेक्टर' ची फेरी होत असे तेव्हा सगळ 'नॉर्मल' आहे असं दाखयायचं ! जसजसा वेळ जाऊ लागला तस काही चांगले सेनिअर्स अक्शाचे मित्र बनू लागले ! पण त्याला 'रैगींग चा वीट यायला सुरुवात झाली होती . कधी हे सगळ संपेल - अन मनाला वाटेल तसे आपण वागू असे वाटू लागले होते .स्वातंत्र हिरवून घेतलं होत ह्या' रैगींग' ने …!
जवळपास एक महिना उलटला होता . एक दिवस दुपारीमेस मध्ये जेवताना नेहमीप्रमाणे सुरु झालं .
एक सेनिअर - अजित सर, 'सुऱ्या' च्या जवळ आला अन बोलला - ' उठ अन जा त्या दुसऱ्या सिनिअर्स ची xxx मारून ये ।
सुऱ्या आधीच वैतागला होता . तो ही सरळ जाऊन त्या सेनिओर्स च्या मागे काही अंतरावर उभा राहिला अन कंबर मागे -पुढे करू लागला, सगळेजण जोराने हसू लागले , तस त्या सेनिअर ने मागे वळून 'सुऱ्या' च्या कानफडात वाजवली .
हे बघून अजित हि जवळ आला अन सुऱ्या ला बोलला कि , 'तुला सेनिअर ' ची इज्जत नाही का करता येत?'
सुऱ्या कसाबसा उभा राहिला … अन अजित ने अजून एक त्याच्या कानफडात वाजवली !
नेहमीच' मस्तीच' वातावरण आज दोन सण-सण आवाजाने जास्तच 'तापल' होत !
आत्ता मात्र कळस झाला होता , सगळं सह्ण्याचा , सुऱ्या एका कानफाडीत खाली पडला !
तो उठला अन त्याने 'बेहेन्चोद' अस ओरडून 'अजित सर ' च्या पोटात जोराची लाथ मारली अन 'अजित' ४-५ फुट दूर जाऊन पडला ! हे बघून २-३ सेनिओर अजून एकत्र झाले अन सुऱ्या ला मारू लागले , काही सोडवू लागले , नित्या हे सगळ बघत होता क्षणातच नित्या सुऱ्या च्या मदतीला गेला , वरून शिव्या देत लाथा मारू लागला ! अक्षा , तात्या अन चंद्या घाबरून गेले , तिघेही उठले अन मध्ये पडले . ८- १० मिनिटाने 'पाचही' जण मेस च्या बाहेर आले अन सरळ ३००-४०० मीटर दूर असलेल्या 'रेक्टर' ऑफिस कडे धावत सुटले .त्या दहा मिनिटाने विद्यापीठाचा इतिहास बदलून टाकला . आजपर्यंत कोणत्याही ज्युनिअर ने सिनिअर ला 'रैगींग' चालू असताना मारण्याचा पराक्रम केला नव्हता ! बाकीचे सगळे 'गुलाम' जागच्या जागी खीळ ठोकून बसले होते !
शेवटच्या वर्षात असेलेले विद्यार्थी परिषदेचे 'चेअरमन ' अन अजून ५-६ विद्यार्थी मागून आवाज देऊन ओरडत होते की - 'रेक्टर कडे जाऊ नका भडव्यानो …. चार वर्ष राहाचय तुम्हाला ह्या कॉलेज मध्ये …. !!!'
(क्रमश :)
बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006