सुंदर चित्रं पहायला मला बरं वाटतं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
18 Sep 2008 - 9:39 pm

त्याचं असं झालं,मी निलकंठ केळकरांकडे माझ्या इनकमटॅक्सच्या काही कामा करता गेलो होतो.त्यांच्या ऑफिसात तशी बरीच गर्दी होती.मला जवळ बोलावून ते मला म्हणाले,
"तुम्ही घरात जाऊन बसा.ह्या सर्व कस्टमरांची सोय लावून मग मी आत येतो.आमाची संध्या नागपूरहून थोडे दिवस माहेरपणासाठी आली आहे.तिच्याशी थोड्या गप्पा मारा. कालच ती तुमची आठवण काढून तुमची विचारपूस करीत होती."
बरेच दिवस दिवस माझी आणि संध्याची भेट झाली नव्हती.एकदा आमच्या घरीपण ये असं मला तिला आमंत्रण पण द्दायला मिळणार असा विचार करून मी त्यांच्या घरात गेलो.

संध्या लहान असताना जरा मंद विचाराची वाटायची असं लोक म्हणायचे.पण आता ती बरीच सुधारली होती.तिचं लग्न होऊन दोन सुंदर मुलंपण तिला झाली होती.नवरा तिकडे नागपूरला एका बॅंकचा मॅनेजर होता.
मी संध्याला विचारलं,
" आता तुझं कसं चाललं आहे?"
मला म्हणाली,
"आता मी पूर्वीची राहिले नाही.लहानपणी मला कुणी जर सांगितलं,
"अमुक अमुक गोष्ट सिद्ध करून दाखव" आणि मी ते सिद्ध करायला सरसावले तरच इतराना वाटायचं मी नॉरमल आहे.पण मी तसं करायला कधीच जात नव्हते.नव्हे तर तसं करण्यात मला स्वारस्यच वाटत नव्हतं.
कारण प्रत्येक गोष्ट मी त्याचं एक सुंदर चित्र मनात आणून त्याकडे बघायची.ही माझी संवय मला आवडायची."

लहानपणापासून मला प्रत्येक गोष्ट अशा तर्‍हेने बघायची संवय झाल्याने एखादी गोष्ट प्रत्यक्ष मनात त्याचं चित्र आणूनच मग मी ठरवते.मला कल्पना करून काही सुचत नाही.म्हणून मी चित्र आणि आवाज ह्याचा विचार करूनच काही गोष्टी डोक्यात आणते.तुम्ही जशा कल्पना करता तसं मला जमतच नाही.
माझा मेंदु कसा चालतो ते तुम्हाला सांगते.गुगल मधे सर्च-इंजीन कसं काम करतं?तुम्ही जर "प्रेम"हा शब्द मला दिला,तर मी माझ्या मेंदुतलं महाजाल वापरायला लागते.त्यामुळे माझ्या डोक्यात एका मागून एक चित्र यायला लागतात.एक मांजराचं पिल्लू त्याच्या आईच्या कुशीत झोपलेलं डोक्यात येतं.किंवा एखाद्दा हिंदी चित्रपटातलं गाणं हिरो हिरोईनच्या मागे धावत आहे असं दिसतं.

लहाणपणी माझे आईबाबा चांगलं आणि वाईट या मधला फरक मला एखादं उदाहरण देऊन दाखवायचे.जसं,माझी आई म्हणायची,
"तू तुझ्या शाळेत तुझ्या बरोबरच्याना मारत नाहीस कारण त्यानी तुला फिरून मारलं तर आवडणार नाही."
ह्याचा अर्थ कळण्यासारखा आहे.पण माझ्या आईने मला,
"एखाद्दाशी चांगलं वागावं"
असं सांगितलं तर मला ते कळायला जरा जड जायचं. पण कुणी मला जर सांगितलं,
"कुणाला जर का फूल द्दावं"
तर त्यातून मला अर्थ कळायचा.
अशा तर्‍हेने मी माझ्या डोक्यात एक अनुभवाची लायब्ररी तयार करून नव्या प्रसंगी त्या लायब्ररीतून संदर्भ घ्यायची.त्यामुळे मला एखाद्दा प्रसंगाला तोंड द्दावं लागलं तर मी ह्या लायब्ररीचा उपयोग करून योग्य तो मार्ग काडून नव्या विचित्र परिस्थितीला सामोरी जायची.

जेव्हा मी मोठी झाले.म्हणजे जवळ जवळ विसएक वर्षाची झाले,तेव्हा जीवनचा अर्थ काय ह्याच्यावर खूप विचार केला.ह्या वयात मी माझ्या करियरची सुरवात केली होती.मला वाटतं काही तरी प्रॅकटीकल गोष्ट करून दाखवण्यात आयुष्याला काही अर्थ येतो.आणि माझ्या ह्या समस्येमुळे बरीच माहिती लक्षात घेऊन त्याचं एखादं चित्र डोक्यात तयार करण्यात मी वाकबगार झाले.

एका संस्थेला वृद्धाश्रम बांधायचा होता.मला माझ्या एका मैत्रीणीकडून याचा सुगावा लागला होता.तिच्या तर्फे मी त्या संस्थेच्या डायरेक्टरांची भेट घेऊन प्रत्येक वृद्ध व्यक्ती ज्या खोलीत आपलं वास्तव्य करणार असतील त्यांच्या खोलीची सजावट करण्याचं प्रोजेक्ट माझ्यावर घेतलं.

वृद्ध व्यक्ती,तिच्या रोजच्या जरूरीच्या वस्तु, रात्री झोपण्याची तिची जागा,तिचा बिछाना,जवळपास भिंतीवर एखादं देवाचं किंवा देवीचं चित्र,मदतीला जरूर लागल्यास कुणालाही बोलवण्यासाठी लागणारी घंटा,रात्रीची तहान लागल्यास एखादा तांब्या आणि
त्यावर फूलपात्र,ताज्या फुलांनी सजवला जाणारा एक फ्लॉवर- पॉट,अशा काहीशा गोष्टी मी त्या वृद्ध व्यक्ती आणि तिच्या गरजा ह्याचं चित्र डोक्यात आणून मग तयार करू शकले.

हे सर्व झाल्यावर प्रत्यक्ष जेव्हा त्या आश्रमात लोक येऊन राहू लागले त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर आलेलं समाधान बघून मला काही तरी माझ्या मनात महत्वाचं मिळवल्याचं समाधान दिसू लागलं.

म्हणून मी म्हणते,
" प्रत्येक गोष्ट मी त्याचं एक सुंदर चित्र मनात आणून त्याकडे बघते.ही माझी संवय मला आवडते."
हे तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो,
"संध्या,तूं जे मला आता सांगितलंस त्यावरून मला असं वाटतं,की हे सगळे मेंदूचे खेळ असावेत.सर्वानीच इतरांसारखं असायला हवं असं काही नाही असं मला वाटतं.तुझ्या परीने तूं जर तुझे प्रश्न सोडवत असशिल आणि त्यासाठी तुला ती संवय चांगली वाटत असेल.तर त्यात गैर असं काहीच नाही असं मला वाटतं."
असं म्हणे पर्यंत केळकर आपलं काम आटोपून घरात आले.मी आणि संध्याने हा विषय थांबवला आणि मी केळकरांना माझी इनकमटॅक्सची फाईल देत दुसर्‍या विषयावर बोलू लागलो.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 1:56 am | क्रेमर

हे लेख म्हणजे मेजवानीच असत असे.

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

मीनल's picture

23 Jul 2010 - 3:07 am | मीनल

खूप दिवसांनी आपले लेखन वाचायला मिळाले. खूप बरे वाटले .
लिहित रहा.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

शिल्पा ब's picture

23 Jul 2010 - 3:09 am | शिल्पा ब

लेख छान आहे...हे मेंदूचे खेळ म्हणजे मेंदू अशाप्रकारे काम करतो असे म्हणायचे आहे का?
बाकी कोणी कोणती गोष्ट कशी डी कोड करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न...नाही का?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/