चारोळी म्हणजे काय? कविला पडले कोडे
दुकानात जाउन त्यानं मागितले थोडे.
दुकानदार शहाणा ,दिले शब्दांचे बुडबुडे
म्हणाला ,चारच ओळीत बांधावे पुडे
सांत्वनाची असेल भाषा
तरच आपली व्यथा सांगावी,
नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा
तर आपण मिठाची गुळ्णी धरावी.
ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात
मी वेलींसाठी बांधिन ग,
ते मोत्यांसाठी शिंपले आणतात
मी अश्रुंसाठी आणिन ग.
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 10:29 pm | मनीषा
ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात
मी वेलींसाठी बांधिन ग,
ते मोत्यांसाठी शिंपले आणतात
मी अश्रुंसाठी आणिन ग. .....................आवडली !
18 Sep 2008 - 11:27 pm | प्राजु
अतिशय सुरेख..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Sep 2008 - 7:08 am | फटू
सांत्वनाची असेल भाषा
तरच आपली व्यथा सांगावी,
नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा
तर आपण मिठाची गुळ्णी धरावी.
ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात
मी वेलींसाठी बांधिन ग,
ते मोत्यांसाठी शिंपले आणतात
मी अश्रुंसाठी आणिन ग
खुपच अर्थपुर्ण आहेत या चारोळ्या...
(या दोन सुंदर चारोळ्यांच्या आधी "रद्दी" चारोळी का बरे लिहिली असावी :? )
(आपलाच, र ला र आणि ट ला ट जोडून चारोळ्या पाडणारा)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
19 Sep 2008 - 12:21 pm | मदनबाण
चारोळ्या आवडल्या..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda