साताजन्माचा वनवास..!

पारोळेकर's picture
पारोळेकर in जनातलं, मनातलं
18 Sep 2008 - 6:09 pm

साताजन्माचा वनवास..!

मला वाटत होतं...
ती माझीच होईल, या जन्मात
ती डोळ्यासमोरून निघून गेली...
मी राहिलो तिला पाहत!

थांबविण्याचा प्रयत्न करू किती
ते होण्यासारखं नव्हतं
कारण, तिच्या गळ्यात
दुसऱ्या कुणाचं 'मंगळसूत्र' होतं!

मी मनात म्हटलं, 'तू ह्या नाही तर...
पुढच्या जन्मात माझीच होशील..! '
पण, मन माझं खट्याळ! मला म्हणालं,
'तू नुसता बघतच राहशील..! '

सत्य स्वीकारण्याची
माझी हिंमत होत नव्हती...
कारण, ती माझीच आहे!
अशी वाटत होती..!

एकदा वाटलं...
सांगून टाकावी तिला व्यथा माझी!
अरे... पण आश्चर्यच ती वळून हळूच म्हणाली,
'होऊ देत सातजन्म मी होईल फक्त तुझी..! '

किती वेळ केला मी...
तिला सांगून टाकण्यात
म्हणून का मिळावे मज
सातजन्म वनवासात...!

-संदीप पारोळेकर

प्रेमकाव्यलेख

प्रतिक्रिया

विकी शिरपूरकर's picture

18 Sep 2008 - 9:33 pm | विकी शिरपूरकर

छान आता इथे का