काल घरी गेल्यावर चॅनेल सर्फिंग करताना स्टार माझावर अत्यंत महत्वाची बातमी दाखवत होते. त्यात सायली दातार व श्री. मेहेंदळे यानी लंडन मधील जुन्या वृत्तपत्रांच्या अर्काईव्ह मधील शिवाजीमहाराजांच्या काळात प्रकाशीत झालेल्या प्रतींमधून शिवाजीराजांविषयी प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा मागोवा घेण्याच्या उपक्रमाबद्दल माहीती दाखवित होते. हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून त्यामुळे शिवरायांबद्दल त्यावेळच्या इंग्लंडमधील लोकांचे (त्रयस्थ देशातील)काय मत होते ते कळेल. सर्वप्रथम या उपक्रमाबद्दल दोन्ही संशोधकांचे अभिनंदन. यात दोन्ही संशोधकांनी प्रकर्षाने व्यक्त केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे.
१. ग्रेगरीयक कॅलेंडरमुळे तारखा वेगळ्या असण्याची शक्यता आहे.
२. शिवाजी महाराजांचा तेथील बातम्यांमधे कायम बंडखोर (rebel) असा उल्लेख केला आहे.
३. शिवाजी महाराजांचा शम्भूकालात राजा शिवाजी असा आणि संभाजीराजांचा प्रिन्स असा उल्लेख केला गेलेला आहे.
४. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी १ पेक्षा अधिकवेळा दिली गेलेली आहे.
५.शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेतील जनता शिवाजीला भिते असा उल्लेक केला आहे. पण आग्र्याहून सुटून आल्यानंतर मात्र शिवाजी हेच खरे भूमिचे राजे आहेत असा उल्लेखही केला आहे.
६. शिवाजी महाराजांनी सुरत एकूण ३ वेळा लुटल्याच्या बातम्याही दिल्या गेलेल्या आहेत.
७. शिवाजी महाराजाना औरंगजेबाने कैद केल्याची बातमी आणि शिवाजी महाराजांच्या सुटकेची बातमीही दिली गेलेली आहे.
८. विषेश म्हणजे टोपीकर इंग्रज शिवराज्याभिषेकाला उपस्थित असूनही याबद्दलची बातमी कोठेही नसल्याचे संशोधकाना आढळले आहे.
यावृत्तपत्रांतील बातम्यांसाठी सुरत वखारीचा प्रेसिडेंट, दिल्लीतील इंग्रज वकील अशा विविध अधिकार्यांच्या पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे. या उपक्रमात 'लंडन गॅझेट' या वृत्तपत्राच्या तत्कालीन आवृत्त्यांचा आधार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक वृत्तपत्रांचा अभ्यासही या दृष्टीकोणातून होत आहे. त्या काळात इंग्लंडमधे एकूण ४२ वृत्तपत्रे असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे. या उपक्रमामुळे शिवचरित्रावर आणखी प्रकाश नक्कीच पडेल असे वाटते. दोन्ही संशोधकाना पुढील संशोधनासाठी अनेक शुभेच्छा.
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर
इतके असून आजतागायत आपल्या इतिहास संशोधकांनी ही माहिती कशी नाही मिळविली? आजवरच्या इतिहासाच्या कादंबर्यांच्या संदर्भसूचींमध्ये इंग्रजी वर्तमानपत्रांचा दाखला कोणी दिलेला आढळला नाही.
18 Sep 2008 - 3:17 pm | भडकमकर मास्तर
उपक्रमामुळे शिवचरित्रावर आणखी प्रकाश नक्कीच पडेल असे वाटते.
मीहे संशोधकांचे अभिनंदन करतो..परंतु
यातून नवीन काय माहिती हाती लागली आहे किंवा लागणार आहे, याबद्दल मी खूप साशंक आहे...
काल बातम्या पाहताना मलाही आधी खूप आनंद झाला..
पण आनंद का बुवा झाला असा विचार करता करता मला थोडे वाईटही वाटले की फक्त त्यांनी मान्यता दिली म्हणून राजे मोठे असं आपल्याला वाटतंय की काय?
गॅझेटात उल्लेख नसता तर राजे छोटे होतात की काय? किंवा उद्या त्यात राजांचा शत्रू या अर्थाने काही वाईट उल्लेख असला तर आपण तो अर्थातच मानणार नाहीच्....मग संशोधनाचं कौतुक का बरं?
यातून इतके एक्साईट होण्यासारखे काय आहे तेच मात्र समजत नाही......
शिवाजी महाराज की जय...!
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Sep 2008 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll
खरेतर एक्साईट होण्याचे कारण नाही हे आपले म्हणणे बरोबर आहे. पण एक्साईट होण्याचे कारण म्हणजे
१. शिवाजी महाराज शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूच्या खोट्या अफवा उठवत आणि शत्रूची सावधानता थोडी जरी कमी झली तरी संधी साधून त्याला चारीमुंड्या चीत करत. इंग्रजी वृत्तपत्रातून शिवरायांच्या मृत्यूची बातमी एकापेक्षा अधिक वेळा प्रसारित होणे हे यशस्वी कूटनीतिचे लक्षण आहे असे वाटते.
२. शिवाजीमहाराजांबद्दलचा आदर उत्तरोत्तर इंग्रजांच्यात वाढत गेला कसा याचेही उदाहरण मिळाले. एक्साईटमेंटचे खरे कारण वरील सर्व गोष्टीना एका अर्थाने पुरावे उपलब्ध झाल्यासारखेच आहे हे आहे.
पुण्याचे पेशवे
18 Sep 2008 - 3:40 pm | पंकज
त्यांनी मान्यता दिली म्हणून राजे मोठे असं आपल्याला वाटतंय की काय?
शत्रूकडून मान्यता मीळणे...तीदेखील ब्रिटिशांसारख्या...एक्साईट होण्यासारखे नाहि का?
18 Sep 2008 - 3:53 pm | भडकमकर मास्तर
तीदेखील ब्रिटिशांसारख्या
नाही बुवा वाटत....
...
अशा मान्यतेची त्यांना गरज आहे असे आपल्याला का वाटावे ?
असो... आमचे मत आम्ही मांडले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Sep 2008 - 3:28 pm | सुनील
१. ग्रेगरीयक कॅलेंडरमुळे तारखा वेगळ्या असण्याची शक्यता आहे.
इंग्लंडने ग्रेगरिअन कॅलेंडर १७५२ ला म्हणजे जवळ जवळ २०० वर्षांनंतर स्वीकारले. तोवर त्यात ११ दिवसांचा फरक पडला होता. माझ्या माहितीनुसार सर्व भारतीय इतिहासकारांनी याची नोंद घेतली होती. त्यामुळे यापुढे तत्कालीन तारखांत फरक पडेल असे वाटत नाही.
२. शिवाजी महाराजांचा तेथील बातम्यांमधे कायम बंडखोर (rebel) असा उल्लेख केला आहे.
३. शिवाजी महाराजांचा शम्भूकालात राजा शिवाजी असा आणि संभाजीराजांचा प्रिन्स असा उल्लेख केला गेलेला आहे.
क्रमांक २ आणि ३ यांचा एकत्र विचार केलात तर अर्थ लागू शकेल. राज्याभिषेक होण्यापूर्वी इंग्रजांनी शिवाजीचा उल्लेख "रेबेल" असा करण्यात गैर वाटत नाही. राज्याभिषेकानंतर मात्र त्यांचा उल्लेख "राजे" असा केला आहे, हे उत्तम.
४. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी १ पेक्षा अधिकवेळा दिली गेलेली आहे.
अशा वावड्या मुद्दामून उठवल्या गेल्या, असे वाचल्याचे आठवते.
५.शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेतील जनता शिवाजीला भिते असा उल्लेक केला आहे. पण आग्र्याहून सुटून आल्यानंतर मात्र शिवाजी हेच खरे भूमिचे राजे आहेत असा उल्लेखही केला आहे.
उत्तम!
६. शिवाजी महाराजांनी सुरत एकूण ३ वेळा लुटल्याच्या बातम्याही दिल्या गेलेल्या आहेत.
कल्पना नाही.
७. शिवाजी महाराजाना औरंगजेबाने कैद केल्याची बातमी आणि शिवाजी महाराजांच्या सुटकेची बातमीही दिली गेलेली आहे.
वृत्तपत्राचे कामच आहे ते, नाही का?
८. विषेश म्हणजे टोपीकर इंग्रज शिवराज्याभिषेकाला उपस्थित असूनही याबद्दलची बातमी कोठेही नसल्याचे संशोधकाना आढळले आहे.
आश्चर्य आहे!
असो, ब्रिटिश वृत्तपत्रे हेदेखिल इतिहासाचे एक उत्तम साधन आहे, हे यानिमित्तने लक्षात आले. यापूर्वीच्या इतिहासकारांनी ब्रिटिश अधिकार्यांच्या नोंदी, इस्ट इंडिया कंपनी तसेच ब्रिटिश सरकारी कागद्पत्रे यावर संशोधन केले होतेच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Sep 2008 - 10:31 pm | प्रविन नामदेव सोनवने
या पेपर ची प्रत माझे कड आहे
pnsonavane@yahoo.co.in
19 Sep 2008 - 10:33 pm | प्रभाकर पेठकर
स्कॅन करून मिपावर टाका. वाचायला आवडेल.
20 Sep 2008 - 1:02 am | ब्रिटिश टिंग्या
येथे वाचायला मिळतील -> http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3499849.cms
19 Sep 2008 - 10:36 pm | प्राजु
कोण्याही वृत्तपत्राच्या पुराव्याची गरज नाही मग ते इंग्रजांचे असले तरी.
उपक्रम स्तुत्य इतकंच मी म्हणेन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Sep 2008 - 1:15 am | आजानुकर्ण
चुकून झाले असावे असे वाटते. 'महाराजांच्या महानतेला' असे हवे.
आपला,
(मुद्राराक्षस) आजानुकर्ण
(संपादक - मूळ प्रतिसाद संपादित करुन योग्य दुरुस्ती केली आहे. कशावरुन गदारोळ उठेल सांगता येत नाही त्यामुळे प्रोऍक्टिव!)
20 Sep 2008 - 3:26 am | प्राजु
मी आत्ताच पाहिले. पण टायपो काय होती कळले नाही. असो.. ते महराजांच्या च आहे आणि हवे होते. धन्यवाद ...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Sep 2008 - 10:42 pm | प्रविन नामदेव सोनवने
माझे जवल पीदीअफ फाईल आहे ति मीपा वर कसी देऊ