तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही...!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
18 Sep 2008 - 11:10 am

(अबू सालेम तुरुंगात त्याच्या साथीदाराला ऐकवतो)

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!
क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही..!

कळेना भारताला कराचीत की दुबईत तो,
कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही..!

मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला,
कशा जागा नव्या शोधायचा दाऊदही..!

कधी मर्डर, कधी मागायचा तो खंडणी.
कसे बाँबस्फ़ोटही घडवायचा दाऊदही..!

कशी भर पार्टीलाही आग माझी व्हायची,
जेव्हा मोनिकाला बिलगायचा दाऊदही..!

आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!

-- अभिजीत दाते

मूळ गीत - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
कवी - संदीप खरे

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 11:20 am | मदनबाण

व्वा..छान कविता..

(छोटा)
मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

बेसनलाडू's picture

18 Sep 2008 - 11:51 am | बेसनलाडू

विषय,मांडणी बरेचसे उत्तम;मात्र मूळ कवितेच्या तुलनेत येथे गतिरोधक जरा जास्त आहेतसे वाटले; चू भू द्या घ्या
(आस्वादक)बेसनलाडू

अरुण मनोहर's picture

18 Sep 2008 - 12:45 pm | अरुण मनोहर

आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!

तो असेही म्हणाला असेल........
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!
इथे गुरूला मरण नाही शिक्षा होऊनही......

भडकमकर मास्तर's picture

18 Sep 2008 - 1:56 pm | भडकमकर मास्तर

उत्तम आणि वेगळा विषय ...
विडंबन आवडले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

baba's picture

19 Sep 2008 - 2:38 am | baba

मस्त्तच जमलिय्...आवडली.
संदीप खरे नी वाचली तर ते ही दाद देतिल.....

***बाबा***