भालचंद्र नेमाडे यांच्याशी एक अविस्मरणीय भेट.

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in जनातलं, मनातलं
2 Apr 2016 - 2:20 am

दहावीला असताना कोसला पहिल्यांदा वाचली, आणी त्या कथेच्या नायकाचा आणि त्याचा विचारांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. नौकरी मिळाल्यानंतर एक एक करून त्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण केले आणि मी भालचंद्र नेमाडेंची फ्यान झाले. माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक, म्हणजे एकदा नेमाडेंना भेटणे आणि त्यांच्या पुस्तकांविशयी माझ्या मनातले सर्व प्रश्न त्यांना विचारणे हे होते.
काही महिन्यांपूर्वी शिमल्यातल्या 'Indian Institute Of Advanced Studies' येथे नेमाडे सध्या असल्याचे कळाले, पूर्वीही अनेकदा त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेलाच होता, म्हणून यावेळी एक पत्र टाकून मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अगदी काही आठवड्यात त्यांचे उत्तर आले आणि पत्रात त्यांनी फक्त त्यांच्या शिमल्यातल्या निवासस्थानाचा पत्ता लिहून 'You are always welcome!' एवढेच लिहिले होते. पत्र हातात पडले, आणि मी आनंदाने उडीच मारली. हापिसात तीन दिवसांची सुट्टी टाकून लगेचच दुसऱ्यादिवशी सकाळी पावणे सातची औरंगाबाद ते दिल्ली फ्लाईट आणि दिल्ली ते शिमला रेल्वेची तिकीटं बुक केली. शिमल्यात राहण्यासाठी हाटेल बुक केले. दिल्लीत पोहचल्यावर तीन साडे तीन तास थांबावे लागले, दुपारी छोले कुलचा खाउन वरून दोन ग्लास गारेगार बदाम थंडाई घेतली व मी रेल्वेत बसले. रात्री जवळपास नऊ वाजता शिमल्यात टेकले, आता थेट हाटेलात जावे असे ठरवले. ओला क्याब ची भलीमोठ्ठी जाहिरात रेल्वे स्टेशनमध्ये पाहून फार बरे वाटले, मग क्याबने आमची स्वारी दहाच्या आसपास हाटेलात आली. अप्रतीम दालखिचडी व छान मोकळी, मोठ्या खिडक्या असलेली हेवेशीर व स्वछ खोली यांच्यात माझा प्रवासाचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी हाटेलात नाश्ता करताना असे ठरवले की नेमाडे सरांकडे चार साडे चार वाजता जावे, शक्यतो ते दिवसभर व्यस्त असतील. तोपर्यंत दिवसभर शिमला पाहून घेता येईल. मग शिमला मस्तपैकी हिंडून घेतला, खाणे पिणे ही चालूच होते.साडेचार वाजण्याच्या सुमारास शोधत-शोधत मी 'वीरभद्र' नावाच्या बंगल्यावर पोहचले. मग संकोच वाटत असतानाही मी कशीबशी बेल वाजवली.
कोणीतरी साठीतल्या आजींनी दरवाजा उघडला आणि, "यस?" असे बोलल्या.
"नेमाडे सर इथेच राहतात का?" असे विचारून मी जीभ चावली आणि पुन्हा तोच प्रश्न इंग्रजीत विचारला.
"हो इथेच राहतात, बोला" असे मराठीतले उत्तर ऐकून माझा आत्मविश्वास वाढला. मग नेमाडे सरांचे पत्र दाखवून मी त्यांना भेटायला आले आहे असे सांगितले.
"औरंगाबादहून आलीस?"
"हो" मी हळूच दारातून आत डोकावत बोलले.
"एकटीच?" त्या आज्जी नवलाने म्हणाल्या.
"हो!" मी परत घरात डोकावत बोलले.
"सर नाहीयेत घरात, पण येतीलच एवढ्यात. ये, आत ये." असे म्हणून आजींनी मला घरात बोलावले.

अगदी टापटीप घर, भिंती वरती काही जुन्या फोटोजच्या फ्रेम लटकावलेल्या होत्या, सोफ्यावर बसून मी त्याकडे पाहून वेळ घालवू लागले. कुणीतरी एक दुसरीच बाई येउन माझ्या समोर चहाचा कप ठेऊन गेली. नंतर पुढची पाच मिनिटे पूर्ण हॉलमध्ये मी सोडून कोणीच नव्हते, मग हातात चहाचा कप घेऊन त्या आज्जी आल्या.
"मग काय करतेस औरंगाबादला? शिक्षण वैगेरे घेतेस का?"असे सोफ्यावर बसून चहा पीत-पीत टिपिकल आज्जीसारख्या स्वरात बोलल्या.
"शिक्षण झाले, सध्या नौकरी करते"
"कसली?"
"प्रोग्रामिंग हेड आहे, एका रेडीओ केंद्रावर" मी बोलले!
"छान! आणि शिमल्याला काय फक्त सरांना भेटायला आली होतीस?"
"हो तेही कारण होतेच, म्हटले सोबत शिमलाही पाहता येईल"
"बरं केलंस. तू बस, मी आलेच" असे बोलून त्या आज्जी परत आत गेल्या.
दहा मिनिटानंतर बेल वाजली. ती दुसरी, मला चहा देणारी बाई पळत आली आणि तिने दार उघडले. कुणीतरी एक चाळीशीतली व्यक्ती आत आली, आणी त्यांच्या पाठोपाठ उंच, हडकुळे व झुपकेदार मिशांचे साक्षात नेमाडे सर!

ती चाळीशीतली व्यक्ती माझ्याकडे पाहून किंचित हसली व थेट आत गेली. नेमाडेसर येउन सोफ्यात बसून त्यांच्या जवळची पिशवी चाळू लागले. मला नेमके काय बोलावे ते कळेना, आणि सरही माझ्याशी काहीच न बोलता, त्यांचे पिशवीतून काही कागद काढून चाळत होते. मग त्या आज्जी आल्या व माझ्या शेजारी बसल्या!
"सर, ही कुठली पद्धत आहे?" त्या आज्जी किंचित मिश्किल सुरात बोलल्या!
"आं? काय झाले?" कागदातून डोके वर काढत सर बोलले.
"दीड हजार किलोमीटरवरून तुम्हाला भेटायला आलेल्या तुमच्या वाचकाला काहीच न बोलता तुम्ही काम करत बसलाय?" हे ऐकल्यावर मात्र या आज्जी नेमक्या कोण असाव्यात हा प्रश्न पडला..
"मला भेटायला? कोण, या? चुकलेच, मला वाटले तुमच्याच स्नेही आहेत!" असे म्हणून त्यांनी ते कागद काळजीपूर्वक परत त्या पिशवीत घातले!
"काय नाव म्हणालात?"
"अमृता जोशी"
"अरे हो, काही आठवड्यांपूर्वीच पत्र मिळाले होते तुमचे!" सर बोलले. सरांना माझे नाव लक्षात आहे हे ऐकून मला भारी वाटले!
"या, मोकळ्या हवेला बसू" असे म्हणून आम्ही थेट बंगल्यामागे असलेल्या लॉन मध्ये ठेवलेल्या खुर्च्यांवर जाउन बसलो.

मग तासभर मी घरून विचारायचे ठरवून आलेले जवळपास सगळे प्रश्न आठवून आठवून विचारात होते. पूर्ण संभाषणात मला त्यांनी अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली, मला बिलकुल असे वाटू दिले नाही की मी एका ज्ञानपीठ विजेत्या साहित्यीकासोबत बसले आहे. बोलता बोलता मला कळले की ती चाळीशीतली व्यक्ती म्हणजे नेमाडेंचे चिरंजीव प्रा.हर्षल नेमाडे हे आहेत. ते IIT गुवाहाटी येथे प्राध्यापक आहेत व त्या आज्जी म्हणजे नेमाडेंच्या पत्नी सौ.प्रतिभा आहेत. थोडावेळ बसून आणखीन एकदा चहा घेऊन साडेसहा च्या आसपास, मी जायला निघाले. त्या आज्जी, नेमाडे सर व हर्षल सर यांच्यासोबत एक छानसा फोटो काढला. जाताना नेमाडेसरांनी ऑटोग्राफ केलेला 'देखणी' हा काव्यसंग्रह मला भेट म्हणून दिला. त्या आज्जी गेटपर्यंत सोडायला आल्या. बाहेर आल्यावर एक वेगळीच उर्जा अंगात संचारल्या सारखे झाले! थंड हवा, किंचीतसा अंधार आणि आनंदाने तुडुंब भरलेले मन!

(नेमाडेसरांसोबत झालेल्या चर्चेवर एक वेगळा धागे वेळ मिळेल तेव्हा काढेल!)

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

2 Apr 2016 - 2:40 am | उगा काहितरीच

वा छान !हरकत नसेल तर(च) फोटो टाकावा .

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 2:44 am | अमृता_जोशी

काही हरकत नाही हो.. :-)
टाकते पुढच्या धाग्यात!

उदाहरणार्थ छान वगैरे. ;-)

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 11:07 am | अमृता_जोशी

:-)

Anand More's picture

2 Apr 2016 - 12:27 pm | Anand More

हेवा वाटला :-)

पण नेमाडे शिमल्याला का राहतात?

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 1:36 pm | अमृता_जोशी

२००७ पासून ते तिथेच आहेत. Indian Institute Of Advanced Studies मध्ये Language research का काहीतरी करतात. नक्की माहिती नाही.

यशोधरा's picture

2 Apr 2016 - 1:44 pm | यशोधरा

ह्या Institute चा परिसर सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे का?

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 3:01 pm | अमृता_जोशी

नक्की माहित नाही. मी तिथे गेले नव्हते; पण हे 'institute' शिमल्यातल्या राष्ट्रपती निवासाशी संलग्नित असल्याने सर्वांना पाहण्यास उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे.

हो. सर्वांना खुला आहे. अर्थात टाईमिंग्ज आहेत.

शिमल्यातल्या सर्वात सुंदर लोकेशन्सपैकी ते एक आहे. तिथे संग्रहालय आहेच पण कड्याच्या टोकावर छोटंसं घरगुती कॅन्टीनही आहे.

तिथे राहून अभ्यास कसा होतो हे मला कोडं वाटतं. इतक्या सुंदर निसर्गरम्य भव्य दृश्यापुढे आपण चोपडीत तोंड आणि डोळे घालून कुरुकुरु नोट्स काढतोय हे चित्र असह्य वाटतं.

इतक्या सुंदर निसर्गरम्य भव्य दृश्यापुढे आपण चोपडीत तोंड आणि डोळे घालून कुरुकुरु नोट्स काढतोय हे चित्र असह्य वाटतं.

म्हणून आपल्याला ज्ञानपीठ मिळत नाही. ;)
.
ह. घ्या. गविराज. मिपाचे ज्ञानपीठ तुम्हीच आहात. :)

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 3:12 pm | अमृता_जोशी

जायला हवे होते. :(

ओहो, मस्त! धन्यवाद गवि, जाईन एकदा.

इरसाल's picture

2 Apr 2016 - 1:38 pm | इरसाल

शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे म्हणुन ;)

यशोधरा's picture

2 Apr 2016 - 1:09 pm | यशोधरा

मस्त!

शान्तिप्रिय's picture

2 Apr 2016 - 1:10 pm | शान्तिप्रिय

छान व्रुत्तांत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2016 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान वृत्तांत. काय बोलणे झाले त्यावरच्या लेखाची प्रतिक्षा आहे.

प्राची अश्विनी's picture

2 Apr 2016 - 3:48 pm | प्राची अश्विनी

कथन आवडले. काय गप्पा झाल्या याची उत्सुकता आहे.

चांदणे संदीप's picture

2 Apr 2016 - 3:50 pm | चांदणे संदीप

चर्चेविषयी जाणून घ्यायला खरेच आवडेल.

Sandy

धागा शीर्षक वाचून वाटले मुलाखत आहे.काय गप्पा झाल्या ते हवे होते धाग्यातच!

नंदन's picture

3 Apr 2016 - 4:47 am | नंदन

आहे. शीर्षक किंचित फसवे आहे, परिणामी लेख वाचून अपेक्षाभंग झाला. असो, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

विवेक ठाकूर's picture

2 Apr 2016 - 6:24 pm | विवेक ठाकूर

चर्चेविषयी उत्सुकता आहे .

अत्रे's picture

2 Apr 2016 - 6:46 pm | अत्रे

ClickBait Title ला मराठीत काय म्हणतात? :)

जव्हेरगंज's picture

2 Apr 2016 - 7:43 pm | जव्हेरगंज

अरे वा!!
चक्क!

छान छान !

पैसा's picture

2 Apr 2016 - 7:49 pm | पैसा

औरंगाबादला रहाता का? लवकरच भेटू तर!

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 8:05 pm | अमृता_जोशी

कधी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2016 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडले. आपल्या आणि नेमाडे यांचा भेटीचा एक फोटो पाहिजेच होता.

भेटीचा वार : सोमवार. स्थळ : स्कायटच. वेळ : २:३०
मेनु : व्हेज सूप. गोल्डन फिंगर्स. बील सौजन्य : बाबा योगिराज. :)

-दिलीप बिरुटे

बाबा योगिराज's picture

2 Apr 2016 - 8:56 pm | बाबा योगिराज

डणा डण.

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 8:57 pm | अमृता_जोशी

आणि दुपारचे अडीच? माझे हापिस असते पाच वाजेपर्यंत. वेळेची अट थोडी शिथील करता येईल का?
"स्कायटच" म्हणजे ते अग्रसेन चौकातले का?

बाबा योगिराज's picture

2 Apr 2016 - 9:09 pm | बाबा योगिराज

प्रा. डॉ. ची वेळ बघा.
सोमवारी मला सुट्टीच असते.

अमृता_जोशी's picture

2 Apr 2016 - 10:14 pm | अमृता_जोशी

जर सहाच्या आस-पास ची वेळ असेल तर जमेल यायला!

बाबा योगिराज's picture

2 Apr 2016 - 11:48 pm | बाबा योगिराज

आपला काय विचार आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2016 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डन. ६:३० @ स्काय टच !

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज परीक्षेच्या कामात आहे, उत्तरपत्रिका तपासणे आणि पर्यवेक्षन असं दुहेरी काम आहे, पुन्हा कधी तरी भेटू या...!

दुपारी मी लंच टाईमला जमवलं असतं. असो, फिर कभी. सॉरी बाबा सॉरी म्याम. _/\_

-दिलीप बिरुटे

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 1:10 pm | अमृता_जोशी

छे. मला वाटले होते आज होईल मिपाकर औरंगाबादकरांशी भेट.
पण जावूद्या apology accepted.

बादवे, पुढील वेळी औरंगाबादला एखाद्या साग्रसंगीत कट्ट्याचेच आयोजन केले तर कसे?

बाबा योगिराज's picture

4 Apr 2016 - 2:36 pm | बाबा योगिराज

आज आमच्या नशिबात कट्टा नव्हता....

पुढील वेळेची वाट बघत आहे.....

छान भेटवृत्तांत. आता पुढील धाग्याची वाट पाहते.

आनन्दा's picture

3 Apr 2016 - 10:44 am | आनन्दा

बाकी अवांतर प्रश्न..
तुम्ही जश्या भेटलात, तसे इतर अनेक लोकही भेटत असणारच ना.. सगळे तेच ते छापखान्यातले प्रश्न विचारत असतील.. त्यांना तीच ती उत्तरे देऊन कंटाळा येत नाही काय?

मी असतो तर बुवा जाम बोर झालो असतो.

उगा काहितरीच's picture

3 Apr 2016 - 12:06 pm | उगा काहितरीच

नसतील भेटत कुणालाही . लेखीकेने अगोदर पत्रव्यवहार केला होता ना. त्यावरून लेखीकेला भेटायची परवानगी मिळाली असेल. अर्थात लेखीका जास्त प्रकाश टाकू शकतील.

ह्म्म.. ते कुणालाही भेटत असती असे मला म्हाणायचे नाही.. पण कुणीही चाहता/समीक्षक भेटला तर विचारून विचारून काय प्रश्न विचारणार?
इन जनरल सगळ्याच सेलेब्रटी<ची याबाबतीतली भूमिका काय असते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

उगा काहितरीच's picture

4 Apr 2016 - 12:19 am | उगा काहितरीच

इतर सेलेब्रटीमधे व लेखकांमधे फरक असावा असे मला वाटते. लेखकाशी गप्पा मारताना लेखकाच्या साहित्यातील एखाद्या पात्रावर , ठरावीक भागावर प्रचंड गप्पा मारता येऊ शकतील. पण इतर सेलेब्रटींना काय बोलणार ?

अमृता_जोशी's picture

3 Apr 2016 - 12:29 pm | अमृता_जोशी

इतरांविषयी मला फार काही सांगता येणार नाही पण माझा नेमाडे सरांशी पत्रव्यवहार अगोदरही खूप वेळा झालेला होता, काहीशी ओळखच झालेली होती म्हणा ना :-)

आनन्दा's picture

3 Apr 2016 - 1:07 pm | आनन्दा

ओक्के मग ठीक आहे.. बाकी तुमच्या पुढच्या धाग्याच्या प्रतीक्षेत.. तुम्ही काय प्रश्न विचारलेत ते जाणून घेण्यास उत्सुक.

रातराणी's picture

4 Apr 2016 - 10:11 am | रातराणी

आवडला लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. आणि इतक्या सहज शिमल्याला जाऊ शकलात म्हणून जळजळ झाली :(

आणि इतक्या सहज शिमल्याला जाऊ शकलात म्हणून जळजळ झाली :(

सहमत, वर्षभर planning करून सुद्धा जाणे होत नाही .....

राजाभाउ's picture

4 Apr 2016 - 10:20 am | राजाभाउ

खरच हेवा वाटला. चर्चे संबधी वाचायला अवडेल,

सुधीर कांदळकर's picture

4 Apr 2016 - 10:52 am | सुधीर कांदळकर

आनंदक्षण वाचायला आवडतील. धन्यवाद.

विटेकर's picture

4 Apr 2016 - 11:28 am | विटेकर

सिमला भेटीची एक सम्रुद्ध अडगळ औरन्गाबादला घेऊन आलात तर !
उत्तम.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 1:01 pm | अमृता_जोशी

:-P

विशाखा पाटील's picture

4 Apr 2016 - 12:05 pm | विशाखा पाटील

नेमाडेंशी काय चर्चा झाली ते लेखात सापडले नाही, त्यामुळे प्रतिसाद जास्त आवडले.

चांदणे संदीप's picture

4 Apr 2016 - 12:09 pm | चांदणे संदीप

:D लोल परतिसाद!

भिकापाटील's picture

6 Apr 2016 - 7:31 am | भिकापाटील

पुढील भाग औंदा का पुढील वर्षी?

नितीनचंद्र's picture

6 Apr 2016 - 1:32 pm | नितीनचंद्र

साहित्य संमेलन ही रिकामटेकडे लोकांची संकल्पना आहे असे नेमाडे सरांना वाटते मग एखादा चाहता आपल्याला भेटतो यात त्यांना उत्सुकता का असते ? हजारो लोक एकत्र येऊन काही मंथन करतात, आपल्या आवडीच्या लेखकाला ऐकण्यासाठी उत्सुक असतात हा रिकामटेकडे पणाचा उद्योग का असतो ?

आपण त्यांच्या लेखनाच्या चाहत्या आहात आणि सर तुम्हाला भेटले यासाठी अभिनंदन. असली तुसडी व्यक्ती भेटणे म्हणजे हा दुर्मीळ योगच मानायला हवा.

बाबा योगिराज's picture

6 Apr 2016 - 1:55 pm | बाबा योगिराज

दुपारच्या वेळी मी आणि प्रा. डॉ. असे आम्ही दोघे येतो तुमच्या ऑफिसात.
या निमित्ताने रेडिओ ऑफिस कस काम करत हे सुद्धा बघणं होईल. हो कि नै सर.

अमृता तै, आपलं काय म्हणणं आहे....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2016 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी तयार आहे.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

6 Apr 2016 - 4:46 pm | अभ्या..

योगीबाबा,

प्राडॉ काय थाटात असतेत नेहमी. तुम्ही पण एकदम ब्रॅन्डेड ड्रेसात टापटीप जावा बरका. ;)

अमृता_जोशी's picture

6 Apr 2016 - 4:36 pm | अमृता_जोशी

चालेल ना. कधी येताय?
प्रा.डॉ., बाबा योगीराज; मो.नं. व्यनी केला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2016 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल बाबा योगीराज यांनी आपणास फोन केला होता पण आपण मीटिंग मध्ये व्यस्त होता. आपल्या call back ची त्यांनी आणि मीही वाट पाहिली. आपण व्यस्त असाल किंवा विसरला असाल असे वाटते, आपण फोन करा योगीराज यांना. आम्ही मोठ्या रेडियो केंद्रावरील अधिका-यास भेटण्यास उत्सुक आहोत.-

-दिलीप बिरुटे

पुंबा's picture

6 Apr 2016 - 3:38 pm | पुंबा

खुप आवड्ले.. अतिअवांतर- नेमाडे दूरध्वनी किंवा मोबाइल फोन आजिबातच वापरत नाहित का?