एका सुन्दर मुलीसाठी

अनिरुद्धशेटे's picture
अनिरुद्धशेटे in जे न देखे रवी...
17 Sep 2008 - 4:03 pm

सुन्दर सुन्दर ओ तुझे
जणू ऊषेची लाली शोभते
डोळयतील इशारे बघुन ते
भाळी कुन्कू लाजते

कानात ग डूल तुझ्या
कुन्द्कळ्यातुन झळके स्मित
नाकातील नथनी गाते
माझ्या प्रीतीचे गीत !

वार्याशी जणु झिम्मा खेलती
बटा या भालप्रदेशी
कानातुन किणकिणती पदके ही
जणु खजुराहोची नक्षी !

केस तुझे ग गर्भरेशमी
वाराही त्यातुन मोहुन वाहे
वेडा होउन प्रत्येकजण हा
चेहरा तुझाच पाहे !

अनिरुद्ध

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

छोटु's picture

17 Sep 2008 - 4:10 pm | छोटु

छान कवीता आहे!!!

sanjubaba's picture

18 Sep 2008 - 9:44 am | sanjubaba

छान कवीता

पक्या's picture

18 Sep 2008 - 12:45 pm | पक्या

सुन्दर सुन्दर ओ तुझे
जणू ऊषेची लाली शोभते

इथे ओ ऐवजी 'ओठ' आहे काय ?

'केस तुझे ग गर्भरेशमी
वाराही त्यातुन मोहुन वाहे'

ही ओळ आवडली.

अनिरुद्धशेटे's picture

18 Sep 2008 - 1:45 pm | अनिरुद्धशेटे

तुम्ही एकट्यानी चुक ओळ्खली
धन्यवाद