रघू दिक्षित एक प्रोजेक्ट

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
27 Mar 2016 - 3:00 pm

“यावेळेस कोण येनार आहे तुमच्या ऑफिसच्या पार्टीला?”
“न ऐकलेले नाव आहे. कुणी रघू दिक्षित ”
नाव बदलले तरीही हा संवाद दरवर्षीचाच, नांव ओळखीची असली तरी कार्यक्रमला जाण्याचा उत्साह आणि प्रतिक्रीया ही अशीच असते. कुणीतरी येनार, चार गाणी म्हणनार, अर्धी बॉलीवुडची काही तॉलीवुडची. आपण पोर सांभाळायची, गर्दीतून रेटारेटीतून खाण्याच्या प्लेट आणायच्या, पोरांना खाउ घालायचे मग आपण खायचे. हे सार करीत असताना वेळ मिळेल तसे स्टेजवर चाललेले गाणे ऐकायचे. पार्टी फक्त खाण्यासाठी असते असे वाटावे इतकी गर्दी खाण्याच्या काउंटरवर असते आणि गायकाच्या अगदी समोरच्या खुर्च्या देखील रिकाम्या असतात. खाउन झाल्यावर वाटल तर पाच दहा मिनिटे आपणही त्या नाचनाऱ्या तरुण मुलांच्या घोळक्यात जाउन साथ द्यायची. कार्यक्रम संपला की आयस्क्रीमची चव तोंडावर ठेवत घरी जायचे हा दरवर्षी होनाऱ्या पार्टीचा क्रम. यावर्षीही काही फार वेगळे होनार अशी आशा नव्हतीच तेंव्हा यावर्षीही तेच करायचे ह्या मानसिक तयारीनेच मी कुंटुंबासमवेत कार्यक्रमाला पोहचलो. कार्यक्रम सुरु झाला ऑफिसमधल्या सहचाऱ्यांची मुल नाचगाण्याचा कार्यक्रम करीत होते आणि मी पळत पळत जाउन स्टार्टर्स घेउन येत होतो. तास दीड तास असाच पळापळीचा खेळ सुरु होता. एकदाचे सांस्कृतीक कार्यक्रम आटोपले, स्टेजवर अंधार झाला. स्टेजवर आता कुणी वेगळी माणसे होती, ते त्यांचे वाद्ये ठेवत होते, माइक टेस्टींग चालले होते. मधेच साउंड डिझायनरला सूचना देउन इकडचा आवाज जास्त तर इकडचा कमी असे काहीतरी चालले होते. हे म्हणजे आता मुख्य गायकाच्या कार्यक्रमाला सुरवात होनार याची नांदी होती.
पाच दहा मिनिटात लाइट लागले आणि पहीला धक्का बसला. इथे ड्रम्स, गिटार, ट्रोंबोन यासारखे पाश्चात्या वाद्य वाजवनारे वादक चक्क लुंगी नेसून होते. प्रत्येकाने रंगीबेरंगी लुंगी घातली होती, वर रंगीबेरंगी कुर्ता होता. लुंगी, भारतीय कुर्ता आणि हातात गिटार हे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे फुजन आहे हेच सांगनारे होते. मुख्य गायकाने तर पायात चक्क चाळ घातले होते. मध्यभागी मुख्य गायक हातात गिटार घेउन उभा होता, त्याच्या उजव्या बाजूला एक लांब केस असनारा गिटारवर होता, डाव्या बाजूला एक मिसरुड न फुटलेला मुलगा इलेक्ट्रीक गिटारवर होता, त्याच्यामागे बासुरीवाला आणि सर्वात मागे ड्रम्स वाजवनारा असा वाद्यवृंद होता. रघू दिक्षितने स्वतः बँडची ओळख ‘रघू दिक्षित एक प्रोजक्ट’ हा एक ‘Folk Band’ आहे अशी करुन दिली. त्यानेच बँडमधल्या इतर वादकांची ओळख करुन दिली. सारीच नावे लक्षात नाही राहीली पण मुख्य गायक अर्थातच रघू दिक्षित, तो लांब केस वाला गिटार वाजवनारा गौरव वाझ, बासरीवर पार्थ आणि स्टेजवर नंतर आलेली ट्रम्पेट वाजवनारी काव्या. कुठलाही वेळ न दवडता ‘जग चंगा’ या अल्बमचे टायटल साँग ‘जग चंगा’ या गाण्याने कार्यक्रमाला सुरवात झाली. मी ना या अलबमचे नाव ऐकले होते ना हे गाणे कधी ऐकले होते. दोनही गायक रघू दिक्षित आणि गौरव वाझ ‘डॉउनडुमडुमडुमडाम’ असे गुणगुणत गायला लागले. आतापर्यंत वेटरच्या मागे धावनारे, पार्टीतसुद्धा ऑफिसविषयीच चर्चा करनारे, उगाचच हायबाय करनारे सारे होते तिथे थांबले. साऱ्यांचे कान आता जग चंगा ऐकत होते आणि पाय त्या तालावर बसल्या जागेवरच थिरकत होते. वाद्यवृंदाचा अप्रितम ताळमेळ, रघू दिक्षितचा सूर याने सभागृहाला मोहीत केले होते. अचानक गिटार आणि ड्रम वाजननारे एका ठेक्यात थांबले आणि बासरीचे जीवघेणे सूर कानावर पडले. वेड लागले. संपूर्ण कार्यक्रमात त्या पार्थाच्या बासरीने वेड लावले. या पार्थाने साक्षात मुरलीधराकडून बासरी शिकली की काय असे वाटत होते. गेल्या कित्येक वर्षात अशी बासरी ऐकली नव्हती. ‘खोया, खोया हो राही’ हे म्हणताना रघू दिक्षितने जो सूर लावला तो या संपूर्ण गाण्याला एका वेगळ्या उंचीवर घेउन गेला. तो जाग ये बंद जाग अशासाठीच म्हणत होता की ते खाणगिण सोडा, आज काहीतरी वेगळीच मेजवाणी आहे, जागा. रघू दिक्षित तू आम्हाला जिकलस अगदी पहील्याच गाण्यात जिंकल. पहील्याच गाण्यात कळून चुकले आज काहीतरी वेगळे, सुंदर ऐकायला मिळनार.

जग कस सुंदर आहे हे सांगनार गाण झाल्यानंतर दुसर गाण होत मस्ती की बस्ती. या गाण्यात जी गिटार वाजली तीचे वर्णन शब्दात करने कठीण आहे. लाइव्ह बँड हा गायकांपेक्षा वादकांचा खेळ असतो हे चांगल्या बँडची गाणे ऐकल्याशिवाय कळत नाही. हे गाण The Dewarists या शोसाठी रघू दिक्षित आणि नागलँडचे लोकसंगीतकार Rewben Mashangva यांनी बसवले होते व गायले होते. त्यानंतर मैसूरसे आयी, यादो की क्यारी असे एकेक सुंदर पुष्प रघू दिक्षितच्या पेटाऱ्यातून बाहेर येत होते. नंतर आले ते ज्यासाठी रघू दिक्षित ओळखला जातो ते म्हणजे कर्नाटक लोकगीते आधुनिक स्वरुपात. कर्नाटकचे कबीर म्हणून ओळखल्या जानाऱ्या शिशुनाल शेरीफ साहेब यांच्या लोकगीतांना नवीन चालीत, आधुनिक वाद्याच्या तालात बांधून सादर करने हे रघू दिक्षित आणि प्रोजेक्ट या बँडचे खास वैशिष्ट. हैद्राबादमधल्या कार्यक्रमात, मुख्यतः तेलगु आणि हिंदी बोलनाऱ्या श्रोत्यांना रघू दिक्षित आणि त्याच्या बँडने कानडी गाणी ऐकवून बांधून ठेवले. शब्द समजो अथवा ना समजो पण सारे गाण्यावर थिरकत होते, ताल धरत होते. पंजाबी, कश्मिरी पासून तामील तेलगु पर्यंत सारेच भारावून कानडी गाणी ऐकत होते. आता वाद्यवृंदामधे ट्रंपेट आणि ट्रोंबोन वाजवनारे सुद्धा सामील झाले होते. सभागृहावर, तिथल्या श्रोत्यांवर आता रघू दिक्षित आणि त्याच्या साथीदाराची पकड होती. तो म्हणेल तसे नाचत होते, तो म्हणेल तसा ठेका धरत होते, त्याच्या प्रत्येक म्हणण्याला दुजोरा देत होते आणि तो पायातले चाळ छमछम वाजवीत नाचत होता, गात होता. मग आले ते ‘लोकड कालजी’. दोन ओळी तो म्हणनार त्याच्या मागून सारे म्हणनार, परत पुढच्या ओळी तो म्हणनार. जोपर्यंत सभागृह सुरात गात नाही तोपर्यंत हे चालू राहनार. ‘लोकड कालजी माडीथीनंती निंघ्यार बॅडॅनतर माडापचिंती’ ( हे उच्चार कदाचित चूक असू शकतात) अर्थ कळू की न कळू, उच्चार चूक किंवा बरोबर कसलाही विचार न करता सारे गात होते. टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे जाउन संगीताचा वेगळा अनुभव सारे घेत होते. तसा या ओळींचा अर्थही सुंदर ‘काळजी करु नका पण तुम्हाला करायचीच असेल तर करा कोणी थांबवलय’. अशा या बहारदार कार्यक्रमाची सांगता ‘हे भगवान मुझको तू जिंदगी दुबारा देदे’ या बहारदार गाण्याने झाली. रघू दिक्षितने या गाण्यात प्रत्येक वादकाला त्याचे सर्वोत्तम वाजवायला लावले त्यामुळे या संस्मरणीय कार्यक्रमाचा तितकाच संस्मरणीय असा शेवट झाला.

असा कार्यक्रम ऐकल्यानंतर रघू दिक्षित काय प्रकरण आहे या बाबतीत उत्सुकता निर्माण होनार नाही हे शक्यच नाही. लगेच इंटरनेटवर बघितले तेंव्हा कळले की रघू दिक्षित हा मैसूरच्या पारंपारीक मध्यमवर्गीय कानडी कुटुंबातला. कॉलेजात जात पर्यंत त्याने कधी हातात गिटार घेतली नव्हती.. पारंपारीक कुटुंबाप्रमाणे त्याने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले होते. ते चाळ बांधणे, ते बांधून नाचने हे सार भरतनाट्यम मधून आले असावे. सहज गंमत म्हणून मित्राने तू गिटार कधी वाजवू शकनार नाही असे आव्हान केले आणि रघू दिक्षितने गिटार शिकली. या कामात मैसूरच्या एका चर्चची त्याला मदत मिळाली. मायक्रोबॉयलॉजी या विषयात एम एस सी केल्यानंतर बेल्जीयममधे एका बायोटेक कंपनीत रघू दिक्षित शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होता. परंतु संगीताचे वेड स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी भारतात परत आला आणि बँड सुरु केला. त्यातही सुरवातीला कोणी संधी दिली नाही. असेच चालले असताना मुंबईला एका कार्यक्रमात विशाल डोडानी यांनी त्याचे गाणे ऐकले आणि त्याला स्टुडीओत बोलावले. विशाल, शेखर या जोडीने रघू दिक्षित एक प्रोजेक्ट या बँडला पहीली संधी दिली. त्यानंतर दुसरा अलबम म्हणजे जग चंगा. आज भारतातल्या सर्वोत्तम बँडमधे रघू दिक्षित एक प्रोजक्ट या बँडची गणना होते. या बँडने जगभर गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. स्वतः रघू दिक्षितने कानडी, तेलगु आणि हिंदी सिनेमांसाठी गाणी म्हटली आहेत. गाजलेला तेलगु सिनेमा श्रीमंतुडु मधले गाणे जागो हे देखील रघू दिक्षित यानेच गायले आहे. पण रघू दिक्षितची खरी ओळख आह ती त्याच्या लाइव्ह शोसाठीच.
त्यानेच त्याच्या एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे मला नाही वाटत मी कधी ‘He Baby you look hot’ यासारखे गाणे कधी करु शकेन. ते म्हणायला बरेच आहेत त्याच्या बँडकडून त्या प्रकारात मोडनाऱ्या गाण्यांची अपेक्षाच नाही. त्याचा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे एक संगीत सोहळा होता. गायकाबरोबर इतर वादकांचेही गाण्यात तितकेच महत्वपूर्ण योगदान असते हे पटवून देनारा कार्यक्रम होता. म्हणूनच म्हणावस वाटत होत असेच गाणे ऐकायला ‘हे भगवान मुझको तू जिंदगी दुबारा देदे’

मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

वीजे निखिल चिनप्पा कैलाश खेर वगैरे सामिल असणारा तो शो होता ते सर्वजण भारताचा एक उत्तम रॉकबैंड बनवत होते... त्यावेळी इतके लक्ष दिले न्हवते पण या लेखामुळे रघु दिक्षित रसायन गुगलने आले. रोचक

बोका-ए-आझम's picture

27 Mar 2016 - 3:22 pm | बोका-ए-आझम

असा आवाज म्हणजे काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याला उत्तर म्हणजे रघू दीक्षित!

हकु's picture

27 Mar 2016 - 3:31 pm | हकु

पहाडी, मोठा आवाज पण तितकाच गोड.
त्याचं 'नो मँन विल एव्हर लव यु, लाईक आय डू' हे माझं आवडतं गाणं.
रघु दिक्षित च्या इतर गाण्यांवर प्रकाश टाकण्यासाठी कुतूहल जगवल्याबद्दल धन्यवाद.

आनन्दा's picture

27 Mar 2016 - 6:22 pm | आनन्दा

मस्त आहे.

कंजूस's picture

27 Mar 2016 - 9:59 pm | कंजूस

कुतुहल वाढले.

मी-सौरभ's picture

29 Mar 2016 - 1:13 am | मी-सौरभ

ह्याची गाणी ऐकलि पाहिजेत आता

अर्धवटराव's picture

29 Mar 2016 - 7:29 am | अर्धवटराव

धन्यवाद मित्रहो.

प्राची अश्विनी's picture

29 Mar 2016 - 10:03 am | प्राची अश्विनी

अरे वा! ऐकलं पाहिजे याला!

यशोधरा's picture

29 Mar 2016 - 10:28 am | यशोधरा

माहितीबद्दल धन्यवाद.

दा विन्ची's picture

29 Mar 2016 - 6:45 pm | दा विन्ची

रघु दीक्षितचा कार्यक्रम भन्नाट असतो. एकदम सहमत. नोव्हेंबर मध्ये आमच्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष पहिला व ऐकला.

मित्रहो's picture

31 Mar 2016 - 2:23 pm | मित्रहो

धन्यवाद दा विन्ची, यशोधरा, प्राची आश्विनी, अर्धवटराव, आनंदा, सौरभ, कंजूस, हकु, बोका-ओ-आजम, भाऊंचे भाऊ.
शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत या व्यतिरीक्त इतर संगीताच्या प्रकारातसद्धा काही चांगले प्रयोग होत असतात. लेखाचा उद्देष मला आवडलेल्या अशाच एका प्रयोगाची ओळख करुन देणे हा होता. कधी संधी मिळााली तर रघू दिक्षितचा कार्यक्रम आवर्जून बघा.

रायडर मेनीया २०१५ ला रघु दिक्षितला पाहिलं आणि ऐकलं...... एक नंबर गाणी आणि गातो पण एक नंबर........ आंजा वर त्याच्या कार्यक्रमातली गाणी शोधली पण मिळाली नाहित.......

मित्रहो's picture

31 Mar 2016 - 6:33 pm | मित्रहो

यू ट्युब वर बरीच गाणी आहेत.कदाचित रायडर मॅनिया या कार्यक्रमाची नसतील. त्याला लाइव्ह ऐकण्यातली मजा काही वेगळीच.