विलवडे गावातील सगळी मंडळी आज देवळात एकत्र जमली होती . एका मोठ्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गहन चर्चा सुरू होती . भुस्कूटे बाबा भयानक संतापला होता . भुसकुटे बाबा गावातील फार मोठा मांत्रिक होता . देवर्षी बाबाचा दरारा फार मोठा होता ... पण याच भुसकुटे बाबाचा थोरला मुलगा रमानाथ आत्यंतिक वेदनेत तळमळत गावातील सरकारी दवाखान्यात पडला होता ,आणि गावावरचे हे संकट निवारण्यासाठी गावाची बैठक देवळात सुरू झाली होती ...
याचे कारण असे की रमानाथ कॉलेज ला शिकायला होता . कॉलेज गावातून 20 किमी लांब होते . पहाटे 5.00 वाजताची एस टी पकडून तालुक्याच्या गावात जावे लागायचे ... रमानाथ च्या घरातून एस टी स्टँड पर्यंतचा रस्ता घनदाट जंगलातून जायचा ... तर माघ अमावास्येला पहाटे साडेचार ला रमानाथ घरातून निघाला ... आणि गिरोबाच्या चिंचेजवळ पोहोचला ... तिथून एस टी स्टँड हाकेच्या अंतरावर होता ... तेवढ्यात गिरोबाच्या चिंचेवरून धप्पदिशी काहीतरी पडले ,ते थेट रमानाथ च्या मानेवर ... त्या अनाहूत हल्ल्याने रमानाथ पार गळपटला ... घामाघूम झाला ... तोंडातून शब्दही फुटेनासा झाला .... तसाच बेशुद्ध पडून होता ... शेवटी सात वाजता शाळेत जाणार्याग मुलांनी त्याला पाहिला आणि भुसकुटे बाबाला खबर दिली ... बाबाने मग ताबडतोब रमानाथला सरकारी दवाखान्यात हलवले .... आज सात दिवस झाले , सगळे डॉक्टरी उपचार झाले , तरीही त्याचा ताप कमी होत नव्हता ....म्हणून शेवटी नाईलाजास्तव देवाला कौल लावून प्रश्न विचारायचे ठरले ....
तर बैठकीत देवाला कौल भरण्यात आले , तेव्हा देवाने उत्तर दिले की “ हा प्रेमप्रकरणाचा विषय असून तुझ्या वैर्या ने तुझ्यावर गावचा खुन्या सोडला आहे ... “ त्यावर बाबा अचंभीत झाला ... कारण बाबाला यातले काहीच माहीत नव्हते ... म्हणून बाबाने “आणखी चौकशी करून मग सगळे भागवतो “,असा शब्द देवाला दिला ,आणि कौल उतरवून बैठक तिथेच संपली .....
रमानाथ च्या कॉलेज मध्ये निशा नावाची एक मुलगी होती. निशा दिसायला खूपच सुंदर, मोहक आणि आकर्षक होती ... कॉलेज मधले बरेचजण तिच्यावर मारत होते ...पण टी कुणालाच भाव देत नसे ... तिला मात्र रमानाथ मनापासून आवडत होता ... हळूहळू दोन मने जुळली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ... पण इथेच घात झाला .... कुणीतरी निशाच्या वडिलांना चुगली केली आणि दोघांच्या प्रेमाचं बभ्रा झाला.... निशाचे वडील भाऊसाहेब लटके हे तालुक्यातील मोठे प्रस्थ .... राजकारणी .... जिल्हा परिषद अध्यक्ष होते ... आणि आपली मुलगी एका सामान्य खेड्यातील मांत्रिकाच्या मुलाच्या प्रेमात पागल व्हावी हे भाऊसाहेबांना रुचले नाही... त्यांना तो आपला अपमान वाटला ... त्यांनी निशाला खूप समजावून पाहिले ..पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती .... “मला रमानाथ पासून वेगळे कराल तर मी जीव देवून आत्महत्या करीन” अशी धमकीही तिने वडिलांना दिली ....
सगळे उपाय थकल्या वर मग भाऊसाहेबांनी आपला विश्वासू तांत्रिक शाह बाबा नूर बंगाली ला पाचारण केले. याच शाह बाबाच्या मदतीने त्यांनी मागची निवडणूक जिंकली होती... त्यासाठी त्याला पाच लाखाची मजबूत दक्षिणा देखील दिली होती... मग शाह बाबाने रमानाथ ज्या गावात राहायचा त्या विलवडे गावाच्या स्मशानात माघ अमावास्येच्या रात्री काही तांत्रिक विधी केले , आणि तिथल्या “खुन्या” नावच्या शक्तीला पाचारण करून बोकडाचा बळी दिला ... आणि रमानाथ चा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली .... नेमक्या त्याच रात्री पहाटे रमानाथ गिरोबाच्या चिंचेजवळ झपाटला होता ......
भुसकुटे बाबाला हे सगळे समजले ते त्याच्या गुरु बाबा दीनानाथ कडून ... भुसकुटे बाबा अडचणीत असला की आपला गुरु बाबा दीनानाथ कडे धाव घ्यायचा ... दीनानाथ ने समाधी लावून सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग डिटेलवार भुसकुटे ला सांगितल्या ... आता ताबडतोब रमानाथ ला घेवून गिरोबाच्या चिंचेजवळ जा आणि तिथे एक नारळ कोंबडा दे आणि रमानाथ ला सांगायचे की आजपासून मी निशाचा नाद कायमचा सोडला .... एवढे केल्यानंतर तुझा पोरगा लगेच बरा होईल ....
भुसकुटे बाबाने मग ताबडतोब रमानाथ ला दवाखान्यातून बाहेर काढून गिरोबाच्या चिंचे जवळ आणले , आणि बाबा दीनानाथच्या आज्ञेप्रमाणे विधी केला आणि रमानाथ कडून निशाला विसरण्याची शपथ घेतली ....
दुसर्यारच दिवशी रमानाथ खडखडीत बरा झाला , भुसकुटे बाबाने त्याला कॉलेज मधून काढून टाकले ... आणि घरी शेतीत लक्ष द्यायला सांगितले .. निशालाही तिच्या वडिलांनी मावशीकडे मुंबईत कॉलेजला पाठवले... टी दोघे आता कायमची दूर गेली होती ..पुन्हा कधीही न भेटण्यासाठी ... एका उमलत्या प्रेमाचा करुण अंत झाला , कोवळी मने उद्ध्वस्त झाली ... पण मुलगा वाचला हेच नशीब असे समजून भुसकुटे बाबा गप्प बसला !
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 11:46 am | दा विन्ची
छान आहे.
19 Mar 2016 - 12:05 pm | दिपुडी
काहीही
19 Mar 2016 - 12:06 pm | दिपुडी
क्रमशः आहे का
19 Mar 2016 - 2:04 pm | viraj thale
क्रमशः ...पूढे आपल्या प्रेमाचा बदला घेण्यासाठी रमानाथ आपल्या मनात योजना घोळवू लागला .पण त्याला काही सूचत नव्हते आपल्यावर झालेल्या अत्याचाराने दिवसेंदिवस मनातल्या मनात तडफडत होता पण बदला घेण्यासाठी नेमके काय करावे हे त्याला समजत नव्हते . शेवटी आपले वडिल म्हणजेच भुसकुटे बाबा कडे रमानाथने विषय काढला तेव्हा भुसकुटे बाबा त्याच्यावर जवळजवळ ओरडलाच ......"गप्प बस रे कार्रट्य्य्य भाऊसाहेबांशी पंगा घेण आपल्याला परवडणार नाय त्याची ताकद खूप मोठी आहे शिवाय त्याला बंगाली तांत्रिक बाबा चे संरक्षण प्राप्त आहे" असे बजावून रमानाथला सक्त्त ताकिदच देऊन ठेवली की भाऊसाहेबाच्या वाटेला जायचे नाही . : @??
19 Mar 2016 - 4:08 pm | स्पा
रमानाथ ने मग एक बुलेट ( हिमालयन फाॅर आॅफ रोड ड्रायविंग)लोन वर घेतलिन, आन सरळ निशाच्या बापाच्या suv वर चढवलिन थेट गिरोबाच्या चिंचेखाली
19 Mar 2016 - 5:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
बुलेटच्या जोरदार धडके मुळे suv मधुन निशाचा बाप खाली पडतो ते चिंचे खालुन वहाणार्या नदीत. ते बघुन चिंचे वर बसलेल्या खुन्याची फाटते आणि तो पोहत पोहत काठावर यायचा प्रयत्न करत असलेल्या निशाच्या बापावर धपकन पडतो आणि दोघे बुडुन मरतात .
मग रामनाथ निशाबरोबर लग्न करतो. आणि पुण्याला स्थायिक होउन टिळक रोडवर मिसळीचे दुकान काढतो.
रामनाथची प्रगती बिस्कुटे बाबाला पहावत नाही. पण जाउदे आपलाच मुलगा आहे असे समजुन तो गप्प बसतो.
पण तिकडे तो बंगाली बाबा चवताळतो आणि रामानाथाला सोडायचे नाही असे ठरवतो. आणि पुण्यात येतो. पण पुण्यात त्याची उणेकर म्हणुन हेटाळणी होते. ती अवहेलना सहन न झाल्याने मग हताश बंगाली बाबा लाकडी पुलावर भर वेगाने येणार्या रामनाथच्या बुलेट खाली उडी मारुन आत्महत्या करतो.
लकडी पुलावरुन बुलेट नेली म्हणुन पुण्यातले पोलीस रामानाथाला पकडुन फाशी देतात.
कर्म:शा
पैजारबुवा
22 Mar 2016 - 7:42 pm | शलभ
कहर..:)
बादवे गोष्टीतील हे वाक्य तर खूपच आवडले.
22 Mar 2016 - 7:52 pm | DEADPOOL
मी आत्महत्या करून जीव देईन!
बरोबर का?
23 Mar 2016 - 2:26 am | रेवती
हा हा हा.
23 Mar 2016 - 3:41 am | आनंदयात्री
>>लकडी पुलावरुन बुलेट नेली म्हणुन पुण्यातले पोलीस रामानाथाला पकडुन फाशी देतात.
=)) =))
23 Mar 2016 - 8:52 am | नाखु
आम्ही किंवा वाचक नाही
फाशी देईपर्यंत गप्प बसणारे सारे डावे उजवे पुढचे मागचे त्या नंतरच जागे होतात. फाशी कशी चुकीची होती त्या फाशीत न्यायाचीच काशी झाली असे काही हौशी सांगतात्,तर फाशीने दोशींना सजा मिळाली असे जोशी सांगतात.
या गदारोळाने रामानाथाचे आत्म्याला अत्मक्लेष होतात आणि मेल्यावर पण आपल्या मागची पनवती काही सुटेना म्हणून तो थेट वडगाव धायरी रोड गाठून काही निशाचर उपाय करता येईल का याची चाचपणी करतो.
पण हाय रे दैवा तिथेही त्याला उशीर झालेला असतो आणि अता पुण्यात किंवा पिण्यातसुद्धा वेळ न घालवात थेट ठाणे गाठावे म्हणून स्वारगेटला लाल डब्ब्यात बसतो. ठाण्यात नाही झाले तरी डोंबिवलीत तरी आपले नक्की कल्याण होईल अशी त्याची खात्री असते.
क्रमशः.......
23 Mar 2016 - 10:08 pm | आनंदयात्री
=)) =))
भारी चाललेय कोलेबरेटिव स्टोरी रायटिंग.
23 Mar 2016 - 10:15 pm | आदूबाळ
लौल!
आता सगळे मेले ना. मग कर्मशः कशाला?
(की ते परत बूथ बनून येणार आहेत??)
24 Mar 2016 - 2:34 am | विद्यार्थी
खिक खिक!!!
22 Mar 2016 - 8:19 pm | भाते
बऱ्याच दिवसांनी जुने मंदार कात्रे मिपावर परत आल्यासारखे वाटले. तुमच्याच नि:शब्दची आठवण झाली.
छान लिहिलंय.
22 Mar 2016 - 8:39 pm | हेमंत लाटकर
आपले ई प्रतिष्ठाणचे क्वाॅर्टर नंबर ३६५ इे बुक वाचले. छान वाटले.
24 Mar 2016 - 2:05 am | बहुगुणी
हे "इे" असं टंकणं कसं काय जमलं हो?
बाकी धागा आणि प्रति-ष्टुर्या वाचून करमणूक झाली:-)
22 Mar 2016 - 11:27 pm | बोका-ए-आझम
अहो पण त्या ताई आहेत ना?
23 Mar 2016 - 1:41 am | भाऊंचे भाऊ
अक्षरश: YZ
23 Mar 2016 - 2:17 am | कपिलमुनी
नुसत्या पिंका टाकण्यापेक्षा तुम्ही लिहीत आहात हे महत्वाचे !
पुलेशु
23 Mar 2016 - 8:56 am | भाऊंचे भाऊ
अक्षरश: YZ =))
23 Mar 2016 - 9:11 am | ब़जरबट्टू
एकदा रामू ला ऐकवा हे.. मनावर घे म्हणा पिक्चर चे..
नाही म्हणजे फक्त आम्हा वाचनप्रिय पामरांवरच का अत्याचार.. ?
23 Mar 2016 - 8:33 pm | शैलेन्द्र
भाई, आखिर कहना क्या चाहते हो?
24 Mar 2016 - 1:48 am | हकु
प्रतिसाद वाचून करमणूक होतेय
24 Mar 2016 - 4:16 am | Ram ram
मुळ कथेहून प्रतिक्रिया लई भारी
25 May 2016 - 8:07 pm | विजुभाऊ
तेच म्हणतो.