( प्रतिसाद संकलन )

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 6:30 pm

(प्रेरणा : http://www.misalpav.com/node/34982 )

प्रतिसादांचा सिक्सर हा कुठल्याही काथ्याकुटात चर्चेत कवितेवर थोडक्यात सर्वत्रच असायलाच हवा असा भाग. कुठे धागा काढायचा अवकाश, की तिथे जाऊन आलेल्यांच्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद सुरू होतात, "ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ", "चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन" वगैरे. शिवाय " अच्चा अचं जालं तलं" असे प्रतिसाद सुद्धा. ;) कधी घाईत असताना सुद्धा किमान एक तरी काडी सारुयात आगाऊपणा म्हणुन, असं म्हणत पटकन टाकलेली एखादी पिंक असेल तर कधी वेळ हाताशी आहे म्हणून भरपूर संदर्भ शोधत, नाही नाही त्या फोटोंच्या लिन्क देत , टारगेट व्यक्तींसाठी किंव्वा मित्र मैत्रिणीं च्या निखळ विनोदासाठी आपल्या लाल रंगाच्या डब्याचे एक प्रतीक म्हणून टाकलेले प्रतिसाद असतील. या प्रतिसादांना बघून मनोमन आपण पुन्हा तो धागा, त्या टवाळक्या आणि ऑफीसात केलेला टाईमपास अनुभवतो. बघा जरा, काय काय सापडलंय सनावृतांच्या प्रतिसादात -

-----
(उजवीकडून वरच्या अंगाने अन डावीकडुन खालच्या अंगाने)
१.
अर्रर्र... तुम्हाला अजून तीन
सतिश गावडे - Fri, 22/05/2015 - 00:04
अर्रर्र... तुम्हाला अजून तीन सुवचने माहिती नाहीत. नाहीतर इतक्यात माफी न मागता ती सुवचने तोंडावर फेकून मारली असती तुम्ही. असो. तुमच्या सोयीसाठी चारही सुवचने पुन्हा लिहितो. व्यवस्थित नोट करुन ठेवा.

|| श्री तांब्याराम प्रसन्न ||
१. तो तुमचा समज आहे.
२. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन
३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात
४. आपणास मुद्दा कळलेला नाही

ही सुवचने (आपल्याकडे उत्तर नसले की) समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी याच क्रमाने वापरावीत. अतिशय प्रभावी अशी ही सुवचने असून आम्ही त्यांचा वापर करुन खात्री केली आहे.

चौथे सुवचन हे ब्रम्हास्त्र आहे. मात्र तुम्ही ते पहिल्याच बाणावर आणि ते ही चुकीच्या पद्धतीने अभिमंत्रित केलेत त्यामुळे घोळ झाला.

प्रतिसाद द्या

२.
विलक्षण प्रत्ययकारी कविता.
प्रचेतस - Sun, 26/04/2015 - 10:16
विलक्षण प्रत्ययकारी कविता.
कवीने व्यथा आणि कथा (किंवा व्यथेची कथा किंवा कथेची व्यथा) ह्या दोहोंचा संगम अतिशय सुरेखरीत्या येथे दर्शवला आहे.

प्रतिसाद द्या

३.
सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड
ज्ञानोबाचे पैजार - Sun, 06/03/2016 - 13:55
सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड लावा "सापांना सोसायटी मध्ये येण्यास सक्त मनाई आहे. बेकायदेशीर घुसखोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल."

तरी देखील साप आले तर सुशिक्षीत सापांना नोटीसा बजावा व अशिक्षीत सापां करता एका प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करा.

सापांची नसबंदी करुन घ्या त्यामुळे सापांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल व भविष्यातला त्रास कमी होण्यास मदत होईल.

सापांच्या बिळात ए.सी, आणि झी च्या कनेक्क्ष्न सकट टीव्ही बसवुन द्या म्हणजे सर्पिणी बाहेर पडायच्या कमी होतील. सापांसाठि एखादा स्मोकिंग झोन तयार करुन द्या म्हणजे ते इकडे तिकडे फिरत बसणार नाहीत.

सोसायटी मध्ये एक तक्षकयाग करुन घ्या. व त्याला सर्व सापांना बोलवा.

साप दिसला कि त्याच्या मागे "सापड्या सापड्या" असे चिडवत फिरा. म्हणजे ते चिडुन येईनासे होतील. नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा.

नाग पंचमिला सर्पिणिंसाठि हळदी कुंकु व सापांसाठि कोकटेल पार्टीचे आयोजन करा.

सापांच्या मुलांना जे एन यु मध्ये दाखला मिळवुन द्या.

पैजारबुवा,

प्रतिसाद द्या

४.
भारी!
संजय क्षीरसागर - Wed, 09/07/2014 - 17:53
किंवा असं ही चालू शकेल :

सोडता धागा वड्याचा... खेकडा माझा मोकळा!

प्रतिसाद द्या

५. -
बिभिबिभिइषण बाकी हा कोण आता?
मांत्रिक - Wed, 14/10/2015 - 22:45
बिभिबिभिइषण बाकी हा कोण आता? की तुमचा पुढचा डुआयडी? :)

प्रतिसाद द्या
कीबोर्ड आणि ब्राउजरचा अनौरस
तर्राट जोकर - Wed, 14/10/2015 - 23:05
कीबोर्ड आणि ब्राउजरचा अनौरस पुत्र आहे....

प्रतिसाद द्या
६.
स्पावडी!!!!!
पियुशा - Wed, 14/01/2015 - 15:27
स्पावडी!!!!!
जबर्या !!
समदुखी समदुखी का काय म्हण्तात त्येच ते !

प्रतिसाद द्या
क्काय्य!!!!??? तुलाही मुली
बिपिन कार्यकर्ते - Wed, 14/01/2015 - 17:37
क्काय्य!!!!??? तुलाही मुली सांगून येताहेत? ;)

प्रतिसाद द्या
७.

टेक इट इझी!
संजय क्षीरसागर - Sun, 14/07/2013 - 15:15
मी पहिल्यांदाच क्लिअर केलंय लेखात न समजण्यासारखं काही नाही. शुद्ध, साधं मराठी आहे.

‘जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे’

ही लेखाची कॅच लाईन आहे.....

_____________________________________________________________

असो , ह्याही व्यतिरिक्त काही अभिजात प्रतिसाद मिपावर आलेले आहेत की जे आल्याने धाग्याव लगेच टाळे लावले गेले होते =)), पण इथे तसेच टाळे लागु नये ह्या भयास्तव ते इथे देण्याचे टाळले आहे =))

तुमच्या पाहण्यात असे अभिजात प्रतिसाद असतील तर ते जरुर शेयर करा ह्या इथे =))))

विडंबनवाद

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

15 Mar 2016 - 6:40 pm | जव्हेरगंज

लय भारी!

वाचतोय !!

नाखु's picture

15 Mar 2016 - 6:45 pm | नाखु

आणि कालातीत असलेला प्रतिसाद

आंतरजालावरील एका मिसळीसाठी
परिकथेतील राजकुमार - Tue, 29/05/2012 - 14:56
आंतरजालावरील एका मिसळीसाठी प्रसिद्ध कट्टा वजा संस्थळातील हा किस्सा.

माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या चावडीवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता.
एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक सदस्य आलं धागा टाकायला.
"धागा टाकू का?" - सदस्य
"बिनधास्त" - चावडीवरील इसम

सदस्य टाकून गेलं.

"आज पुन्हा आली वाटतं जिलबी?" - मित्र
"हो!! वैताग आलाय ह्या जिलब्यांचा आणि ट्यार्पी खेचायच्या प्रयत्नांचा " - चावडीवरील इसम
"मग त्या सदस्याला का सांगितलत की बिनधास्त टाक म्हणून?" - मित्र
"अहो सारखे डायरीयावाले येत असतात काही ना काही लेखनकंडू शमवायला. आम्हाला जरा समतोल असण्याचे कौतुक नको ?" - चावडीवरील इसम

या एका प्रतिसादासाठी तरी पराशेठना भेटायचेय(त्यांची इच्छा असल्यास)