निकामी

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
16 Sep 2008 - 5:49 pm

नात्यातले उमाळे- नसतात सत्य सारे
ओठांवरील शब्द ,नुसतेच वांझ भारे

हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने
हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे

आभाळ शोधताना हातात मेघ येई
डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही

कोणासही कराव्या का व्यर्थ वल्गना मी
माझे मलाच ठावे, ठरलो कसा निकामी

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

फटू's picture

17 Sep 2008 - 1:03 am | फटू

खुपच छान !!!

ओळ अन ओळ मनाला भिडली...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

आनंदयात्री's picture

17 Sep 2008 - 10:34 am | आनंदयात्री

हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने
हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे

सुरेख !!

बेसनलाडू's picture

17 Sep 2008 - 11:19 am | बेसनलाडू

लयबद्ध,सहज,गेय कविता. फार आवडली.
आभाळ शोधताना हातात मेघ येई
डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही

हे सगळ्यात जास्त आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

सर्किट's picture

17 Sep 2008 - 11:22 am | सर्किट (not verified)

ह्याच ओळी खूप आवडल्या.

- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

चतुरंग's picture

18 Sep 2008 - 2:02 am | चतुरंग

सुंदर!!

चतुरंग

मनिष's picture

17 Sep 2008 - 11:22 am | मनिष

छान आहे कविता, नेहमीसारखीच!

मनीषा's picture

17 Sep 2008 - 10:46 pm | मनीषा

कविता छानच आहे ...आवडली

आभाळ शोधताना हातात मेघ येई
डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही
------------ सुंदर

यशोधरा's picture

17 Sep 2008 - 10:53 pm | यशोधरा

किती सुरेख लिहितेस बयो! :)

स्वाती दिनेश's picture

18 Sep 2008 - 1:07 am | स्वाती दिनेश

आभाळ शोधताना हातात मेघ येई
डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही
हे फारच सुंदर..
स्वाती

प्राजु's picture

18 Sep 2008 - 1:35 am | प्राजु

एक न एक ओळ सुंदर आहे.. अतिशय गेय..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 10:09 am | मदनबाण

व्वा.. कविता आवडली..
हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने
हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे
या ओळी फार आवडल्या..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

काही काही रचनाच असतात की प्रतिसाद दिल्यावाचून राहवत नाही.
अतिशय सुंदर लिहिलेस तै! प्रत्येक ओळ भिडली...केवळ क्लास!!