खान्ग्रेसीजन व त्यांचे समर्थक , मित्र यांनी विरोधक असूनही काही चांगल्या योजना चालू केल्या आहेत त्यातील काही आपल्यासाठी ..
जळजळ / मळमळ ओकू योजना
या योजनेअंतर्गत आपण निवडणुकीत हरल्यामुळे सरकारविरोधातील आपली होणारी जळजळ कुठेही ओकण्याची मुभा दिली जाईल. त्यासाठी सरकारविरोधात जास्तीत जास्त फालतू विधाने कशी करावी याचे खास प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. माननिय युवराजांच्या अभ्यासपूर्ण भाषणाच्या सीडी व केसेट सवलतीच्या दारात उपलब्ध .
संसद रोको कमअक्कल योजना :
या योजनेअंतर्गत कोणत्याही क्षुल्लक कारणावरून संसद बंद पाडण्यात येईल. संसद हे गदारोळाचेच ठिकाण असल्यामुळे जितका जास्त गोंधळ खान्ग्रेसी व अन्य विरोधक करतील तितका या योजनेचा लाभ देशातील सर्वसामान्य नागरिकास होईल हेच या योजनेचे खास वैशिठ्य . सर्वात जास्त गोंधळ घालनार्या व सर्वात मोठा आवाज करून कोकलनार्या सभासदास मनमोहन साहेबांबरोबर जेवण्याचा लाभ. काळे झ्हेंडे व फलक बनवणार्या लोकांना सवलतीत सूट.(!). संसद काय कारणास्तव बंद पाडावी यातील प्रथम ५ विजेत्यांना देश के जमाइ श्री वद्रा यांचे हस्ते एक काळा सूट मोफत . क्षुल्लक बातमीचे मोठे रूप कसे तयार करावे व प्रत्येक अधिवेशन कसे उधळावे यासाठी या योजनेअंतर्गत सभा घेतल्या जातील . खान्ग्रेसीनी लाभ उठवावा .
मृतक – जात योजना
यामधे आत्महत्या केलेल्या माणसाची खासकरून विद्यार्थ्याची जातपडताळणी होईल. विद्यार्थी जर दलित गैरहिंदू अथवा ‘पिछडे हुये समाज से ‘ असेल तर “ दलितांचा सरकार खून करत आहे “ वगैरे संदर्भहीन बरळण्यास मुभा . मेलेल्याची जात काढून त्यावर राजकारणी डावपेच आखणे हे या योजनेचे प्रमुख वैशिट्य. मात्र या योजनेअंतर्गत वरील तीन जातीचे लोक सोडल्यास कोणी आत्महत्या केली तर त्यांची नावे वगळण्यात येतील. सरकार जास्तीत जास्त दलित / मुस्लीम विरोधी कसे आहे हे फक्त त्या लोकांची मते मिळवण्यासाठी ही योजना चालू केली आहे. याउलट सरकारच कसे जातीपातीत भेदभाव करत आहे असे वैचारिक लेख लिहिणार्या “विचारवंतास “ या योजनेंतर्गत मम्मा मेडम नी वापरलेल्या जोड्यांपैकी एक चपलांची जोडी वापरण्यासाठी भेट . अ
असहीष्णूता वाढवा योजना .
कोणत्याची गैरहिंदू व्यक्तीवर जर हल्ला झ्हाला तर देशात असहीष्णूता वाढली आहे देश आता राहण्यालायक राहिला नाही असा प्रचार या योजनेअंतर्गत केला जाईल. देश शांततेत असून सर्व सुरळीत आहे हे पुढील पक्षाच्या पुढील वाटचालीस अत्यंत घातक आहे. तस्मात देशात किती अशांतता नांदत आहे असा योग्य प्रचार हिरीरीने यामध्ये केला जाईल. याची काही वैशिष्ट्ये
१. ह्या योजनेत गैरहिंदू व्यक्तीवरच हल्ला होणे आवश्यक आहे अन्यथा ती केवळ एक घटना असेल
२. दोन व्यक्तींमधील वैयक्तिक गोष्टींमुळे जरी काही घडले तरी ते सरकारच कसे घडवून आणत आहे याचा शोध घेतला जाईल.
३. या घटना राज्यात घडल्या तरीही अशा घटनांवर केंद्र सरकारची जबाबदारी राहील .
४. या योजनेंतर्गत पुरस्कार वगैरे परत करणाऱ्यास “ गांधी घराण्याचे निष्ठावान सेवाक “ असे प्रशस्तीपत्रक स्वतः म्याडम च्या सहीचे मिळेल अथवा ‘गांधी घराण्याच्या सेवेचे ठायी तत्पर “ असा बोर्ड स्वताच्या घराबाहेर लावण्याची परवानगी.
५. सर्वात महत्वाचे १९८४ दंगल , कश्मीरी पंडित हत्याकांड , २०१४ पूर्वी घडून गेलेल्या अनेक लहानमोठ्या जातीय दंगली हे यात गृहीत धरु नये. त्यावेळी कायम सहिष्णुता व शांतताच होती .
दहशतवादी पावन चिदंबरम योजना
कुठलाही दहशतवादी भाजपा चे सरकार असलेल्या राज्यात मारला गेला असल्यास असे करणे खुनाहून अधिक गंभीर आहे असा वेळोवेळी प्रचार केला जाईल. किंबहुना मेलेला दहशद्वादीच कसा न्हवता हे सिद्ध करण्यासाठी अनेक उपाय केले जातील. देशापेक्षा आपल्याला दहशतवाद्याच्या जीवावर मिळालेली मते जास्त महत्वाची हाच या योजनेचा पाया आहे .
सर्व खोटे योजना
यामध्ये सरकार मधील कोणीही काही विधान केले की तो खोटेच बोलत आहे असे ढोल बडवून सांगत सुटणे . तो खोटे कसे बोलत आहे याचे पुरावे देण्याचे कष्ट या योजनेंतर्गत करू नये. फक्त तो बोलतो ते खोटेच आहे असे सर्वांनी मानावे. हवेच असल्यास फारतर संसदेत एखादी केस टाकावी .
सर्वात महत्वाची योजना
मोदी विरोध योजना
ज्या व्यक्तीला १२ वर्ष कुरापती काढून त्रास देऊनही ते पंतप्रधान झ्हाले व त्यांच्यामुळेच सर्व विरोधक उघडे पडत आहेत हे समाज्ल्यामुळे फक्त त्यांच्यावर काहीही करून टीका करा असे याचे स्वरूप आहे. जास्तीत जास्त घाण टीका करणार्यास श्री युवराज यांचे जुपीटर च्या एस्केप वेलोसीटी चे तंत्र त्यांच्याकडूनच समजून घेण्याची संधी.
लोकसहभागातून चालणाऱ्या काही योजना : ( बुद्धीजीवी लोकांनी चालवलेले प्रचार )
१. आम्हाला मते मांडण्याचा अधिक्कर नाही असा आधीच निश्कर्ष काढून हाय हाय असे बरळत सुटणे
२. सरकारच्या कुठल्याही योजनेवर अथवा गोष्टींवर फक्त टीका करत सुटणे. सरकार ने ती गोष्ट मुद्दाम केली का , सरकार ती गोष्ट संपवण्यासाठी काय प्रयत्न करत आहे वगैरे माहिती न काढताच आमचा भ्रमनिरास झ्हाला असे सांगत सुटणे ( वास्तविक तुमचा भ्रमनिरास होणारच होता कारण भ्रमनिरास कधी होतो याचीच तुम्ही वाट बघत होता कारण तेच तुम्हाला हवे होते असो)
३. आपण सरकारवर टीका करतो म्हणजे आपण किती हुशार अभ्यासू असे मानून हुरळून जाणे (!) व बाकीचे भक्त ते मूर्ख असे समजत राहणे.
तर यावतिरिक्त “ मिडिया ला चारा योजना “ “काहीही करा पण मलाच हाना ही केज्रीवली योजना “ आपल्याकडे कोणतेही उपाय नसून व मूळ प्रश्नाचे कारणे वेगळी असूनही फक्त विरोध करण्यासाठी “हमे चाहिये आझ्हादी अथवा मूर्ख घोषणा योजना या व अशा अनेक योजना चालू आहेत . त्याविषयी नंतर कधीतरी . तूर्तास इतकेच पुरे .
रच्याकने : मी कोन्ग्रेस चा समर्थक असून मी त्यांनाच मत दिले होते पण ते विरोधक या नात्याने काही चांगले काम करत नाहीत म्हणून माझ्हा भ्रमनिरास झ्हाला . मग तरीही मी न्यूट्रल राहिलो तर हे लोक जास्तच चेकाळले. खान्ग्रेसी समर्थक कशालाही पाठींबा देऊ लागले . खान्ग्रेस ने या पिलावळी शांत करण्याबाबत काहीच केले नाही. यांच्या पिलावळीचा त्रास सोशल मेडिया वर इतका वाढला की सरकार विरोधात हे काहीही खोटेनाटे सांगत सुटले. माझ्यासारख्या न्युट्रल लोकांवर राहुल महानच आहेत हे मान्य करा असा अघोषित दबाव आनला जाऊ लागला
माझे कांग्रेस समर्थकांना इतकेच म्हणणे आहे की बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका. इथे कोणी टिका केली तर लगेच सरकार खान्ग्रेस सरकार २०१९ साली येणारच नाही असे नाही . अल्पमतात येऊन पडणार नाही. पाच वर्ष पुर्ण होतील. थोडा आत्मविश्वास ठेवा आणि दुर्लक्ष करायला शिका. बाकी मोदी ना प्रत्येक बाबतीत ओढणे उपयोगाचे नाही. देशाने भाजपाला पूर्ण बहुमत दिले आहे. त्याचा अपमान करु नका. जमिनीवर राहा. प्रगती करा. आपोआप लोक डोक्यावर घेतील. आधीच नाचायला लागलेत तर विसरु नका हा भारत आहे. :) :)
प्रतिक्रिया
9 Mar 2016 - 1:29 am | अर्धवटराव
मिपावर प्रतीभेची चणचण जाणवायला लागली आहे कि काय.
9 Mar 2016 - 9:32 am | सुज्ञ
जमवा म्हणजे जमेल
9 Mar 2016 - 12:41 pm | अर्धवटराव
आधीच एक्सपर्ट लोक काम करताहेत त्यावर.
9 Mar 2016 - 1:49 am | राजेश घासकडवी
राहुल गांधी बालबुद्धीविकास योजना - जगातल्या सगळ्याच गोग्गोड बालकांच्या बुद्धीचा विकास घडवण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील राहाणार आहे. विशेषतः त्यांचे बोबडे बोल सुरूवातीला कौतुकास्पद वाटले तरीही ते बदलून त्यांना ठीकठाक बोलायला या योजनेअंतर्गत शिकवलं जाणार आहे.
9 Mar 2016 - 6:42 am | बाजीप्रभू
कालच व्हॉटअप्सवर एक जोक वाचला तो असा,
हिंदी सिनेमा मे हमेशा डॉक्टर कहता हैं,
"हम मां और बेटे में से किसी एक को हि बचा पायेंगे"
जब राहुल गांधी पैदा होने वाले थे तब डॉक्टर ने कहा,
"हम मां और बेटे दोनो को बचा लेंगे पर देश को बचा नही पायेंगे"
9 Mar 2016 - 9:24 am | राजेश घासकडवी
हात चोळो आंदोलन - २०१४ चा लोकसभा पराभव, दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आलेलं अपयश आणि बिहारमध्ये महागटबंधनातला एक छोटासा गट व्हायची पाळी आल्यामुळे कॉंग्रेस पार्टीने हात चोळो आंदोलन सुरू केलेलं आहे. पार्टीच्या चिन्हात सध्या केवळ एकच हात आहे. हात चोळो आंदोलन यशस्वी होण्यासाठी ते चिन्ह बदलून दोन हात करण्याचं घाटतं आहे.
9 Mar 2016 - 9:31 am | सुज्ञ
हे काही पटले नाही . वरील योजना कशा काही किमान तथ्य्यांवर आधारित असाव्यात. राहुल गांधी बालबुद्धी विकास योजना ? म्हणजे राहुल बालबुद्धीचे ? यात नक्की काही तथ्य आहे का
9 Mar 2016 - 9:43 am | राजेश घासकडवी
तुम्ही ज्या धाग्याचं विडंबन करून हा धागा काढला आहे, त्याचा तथ्यांशी काही संबंध नव्हता. तो निव्वळ भंकस करण्यासाठीचा धागा होता. तसाच हाही आहे असं गृहित धरून मी इथेही भंकस करतो आहे. तुम्हाला जर भंकस नको होती तर या धाग्याचं नाव वेगळं ठेवायला हवं होतं. आता चान्स गेला.
9 Mar 2016 - 9:42 am | सभ्य माणुस
लिखानशैली छान आहे तुमची.
बाकी "सेम-टू-सेम" योजणा NDA ने पण आखल्या होत्या ज्यावेळी "युवराजांचे" राज्य होते...!
तात्पर्य: हे सारे एकाच माळेचे मनी आहेत, असे मला तरी वाटते..!
9 Mar 2016 - 9:45 am | भंकस बाबा
इटालियन बहु आणि परमपूज्य पप्पू यांचा असा अपमान कदापि सहन केला जाणार नाही.
धागाकर्त्याला पप्पुचि भाषणे ऐकण्याची सजा फर्मावण्यात येत आहे. पप्पू जे काही बोलतो ते समजवण्यासाठी तुम्ही मनीष तिवारी व् डॉगीराजाची मदत घेऊ शकता.
च्यामारि त्यांना तरी कळत असेल का ते?
कालच म्हणे रॉ च्या दोन गुप्तहेराना मानसिक संतुलन बिघड़ल म्हणुन हॉस्पिटलात भर्ती केले आहे. पपुची भाषणे डिकोड करायला दिली होती त्यांना!
9 Mar 2016 - 10:16 am | आनन्दा
कोणत्याच पक्षावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये अश्या मताचा मी आहे. विशेषतः इतर प्रतिसाद ती मर्यादा पाळत असताना.
त्यामुळे तुम्ही या धाग्यावर जे काही लिहिले त्याने मला वाईट वाटले एव्हढेच नमूद करतो. हाच आशय तुम्ही किमान सभ्य शब्दातदेखील व्यक्त करू शकला असतात.
असो. लोभ असावा.
9 Mar 2016 - 10:18 am | अनुप ढेरे
ऑन सिरियस नोट,
कॉंग्रेसची एक सिग्निफिकंट योजना म्हणजे त्यांनी नुकतच प्रशांत किशोर यांना पण्जाब, युपी निवडणुकांपासून २०१९ लोक्सभा निवडणुकांपर्यंत प्रचार/स्ट्रॅटेजी प्रमुख म्हणून हायर केलय.
प्रशांत किशोर हा माणूस मोदींचा गुजरात २०१२ आणि २०१४च्या निवड्णूकांमधला खास होता. अबकी बार मोदी सरकार हे कँपेन, चाय पे चर्चा या त्याच्या आयडीआ होत्या. मोदींचं २०१४ च प्रचंड यशस्वी मार्केटिंग याने केल होतं. नंतर अमित शहांशी भांडण झाल्यामुळे ते बाहेर पडले.
नंतर गेल्या वर्षी नितीश कुमार यांनी बिहार निवड्णूकांमध्ये त्यांना हायर केलं होतं. तिथेही त्यांनी प्रचंड यशस्वी कँपेन केलं आणि निकुंना जोरदार मोठा विजय मिळाला. किशोर आधुनिक चाणक्य आहेत वगैरे वल्गना देखील सुरू झाल्या होत्या.
आता रा.गां बरोबर बघु किती यश मिळवतात ते.
9 Mar 2016 - 2:40 pm | श्री गावसेना प्रमुख
समोरचा जे स्पष्टीकरण देतो त्याला न जुमानता आणखी पुरावे लिंक ह्यांची मागणी करणे आणि वरून अजून आरोप करणे,आणि ह्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेला आहे त्यांनी त्यांचं निर्दोषत्व स्वतः सिद्ध करायचं (केजरीवाल स्टाईल) ही पुरोगामी स्टाईल सर्व कार्यकर्त्यांना आत्मसात व्हावी ह्या साठी काही काही किमान कौशल्य योजना आखायला हवी।
9 Mar 2016 - 3:16 pm | श्रीगुरुजी
डॉ. दोरूगडे यांच्या धाग्यावर जसा प्रतिसाद दिला होता, तसाच इथेही देतो.
सटायर आवडले. पण हे जरा जास्त व्यक्तिगत झाले आहे. निष्पक्षपाती राहून लिहायला हवे होते. त्या तुलनेत त्या धाग्यात व्यक्तिऐवजी सरकारचा उपहास होता.
9 Mar 2016 - 7:52 pm | आनन्दा
यात काय व्यक्तिगत आहे? मला तर आवडले बुवा.
9 Mar 2016 - 8:16 pm | चेक आणि मेट
हाण्णा तुम्ही,