मागे वळून पाहताना त्रास होतो-
मागे वळून पाहू नकोस!
आठवून भूतकाळ वाईट वाटतं-
मागचं काही आठवू नकोस!
दिल्या-घेतल्या वचनांची
फिकिर तू करू नकोस
ठोकरलेल्या प्रियकरास
दया बिलकूल दावू नकोस!
गेलीस निघुनी सोडून मला
एक मागणी नाकारु नकोस
या जन्मी भेटलिस, कृपया
पुढल्या जन्मी भेटू नकोस!!
(जुनी कविता- बहुदा 9वी/10वी ला असताना केली होती.)