तेरे इष्क मे मेरी जान फना हो जाये..........

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 6:12 pm

काय म्हणताय मॅडम तुम्हाला काय वाटते यात गिल्टी कोण आहे?
नवरा की बायको?
सांगणं अवघड आहे सर. प्रथमदर्शनी पाहिलं तर एकावर दुसरा अन्याय करतोय हे नक्की. खलील जीब्रानच्या प्रॉफेट पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे "रॉब्ड इज ईक्वली रीस्पॉन्सिब्ल अ‍ॅज द रॉबर इज" चोरीसाठी ज्याच्याकडे चोरी झाली तोही चोरा इतकाच जबाबदार आहे. अन्याय करणारा इतकाच अन्यान सहन करणारा देखील अन्यायासाठी जबाबदार आहे.
अहो मॅडम असा विचार केला तर मग न्यायदानाची गरजच उरणार नाही. सगळी कडे अराजक माजेल.
सर खरं सांगु माझ्या कडे उत्तर नाही. मला जे वाटते ते मी इथे व्यक्त करणे कितपत योग्य आहे माहीत नाही. प्रोटोकॉल प्रमाणे मी या केसमधे तुमच्याशी असे कोर्टाबाहेर काही मत व्यक्त करणे योग्य वाटत नाही.
मॅडम तुमचे बरोबर आहे. मी तुमचे एक मत विचारले होते. या वेळेस मी तुमच्याशी जज्ज म्हणून बोलत नाही. आपण अनौपचारीक बोलतोय.
सर एक विचारू?
हो जरूर.
सर एखाद्या ठिकाणी अपघात झालेला आहे. दोन्ही वाहन चालक जबर जखमी झालेत. अशा वेळेस त्या जखमीना वाचवणे हे मी प्रथम कर्तव्य मानते. दोष कोणाचा हे नंतर ठरवता येईल. जीव वाचणे महत्वाचे. माझ्याकडे आलेल्या केसेस मधे मी हेच पहाते. घटस्फोटाच्या खटल्यात एखादे घर वाचणे महत्वाचे.
बरोबर.
पण कोणी आत्महत्या करण्याच्या इराद्यानेच अपघात करत असेल तर?
तरीही जीव वाचवणे महत्वाचे.
जज्ज साहेबांच्या त्या रीमार्क मुळे मी विचारात पडले.
नीरज आणि रजनी च्या केस मधे अशी कोणती गोष्ट असेल की त्याना दोघाना पुन्हा एकत्र यायला लावेल?
गेले काही दिवस डोक्याला भुंगा लावणारी केस. खरे तर मला इतके त्या केस मधे गुंतायचे कारण नव्हते. केस एकदम स्ट्रेट होती. कोणाला तरी दोषी ठरवून किंवा दोषी न ठरवताही त्याना सेपरेशन मिळवून दिले असते.
पण मला घर मोडण्यापेक्षा टिकवण्याचे जास्त समाधान मिळाले असते.
अनौपचारीक बोलण्यात का होईना जज्ज साहेबांच्या प्रश्नाचे मी सरळ उत्तर देऊ शकले असते. पण मलाच ते उत्तर नको होते. मन पुन्हा विचारात गुंगून गेले.
नीरज आणि रजनी च्या केस च्या मागील दीड वर्षातील सगळ्या सिटींग्ज डोळ्यापुढून चित्रपट सरकावा तशा सरकू लागल्या.

---------------------------------------------------------------------------------
फोन वाजला. नंबर अनोळखी होता. या वेळी कोण फोन करत असेल? मी साशंकतेनेच फोन उचलला. न जाणो काही इमर्जन्सी असेल.
कोण आहे?
मॅडम मी अमुक अमूक... मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.
अहो ही काय वेळ आहे फोन करायची. आत्ता सकाळचे साडेपाच वाजताहेत. ऑफिसात बोला
नाही सर खूप महत्वाचे आहे. आत्ता च्या आत्ता बोलायचे आहे.प्लीज ऐकून घ्या. मला माहीत आहे मी तुमची झोपमोड केली आहे. पण प्लीज ऐकून घ्या.
काय वैताग आहे. मी चरफडतच त्या अमूक अमूक चे म्हणणे ऐकून घेतले. नाईलाज होता.
तुम्ही एक काम करा दुपारी ऑफिसात या चार वाजता. मी वेळ ठेवतो
धन्यवाद मॅडम.
ऑफिसात जायच्या अगोदरच मी त्यांची अपॉईंटमेंट बूक करुन ठेवली. दुपारी चार ही खरेतर ऑफिसमधे महत्वाची वेळ
सकाळी झालेल्या केसेस चे डिटेल्स अपडेट करणे आणि उद्या तारीख असलेल्या केसेस मधले मुद्दे कन्फर्म करणे. हा वेळ पूर्णतः स्वतःसाठी राखून ठेवलेला.संध्याकाळी साडे पाच पासून क्लायंट च्या मिटींग्स सुरू व्हायच्या आत हे सगळे पूर्ण करायचे असते. काही राहून गेले तर उगाच चिडचीड व्हायची. आणि तो राग ज्यूनीयरवर निघायचा.बाकी अर्ज करणे , अ‍ॅफेडेव्हीट करणे , तारखा घेणे वगैरे कामे ज्यूनीयरच करायची.
हे गृहस्थ ऑफिसमधे येवून नक्की काय सांगणार आहेत ते माहीत होते. नव्वद टक्के केसे मधे नाव आडनाव गाव वगैरे किरकोळ गोष्टी सोडल्या तर मुद्दे सारखेच असतात. तीने त्याला फसवले , त्याने तीला फसवले. बीगॅमी वगैरे.
आईबापाने भरीला पाडले असल्या सबबी सुद्धा तशा कॉमनच. एका केस मधे तर त्या नवर्‍याने बायकोकडून "अगं जरा ह्या कागदावर सह्या कर गं बेंकेतून जोईन्ट लोन प्रोसेस करतोय सांगून कागदपत्रावर सह्या घेवून रीतसर दुसरे लग्न केले होते. नवर्‍या मुलाच्या बापाने मुलाला हे इमोशनल ब्लॅकमेल करून करवून घेतले होते. विशेष म्हणजे त्या लग्नापासून त्या मुलाला एक सहा महिन्याची मुलगी होती. मुलीने लग्ना अगोदर घरच्यांचा विरोध पत्करुन लग्न केले होते तीला माहेरच्यानी घरदार बंद केले होते. रडत रडत स्वतःच्या सहा महिन्यांच्या मुलीला कडेवर घेवून ती मुलगी कोर्टात उभी होती. त्या सहा महिन्याच्या निरागस तान्हुल्या चा चेहेरा पाहूनही मुलाच्या बापाच्या चेहेर्‍यावर काहीच भाव उमटत नव्हते.
कुठे तो निष्ठूर बाप , नेभळ्ट नवरा मुलगा. आणि कुठे ही केस.
जॉन लिली ने म्हंटले आहे की Every thing is fair in Love and War प्रेमात आणि युद्धात सारे काही क्षम्य असते.
पण जर प्रेमाचे परीवर्तन युद्धात झाले तर? देईल तो उत्तर याचे?
(क्रमशः)

कथाविचार

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Mar 2016 - 6:22 pm | कपिलमुनी

पुभाप्र

जगप्रवासी's picture

7 Mar 2016 - 6:55 pm | जगप्रवासी

वाचतोय

थोडी मॅडम-सर मध्ये गफलत झालीये काही ठिकाणी असं वाटलं. पुभाप्र.

भाऊंचे भाऊ's picture

8 Mar 2016 - 10:44 am | भाऊंचे भाऊ

जज बाई की असिस्टंट की वकील आहे की स्प्लिट पर्सनालिटी प्रकार आहे ?

पण असा गुंता करणे अन सोडवणे सवयीने अंगवळनी असल्याने एकुण लिखाण नक्कीच रोचक. पुभाप्र.

मराठी कथालेखक's picture

9 Mar 2016 - 4:55 pm | मराठी कथालेखक

फोन वाजला. नंबर अनोळखी होता. या वेळी कोण फोन करत असेल? मी साशंकतेनेच फोन उचलला. न जाणो काही इमर्जन्सी असेल.
कोण आहे?
मॅडम मी अमुक अमूक... मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.
अहो ही काय वेळ आहे फोन करायची. आत्ता सकाळचे साडेपाच वाजताहेत. ऑफिसात बोला
नाही सर खूप महत्वाचे आहे. आत्ता च्या आत्ता बोलायचे आहे.प्लीज ऐकून घ्या. मला माहीत आहे मी तुमची झोपमोड केली आहे. पण प्लीज ऐकून घ्या.

शित्रेउमेश's picture

11 Mar 2016 - 3:44 pm | शित्रेउमेश

सुरवात मस्त....
पुभाप्र.

मधुरा कुलकर्णी's picture

17 Jun 2019 - 11:29 am | मधुरा कुलकर्णी

याचा पुढचा भाग आहे का??
असला तर त्याची लिंक द्याल का? कारण मला पुढचा भाग सापडत नाहीय ...