मोदी सरकारच्या नवीन योजना

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 12:38 pm

मेक-अप इंडिया-
या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल.

वेक अप इंडिया-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल. शिवाय आपल्या वाढदिवसाच्या वगैरे दिवशी मोदींच्या आवाजातील शुभेच्छा सन्देश देईल.

एक कप इंडिया-
प्रत्येक तालुक्याच्या गावी चहाचे दूकान उघडण्यात येणार असून तेथे रोज सकाळी 4-5 या वेळेत प्रत्येकास एक कप चहा मोफत देणेत येईल.

स्वस्त भारत-
मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना. या योजनेअन्तर्गत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ₹1 इतक्या कमी किमतित गहु, तांदूळ इ. सोबत तुरडाळ, उड़ीदडाळ इ. सारखी कडधान्ये आणि डाळी पहावयास मिळतील.

फस्त भारत-
सर्व भ्रष्टाचारी, गुंड, भेसळखोर लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल.

टेक अप इंडिया-
या योजनेत उद्योजकाना शेतकऱ्यांच्या जमीनी कमी भावात उपलब्ध करून दिल्या जातील.

फेक अप इंडिया-
खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली.

या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत-
1. आधार कार्ड
2. मतदान ओळखपत्र
3. ड्राइविंग लैसेंस
4. शाळा सोडल्याचा दाखला
5. राशन कार्ड
6. रहीवासी दाखला
7. 7/12 उतारा
8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र
इ.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

6 Mar 2016 - 12:58 pm | उगा काहितरीच

काय राव आता असे पण धागे वाचावे लागतील काय मिपावर ? तुम्हाला नाही आवडत मोदी सरकारच्या योजना तर प्रत्येक योजनेविषयी थोडा अभ्यास करून त्या कशा फायदेशीर नाहीत ते स्पष्ट करा. उगात काय असले धागे काढुन फायदा नाही. मी तर संपादक मंडळींना विनंती करेल की हा धागा उडवण्यात यावा.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2016 - 1:18 pm | राजेश घासकडवी

मन्नैरहेगा - ही फसलेली योजना केवळ ती कशी फसलेली आहे हे दाखवण्याच्या शोसाठी ठेवण्यात येईल. आणि निव्वळ शोसाठी ठेवलेल्या गर्लफ्रेंडप्रमाणे तिला ठेवलेलीच आहे तर तिला ३५००० कोटी देऊन 'बघा बघा, तरीही कशी फेल गेली' असं तीन वर्षांनी सिद्ध करून दाखवण्यात येईल.

योजनेच्या आयड्या लेखकाच्या, नाव मोदीचे. आखिर माजरा क्या है?
मोदीचे नाव घेतल्याशिवाय काही सादर करायला बंदी आलीय काय?
मला वाटले आली एखादी नवीन स्कीम. निदान पोस्टरांचे तरी काम मिळेल. :(
.
ओ संपादक, उडवा हो. टाइम्पास करायला कन्हैय्या हाय सध्या.

भाते's picture

6 Mar 2016 - 1:32 pm | भाते

धागाकर्त्याचे मिपावय ६ महिने १ दिवस. एकाही धाग्यावर १० पेक्षा जास्त प्रतिसाद नाहीत. एका नवलेखकाला लिखाणापासुन परावृत्त करण्याचा निषेध.
कृहघ्या.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2016 - 1:36 pm | राजेश घासकडवी

हा धागा उडवण्याच्या मागण्या का होत आहेत कळत नाही. हलकीफुलकी टिंगल, कोपरखळ्या मारायला काय हरकत आहे? एकीकडे कडवट धाग्यांवर घणाघाती चर्चा होतात त्याचा वीट येतो म्हणून संपादक मंडळाने विडंबन स्पर्धेचा उत्तम उपाय सुचवलेला आहे. त्यातही राजकारण हा विषय आहेच. मग कवितेत गंमतजंमत करायची तशीच इथेही करू की. कोणी जर 'राहुल गांधींच्या भावी योजना' अशी टिंगल करणारा धागा काढला तर तिथेही करू टिंगल. व्हाय सो सीरियस?

अभ्या..'s picture

6 Mar 2016 - 1:44 pm | अभ्या..

सहमत ओ गुर्जी.
तुम्ही कधी चुकीचे बोललायत का कधी. कधी कधी फारच असहिष्णू वागतो बघा आम्ही.
माझेच चुकले. राहु द्या धागा. वाटल्यास राकुंना परत बोलावून सेपरेट सेपरेट फुसके बार लावले तरी करु टिंगल. हाकानाका.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2016 - 1:54 pm | राजेश घासकडवी

राकुंचं आणि त्यांच्या शेप्रेट बारांचं नाव काढून तुम्ही अगदी माझ्या वर्मावर बोट ठेवलंत हो! ;) माझंच चुकलं. तुमच्यापुढे साष्टांग नमस्कार आणि सपशेल माफी. ओ संपादक मंडळ भौजी, हे अभ्या.. जे काय म्हंटात ते करा ब्वॉ. मी यांच्या शब्दाबाहेर नाही.

अभ्या..'s picture

6 Mar 2016 - 2:12 pm | अभ्या..

असो गुरुजी. राकु चीज ही ऐसी है. ;)
जरा थोडा वेळ काढून आमच्या शंकेचे http://www.misalpav.com/comment/812700#comment-812700 निराकरण करा ना प्लीज. जरा उत्क्रांतीसाठी अडलाय विषय.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2016 - 2:47 pm | राजेश घासकडवी

उत्तर दिलेलं आहे.
http://www.misalpav.com/comment/813299#comment-813299

थ्यांक्सलॉट गुरुजी. समजले.

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Mar 2016 - 1:58 pm | श्री गावसेना प्रमुख

ओ दारुगडे साहेब अँप ची लिंक द्या बरं, डाउनलोड करून घ्यावं म्हणतोय।

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2016 - 2:01 pm | श्रीगुरुजी

चांगलं लेखन! satire आवडलं. धागा उडविण्याची मागणी चुकीची आहे. अजून जरा विस्तृत व जास्त उपहासात्मक लिहायला हवं होतं.

विवेक ठाकूर's picture

6 Mar 2016 - 3:25 pm | विवेक ठाकूर

सटायरला कुठे तरी वास्तविकतेचा स्पर्श असतो त्याशिवाय ती पटत नाही याची कल्पनाच दिसत नाही.

आत्ता ! अरारारारा ! विठा तुमी गुर्जिंना इरोध कर्ता कर्ता इक्त व्हावून ग्येला की तुमी मोदींची बाजू घ्येऊ र्‍हायलाय हे तुमी ठार इसारला की वो; =)) =)) =))

विवेक ठाकूर's picture

6 Mar 2016 - 3:02 pm | विवेक ठाकूर

खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली.

एकदम भारी !

भाऊंचे भाऊ's picture

6 Mar 2016 - 7:56 pm | भाऊंचे भाऊ

मस्त विनोद....!

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2016 - 4:31 pm | राजेश घासकडवी

टेक अ सेल्फी विथ एनीवन योजना - यात आपण फक्त आपला सेल्फी काढायचा, मात्र त्यात कोणतीही इतर व्यक्ती अवतरू शकते. म्हणजे गांधीजींच्या फोटोत त्यांच्या नकळत त्यांच्या नाकाला नाक लावून बसलेली तरुणी येते आणि गांधी म्हणतात, अरे, ही कशी आली इथे? ओबामाच्या फोटोतल्या टीव्हीत मोदी दिसतात, मोदींच्या हेलिकॉप्टरच्या खिडकीत चैन्नई दिसतं... स्टालिनच्या फोटोंमध्ये बरोब्बर उलटं व्हायचं - त्याच्याबरोबर एकेकाळी दिसलेले लोक नाहीसे झाले किंवा निव्वळ त्याच्या मर्जीतून उतरले (हे खरंतर वेगळं आहे का? पण असो.) तर त्याच्याबरोबर काढलेल्या फोटोंमधूनही ते नाहीसे व्हायचे. आपल्याकडे बेरजेचं राजकारण आहे, वजाबाकीचं नाही.

विवेक ठाकूर's picture

6 Mar 2016 - 4:54 pm | विवेक ठाकूर

टेक अ सेल्फी योजना : कसाही आणि कुठूनही फोटो काढा त्यात मोदीच दिसले पाहिजेत.

ही योजना खरं तर स्मार्ट फोन आल्यापसनं सुरु झाली पण तीची लोकप्रियता स्वतः पंतप्रधानांनी वाढवली. मतदान केल्यावर त्यांनी स्वतःचा सेल्फी मोठ्या दिमाखात प्रसिद्ध करुन जनतेला मतदानाला उद्युक्त केलं. ते करतांना स्वतःच्या खिश्यावरचं कमळ त्यात खुबीनं टिपलं पण लगेच: अरेच्या, हे माझ्या लक्षातच आलं नाही अशी कोलांटी उडी मारली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2016 - 7:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या न्यायाने एका पक्षाच्या खात्या आणि धुत्या दोन्ही हाताचे पंजे कलम करुन मगचं मतदानाला पाठवलं पाहिजे नाही का?

आनन्दा's picture

6 Mar 2016 - 8:19 pm | आनन्दा

कलम नै काय.. कमल.

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2016 - 8:26 pm | श्रीगुरुजी

मतदान केल्यावर त्यांनी स्वतःचा सेल्फी मोठ्या दिमाखात प्रसिद्ध करुन जनतेला मतदानाला उद्युक्त केलं.

काय सांगताय? म्हणजे सेल्फी काढली नसती तर लोकांनी मतदान केलंच नसतं की काय?

स्वामी संकेतानंद's picture

6 Mar 2016 - 7:52 pm | स्वामी संकेतानंद

छान औपरोधिक आहे की हे! ठेवा धागा, उडवू नका.

राजेश घासकडवी's picture

7 Mar 2016 - 12:15 am | राजेश घासकडवी

तूरडाळ म्युझियम - अजून काही लिहिण्याची गरजच नाही. सिर्फ नामपरीच हम फिदा है!

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 12:34 am | निशांत_खाडे

दोरुगडे सर, हे आपले 'धोरण' व 'प्रकटन' कुठल्या आधारावर आहे हे सांगता का जरा? सटायरला थोडासा तरी वास्तवाचा स्पर्श असावा की नको? निव्वळच बेसलेस असून कसे चालेल?

मन्नैरहेगा - ही फसलेली योजना केवळ ती कशी फसलेली आहे हे दाखवण्याच्या शोसाठी ठेवण्यात येईल. आणि निव्वळ शोसाठी ठेवलेल्या गर्लफ्रेंडप्रमाणे तिला ठेवलेलीच आहे तर तिला ३५००० कोटी देऊन 'बघा बघा, तरीही कशी फेल गेली' असं तीन वर्षांनी सिद्ध करून दाखवण्यात येईल.

हा घासकवडी सरांचा प्रतिसाद तुमच्या पूर्ण लिखाणापेक्षा अव्वल आहे.

Ram ram's picture

8 Mar 2016 - 7:27 am | Ram ram

रा घा जी यंत्राचा शाेध माणसाचे श्रम कमी व्हावे म्हणून लागला आहे, पण यांना मजूर हा मजूरच राहावा असे वाटते. मनरेगा मधील बहुतेक कामे सरकारला फसवुन यंत्राने खेली जातात, कितीही आनलाइन च्या गप्पा मारल्या तरी पाणी मुरतेच, फार दुष्काळाच्या ठिकाणीच खरे मजूर काम करतात, मजूराने पुढे जावु नये यासाठी ही याेजना आहे.

राजेश घासकडवी's picture

8 Mar 2016 - 8:00 am | राजेश घासकडवी

अगदी बरोबर... ही फसलेली आणि चुकीची योजना आहे असं मोदी सरकार उगाच नाही सांगतंय. आणि म्हणूनच त्यांनी त्या योजनेत ३५००० का कायसे कोटी रुपये घालून ही योजना तरीही फसेल असं दाखवलेलं आहे.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 8:01 am | डॉ. एस. पी. दोरुगडे

घासकड़वींच्या बाबतीत प्रश्नच नाही! वो मंझे हुए लेखक है.

मोदींच्या नवनवीन योजना कशा असतात, त्यांची नावे कशी असतात, त्यांचे वृत्तपत्रात वर्णन कसे येते हे लक्षात घेवून मी हे लेखन केले होते.

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. शिवाय मुळातच या कल्पनेचा जीव लहान. आणखी जास्त लिहिता आलं असतं पण त्यामुळे गम्मत हरवली असती.

लिखानामागे रचना आहे-
सुरुवात हलक्या-फुलक्या कल्पनेने करून हळूहळू त्यातील उपाहासाचा डोस वाढवत नेणें. मला जे सांगायचं होतं ते शेवटच्या भागात येतं.

मी मोदी विरोधक नव्हतो. निवडणुकीच्या वेळी उलट मी त्यांना पाठींबाच दिला होता. मात्र पुढे माझा हळूहळू भ्रमनिरास होत गेला. अर्थात अजूनही मी त्यांच्या हातून चांगलं काही घडेल अशी अपेक्षा सोडलेली नाहिये.

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 12:00 pm | निशांत_खाडे

प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचय औ..
तुम्ही जे लिहिताय त्यात मला काहीच उपहासात्मक काहीच वाटत नाहीये. उगाच बालिशपणे लिहिल्यासारखे वाटतेय.
एखादा मोदी भक्त जरी या धाग्यावर आला, तरी त्याला प्रतिसादाच द्यावा वाटणार नाही इतके कमकुवत आहेत तुमचे मुद्दे. थोडासा जरी वास्तवाचा स्पर्श याला असता तरी हे भारी झाले असते. उगाच स्वतःच्या आयड्या कशाला मोदींच्या नावाने खपवताय?
आणि तुम्ही दिलेला हा प्रतिसाद म्हणजे तुमच्या लेखनाचे तुम्हीच केलेले समीक्षण असल्यासारखा आहे. कोण म्हणतो या कल्पनेचा जीव लहान आहे? घासकड़वींनी दिलेल्या प्रतिसादावर एक वेगळा धागा काढला तरी त्यावर चर्चा होऊ शकते इतका तो तगडा आहे. उपहासात्मकही आहेच. प्रोब्लेम कल्पनेचा नाही तर तुमच्या मर्यादेचा आहे. तुम्हाला सुचत नाही म्हणा किंवा तुम्हाला मोदींच्या योजनाविषयी माहितीच नाही म्हणा कारण काहीही असो पण या लिखाणाचा आणि मोदींचा काहीच संबंध नाहीये.

या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत-
1. आधार कार्ड
2. मतदान ओळखपत्र
3. ड्राइविंग लैसेंस
4. शाळा सोडल्याचा दाखला
5. राशन कार्ड
6. रहीवासी दाखला
7. 7/12 उतारा
8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र
इ.

हे नेमकं कशासाठी लिहलयत तेही सांगून टाका.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 12:20 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

असं का? बरं. आणि?

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 3:28 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

१. समीक्षा आणि लेखनामागिल विचारप्रक्रिया यात फरक असतो.
२. कुणासही चिडवावं अथवा त्यांच्या प्रतिक्रिया आजमाव्यात असा उद्देश कधीच नसतो.
३. मोदींच्या योजनांमधील उघड-उघड डिसणाऱ्या गुण-अवगुणांचे बाह्यानुकरण करणे अशी कल्पना होती. त्यामुळे जीव लहान म्हटले. अर्थात त्यातही कल्पनेच्या भरा-या खूप मारता आल्या असत्या (आणखी योजना, त्यांची प्रक्रिया, टेंडर, अनुदान, स्पर्धा, निकाल, मीडिया, प्रचार, सेलिब्रिटी इ.इ.). पण मी ते टाळलं. जी गोष्ट मोजक्या शब्दात मांडणं शक्य असतं ती उगाच ताणायाची का?
४. ह्या लेखनातील वास्तव गोष्टी (अनुक्रमे नाहीत)- मोदी, सेल्फ़ी, महागाई, भ्रष्टाचार, गुंडगिरी, उद्योजक, शेतकरी, थापेबाजी, चहा, ऍप, योजना, कांग्रेस, जमीन, प्रशिक्षण, पुरस्कार, नमो नमः, रिंगटोन इ. इ.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 3:32 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

हां, ते शेवटचं राहिलं-
सरकारी कामांसाठी खूपशी कागदपत्रे लागतात. त्यावर रोख आहे.

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 3:46 pm | निशांत_खाडे

आता प्रत्येक वेळी जेव्हा आपण लिहाल, त्यावेळी लेखातच असे स्पष्टीकरणहि करत जा. उगाच वाचकांना फसवल्यासारखे वाटायला नको. आपण अर्थ सांगायच्या आधी मी आपला दहा-बारा अर्थ काढून यातला कुठला चपखल बसतो ते तपासात होतो. एवढी विनंती लक्षात ठेवा. धन्यवाद.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 3:52 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

ज्या लोकांना समजत (पक्षी: कळत) नाही. त्याच लोकांना स्पष्टीकरण देतोय.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 8:58 am | तर्राट जोकर

डॉ. एस पी. तुम्ही बिन्दास लिवाहो. ह्यांना विरोध तर सहन होतच नाही, जरा कुठे उपरोध झाला तरी भयंकर दुखतं. तुम्ही आगपेटीची काडी फक्त दाखवाल हे सार्‍या शहरातले पाण्याचे टँकर घेऊन तुमच्या अंगावर ओततील. लैच इन्सिक्युरिटी ब्वा! अशी बेचैनी का आहे काय कळत नाही.

मजा तेव्हाच येते जेव्हा आपल्या बोलण्याने समोरचा अंगावर घेऊन घेउन अजून चिडतो आणि थयथयाट करतो. तुम और लिखो. हम समर्थन करते है.

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 12:04 pm | निशांत_खाडे

तजोशेठ,

ह्यांना विरोध तर सहन होतच नाही, जरा कुठे उपरोध झाला तरी भयंकर दुखतं.

संदर्भ कळेल काय? 'ह्यांना' म्हणजे कुणाला?

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 1:44 pm | तर्राट जोकर

मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 3:39 pm | निशांत_खाडे

खरय. फक्त जालावरच नाही, तर सगळीकडेच हे लोक आजकाल बोकाळले आहेत. या दोन चार दिवसात मिपावरील काही धाग्यावर चाललेले घणाघाती वादविवाद पाहिले तर तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आहे हे मान्यच करावे लागेल. पण मग समजा पूर्ण डोळसपणे एखादा व्यक्ती काही रास्त कारणांसाठी मोदींचे समर्थन करत असेल (अगदीच भक्ती वैगेरे नाही) तर त्याला विरोध करणारे लोकही इतके वरच्या टोकाला का बरे जातात?

  • वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात
  • कुठे वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्
  • जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात

हे तीन मुद्दे मला मोदीभक्त आणि मोदी विरोधक यांच्यात समान वाटतात. दोन्ही गटातले लोकही हेच करतात.
मुळात एखाद्या व्यक्तीचे समर्थन करायला किंवा आपल्याला ज्या व्यक्तीचे पटते त्या व्यक्तीवर होणाऱ्या टीकेचे खंडन करायला काहीच हरकत नसावी. तसेच ज्या व्यक्तीचे पटत नाही त्या व्यक्तीवर टीका करण्यातही काहीच तोटा नाही, उलट आपली समज सुकीची आहे की बरोबर यावर काही चांगली चर्चा घडून येते, पण हे मोदींच्या बाबतीत लागू पडत नाही. जिथे मोदींविषयी एखादी चांगली गोष्ट बोलली जाते तिथे विरोधक येउन वाद निर्माण करतात. आणि जिथे मोदींवर थोडीशीही टीका होते तिथे वाद घालायला मोदिभक्त येतात. वरून स्वतःला मोदिभक्त किंवा मोदीविरोधी म्हणवून घ्यायचीही लाज वाटत नाही.

तर, मोरल ऑफ द स्टोरी इज 'मोदिभक्त' हा मोदी समर्थनाचा आणि 'मोदीविरोधक' हा मोदि टीकेचा व्यत्यास आहे. म्हणजे "मोदीने कितीही चांगले केले तरी आम्ही टीकाच करू" आणि "मोदीने कितीही वाईट केले तरी आम्ही समर्थनच करू" असल्या अजेन्ड्यांचे दोन ग्रुप सगळीकडे धुडगूस घालतायत.मग माझ्यासारख्या 'भक्त' व 'विरोधक' दोन्ही नसलेल्या एखाद्या माणसाने काहीही मत मांडू नये म्हणजे हे लोक आपले क्लासिफिकेशन करणार नाहीत असा विचार करणे शहाणपणाचे आहे काय?

रच्याकने, दोरुगडे साहेबांचा हा लेख मला का आवडला नाही हे मी स्पष्ट केलेच आहे. मग माझ्या तक्रारींचे उत्तर न देता दोरुगडे साहेब म्हणतात कि या 'मोदिभाक्तांचे' काय करावे? आता माझ्या कुठल्या प्रतिसादात असे दिसते कि मी मोदिभक्त आहे? का माझ्या सर्व तक्रारींचे हे एकच उत्तर त्यांना सापडते? मग मी त्यांना चरम मोदी विरोधक म्हटलो तर काय होईल? परत ते मूर्खपणाचे वादविवाद. चारपाच मिपाकर माझ्या बाजूने तर चारपाच मिपाकर त्यांच्या बाजूने. इच्छा नसताना मला मोदी भक्त त्यांच्या घोळक्यात सामील करून घेतील. पाठींबा मिळत आहे हे ओळखून आमीही तिथे घुसुच. हेच चित्र आजकाल सगळीकडे आहे.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 4:06 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

आधी स्पष्टीकरण देत नाही म्हणायचं आणि ते दिलं की (तरी) तक्रार करायची.
मोदीभक्त तुम्हाला कुठे म्हटले आहे? उगाच का ओढवून घेताय?

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 4:21 pm | निशांत_खाडे

याच धाग्यावर १२:२० ला आपण दिलेला प्रतिसाद आणि १५:०० ला दिलेले प्रतिसाद मी वाचलेले होते, बाकी जेव्हा आपण स्पष्टीकरण दिलेत तेव्हा मी हा प्रतिसाद लिहित होतो राग येऊ देवू नका. आणि माझे हे प्रश्न तजोशेठ यांना आहेत.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 4:25 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

ठीक.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 5:05 pm | तर्राट जोकर

तुमचे सर्व विचार पटले.

सर्वप्रथम, मोदी काम करत आहेतच. १९९१ नंतर होणारा एक मोठा बदल मोदी आल्यापासून भारतात झालाय. सकारात्मकता वाढलीये, उर्जा वाढलीये. काही केंद्रिय मंत्री जबरदस्त काम करत आहेत. स्वराज, पर्रिकर, प्रभू, गडकरी, गोयल ह्यांची खाती अपेक्षेपेक्षा कैक वेगाने आणि क्षमतेने काम करत आहेत. अनेक चांगले निर्णय घेतले गेले, युपीएच्याही काही योजना रेंगाळत पडलेल्या त्या निगुतीने मार्गी लावल्या गेल्या. त्याचबरोबर काही घुमजावही आहेत. काही प्रकरणं नीट हाताळण्यात कमीही पडले आहेत. सरतेशेवटी मी असे म्हणेन की मागच्या दोन्ही सरकारपेक्षा भाजप हे ३०-४०% तरी अधिक चांगलं काम करत आहेत. अगदी आकाशात उडायच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण चालत होतो, आता धावण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. मागच्या सरकारांनीही बरीच चांगली कामं केलीत, त्यांचे श्रेय त्यांनाही द्यायला हवे, त्यांच्या काळात आपण चालता चालता थांबतो की काय अशी भीती वाटत होती, ती आतातरी नाही.

दुसरा मुद्दा. भक्त-विरोधक. कोणी म्हणो न म्हणो हा एक गंभीर प्रश्न आहेच. थोडं मागे जाऊन बघितलं ही सुरुवात मोदीभक्तांनी केली आहे. जालावर आज आहेत तसे व तितके मोदीविरोधक कधीच नव्हते. जे मोदीविरोधक आहेत ते एकेकाळी न्युट्रल होते, कित्येक तर कट्टर काँग्रेसविरोधक होते. अनेकांनी भाजपचे २०१४ साठी कँपेनिंगही केलंय. पण जसे मोदी पंतप्रधान झाले तसे मोदीभक्त पिसाटले, त्यांना हर्षवायु झाला. रोज नवीन नवीन बाता मारल्या जाउ लागल्या, अतिशयोक्तीची परमावधी, तथ्यांना सोयिस्करपद्धतीने मांडून मोदी कसे महान आहेत ह्याचा रातंदिन घोषा लावल्या जाऊ लागला. सोशल मिडियावर फोटोशॉप इमेजेसची रेलचेल होउ लागली. हे तर आहेच पण भाजपशी संबंधित अनेक फ्रिंज एलिमेंट्स नी उचल खाल्ली. विकासाचा मुखवटा घेऊन निवडणूक लढवलेल्या भाजपने ह्या पिलावळींना शांत करन्याबद्दल काहीच केले नाही. उलट तेव्हा तुम्ही कोठे होते चे नारे सुरु केले. हे सगळे बघून माझ्यासारखे न्युट्रल लोक भडकणारच. ते भडकले तर त्यांना खान्ग्रेसी, आप्टार्ड्स, फुरोगामी, इत्यादी लेबलं लावून चिडवले जौ लागले. जो प्रश्न करेल तो कॉन्ग्रेसचा गुलाम आहे अशी मानहानी सुरु झाली. सगळीकडे नुसता बेलगाम धुमाकूळ ह्या भक्तांनी घालायला लागल्यावर, वरुन सरकारची त्यास साथ असल्यावर धुमश्चक्री रोखणार कशी? माझ्यासारख्या न्युट्रल लोकांवर मोदी महानच आहेत हे मान्य करा असा अघोषित दबाव आनला जाऊ. भाजपाला आणले देशाचा विकास करायला, ते सोडून हे मोदींची आरती दिन-रात गाऊ लागले तर कुणाच्याही डोक्यात जानार. शेवटी मोदीही एक माणूस आहेत, त्यांनी जादूगार असावे, मसिहा असावे अशी आमची कल्पना नव्हती. त्यांनाही मर्यादा असणार, ह्या विशालकाय देशाला सांभाळतांना हजार खटपटी, लटपटी, वेगवेगली माणसे, त्यांचे टॅण्ट्रम्स सांभाळायला लागनार हेही समजते. मोदी एकटे काहीच करु शकत नाहीत पण करण्याचे स्फुल्लिंग चेतवू शकतात. त्यांची भाषणे स्फूर्तीदायक असतात. कामही नीट होतंय. पण अशा जमीनीवर पाय असलेल्या व त्याची चांगली जाण असलेल्या नेत्याला हे भक्त लोक उगाच तारणहार, सर्वव्यापी परमेश्वराच्या ठिकाणी ठेवायला लागले तर जमणार नाहीच. मोदींवर गुजरात दंगलीचा आरोप २००२ पासुन सतत चालू आहे, तो आरोपाचा लोड घेणं मोदींनी केव्हाच सोडून दिलंय. पण राजदिप-बरखा द्वयींनी इतकं हॉण्टींग केलंय की विरोधक मोदींबद्द्ल काही बोलला की तो राजदिप-बरखाचेच अपत्य आहे असे समजून तुटून पडतात. असे अनेक मुद्दे आहेत. भक्तांचे प्रतिसाद बघितले की एकाच साच्यातले वाटतात. मिपावर भाजपसमर्थक असले तरी बहुसंख्य लोक विचार, अभ्यास करुन प्रतिसाद देत असतात. हा दर्जा मात्र सोशलमिडीयावर नाही.

माझे भाजप समर्थकांना इतकेच म्हणणे आहे की बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका. इथे कोणी टिका केली तर लगेच भाजपचं सरकार अल्पमतात येऊन पडणार नाही. पाच वर्ष पुर्ण होतील. थोडा आत्मविश्वास ठेवा आणि दुर्लक्ष करायला शिका. वातावरण शांत ठेवाल तर येणार्‍या सर्व टर्म्स तुमच्याच असतील. चांगल्या आणि सत्य बातम्या कुठलाही अभिनिवेश न दाखवता द्या. टिकेवर रिअ‍ॅक्ट होऊ नका, योग्य असेल तिथे रिस्पॉन्स करा. अन्य्था दुर्लक्ष करा. टिकाकारांना उत्तर देऊन तुम्ही त्यांना महत्त्व देताय. काँग्रेसकडून हा एकमेव चांगला गुण घ्या. ते कधीच आक्रस्ताळेपणाने उत्तर देत बसत नाहीत. तुम्ही सरकारला जमत असेल तर जनमत कळवत राहा. त्यायोगे सरकार सकारात्मक वातावरनासाठी प्रयत्न करेल. आम्हीही सहकार्य करु. बाकी काँग्रेस व इतर लोक आपल्या कर्माने मरतील. त्यांची चिंता, राहुल, केजरी यांना प्रत्येक बाबतीत ओढणे उपयोगाचे नाही. देशाने भाजपाला पूर्ण बहुमत दिले आहे. त्याचा अपमान करु नका. जमिनीवर राहा. प्रगती करा. आपोआप लोक डोक्यावर घेतील. आधीच नाचायला लागलेत तर विसरु नका हा भारत आहे.

निशांत_खाडे's picture

8 Mar 2016 - 5:23 pm | निशांत_खाडे

प्रतिसाद आवडला व पटलाही.

टिकाकारांना उत्तर देऊन तुम्ही त्यांना महत्त्व देताय. काँग्रेसकडून हा एकमेव चांगला गुण घ्या. ते कधीच आक्रस्ताळेपणाने उत्तर देत बसत नाहीत.

असेच म्हणतो.

sagarpdy's picture

8 Mar 2016 - 5:34 pm | sagarpdy

+1

नाना स्कॉच's picture

8 Mar 2016 - 5:43 pm | नाना स्कॉच

+1000

राजेश घासकडवी's picture

8 Mar 2016 - 6:14 pm | राजेश घासकडवी

प्रतिसाद आवडला.

बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका.

हेच म्हणणं असतं. अगदी साधीशी चूक दाखवली तरी 'ही नाहीच्चे चूक' किंवा 'त्यांनी असंच केलं होतं, तेव्हा का नाही बोललात?' असा प्रतिवाद होतो.

बाळ सप्रे's picture

8 Mar 2016 - 6:36 pm | बाळ सप्रे

एखाद्या गोष्टीवर टीका केली म्हणजे सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्यासारख डीफेन्सिव होउ नये .. झालेली चूक मान्य करून पुढे होणे..
पण भक्तांना काही चुकतय हा विचारच पण सहन होत नाही.. प्रत्येक गोष्ट जस्टीफाय करायची प्रचंड धडपड चालू असते..
याबाबतीत केजरीवालच निश्चित कौतुक आहे.. ४५ दिवसात सरकार सोडण्याची चूक मनमोकळेपणाने कबूल केली.. अशा गोष्टी आज राजकारणात फार क्वचित दिसतात. (हे कौतुकदेखिल बर्‍याच जणांना सहन होणार नाहीये)

पण नशा/उन्माद/विखार इतका वाढलाय की आपापले गाडे रेटणे सुरुच राहाते.. हे ही विसरले जाते की मोदींना ज्यांनी निवडून दिलय त्यांच्यावरसुद्धा आपण चिखलफेक करतोय..

कपिलमुनी's picture

8 Mar 2016 - 7:22 pm | कपिलमुनी

योग्य प्रतिसाद !

अद्द्या's picture

8 Mar 2016 - 8:13 pm | अद्द्या

कधी नाही ते जोकर शी सहमत :)

इष्टुर फाकडा's picture

8 Mar 2016 - 9:43 pm | इष्टुर फाकडा

त.जो., प्रतिसाद खूप आवडला. मोदींचे आंधळे समर्थक (भक्त) आणि आंधळे विरोधक या दोन्ही बाजूंचा वीट आला आहे. पण बांधीव टीकेचा असलेला अभाव हेही एक कारण आहे भक्तांची संख्या आणि तीव्रता वाढायला. काँग्रेस च्या नंतरची पोकळी भरून काढण्याच्या नादात केजरीवाल समर्थक (टार्ड) लोकांनी याला मदतच केली आहे. सध्याच्या राष्ट्रीय राजकारणात जागा म्हणजे मोदींवर उभा दावा अशी भूमिका सुरुवातीच्या थोड्याच कालावधीत आआप ने घेतल्याने याला हातभार लागला आहे असे माझे मत आहे. बांधीव टिकेअभावी सरकारचे फावेल आणि सरधोपट निर्णय घेतले जातील हे कोणीही लक्षात न घेता नुसते बेछुट झाले आहेत. याने भाजपचे काही झाले तर फायदेच होतील त्यामुळे तेही एक डोळा बंद करून आहेत. एकुणात काय, मोदी हे केंद्रस्थान न ठेवता 'सरकार' हे केंद्रस्थानी ठेवून टीका किंवा समर्थन केलं तर बरे राहील. त्यामुळे मोदीही 'मैने' कर दिखाया वरून 'हमने' वर येण्याची परिस्थिती तयार होवू शकते. असो, दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 12:32 am | तर्राट जोकर

धन्यवाद. तुमच्या प्रतिसादाशी बर्‍याच अंशी सहमत. विशेषतः बांधीव टिकेचा अभाव हा मुद्दा आवडला. तसेच केंद्रसरकारला सतत मोदीसरकार म्हणणेही सुरुवाती पासून आवडलेले नव्हते.

इष्टुर फाकडा's picture

9 Mar 2016 - 2:38 am | इष्टुर फाकडा

लोकांचा भाजप पेक्षा मोदींना जास्त पाठींबा होता हे ओळखून २०१४ च्या निवडणुकीत 'मोदी सरकार' हि शब्दयोजना आणली गेली आणि जी तुफान चालली. तो प्रचाराचा भाग सोडून द्या.
पण हल्ली मोदींची भाषणे बघताना त्यांचा 'मी' सतत खटकतो. अर्थात, त्यांच्या मुख्य खात्यातील मंत्र्यांना ते त्यांच्या वाट्याचे श्रेय द्यायला कमी पडत नाहीत असेही जाणवते.

विकास's picture

9 Mar 2016 - 12:58 am | विकास

जालावर आज आहेत तसे व तितके मोदीविरोधक कधीच नव्हते.
संपुर्ण इंटरनेट जाऊंदेत, नुसते मिपा सुरवातीच्या काळापासून खोदून पहा. मोदीविरोधक म्हणून किती लिहीले गेले आहे ते कळेल. किंबहूना मी पुढे जाऊन असे म्हणेन की, जर इतका मोदीविरोध मोदी विरोधकांनी केला नसता, तर कदाचीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील होऊ शकले नसते... :)

किंबहूना आता जे कोणी केवळ मतदानापुरते भाजपाचे झाले होते पण वास्तवीक लेफ्ट ऑफ सेंटर आहेत, ते देखील सततच्या मोदी विरोधाला कंटाळले आहेत. याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे जालावर नसून राज्यसभेत आहे, जेथे सगळे अडवले जात आहे. सोनीयाबाई आणि राहूलजींनी पणच केला आहे, की काय वाट्टेल ते होवोत, पण गांधीजींची इच्छा नजिकच्या काळात पूर्ण करणारच! ;)

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2016 - 2:03 pm | श्रीगुरुजी

इतर मोदीविरोधक जाऊ देत, मिपावरील मोदीविरोधाची काही उदाहरणे देतो.

(१) सेल्फीच्या धाग्यावर मोदींचा काहीही संबंध नसताना तिथे मोदी हा विषय आणला गेला आणि सहजच लिहितोय असे दाखवून असेही सुचविले गेले की मोदी सेल्फी काढतात म्हणजे तेही सेल्फी या मनोविकाराचे बळी आहेत. फोन त्यांचा, ते स्वतःची सेल्फी काढतात आणि यात इतरांना काय त्रास होतो हेच समजत नाही. परंतु मोदी हे नावच काहीजणांसाठी इतके त्रासदायक आहे की मोदींची प्रत्येक गोष्ट (अगदी व्यक्तिगत असली तरी) या मंडळींना त्रास होतो.

(२) २०१४ च्या निवडणुकीत मोदी मतदान करून बाहेर आल्यावर एका ठिकाणी थांबून एका हातात कमळ घेऊन स्वतःची सेल्फी काढत होते. ते दृश्य माध्यमांनी टिपून सर्वत्र प्रसिद्ध केले. यात मोदींचा काय दोष? परंतु मिपावर असे लिहिले गेले की मोदी मतदान सुरू असताना स्वतःचा प्रचार करीत आहेत. मोदींविरूद्ध निवडणुक आयोगात तक्रारही दाखल झाली व काही काळानंतर निवडणुक आयोगाने तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगून ती फेटाळली. खरं तर त्यांचा सेल्फी काढताना फोटो काढून तो प्रसिद्ध केल्याबद्दल माध्यमांना दोषी ठरवायला पाहिजे. परंतु माध्यमांची चूक असली तरी ती मोदींचीच चूक.

(३) ते मतदान केंद्रातून बाहेर येताना एका माध्यमाचा प्रतिनिधी त्यांच्याजवळ गेला व त्याने मोदींना मतदानाबद्दल विचारले. त्यावर त्यांनी काहीतरी उत्तर दिले. हे लगेच त्या वाहिनीने दाखवायला सुरूवात केली. मिपावर एका सदस्याने लगेच लिहिले की मोदींनी प्रत्यक्ष मतदान केंद्रात "पत्रकार परीषद" घेऊन नियमांचा/कायद्यांचा भंग केला. "पत्रकार परीषद" म्हणजे नक्की काय हे या सदस्याला माहित नसेल का? ज्या पत्रकाराने मोदींपर्यंत जाऊन प्रश्न विचारला तो दोषी नाही पण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणारे मोदी दोषी आणि मोदींनी न बोलविता स्वतः त्यांच्याकडे धावत जाऊन एक प्रश्न विचारला तर ती म्हणे मोदींनी "पत्रकार परीषद" घेतली!

मोदीद्वेषाची कावीळ झाल्यामुळे काही जणांना कोणत्याही विषयात मोदींना ओढूनताणून आणून त्यांच्यावर असंबद्ध टीका केल्याशिवाय राहवतच नाही. आणि अशा टीकेला प्रत्त्युत्तर मिळाले की लगेच नमोभक्त, मोदीभक्त असा गटाणा सुरू होतो.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 2:38 pm | तर्राट जोकर

गुरुजी,

>> फोन त्यांचा, ते स्वतःची सेल्फी काढतात आणि मी त्यांचे नाव घेऊन खोडसाळ कमेंट केली. मी आणि मोदी बघून घेऊ ना? इतरांना काय त्रास होतो हेच समजत नाही.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी

जेव्हा तुम्ही सार्वजनिक संस्थळावर लिहिता तेव्हा ते फक्त तुम्ही आणि मोदी यांच्यापुरते मर्यादीत राहत नाही हे समजावे अशी अपेक्षा आहे.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 3:18 pm | तर्राट जोकर

केजरीवाल यांना शिवी म्हटलेले योग्य आहे ते कोणत्या अपेक्षेने?

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2016 - 3:19 pm | श्रीगुरुजी

आता इथे केजरीवाल कोठून आले? आधी काहीही संबंध नसताना तुम्ही इथे मोदींना आणलंत आणि आता केजरीवालांना.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 3:31 pm | तर्राट जोकर

हे हे. असं असतंय ते. आणि लोक मलाच म्हणतात. सार्वजनिक संस्थळावर प्रसिद्ध व्यक्तीबद्दल काहीही बोलणे वक्ता आणि ती व्यक्ती यांपुरते मर्यादित राहत नाही असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला? मी उदाहरण म्हणून तुमचेच वाक्य दिले. प्रश्न बघा, नसते फाटे फोडु नका.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2016 - 11:01 pm | श्रीगुरुजी

त्या प्रश्नाला उत्तर द्यायची ही जागा नाही. जिथे हा विषय आला आहे तिथे विचारा.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 11:42 pm | तर्राट जोकर

इथे मोदी वा केजरीवाल हा प्रश्नच नाही. सार्वजनिक संस्थळावर प्रसिद्ध व्यक्तीबद्दल काहीही बोलणे वक्ता आणि ती व्यक्ती यांपुरते मर्यादित राहत नाही हे तुम्ही ह्याच धाग्यावर म्हटलेले आहे. मी फक्त एवढंच विचारलं की हे फक्त मोदींपुरतं आहे की जनरल आहे. तुम्ही त्याचे उत्तर दिल्यावर जिथल्या तिथे जाऊन प्रतिसाद देईन. बाकी तुमची मर्जी.

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 9:14 am | बोका-ए-आझम

इथे तुम्ही जी maturity दाखवली आहे ती दुर्दैवाने भक्त आणि विरोधक दोघेही दाखवत नाहीत. असो.

तजो साहेब मिपा वर चे काही आयडी सुबोध खरे,विकास,क्लिंटन,निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी...इत्यादि खरोखरच अभ्यासू आणि निष्पक्ष पद्धतीने विचार करणारे आहेत. गेली ७ वर्षे मी मिपा चा सदस्य आहे आणि मिपा वरील प्रत्येक चर्चा मी बारकाई वाचत असतो. मिपा हे फक्त एक संकेतस्थळ न राहता कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या घटनेच्या संदर्भात सर्व बाजू समोर येउन मत बनविण्यात (opinion maker) अत्यंत महत्वाचा घटक आहे असे मला वाटते.
उल्लेख केलेल्या आयडींच्या अचूक आणि संयमित प्रतिसादां नंतर कित्येक प्रक्षोभक होऊ घातलेल्या चर्चांचा रोख पूर्णपणे बदलला गेल्याचे प्रत्येक वेळा वाचनात आले आहे.
भाजपा प्रणीत सरकार स्थापन होणे हि गेल्या २ वर्षातील घटना आहे,त्या आधी कधीच मोदी/भाजप/संघ समर्थनाचे प्रतिसाद किंवा धागे या आयडींने काढलेले वाचनात आलेले नाही तसेच काँग्रेस आणि त्या पक्षाच्या इतर नेत्यांवर नाहक टीका करणारे प्रतिसाद मोदी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी सुद्धा कधीच वाचनात आले नाहीत.
तुम्ही ज्या पद्धतीने प्रतिवाद करताना अशा आयडींना सरसकटीकरण करून मोदी/भाजप समर्थक असा रंग देण्याच्या प्रयत्न करत आहात तो निश्चितच निष्पक्ष वाटत नाही.या अशा आयडींना मोदी/भाजप/संघ समर्थनार्थ प्रतिसाद का द्यावे वाटले याची कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर तुमचा त्रागा बराच कमी होईल हे निश्चित.

बाळ सप्रे's picture

9 Mar 2016 - 2:57 pm | बाळ सप्रे

काही आयडी (वरीलपैकीच असतील असे नव्हे) "अभ्यासू आणि निष्पक्ष " पासून किंचित आक्रस्तळेपणाकडे झुकल्याचे निरीक्षण नोंदवू इच्छीतो.

lakhu risbud's picture

9 Mar 2016 - 3:01 pm | lakhu risbud

वरीलपैकीच असतील असे नव्हे

सोदाहरण स्पष्ट केले तर बरे होईल

बाळ सप्रे's picture

9 Mar 2016 - 3:25 pm | बाळ सप्रे

इथे आयडी लिहून व्यक्तिगत पातळीवर मला उतरायचे नाही.

मी प्रतिसाद/ लेख वाचून माझे मत बनवतो. जे कायम बदलते असू शकते. इतरांनी माझ्या मतावरून मत बनवणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे तुम्हीच प्रतिसाद/ लेखावरून समजा. तुमचे मत वेगळेही असू शकते. (तुम्हालाही जर असेच वाटले तर व्यनिमधून उत्तर मिळू शकेल)

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 3:17 pm | तर्राट जोकर

मला इथे कोणाचे नाव घ्यायचे नाही. तुम्ही वर उल्लेखित आयडींच्या इतर विषयांवरच्या प्रतिसादांबद्दल मी कुठे बोललो नाही, किंवा त्यांच्या विश्वासार्हतेवर काहीही प्रश्नचिन्ह नाही. मुद्दा फक्त भाजप व मोदींशी संबंधित आहे. त्यासंदर्भात होणार्‍या चर्चांना तेवढ्यापुरतं घ्यावं. विशिष्ट आयडीने अमूक एवढ्या बाबतींत नेहमी संतुलित भूमिका घेतली म्हणजे ते आता ह्या बाबतीतही संतुलितच भूमिका घेत आहेत असे मानणे ह्याला शास्त्रिय भाषेत काय म्हणतात ते माहितगार सांगू शकतील. पण असे असु नये असे माझे पर्सनल मत आहे.

एक वर्षानंतर... हा धागा आणि त्यामधे केले गेलेला भाजपाचा प्रचार, अतिरंजित दावे, सरकारच्या आरत्या, विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे, आविर्भाव ह्याबद्दल तुम्ही उल्लेखित आयडींनी तुम्ही म्हणता तसे अचूक आणि संयमित प्रतिसाद दिलेले दिसले नाहीत. तेच आपशी संबंधित धाग्यांवर, भाजपच्या धोरणांवर टिका करणार्‍या प्रतिसादांवर हेच आयडी हिरिरीने अभ्यासून प्रतिसाद देतांना, दावे खोडून काढतांना दिसतात. तुम्ही ज्या निष्पक्षतेबद्दल बोलत आहात तो मला तरी दिसत नाही. उदा. आपसेना आणी आप हे वेगवेगळे आहेत ह्याबद्दल बराच वाद लांबला पण तिथे कोणीच मधे पडून श्रीगुरुजींचे दावे निष्पक्षपणे खोडलेले दिसले नाहीत. पण तेच नाना स्कॉच ह्यांनी महागाईवर भाजप सरकार कमी पडले म्हटले तर कोणाकोणाचे किती प्रतिसाद आले ते बघितले. बँकांनी उद्योजकांची कर्जे माफ केली ह्यावर तेच कसे बरोबर ह्याचे उत्तर आले पण कोणाही अभ्यासूंनी त्याबद्दल विरोध केलेला दिसला नाही. हेच करणारे काँग्रेस वा आप सरकार असते तर? कोणाचे कोणाकडे इन्क्लिनेशन असावे ह्याबद्दल प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण त्या इन्क्लिनेशनपायी येणारा शिक्का नको अशी दुटप्पी भूमिका मात्र पटत नाही. निष्पक्ष म्हणवल्या जावे असे वाटत असेल तर प्रत्येक बाबतीत निष्पक्ष असावे. सिलेक्टीव निष्पक्षपणा घेऊ पण त्याचा उल्लेख करु नका हा दांभिकपणा आहे.

सरसकट हा अगदी रोजच्या वापरातला शब्द का झाला? कुठल्याही पक्षसमर्थकांप्रमाणे भाजपसमर्थकांमधे अनेक स्तर आहेत, काही खरंच विचार करुन आपल्याच पक्षाला विरोध करणारे आहेत, काही पक्षप्रेमापायी वेडे झालेले आहेत. ह्या दोन्ही टोकांमधेही अनेक प्रकारचे समर्थक आहेत. हे सर्व प्रकारचे समर्थक चर्चांमधे भेटतात. पण जास्त संख्या अशा समर्थकांची आहे जे प.प्रे.वेडे होण्याकडे झुकले आहेत पण शिक्का मात्र आ.पक्षाला विरोध करणार्‍यांचा हवा आहे. मी जेव्हा भक्तांना बोलत असतो तेव्हा खरोखर अभ्यासू असणारांना का झोंबावे? मला इथे कम्युनिस्ट म्हटले गेले, देशद्रोह्याम्चे समर्थक म्हटले गेले, मी अंगाला लावून घेत नाही. कारण मी तसा नाही. पण मी शिक्का मारणार्‍यांना विरोधही करत नाही. व्हाय शुड आय वरी? मला ते माझे सरसकटीकरण केलेले वाटत नाही. मला वाटतं लोकांनी फॅन आणि सपोर्टर ह्यात फरक करायला शिकायला पाहिजे. मी जे बोलतो ते फॅन्ससाठी आहे. सपोर्टरनी अंगाला लावुन घेऊ नये अशी अपेक्षा आहे.

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 10:19 am | डॉ. एस. पी. दोरुगडे

धन्यवाद!

चेक आणि मेट's picture

8 Mar 2016 - 1:31 pm | चेक आणि मेट

धागा राहू दे
मोदीविरोधी,सरकारविरोधी,संघविरोधी गरळ इथे ओकली तरी चालेल.
उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर फालतू पिचकार्या मारायची गरज नै.

नाना स्कॉच's picture

8 Mar 2016 - 3:14 pm | नाना स्कॉच

उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर फालतू पिचकार्या मारायची गरज नै.

हे ठरवणारे आपण कोण हो चेमे?? (अशोक सराफच्या अशी ही बनवा बनवी मधील "तुम्ही आमचे कोणssssss?" च्या धरतीवर वाचावे)

आयडी वय महिनाभर जेमतेम अन मिजास मालकांची करताय इतके नोंदवतो!

चेक आणि मेट's picture

8 Mar 2016 - 9:05 pm | चेक आणि मेट

हा प्रतिसाद कशाला स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलात?
तुम्ही फालतू पिचकार्या मारत नाहीत ना?मग कशाला उपप्रतिसाद देण्याचे कष्ट घेतलेत?

आयडी वय महिनाभर जेमतेम

आयडीच वय महिनाभर आहे,आयडीमागच्या व्यक्तीचं नाही.

मिजास मालकांची करताय इतके नोंदवतो!

अनावाधानाने मला मालक म्हणल्याबद्दल धन्यवाद!
तुमच्या आयडीचे वय चार महिन्याचे,हे म्हणजे स्वतः अजून रांगत आहात अन् दुसर्याला चालायला येत नाही म्हणून हिणवत आहात.

नाना स्कॉच's picture

8 Mar 2016 - 9:50 pm | नाना स्कॉच

फाट्यावर :)

चेक आणि मेट's picture

8 Mar 2016 - 10:42 pm | चेक आणि मेट

फाट्यावर मारण्यासाठी "फाट्यावर"असं लिहून प्रतिसाद द्यायची गरज नसते

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Mar 2016 - 7:40 am | श्री गावसेना प्रमुख

अहो त्यांच्या id चे वय जरी 4 महिन्याचे असेल तरी ते मिपा कोळून प्यायलेत,त्यांच्या अंगात एखादा जालीय मिस्टर इंडिया आय डी असू शकतो, है कि नाय स्कॉच साहेब।

नाना स्कॉच's picture

9 Mar 2016 - 8:08 am | नाना स्कॉच

गावसेना प्रमुख दादा,

प्रथम मजला साहेब म्हणल्या बद्दल आभार! ___/\___

बाकी विषयाबद्दल बोलायचे झाल्यास "मांजराने डोळे मिटुन दूध प्यायले तरी.... वगैरे वगैरे" म्हण लागु पड़ते ह्या विषयावर असे वाटते.

असो!! चालायचेच!

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

8 Mar 2016 - 3:00 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

या मोदीभक्तांना काय झालय काय?

अनुप ढेरे's picture

8 Mar 2016 - 4:12 pm | अनुप ढेरे

आत्ताच ही अवस्था !? अजून किमान तीन वर्ष आहेत हो...

राजेश घासकडवी's picture

8 Mar 2016 - 11:12 pm | राजेश घासकडवी

जनसंख्या नियंत्रण योजना - देशात लोकसंख्येचा स्फोट होऊ नये म्हणून लोकांना कंडोम वापरायला प्रवृत्त करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात कंडोमच्या वापराची मोजमाप आणि त्यात दरवर्षी ५६ टक्के वाढ अनुस्युत आहे. या योजनेची पूर्वतयारी म्हणून सध्या तरुण वर्गाचा कंडोम वापर किती आहे हे तपासून पाहाण्यासाठी फक्त काही विशिष्ट युनिव्हर्सिटीजमध्ये मोजणी चालू आहे. प्राथमिक मोजणीनुसार दररोज फक्त ३००० कंडोम वापरले जातात. छप्पन्न टक्के वाढ होऊन तो आकडा ४६८० वर नेण्यासाठी नोकरशाहीवर दबाव आणण्यात येत आहे.

निशांत_खाडे's picture

9 Mar 2016 - 12:47 am | निशांत_खाडे

कंडोम वापरतानाचा सेल्फी काढण्याची सक्ती नाही ना?

राजेश घासकडवी's picture

9 Mar 2016 - 1:30 am | राजेश घासकडवी

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;)

मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.

अर्धवटराव's picture

9 Mar 2016 - 3:33 am | अर्धवटराव

'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;)

गुर्जी... धन्य हो =)) =)) =))

मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.

याला आणखी खुलवतो म्हटलं तर आमचं सदस्यत्व रद्द व्हायचं =)) =))

हेमंत लाटकर's picture

9 Mar 2016 - 9:18 am | हेमंत लाटकर

६० वर्षात जमले नाही पण २ वर्षात जमले पाहिजे अस कस ?

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 3:22 pm | तर्राट जोकर

साठ वर्षात काय जमले नाही याबद्दल सांगाल काय लाटकरसर?

राजेश घासकडवी's picture

9 Mar 2016 - 6:09 pm | राजेश घासकडवी

लोकहो, हा टाइमपासचा धागा आहे. इथेही काय मारामाऱ्या करताय? त्यासाठी इतर धागे आहेतच. आणि तिथे समर्थक आणि विरोधक यांनी चिक्कार घणाघाती चर्चा चालू ठेवलेल्या आहेत. इथे तरी थोडी प्यूअर भंकस चालू द्यात. विनोद आवडला तर हसा आणि सोडून द्या, नाही आवडला तर 'कुछ जम्या नै' म्हणा. पण या युद्धात विनोदबुद्धीचा का बळी देत आहात?

थोडी चिलपिल घ्या.

राजेश घासकडवी's picture

9 Mar 2016 - 9:20 pm | राजेश घासकडवी

तडीपार पुनर्वसन योजना - ज्यांना राज्यातून तडीपार होण्याची शिक्षा मिळालेली आहे अशांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहून त्यांच्या आयुष्याची घडी बसवण्याची व्यवस्था करायची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यांनी चांगली वागणूक दाखवली तर त्यांना बऱ्यापैकी नोकरीही मिळवून देण्याची कलमं त्यात आहेत.

राजेश घासकडवी's picture

10 Mar 2016 - 12:17 pm | राजेश घासकडवी

महत्त्वाकांक्षी स्टॉक मार्केट ऱ्हास योजना - कोण म्हणतं सद्य सरकार उजव्या धोरणाचं आहे? कोण म्हणतं सरकारचं उद्योगपतींशी साटंलोटं आहे? डाव्या धोरणांशी कटिबद्ध राहून कॅपिटॅलिझमचा सर्वनाश करण्यासाठी एका वर्षात स्टॉक मार्केट पंचवीस टक्के उतरवण्याची ही योजना आहे. परकीय शक्ती भारताच्या मार्केटमध्ये पैसे गुंतवून हरामखोर एनजीओंना पैसे देते. त्या गुंतवणुकदारांचं कंबरडं मोडण्यासाठी किंवा त्यांना घाबरवून भारतातल्या उद्योगातले पैसे काढून घ्यायला लावण्याची ही योजना आहे. ४ मार्च २०१५ ते ४ मार्च २०१६ या काळात स्टॉक इन्व्हेस्टर्सचे १४ लाख कोटी रुपये नष्ट करणाऱ्या या योजनेला लाल सलाम!

तर्राट जोकर's picture

12 Mar 2016 - 12:12 pm | तर्राट जोकर

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Friday, March 11, 2016