दंगा कथा : छोटू

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 7:59 pm

बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतिया खान असा शाळेत जाण्याचा मार्ग. शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३ किलोमीटर पाई चालण्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजयचेच. मोतिया खान जवळ एक चांभार होता. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याचा मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी अर्थात ७-८ च्या दरम्यान तो आपल्या वडिलांची कामात मदत करायचा. चप्पला आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे हे व्हायचेच. आमच्या दृष्टीने दंगा म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूट-पाट. असाच एक दंगा सदर बाजार येथे झाला. त्या दंग्यात कपड्यांची बरीच दुकाने लुटल्या गेली. बहती गंगेत, बहुतस्या गरिबांनी हि आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी मुले नवीन कपड्यात दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यात साजरी झाली. पण प्रत्येक सिक्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याचा १५-२० दिवसानंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला, या वेळी हा शाळा सोडून इथे का बसला आहे? कदाचित याचा वडिलांची तब्येत खराब असेल. जोड़ा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होताच. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारले, अब्बू की तबियत ख़राब है क्या? छोटू म्हणाला, स्कूल छोड़ दिया है. अब दुकान में हि बैठूंगा. मी विचारले, का? तो निर्विकारपणे म्हणाला, अब्बू जेल में है. क्यों???

तो म्हणाला, उस दिन तडके, अम्मीने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही है. पड़ोस का नानके दो-चार कपडे के थान उठा के लाया है. मोहल्ले के बाकि मर्द भी वहीं गयें है और तुम हो की सो रहे हो. अब्बू उठला, मनात विचार केला हे ठीक नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोह्ल्लाच हिंदू असो वा मुसलमान दुकाने लुटायला निघाला होता. अब्बू पण त्या भीड़चा हिस्सा बनला. सदर मध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बू हि त्या दुकानात घुसला. लालच बुरी बला होती है ही म्हण उगाचच नहीं. शरीराला पेलवत नव्हते तरी ही ३-४ कपड्यांचे थान डोक्स्यावर लादून अब्बू दुकानातून बाहेर पडला. अचानक आवाजे आली, पुलिस पुलिस. अब्बू घाबरला. त्याचा तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच पण पोलिसांनी हि त्याला रंगे हाथ पकडले. काय म्हणावे हे कळण्या सारखे वय नव्हे तरी हि मी हिम्मत करून विचारले, कोई वकील किया है क्या? हां, एक वकील केला आहे, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत है, काही वर्ष तरी अब्बूला जेल मध्ये काढावी लागतीलच. छोटू पुढे म्हणाला उस दिन अब्बू से गलती हो गयी. किस्मत खराब थी, और क्या. खरोखरच! किस्मतची मार छोटू वर पडली होती. त्याचे शिक्षण सुटले. लहान वयातच घराचा संपूर्ण बोझा त्याच्या खांद्यावर आला होता.

त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार ही घेऊन आली होती.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 8:08 pm | एक एकटा एकटाच

:-(

जव्हेरगंज's picture

1 Mar 2016 - 8:24 pm | जव्हेरगंज

ओह

मी-सौरभ's picture

1 Mar 2016 - 8:28 pm | मी-सौरभ

नशीब :(

पैसा's picture

1 Mar 2016 - 8:37 pm | पैसा

:(

कविता१९७८'s picture

1 Mar 2016 - 8:55 pm | कविता१९७८

दुर्दैव

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 9:11 pm | उगा काहितरीच

:-( अतिशय कमी शब्दात जास्तीत जास्त आशय !

जेपी's picture

1 Mar 2016 - 9:18 pm | जेपी

:-(

एस's picture

2 Mar 2016 - 12:32 am | एस

हृदयस्पर्शी!

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2016 - 7:05 am | प्राची अश्विनी

:(

शित्रेउमेश's picture

2 Mar 2016 - 10:07 am | शित्रेउमेश

:-(

नाखु's picture

2 Mar 2016 - 11:45 am | नाखु

खरोखरच! किस्मतची मार छोटू वर पडली होती.

महासंग्राम's picture

2 Mar 2016 - 12:50 pm | महासंग्राम

कथा अनुवादित आहे का ?? मरम्मत, सिक्याचे दोन पहलू ,बनियांच्या, बहती गंगेत असे शब्द दिस्ताएत ते टाळले तर उत्तम होईल

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 12:57 pm | पिलीयन रायडर

पटाईत काका दिल्लीला असतात. त्यांचे मराठी असेच हिंदी मिश्रित आहे. आणि आम्हाला सर्वांनाच ते फार आवडते.
काकांचा हा लेख वाचुन उलगडा होईल - माझी बोली भाषा

काका,
गोष्ट खुप हृदयस्पर्शी आहे. तुम्ही खुपच परिणामकारक लिहीली आहे.

स्रुजा's picture

2 Mar 2016 - 1:15 pm | स्रुजा

संपूर्ण प्रतिसादालाच +१.

महासंग्राम's picture

2 Mar 2016 - 1:39 pm | महासंग्राम

अरे वा मग असे शब्द येण साहजिकच आहे, बाकी कथा उत्तमच

विवेकपटाईत's picture

2 Mar 2016 - 8:09 pm | विवेकपटाईत

मला आठवते बहुतेक १९७४ मध्ये सदरमध्ये दंगा झाला होता. त्यात कपड्यांची दुकाने लुटल्या गेली होती. दंग्या नंतर त्या भागात नवीन कपडे परिधान करणार्यांची संख्या अचानक वाढली. त्या वरून अनेक कथा ऐकायला मिळाल्या होत्या. बाकी खरे दंगेखोर लूट पाट करून केंव्हाच पळून जातात. नंतर गोर-गरीब थोड्या लालच मध्ये येऊन, उरले सुरलेले लुटायला जातात आणि अब्बू सारखे ते पकडले जातात. त्याचे परिणाम त्यांच्या परिवाराला भोगावे लागतात.

त्या काळी छोट्या मोठ्या दंग्यांना जास्त प्रसिद्धी मिळायची नाही. जास्तीस्जास्त २-४ दिवस वर्तमान पत्रात बातम्या झळकायच्या. जुन्या दिल्लीत कर्फ्युत लागलेला असतानाही आम्ही शाळेत जायचो.

विवेकपटाईत's picture

10 Aug 2021 - 9:21 am | विवेकपटाईत

हा खरी कथा आहे. माझे आजोबा १९२१ मध्ये दिल्लीत आले होते. माझ्या वडिलांचे शिक्षण हि दिल्लीचे. जुन्या दिल्लीत १९८० पर्यंत भाड्याच्या घरात. आज उत्तम नगर येथे निवास. मराठी मी फक्त ५ वी पर्यंत शिकली (?) आहे.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 2:23 am | श्रीरंग_जोशी

कथा वाचून वाईट वाटलं.

चांदणे संदीप's picture

4 Mar 2016 - 1:12 pm | चांदणे संदीप

:(

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2021 - 2:13 pm | चौथा कोनाडा

दुर्दैवी अब्बू !
शेवटी असेच सामन्य लोक यंत्रणांच्या हाती सापडतात !
सुटणारे सुटून जातात आणि अश्या लोकांचे हाल कुत्रं खात नाही, आयुष्य उध्वस्त होऊन जाते !

त्यात असाच प्रसंग होता राजीव गांधी यांची हत्या होते अशी बातमी येते अन गावात दंगे सुरू होतात आख्खी वस्ती कुठून कुठून वस्तू उचलून आणत असते ते पाहून हिरोची आई हिरोला जागं करते अन म्हणते लोकं काय कायआणत आहेत तु कुकर तरी घेऊन ये...

त्यावेळी प्रसंग अतिरंजित वाटला होता दिग्दर्शकाची कीव केली होती... आता मात्र गांभीर्य समजते आहे

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2021 - 6:24 pm | चौथा कोनाडा

तळागाळातील शोषितजन पै पै जोडून वाढत्या गरजा आणि महागाईशी लढा देत जगत असतात. त्यांच्यासाठी अश्या घटना म्हणजे एक संधीच असते.
दुर्दैवी असली तरी.