या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
- यशवंत देव यांच्या गीताचे स्वैर रुपांतर
- बहुगुणी, ऑगस्ट ८, २००८
शक्य झाल्यास चालीतही गाता यावं असा प्रयत्न आहे.
-------------------
इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं
दिल सौ बार लुटाएं
इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं
चंचल झोंके, जलकी धारा, भीगी काली मिट्टी
जैसे प्राण हो हरे भरे, निकल पडी तृणपत्ती
फूल शर्मिले देखके किसकी, होठोंकी याद आए
इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं
रंगोंका फैलाकर पंखा, सांझ ये किसने बना ली
रैनाके दरवाजेपर जैसी, तारोंकी रंगोली
छे ऋतुओंकी हो छे मेहेफ़िलें, यहींपर दर्द हटाएं
इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं
नन्हे होठोंसे बच्चेकी, जैसे बोली आती
प्रीत प्रियाकी जन्म फूलोंसे जैसे लतापर लेती
नदीकिनारे सजनी जैसे तनहा गीत सुनाए
इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं
इन होठोंसे चूम लूं मैं भी, बार बार मिट्टी ये
कई मर्तबा जां निछावर हो, यहींके जीने सच्चे
यहां के पीपल पत्ते पर ही, जिंदगी तैरती जाए
इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 9:01 am | विसोबा खेचर
मराठीतील अजरामर गीतांचा इतर भाषिकांनाही आस्वाद घेता यावा म्हणून हा प्रयत्न...
प्रयत्न स्तूत्य आहे परंतु आस्वाद घेण्याकरता मिपावर इतर भाषिक लोक कितीसे आहेत हा एक प्रश्नच आहे....
शिवाय,
हे मराठी संस्थळ आहे परंतु अपवादात्मक परिस्थिती मानून हा गैरमराठी अनुवाद येथून काढला जाणार नाही.
'क्वचित' आणि 'कधी कधी' असे बिगरमराठी लेखन मिपावर येण्यास हरकत नाही परंतु 'क्वचित' आणि 'कधी कधीच'! त्यात अगदी नित्यनियमितपणा नसावा इतकेच सांगावेसे वाटते!
आपला,
(मराठी) तात्या.
24 Oct 2013 - 1:07 am | आनंदमयी
एकदम पर्फेक्ट अनुवाद! सही जमलाय...आवडला!! :)
30 Aug 2015 - 10:07 am | एस
ही कविता मंगेश पाडगावकरांची आहे. संगीत यशवंत देव यांचे आहे.
अनुवाद आवडला. हा धागा आधीही वाचला होता. पण प्रतिसाद आत्ता देत आहे. बाकी तात्यांच्या मताशी सहमत. पण हल्ली मिपाचे मराठीपण जरा कमी झाले आहे असे अमराठी लिखाण पाहून वाटते. कुणी ऊर्दू लिहितो कुणी संस्कृत.
30 Aug 2015 - 11:55 am | माहितगार
मुलतः अनुवादांची संकल्पना चांगली आहे. हि संकल्पना मनोररंजनातून मराठी भाषा शिक्षणासाठी उत्तम आहेच. त्या शिवाय मराठी भाषीकांच्या संकल्पना आणि दृष्टिकोणांचा अल्पओळख इतर भाषिकांना होऊ शकते.
तात्यांनी सांगीतलेली एक अडचण आहेच परंतु प्रथमतः मंगेश पाडगावकरांचे काव्य कॉपीराइटेड असण्याची संभावना आहे आणि आपला अनुवाद कितीही उत्तम असला तरी त्याच्या प्रकाशन/प्रसिद्धीपुर्वी मंगेश पाडगावकरांची अनुमती घेणे अभिप्रेत असावे असे वाटते.
सामुदायिक प्रयत्नातून अनुवादांसाठी विकिस्रोत हा चांगला प्लॅटफॉर्म आहे पण तेथे मराठी भाषी व्हॉलूंटीअर्सची वानवा आहे. (अंशतः यास मराठी भाषिकांचे द्रुपल प्लॅटफॉर्म एके द्रुपल प्लॅटफॉर्म प्रेम जबाबदार आहे ते द्रुपल बेस्ड प्लॅटफॉर्मसोडून इतर प्लॅटफॉर्मवर काम करण्यास अनुत्सुक प्रतीत होतात) त्यामुळे इतर भाषेतील कशाचा अनुवाद मराठीत करून हवा असेल तपासून सुधारीत करून घेण्यात साहाय्य हवे असेल तर तुर्तास मिपा बरे पडते आहे.
काही मिपालोक्स इतर भाषी साहित्याबद्दल मराठीतून आस्वादात्मक लेखन करत असू शकत असतात. इतर भाषातून मराठीत अनुवाद, संदर्भ आणि आस्वादात्मक लेख या तीन बाबतीत मिपा धोरणात लवचिकता राहील्यास बरे पडेल असे वाटते. बाकी प्रताधिकार मुक्त साहित्याच्या प्रताधिकारमुक्त अनुवादांसाठी खरे म्हणजे विकिस्रोत हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे.