.

नागपुरात..

Primary tabs

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
29 Feb 2016 - 6:56 pm

मोठ्ठाल्ले रस्ते..
ट्राफिकले हसते ..
ढोरं बसते..
नागपुरात..

डी पी ची हिरवळ
नागनाल्याचा चिखल
उन्हाळ्यात तळमळ
नागपुरात

नागपुरीचा थाट
हिंदी बम्बाट
इंग्लिशलेबी वाट
नागपुरात

के सी पार्कचा पोहा
पहाटे चारले चहा
उधारीच वाहा
नागपुरात

माहोल पोट्टे
रिकामचोट्टे
संत्र्याचे कट्टे
नागपुरात

मिहानची भरारी
लफडे भारी
दिल्लीची वारी
नागपुरात

बी इ करी
बेरोजगारी
पुण्याची वारी
नागपुरात

मस्तीत चित्त
पाहुणचार मस्त
फॅमिली संग
नागपुरात

---------------------------------------------

बम्बाट = भरपूर .
विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार !

माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या भाई, आजकल बम माहोल कर रा तू ! " इथे वेगळाच अर्थ आहे ना ?

डी पी = धरमपेठ .. इथल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर( WHC Road) बरीच 'हिरवळ' असते. शंकरनगर वा लक्ष्मीभुवन चौकात उभे राहायचे.. :)

के सी पार्क = कस्तुरचंद पार्क . इथले पोहे खूप प्रसिद्ध आहेत. पण भल्या सकाळीच जायचे.

पहाटे चारले चहा = शंकरनगर चौकात पहाटे ४-५ ला जायचे आणि चहा घ्यायचा किंवा रामदासपेठेत लोकमत चौकात जायचे. हा तरुणांचा फेवरेट विरंगुळा..

कवितेत बर्डी ( सीताबर्डी ) सुटली.. :( बर्डीचा महिमा शब्दांत बांधता येणार नाही .. ;) प्रयत्न करेन परत एकदा :)

नागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

29 Feb 2016 - 7:21 pm | श्रीरंग_जोशी

स्वाम्या, माहोल करून राहिला बे मिपावर आजकाल.
बाप्पा, बाप्पा कविता भल्लीच आवडली ना मले.

मधुरा देशपांडे's picture

29 Feb 2016 - 7:28 pm | मधुरा देशपांडे

:)

प्राची अश्विनी's picture

29 Feb 2016 - 7:30 pm | प्राची अश्विनी

अरे वा! मस्त!ते सावजी रायले ना वो बाप्पा!

स्वामी संकेतानंद's picture

29 Feb 2016 - 8:12 pm | स्वामी संकेतानंद

आता काही न काही सुटूनच जाते!

नाव आडनाव's picture

29 Feb 2016 - 9:13 pm | नाव आडनाव

संत्राबर्फी पण राहिली :)

महासंग्राम's picture

1 Mar 2016 - 4:39 pm | महासंग्राम

संत्रा बर्फिले उगाच डोक्यावर बसोल हाय बाहेरच्यांन नागपुरात कोणी संत्रा लावून बी पायात नाई त्याले.

विवेकपटाईत's picture

29 Feb 2016 - 8:17 pm | विवेकपटाईत

कविता आवडली.

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 9:18 pm | प्रचेतस

झक्कास स्वामीजी

पैसा's picture

29 Feb 2016 - 9:31 pm | पैसा

मस्तय!

मित्रहो's picture

29 Feb 2016 - 10:00 pm | मित्रहो

LAD कॉलेज, शंकरनगर चौकातले पोहे साऱ्या आठवणी जाग्या केल्यात. रामभंडारची लस्सी, बर्डीजवळचे पकोडे.

चांदणे संदीप's picture

1 Mar 2016 - 12:55 am | चांदणे संदीप

ऐ सरजमीन-ए-नागपूर..... ____/\____

अशाच वरहाडी कविता टाकजा भौ मिपावर! बिलकुल माहोल बनवला एकदम!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2016 - 8:28 am | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जि ज़िंदाबाद!

नाखु's picture

1 Mar 2016 - 9:12 am | नाखु

"त्रिकाल(स्थ्ल) दर्शी" आहेत याचा पुन्हा प्रत्यय आलाच.

पंखा नाखु

ब़जरबट्टू's picture

1 Mar 2016 - 9:14 am | ब़जरबट्टू

एक नम्बर लिव्हल न भाऊ . च्याभिन, या पुण्याले आलो, न सुधरुनच गेलो पार , थे मजा गेली राव नागपुरीची :)

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 12:05 pm | बॅटमॅन

एकदाच गेलेलो नागपुरास, ते सगळं आठवू राहिलं.

बाकी बम = खूप, म्हणूनच शंकररावांना 'बम भोले' म्हणतात की काय?

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 1:16 pm | भरत्_पलुसकर

छान! अशे सम्द्या गावाव हुन जौ द्या!

नीलमोहर's picture

1 Mar 2016 - 1:19 pm | नीलमोहर

लै भारी.

होबासराव's picture

1 Mar 2016 - 3:15 pm | होबासराव

काय भाउ आजकल बम्बाट माहोल करुन र्‍हायले तुम्हि अथिसा ;)

सिरुसेरि's picture

1 Mar 2016 - 3:33 pm | सिरुसेरि

ते वाळ्याचे पट्टे आठवले .
माहोल पोट्टे
रिकामचोट्टे
संत्र्याचे कट्टे
नागपुरात

होबासराव's picture

1 Mar 2016 - 3:46 pm | होबासराव

ते पट्टे नसतात तट्टे असतात ;)

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 3:56 pm | पिलीयन रायडर

वा मस्त!! नागपुरची लोकं आवडतात आपल्याला.. निवांत असतात..

जुइ's picture

2 Mar 2016 - 4:32 am | जुइ

=))

रेवती's picture

2 Mar 2016 - 4:42 am | रेवती

कविता आवडली.

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 9:05 am | बोका-ए-आझम

तुमच्या नागपूरवरच्या कवितेचं?

मित्रहो's picture

2 Mar 2016 - 10:52 am | मित्रहो

आम्हाला तर भारी आवडली, आम्ही तर घरीही घेउन आलो. तरीही तिथली हिरवळ आहे तशीच आहे.

संजय पाटिल's picture

2 Mar 2016 - 6:02 pm | संजय पाटिल

अभिनंदन!!

गौरी लेले's picture

2 Mar 2016 - 6:07 pm | गौरी लेले

खुपच सुरेख !

पण संत्र्याचे कट्टे म्हणजे काय ?

चाणक्य's picture

2 Mar 2016 - 9:52 pm | चाणक्य

भारी लिहून -हायले तुम्ही तर.

चाणक्य's picture

2 Mar 2016 - 9:52 pm | चाणक्य

भारी लिहून -हायले तुम्ही तर.

रातराणी's picture

4 Mar 2016 - 9:35 pm | रातराणी

मस्त !

पद्मावति's picture

4 Mar 2016 - 9:58 pm | पद्मावति

:) क्लास!!

नूतन सावंत's picture

4 Mar 2016 - 10:22 pm | नूतन सावंत

मस्त,नागपूर डोळ्यांसमोर उभं केअत स्वामीजी.

चिगो's picture

7 Mar 2016 - 1:51 pm | चिगो

बम माहोल पिट रहा भाऊ तू..

एक नंबर.. बरंच काही आठवून गेलं.. नागपुरात/विदर्भात उन्हाळ्याची जी मजा आहे ना, ती कुठंच नाही.. (असं प्रत्येकालाच आपल्या गावाबद्दल वाटतं, ही गोष्ट अलहीदा.. ;-) ) टरबुज, पन्हं, कुलरनी थंडावलेलं घर, गच्चीवर झोपण्याची मजा, झालंच तर मामाच्या घरातलं थंडगार तळघर ह्याची मजा घ्यायची तर बाहेर ते सन्न ऽ ऽ तापणारं उनंच पाहीजे..

कविता घाप्प ऽऽ किन्या भिडलीच ना भाऊ.. बाकी, कवितेत बर्डी, सावजी, बजाजनगरातल्या भेल्/पानीपुरी इत्यादींच्या हातगाड्या/ पकोडेवाला / जिल्ह्यासमोरचा पाटोडीवाला सुटलंय, स्वामीजी. आता अड्डे बदलले असल्यास ठाऊक नाही..

स्वामी संकेतानंद's picture

7 Mar 2016 - 7:18 pm | स्वामी संकेतानंद

अड्डे अजून बी थेच् हाएत पर कवितेत का घेऊ न का नाही असा झालता भाऊ..

श्रीनिवास टिळक's picture

7 Mar 2016 - 7:54 pm | श्रीनिवास टिळक

आपली कविता वाचून बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९६० ते १९६३ मी फार्मसीचा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठात करत होतो. तेव्हा वसतीगृहापासून धरम पेठ आणि रामदास पेठ या दोन 'हिरवळी' आम्हाला जवळ असल्यामुळे सोयीच्या होत्या. तेथील बापट बंधू यांचे किराणा आणि इतर मालाचे मोठे दुकान मध्यवर्ती होते. जवळच्या एका उपहारगृहात (नाव विसरलो) दुधी हलवा चांगला मिळे. तेथेच आमचा मुक्काम असे.

एकदोन नागपूरकर डोकी आठवली.