पप्पा इन्टॉलरंस म्हणजे काय हो ? माध्यमात सुरु असलेली चर्चा ऐकून माझ्या मुलाचा मला प्रश्न. अरे इन्टॉलरंस म्हणजे असहिष्णुता..पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखकांच्या मते देशात सध्या जे वातावरण आहे त्याला म्हणतात असहिष्णुता ....मी उत्तर दिले. पप्पा, मी तुम्हाला अवघड नाही तर सोपं करण्यासाठी प्रश्न विचारला आहे. बर सांगतो सोपं करून.
आता हे बघ.. देशावर हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना तुरुंगात बिर्याणी ऐवजी वरणभात खाऊ घातला तर ती झाली असहिष्णुता आणि त्याने कितीही जीव घेतले आणि फासावर गेला तरी त्याचा जयजयकार करणा-यांना आपण सहन करतो हि झाली आपली सहिष्णुता.
पप्पा...तुम्ही जे काही सांगताय ते काही लक्षात येत नाही. थांब अजून सोपं करून सांगतो.
अरे..श्रीमंताच्या ( हिंदीत अमीर )कानात त्याची बायको रात्री जे कुजबुजते ती असते असहिष्णुता आणि त्याने हे जगजाहीर करून कितीही वाद केला तरी सरकार त्याला आपल्या उपक्रमात सहभागी करून घेते हि झाली सहिष्णुता.
मम्मी भाजी विकत घेताना त्या गरीब कष्टकरी शेतक-यांशी घासाघीस करते ती झाली असहिष्णुता आणि दररोज पहाटे उठून तुझ्यासाठी केलेली भाजी तू न संपवता डब्यात परत आणतो म्हणून ती जे सहन करते हि झाली तिची सहिष्णुता.
आता समजलं ?..हे विचारताच मुलगा म्हणाला..पप्पा...तुम्ही खूप सहिष्णु....त्याच हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी त्याच्या तोंडावर हात ठेवला. पुरस्कार वापसी वाल्या लेखकांचा सरकारला जसा अडचणीत आणण्याचा हेतू होता तसाच मलाही हा प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा मुलाचा हेतू माझ्या लक्षात आला होता. सहिष्णुता-असहिष्णुता काही नाही इथे...चल अभ्यास कर आपला असं म्हणून मी विषय संपवला.
प्रतिक्रिया
21 Feb 2016 - 7:51 am | प्रचेतस
ओक्के.
21 Feb 2016 - 11:54 pm | उगा काहितरीच
"असहिष्णुता आहे" असं खुलेआम बोलू शकण हेच मुळात "सहिष्णुतेचे" उदाहरण आहे . ;-)
22 Feb 2016 - 3:16 pm | होबासराव
"असहिष्णुता आहे" असं खुलेआम बोलू शकण हेच मुळात "सहिष्णुतेचे" उदाहरण आहे . ;-)
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
22 Feb 2016 - 5:33 am | कंजूस
आपल्याला न आवडणाय्रा गोष्टी दुसय्राने केल्यावर त्यावर नापसंती दाखवणे/ न दाखवणे.
22 Feb 2016 - 7:06 am | कपिलमुनी
22 Feb 2016 - 8:14 am | विकास
त्याला Freedom of expression म्हणतात, जो हक्क भारतीय संविधानाने सगळ्यांना समान दिला आहे.
22 Feb 2016 - 3:01 pm | नितीनचंद्र
कायद्याने न्यायालये निर्माण झालेली आहेत. सर्व साक्षी पुराव्यानिशी जेव्हा अफजलचा गुन्हा सिध्द झाला तेव्हा ज्याने फक्त अफजल हे नाव ऐकल आहे. खटला ऐकला नाही. निकाल वाचला नाही अशी व्यक्ती Freedom of expression च्या आधारे अफजल निर्दोष होता हे जाहिर रित्या कस म्हणु शकते ?
22 Feb 2016 - 3:57 pm | माहितगार
नितीनचंद्र आपले म्हणणे तर्कसुसंगत वाटते. तुम्हाला दुसर्या मिपा धाग्यावरील माझा हा प्रतिसाद आणि हा प्रतिसाद देखिल कदाचित वाचण्यास आवडेल.
22 Feb 2016 - 3:49 pm | माहितगार
धागा लेखास =))
22 Feb 2016 - 5:00 pm | तिमा
आताच ताजी बातमी टी.व्ही. वर बघितली. काश्मीरमधे पाम्पोर येथे अतिरेक्यांबरोबर चकमक चालू असताना, नदीच्या पलिकडल्या काठावर त्या गांवातले नागरिक(?) मोठ्या प्रमाणावर जमून 'आजादी' च्या घोषणा देत होते. इकडे आपले शूर जवान मरत होते. याला सहिष्णुता म्हणतात की अभिव्यक्तिस्वातंत्र्य ?
22 Feb 2016 - 6:42 pm | कपिलमुनी
१-२ राउंडस् नदीपलिकडे फायर केले असते तर काहीजणांना आजादी मिळाली असती
22 Feb 2016 - 6:45 pm | होबासराव
१-२ राउंडस् नदीपलिकडे फायर केले असते तर काहीजणांना आजादी मिळाली असती
सहमत
2 Mar 2016 - 10:22 am | सुबोध खरे
दुर्दैवाने सैन्याकडून एक जरी चूक झाली तरी त्याबद्दल चौकशी आयोग आणि इतक्या कटकटी पुढची पाच वर्षे मागे लागतात कि दोन दहशतवादी सुटले तरी चालतील पण एकाही "स्वतंत्र" नागरिकाला खरचटलं तरी चालत नाही हि आजची सैन्याची स्थिती आहे.
सैनिकांना काश्मीरमध्ये पोस्टिंग नको असे झाले आहे.
2 Mar 2016 - 5:26 pm | होबासराव
पण हा अॅक्ट तेथे लागु असताना सैनिकाना चौकशि चा जास्त ससेमिरा मागे लागत नाहि ना डॉक ?
खरच माहित नाहिये म्हणुन विचारतोय.
25 Feb 2016 - 7:23 pm | नितीनचंद्र
काश्मीर मधील १९४७ नंतर विस्थापीत हिंदु यावर अभिव्यक्ती नसतेच.
25 Feb 2016 - 9:18 pm | निनाद मुक्काम प...
विरोधी पक्षाचा उत्कर्ष सहन झाला नाही कि अश्या खोड्या काढायच्या
आता पहा विचाराजंत मारे लिहितात असे करू नका ह्याला मते देऊ नका विविध स्वरुपात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लिहितात.
तरीही सामान्य जनता त्यांना .... मारते
मग आपली लायकी समजली की ते बोंबा बोंब करायला लागतात.
आत्ममग्न लोकांना सामान्य जनतेच्या भावना समजत नाहीत मग असहिष्णुतेचा पोकळ नारा दिला जातो
2 Mar 2016 - 10:07 am | नितीनचंद्र
पोकळ नाय, काळा पैसा आणुन नविन वाहीन्या स्थापन झालेल्या आहेत. परवाच निखील वागळे नागराज मंजुळेची मुलाखत घेताना असा प्रश्न विचारला की माझ्यावर सुध्दा देशद्रोहाचा गुन्हा लागु शकतो असे म्हणाले. ह्यांचा बोलविता धनी कोण ते काय समजत नाय ?