विषय संपला????

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जनातलं, मनातलं
21 Feb 2016 - 1:01 am

बाबासाहेबांच्या पुरस्काराचा वाद झाला, मतांतरं, धमक्या सगळं झालं, पण काम त्या पोलिसांचं वाढलं. दिवस रात्र ड्युट्या लागल्या... तेव्हापासून पाहतोय, सारखं काहीतरी आहेच. तो ओवेसी काहीतरी बोलतो पुन्हा फेसबुक वर त्याच्या आई माईला घोडे लावले जातात. विषय संपला.
मग गुलाम अली येतात, त्यांना परत पाठवलं जातं आपला स्वाभिमान जपण्यासाठी. पुन्हा एकदा कुणाला उमाळे येतात, त्यांच्या गजला शेअर होतात. विषय संपला.
मग आमीर खान काहीतरी बोलतो, सामाजिक जाणीव असलेला अभिनेता, पर्फेक्षनिस्ट वगैरे आपण पूर्वी दिलेली बिरुदं विसरून हा कसा जन्मापासून हरामखोर आहे असल्या कथा whatsapp वर येऊ लागतात. मेम्स बनतात, असहिष्णू, सहिष्णू या शब्दांच्या मागे hashtag लागतात. ट्रेंड्स वाढतात. विषय संपला.
पुन्हा दाभोळकर वगैरे हत्येचे विषय चघळले जातात, विषय संपला.
मग कुणाचा खून होतो, दगडाने ठेचून झाला की तीक्ष्ण हत्याराने झाला याला महत्त्व नाही, ‘पण एकदा जाळल्यावर ज्याची राख राखाडीच दिसणार आहे’ तो मरणारा ‘दलित’ असतो. त्याची उच्च वर्णीय लोकांनी पिळवणूक केलेली असते. तर तो दलित मेला म्हणून दु:ख झालेला प्रत्येक जण संध्याकाळी सिनेमाच्या तिकिटांच्या रांगेत असतो. कारण???...विषय संपला.
कुणीतरी क्रिकेट मध्ये १००० रन्स करतो, त्याची कौतुकं होतात, बॉलर कोण चुx होता?? वगैरे चर्चा घडतात...पण दोन दिवसांनी त्या खेळाडूच नाव पण आठवत नाही राव.....विषय परवाच संपला.
कुणी मंदिरात ठराविक कपड्यांना बंदी करतात, कुणी महिलांना जुन्याच रितीप्रमाणे मनाई करतं दर्शन घ्यायला. मग आंदोलनं, happy to bleed. प्रसिद्धी, काहीतरी केल्याच समाधान. मग जुनीच पद्धत का बरोबर आहे याचं कुणीतरी विश्लेषण करणार whatsapp वर. पण आठवड्याने काही नाही. कारण विषय संपला ना.
च्यायला काहीतरी बिनसतंय लोकहो....आपणच सावरायला हवंय स्वत:लाच. आपल्या भावना किती क्षणभंगूर आहेत हा विचार अस्वस्थ करतोय मला परवापासून. विषय संपला नाही.
प्राण साहेब गेले, हे कळायचा अवकाश....RIP प्राण. अरे verify तरी करा. का कुणाला पहिलं कळलं अन कुणी पहिली श्रद्धांजली वाहिली याला महत्त्व आहे?
अरे १८ मुलं मेली त्या समुद्रात बुडून. १८ नाही १९, बातम्या नीट वाचत जा.
अरे तुम्ही काय केलंत भडव्यांनो? ‘१०८’ ambulanceवाले त्यांना वाचवत असताना तुम्ही लांबच्या मित्रांना मृतदेहाचे फोटो पाठवत होतात? का? तुम्हाला आधी कळल हे सिद्ध करायचं होतं म्हणून? पुढे? .......विषय संपला.
याच विचारात आहे सारखा की नक्की त्या whatsapp सोबत कुठे वाहवत जातोय आपण?
जेव्हा पाडगावकर गेले, आधी मान्यच होईना मनाला, मग जेव्हा झालं तेव्हा सलग २ दिवस घरचं कुणी गेल्यासारखं अपार दु:ख झालं. त्यात whatsapp वर त्यांच्या कविता यायला लागल्या, उपक्रम चांगला होता, पण प्रत्येक कविता वाचताना तो ‘वयस्क तरुण’ डोळ्यांसमोर दिसायचा. मन हेलावून जायचं. मंगूअण्णा गेले. थरथरत्या हाताने कळवलं होतं मी. अन मग ती मेसेज मधून जाणवलेली नि:शब्द अस्वस्थता. मला म्हणायचं नेमकं हेच आहे की मला जेव्हा दु:ख झालं, ते कायम सलत राहिलं.
इथे मी कुणाचं दु:ख लहान, कुणाचं मोठं हा ऊहापोह करायला बसलेलो नाहीये हे लक्षात घ्या. मुद्दा क्षणभंगूरतेचा आहे. जो मला परवा प्रकर्षाने जाणवला. अगदी दुपारपर्यंत सर्वांना हनुमंत्ताप्पा किंवा जे त्याचं नाव होतं ते. मी ४ वेगळी नावं वाचली आहेत. (प्रसार माध्यमांकडे नाव नीट माहीत करून घेऊन दाखवायची पण जबाबदारी नाहीये वाटतं). तर त्यांच्या जाण्यामुळे अचानक सर्वांना झालेलं दु:ख, आपल्या सेनेविषयी असलेलं प्रेम एकदम सफाचट झालं एकदम. सर्व इंटरनेट, फेसबुक हे ‘इशरत जहान’न व्यापलं होतं. कधी, काय अन कसं घडलं याचाच बोलबाला...अन तीला मारलं तेव्हा आपणच हातात मेणबत्त्या घेऊन फेरया काढल्या होत्या, हे सगळे विसरले, अन त्या पोलिसांच्या कामगिरीला राजकीय रंग चढला.
अरे तुम्हाला दु:ख झालं होतं ना?? हनुमंताप्पा गेले म्हणून...?? कुठे गेलं ते? अनाकलनीय वाटतंय मला सगळं...आपल्या भावना किती क्षणिक आहेत? म्हणजे त्या आमीरला शिव्या घालताना पण जो तो प्रत्येक जण जो देशभक्ती दाखवत असतो, तो खरंच किती सिरीयस ‘असेल स्वत:च्या मतांच्या बाबतीत? म्हणजे खरच वेळ आली तर यातले किती जन(जण) खरच देशकार्यात योगदान देतील? ते असो...फार पुढचा मुद्दा आहे तो.

पण हे जे “विषय संपणं” आहे, ते घातक आहे. पण तात्पुरतं जगासोबत जगता यावं, चार चौघात मत देता यावं म्हणून आपण आलेला मेसेज फॉरवर्ड करून खूप तात्पुरतं जगतोय. धडाधड एकेक घटना डोक्यावर घेऊन त्यांना उगाच महत्त्व देतोय. पर्यायाने उगीच अस्थिरता निर्माण होतीय. अन ती मात्र क्षणभंगूर नाहीय. तीचे व्यापक परिणाम होणारेत, दीर्घकाळ टिकणारेत असं वाटतंय.
पहा म्हणजे....आपल्यातले बदल किती इतके हळू झालेत की आपल्याला कळले नसावेत. पण एवढ मात्र खरं, की मागच्या पिढ्यांनी विषमता नष्ट करण्यासाठी जे कार्य केलं ते भलतीकडे जातंय...मूळ पदावर येऊ पाहतंय.
अन ही अस्थिरता मुद्दाम maintain केली जातीय.
यावर उपाय काय म्हणावा तर मी सुद्धा blank आहे. पण एक मात्र नक्की सुरु केलंय, की मी काहीच मनावर घेत नाहीय. एक गुरु भेटलेत इतक्यात, कामं prioritize करायला शिकवतायत, तसंच मी त्रयस्थपणे घटनांकडे पाहतोय. कशाला महत्त्व द्यावं हे शिकतोय. नाही त्रास होत मग कशाचा. अन मग त्यावर काही बोलावसं पण वाटत नाही. त्यामुळे मग मनात सामावलेले सगळे विषय भरपूर वेळ देऊन चघळले जातात. त्यावर ठाम अशी मतं बनतात. आजूबाजूच्या घटनांपेक्षाही काही महत्वाचं आहे हे जाणवतं. वगैरे....

असो...मनातलं खूप काही खूप दिवसापासून मांडायचं होतं, आज वाट करून दिली इतकंच. पटलं तर विचार करा. Whatsapp, फेसबुक कसं वापरावं हा विचार करा...अन आपल्या भावना अस्सल, स्थिर असू द्या, त्या वैचारिक मंथनातून आलेल्या असू द्या...बस इतकंच.

-आगाऊ म्हाद्या

समाजविचार

प्रतिक्रिया

रेवती's picture

21 Feb 2016 - 1:56 am | रेवती

छान लिहिलयत.
सगळच पटलं असं नव्हे तरी आवडलं.

पुणेकर भामटा's picture

21 Feb 2016 - 8:41 am | पुणेकर भामटा

आवडला लेख.

आगाऊ म्हादया......'s picture

21 Feb 2016 - 3:28 pm | आगाऊ म्हादया......
माहितगार's picture

21 Feb 2016 - 9:13 am | माहितगार

सजगता आणि इनफॉर्म्ड पब्लिक ओपिनियन साठी या साधनांचे योगदान अत्यल्प म्हणून का होइना मान्य करण्यास काय हरकत असावी ? यातील अल्फाबेट मोजून लिहून तेवढ्याच अल्फाबेटात उत्तर द्या हे व्यक्तीशः माझ्या डोक्यात जाते. 'देशप्रेम म्हणजे काय', 'मला कुणीतरी देशभक्ती शिकवा' अशी आमच्या तजोंचे लेखन एक वाक्यीय मोजक्या अल्फाबेटात असते प्रत्येक एक वाक्यीय प्रश्नाचे उत्तर एकवाक्यीय कसे असू शकेल ? पुर्ण विसृत चर्चेस संधी न मिळता मते बनवली जाणे ही यातील काही साधनांची मर्यादा असू शकेल का ?

बाकी आयुष्यातील प्रत्येक आठवण आणि समोर आलेला प्रत्येक विषय चघळत मनुष्यप्राणी कसा काय जगू शकेल ? प्रत्येक प्रश्नाचे/समस्येचे निदान होऊ शकतेच असे नाही धागा लेखक म्हणतो तसे मनुष्याला स्वतःच्या प्रिऑरिटीज ठरवत जगावे लागते. मला वाटते विस्मृती ही मनुष्य प्राण्यास मिळालेली अमुल्य देणगी आहे आणि विषय संपणे हि समस्या असु शकेल पण विषय संपणे हे प्रत्येक वेळी घातकच असेल हा विचार तार्कीक उणीवेचा नाही का ?

आगाऊ म्हादया......'s picture

21 Feb 2016 - 3:27 pm | आगाऊ म्हादया......

पण व्यक्त केलेली मतं क्षणिक आहेत, असं वाटतं मला. तुमचे इतर मुद्दे अमान्य नाहीत, पण विस्मृती एवढी २-२ तासात होत असेल तर ते वरदान वगैरे वाटत नाही. पण आपले म्हणजे माझे विचार एकांगी आहेत कि नाही हे समजवायला मिपा च हवं हे पटलंय

तर्राट जोकर's picture

21 Feb 2016 - 3:36 pm | तर्राट जोकर

'देशप्रेम म्हणजे काय', 'मला कुणीतरी देशभक्ती शिकवा' अशी आमच्या तजोंचे लेखन एक वाक्यीय मोजक्या अल्फाबेटात असते
>> देशप्रेम, देशद्रोह ह्यांची व्याख्या लोक एका वाक्यात स्पष्ट करतायत. तेही सुचलं नाही तर कानफाटात वाजवून उत्तर देतायत. तिरंगा घेऊन भारतमाता की जय म्हटलं की देशभक्ती सिद्ध होत असतांना तुम्ही म्हणताय एका वाक्यात उत्तर कसं द्यायचं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2016 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

जनतेची आठवण ठेवण्याची क्षमता कमी असते (Public memory is short lived).

तिमा's picture

21 Feb 2016 - 8:10 pm | तिमा

मनांतला विषय संपवला नाही तर कुठलाही सहृदय माणूस वेडा होईल, अशा वेगाने घटना घडत आहेत. 'रसातळ' असा कुठला रसातळ नसतो. एखादी व्यक्ति वा समाज वा देश नैतिक दृष्ट्या किती खाली जाईल त्याचे मोजमाप नसतं. ते पतन अव्याहतपणे चालूच असतं!