चारोळ्यांचा चखणा

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
15 Sep 2008 - 6:34 am

प्यायला बसला पंपू, वर चारोळ्यांचा चखणा
चारोळ्यांचा चखणा, मारतो काजूंचाही बोखणा
काजूच्या बोखण्यातच मानली फ़ेणीची झींग
झींग नकोच फ़ेणीची, मस्त होती कढी वीथ हींग

सारी शब्दांची भेंडोळी, अन वृत्तांची खांडोळी
कधी अर्थाची होळी, अपुरी यमकांची खेळी
शोधून फ़सलेल्या ओळी अगम्य गम्याची जाळी
टाकली आज संस्थळी आयतीच तयार चारोळी

आधी होता कादंबरीकार त्याची लांबण खपेना
लिहील्या लघुकथा चार तरी वाचक मिळेना
पाडल्या कविता वजनदार त्याही फ़ुकटात विकेना
केल्या चारोळ्या तय्यार लोक म्हणे एकोळ्या द्याना!

डॉक्टर बघा ताप आला चांगले औषध द्या मला
तुम्ही घेउ नका टेन्शन देतो तापाचे इन्जेक्शन
काय राव करता थट्टा? डॉक्टराच्या पेशाला बट्टा!
तुम्ही तापाचे इन्जेक्शन? मच्छरांचे हे रोजचे फ़ंक्शन!

घसा बंडुचा सुकला खोकून खोकून
म्हणे कफ़ सिरप घ्या चमचाभरुन
म्हणे बंडु कफ़ सिरप घेऊ कशाला?
काढुद्या बाहेर जो आधीच छातीत जमला, .

याराबरोबर पकडले बायकोला नवऱ्याने घटस्पोट मागीतला
म्हणे नवरा फ़सवले तू मला घरात घेतला दुसरा दादला
फ़सवलेत तुम्हीच आम्हाला म्हणे आठवडा लागेल परतायला
एकाच दिवसात परत आला? सांगा कुणी फ़सवले कुणाला?

आई बाबूला काम सांगते डोक्याचे तेल घेउन ये.
कुणाचे डोके, कसले तेल? बाबूला लागत नाही मेळ
गाढवा आण तेल केसाचे नीट सांग केसाचे की डोक्याचे?
आण गधड्या खोबऱ्याचे आई, गधडे खोबरे कुठे शोधायचे?

चारोळ्याप्रतिभा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

15 Sep 2008 - 6:38 am | मदनबाण

चखणा आवडला..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सहज's picture

15 Sep 2008 - 6:54 am | सहज

एकदम चविष्ट.

:-)

अनिल हटेला's picture

15 Sep 2008 - 7:13 am | अनिल हटेला

हा हा हा !!

मस्त आहे चखणा !!

( काय राव फक्त चखणाच व्हय ? बाकी? )

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वैशाली हसमनीस's picture

15 Sep 2008 - 9:27 am | वैशाली हसमनीस

चखणा फारच मस्त आहे.

फटू's picture

15 Sep 2008 - 9:34 am | फटू

अगदी योग्य शब्दांत चारोळी निर्मितीचं वर्णन केलं आहे :D

(र ला र आणि ट ला ट जोडून चारोळी पाडणारा),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर's picture

15 Sep 2008 - 11:04 am | अरुण मनोहर

खुशाल र ला र जोडा
लावा ट ला ट चा घोडा
पण का ला लावून का च्या जटा
बोचवलात फटदिशी काळजांत काटा!

फटू's picture

16 Sep 2008 - 6:42 am | फटू

तुमच्या खरडवहीतील फोटोकडे पाहून मी तुम्हाला काका म्हटलं होतं... माझा खरडवहीतील फोटो पाहा... मी तुमच्यापेक्षा खुपच लहान आहे... बास... केवळ हे आणि हेच कारण होतं तुम्हाला काका म्हणण्यामागे...

असो, नकळत का होईना मी तुमच्या भावना दुखावल्याबद्द्ल मी तुमची माफी मागतो...

आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सर्किट's picture

16 Sep 2008 - 10:37 am | सर्किट (not verified)

ही सर्वात बेष्ट चारोळी !

-- सर्किट काका

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)