सोमवार
देउळ दिवस
लोअर परेल
ठाणे दादर फास्ट-दाद्रर परेल- शेअर टॅक्सी
गेल्या पाच वर्षात न चुकणारा कार्यक्रम.
मेलवर आजच्या देउळातल्या पाहुण्यांची जळजळीत कहाणी डोक्यात भिनलेली.
सर्व दुष्काळी भागातील मुले.
सर्व प्रकारची आव्हाने परतवुन लाउन मुंबई च्या सरकारी इंजिनियरिंग आणि नेडीकल कॉलेज मधे प्रवेश घेतलेली.
शिष्यव्रुती अर्जाची मुलाखत.
सग़ळ्यांची वेगवेगळी पण तरीसुद्धा एकच असलेली व्यथा डोक्यात भिनलेली.
कधी वेस्टर्न ला आलो ते कळलेच नाही.
नुकतीच एक गाडी गेलेली, नंतरच्या लेडीज स्पेशल ची घोषणा.
सर्व प्लॅटफॉर्म वर स्त्री राज्य.
पुरुष मंडळी मागे सरलेली.
बाजुला एक वजनी ग्रुहस्थ, चक चक आवाज करत.
" मी म्हणतो अशा गर्दीच्या वेळेला लेडिज स्पेशल का ठेवते ही रेल्वे. हवे तर दोनाच्या ऐवजी चार डबे ठेवावेत.काही तरी करायला पाहीजे. तुमचे काय मत आहे"
काही नाही.
"बघा ना लोकल खाली जाईल आणि आपल्याला लटकत जावे लागेल"
माझा संभाषणातला निरुत्साह बघुन त्याने बाजुचे तरुण झाड पकडले.
त्या तरुणाने पण काणाडोळा केला.
तेवढ्यात लेडिज स्पेशल आली. बर्यापैकी भरलेली.
ग्रुहस्थ काही थांबेना.
" बघा सांगितले होते का नाही. आता नेंतरच्या गाडीत चढणे अशक्य. निदान नंतरच्या गाडीत सर्व डबे पुरुषांसाठी हवेत" झाड नंबर ३ निर्विकार.
आता ग्रुहस्थ इरेस पेटलेला.
"ह्यांच्या सारख्या वयस्कांचे काय हाल होत असतील? रेल्वेने विचार करायला पाहीजे. काही तरी केले पाहीजे"
आता मात्र मला राहवले नाही.
३०० मीटर वर दुसरी लोकल उभीच होती.
चला देउन टाकु दणका.
-काही तरी केले पाहीजे म्हणता म्हणजे नेमके काय करायचे? मी सुचवु. तुम्ही एक काम करा.पुढाकार घ्या. आपण सह्या मोहीम राबवु. म्हणता तर एक दिवसाचे उपोषण सुद्धा करु. जनरल मॅनेजर ला निवेदन देउ. सर्व चॅनेल कडे काय बोलायचे ते लिहुन तयारी करा. मी तुमच्या बरोबर उपोषणाला बसेन अर्धा दिवस. आणखी माणसे हवी असतील तर सांगा. दर दिवसाला १००० रुपये. माझी ओळखीच्या संस्थळावराचे २० जण नक्की येतील. ते पैसे आकारणार नाहीत. आम्ही नंतर कट्टा करु सांग्रसंगित. तो खर्च माझा.ठाण्याला का छ शि. ट. ते ठरवा आणि तारीख कळवा.-
तेवढ्यात लोकल आली. झाड नंबर २ आणि ३ गालातल्या गालात ह्सु दाबत होते. गर्दी होती. पण सहज प्रवेश मिळाला. ग्रुहस्थ झाड २ ३ सगळे बरोबर.
"आर यु सिरियस"
अॅज सिरियस अॅज कोमा केस. उगाच पुरुष प्रधान संस्क्रुती म्हणुन ओरडतात. घरी दारी सगळी कडे मुस्कटदाबी. काय चालले आहे काय?
"तुम्हाला कसे कळाले?"
काय?
"नाही, घरचा उल्लेख केला म्हणून म्हटले"
कॉमन प्रॉब्लेम आहे. माझ्या घरी पण तेच हो.
" असे म्हणताय, द्या तुमचा नंबर, ठरवुन कळवतो तुम्हाला."
झाड २, ३ हसु आवरेना मुद्रेत.
इतक्यात एलफिस्टन आले.
उतरताना कळस चढवला.
झाड २,३ चा हास्य धबधवा.
सकाळी किती वाजता उठता? सकाळी उठल्यावर जे करायचे ते सर्व काही करुन आला आहात ना?
प्रतिक्रिया
18 Feb 2016 - 12:17 am | रमेश भिडे
सगळं समजलं.
हल्ली वि प्र सरांचं घरी बरं चाललेलं असावं.
18 Feb 2016 - 1:44 am | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! मी २० मधला. मुंबईपर्यंतचा खर्च माझा.