नॉस्टॅल'जीया'
मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड... जूना ऐशट्रे, जूने जुळे साल्टपेपर, जुन्या मधुबाला पासून जुन्या ऐर्नोल्डचे रैंडम जुने पोस्टर्स, जूना फिडोडीडो नी जुन्या चार्ली चैप्लिनचे जुने स्टीकर्स, ताज्या अंड्यांच्या जुन्या क्रेटची इमारत, बाजूला फ्रेश स्लाइस/पावांच्या लाद्यांचे डोंगर, काउंटर वरची जुनीच 'स्टील्ल'बेल्ल, कोपऱ्यातली नीळी कैडबरीची जुनी तिजोरी, जुन्या शोकेस मधला जूना हुक्का... जुन्या छतावरचे काचेचे चंबूयुक्त जुनेच प्राकाशलट्टू... 'आज नगद कल उधार' ह्याची पाटी नसलेले जुने दरवाजे, जुन्या खांद्यावर रुमाल आणि कपाळावर घाम असलेले जुने 'वेट'र्स... भेजा न खीमा न डबलफ्राययुक्त जूना पदार्थफलक, बऱ्यापैकी जुनी पांढरीजाड कपबशी, त्यात साय आलेला चहा/कॉफी... जुनी स्टीलची ताटली... मस्कापाव... हातात जूनसं घड्याळ... डोळ्यात काटे... 'अजुन नाही आलाय भें...' करत जुन्या टीव्हीवरचा म्यूट धांगडधींगा... अर्धा पाऊण तास तेच... शेवटी बिल मगवलं तेवढ्यात आलं... जुन्या मैत्रीचं उधाणं... गले मिल कमीने!... अजुन एक मस्कापाव न दोन चहा... अजुन अर्धा तास... मध्येच बोटांच्या ड्रायव्हरयुक्त पाण्याचा ग्लास... ते करात नजरअंदाज, बैक टू धमाल गप्पा न मैत्रीचा सुवास! गेले ते दीन... परत कधी येइन!? माहीत नाही, असेल का इथे हे जुनं जग!? आठवणींची धीमी लोकल... रिटर्न वालं तिकीट प्रत्येक स्टेशन डोकावून उतरुन चढुन...
अरे बील द्यायचं राहिलच... टीप च्या बाजूला
बडीशेप नी टूथपीक, पाउल त्या जुन्या पायऱ्यांवर न डोक्यात परतीचे नवं तीकिट!अ
जड झाले मन... झाले हलके रस्ते...
थांबला टैक्सी वाला भैया...
मीटर पडता पडता... घामाच्या धारा...
सिग्नल सुटता सुटता... थंड मंद वारा...
असा हा नॉस्टेल'जीया',
नही तो क्या जीया!?
#सशुश्रीके
प्रतिक्रिया
17 Feb 2016 - 5:51 pm | उगा काहितरीच
मस्त लिहीलं की ! मिपाच्या एवढया गदारोळात वाचायचं राहून गेलं होतं .
18 Feb 2016 - 2:20 am | बहुगुणी
आवडलं.
18 Feb 2016 - 12:35 pm | राहुल मराठे
मस्त
18 Feb 2016 - 12:35 pm | राहुल मराठे
मस्त