एका गावातिल बस - रुपक कथा

सुज्ञ's picture
सुज्ञ in जनातलं, मनातलं
9 Feb 2016 - 1:06 am

एक गाव होते , त्या गावात एक खुप मोठी बस होती. बस मधे वर जाण्यासाठी ( त्या गावातील बाकीच्या लोकांच्या दृष्टीने वर जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी म्हणा ) एक शिडी लावलेली असून अनेक लोक प्रयत्न करून ती शिडी चढुन बस मधे जागा मिळवत असत. अडचण ही होती की लुळ्या लोकांना ती शिडी चढ़ण्यास धडधाकट लोक मदत करण्याऐवजी कायम त्रास देत (गंमत ही होती की ते लुळे नसत फक्त धडधाकट लोकांनी त्यांना मानसिक दृष्ट्या तसे बनवले होते. आपल्याला वर जायला मिळावे म्हणून हो ! ही त्या धडधाकट लोकांनी चूकच) . तर बस मध्ये अशा लुळ लोकांना जागा मिळण्यास उगीचच अडचण येऊ लागली.

यावर उपाय म्हणून काही लोकांनी मिळून असे ठरवले की बस मधील काही जगा लुळ्या ( धडधाकट लोकांनी उगीचच मानसिकरीत्या व त्रास देऊन बनवलेले लूळे) लोकांसाठी आरक्षित ठेवव्या व त्याना वर जाण्यास एक सरकता जीना ठेवावा.

तसेच लुळ्या लोकांना जागा मीळेल याची जबाबदारी त्या बस च्या कंडक्टर वर सोपवण्यात आली. तसेच किती लुळे लोक बस मधे बसतील यावर त्याची नोकरी व पगार अवलंबून करण्यात आला.

याने लुळ्या व अपंग लोकांना ( धडधाकट लोकांनी उगीचच .... ) बस मधे व्यवस्तित जागा मिळू लागली व ते सरकत्या जिन्याने आरामत वर पोहोचु लागले.. आहा !! काही लोकांनी विचार केला, फारच सोपे!जीना चढण्याचे कष्ट घेण्यापेक्षा आपण लुळे असलेले कंडक्टर ला सांगितले की आरामत वर पोहोचता येते व जागही मिळते!

पण हे व्हावे कसे..

काही वर्षे गेली

एकदा एक इसम कंडक्टर जवळ आला व सांगू लागला की त्याला सरकत्या जिन्याने वर जाऊ द्यावे व जागा द्यावी. " का बरे?" कंडक्टर ने विचारले . "आहो माझ्या पूर्वजांना जे लुळे होते , त्याना या धडधाकट लोकांच्या पूर्वजानी खुप त्रास दिला म्हणून मी पण आता लुळा". मी पण लुळ्या लोकांच्या जिन्यानेच वर जाणार! .. या अजब तर्कटाचे कंडक्टर ला हसु आले..!

अरे पण आत्ता तू धडधाकट दिसतोस तुला जिनाही चढता येईल पण मग पूर्वजांचे दाखले कशाला देतोस?

नाही नाही , मी धडधाकट लुळा आहे!! तो म्हणाला. तुम्हाला माहित नसेल पण कंडक्टर ची नोकरी व पगार ही किती "लुळे" बस मधे बसतील यावर अवलंबून असल्याने त्याने त्यास जाऊ दिले व बस मधिल लुल्यांच्या आरक्षित जागा वाढवल्या.

हळू हळू बस मधे आशा धडधाकट लूळ्यांची संख्या वाढू लागली ... पण कंडक्टर चा पगार वाढला व त्याची नोकरी टिकत होती त्यामुळे तो अधिकाधिक धडधाकट लुळे तयार व्हावे असेच बघत असे!

अजून काही वर्षे गेली ...

एकदा कही लोकांनी गावात खऱ्याच त्रास झ्हालेल्या लुळ्या लोकांना धडधाकट होता येईल म्हणून प्रयत्न चालु केले जेणेकरून त्यानाही जिन्याने 'प्रयत्न' करून वर जाता येईल व आपण लुळे नसल्याचा अभिमान वाटेल . हे ऐकून कंडक्टर चे धाबे दणाणले... सर्वच सशक्त झाले तर पगार कसा मिळणार..!

त्याने अनेक सशक्त लोकांना लुळे बनवण्याचा चंगच बांधला. अनेकांना तो सांगत सुटला की आत्ता तुम्ही धडधाकट असला म्हणून काय झाले तुमच्या पूर्वजांवर किती अन्याय झाले हे आठवा.

या कामी कंडक्टर ला आधुनिक " धडधाकट असलेले विचारवंत " उपयोगास आले कारण अत्ताच्या धडधाकटांच्या पूर्वजांवर अन्याय झाले म्हणून आत्ताचे हेही लुळेच व त्यामुळे सर्व समान होतील तसेच , गावात अजूनही "काही" धडधाकट लोक दुसर्यांना लुळे समजतात किंवा गावातील कोणीतरी अजूनही लुळयांवर अत्याचार करतो म्हणून सर्व लुळे हे लुळेच आहेत ( सर्वत्रच अत्याचार व संधी नाकारल्या जात आहेत ) असे हे आधुनिक विचारवंत सांगत तसेच असा अजब युक्तिवाद करताना त्याना आपण खुप मोठा व जगाचा विचार करत आहोत असे समजून घेऊन स्वताचीच च पाठ थोपटुन घेण्याची संधी मीळत असे !!!

झाले.. धडधाकट लुळ्या लोकांना हेच हवे होते.

आशा रीतीने सरकता जीना काढून टाकून लूळ्यांना सशक्त करून जीना चढण्याचे शिकावण्याचे सोडून सशक्त लुळ्यांसाठी आणखी एक सरकता जीना बसवला गेला व अनेक जागा आरक्षित ठेवल्या गेल्या.. अविरत ..

आता कंडक्टर प्रचंड खुश असून गड़गंज श्रीमंत आहे. कधी सरकते जीने काढण्याची कोणी गोष्ट केली तर मात्र तो "आधुनिक विचारवंताना" हाक देतो!!!

सशक्त लुळे वेळ आल्यावर आम्ही स्वताच्या हाताने तो जीना काढून टाकू असे म्हणतात .

स्वताच्या अभिमानाला कुरवाळन्यासाठी.. गंमत म्हणजे विचारवंत त्यानाही साथ देतात...

शेवटी काही गणिती लोकांनी आत्ताच्या लूल्याना किती संधी मिळते जाते आणि आणि खर्या लुळयाना किती फायदा मिळतो हे संपूर्ण गावाचा विचार ( व्यक्तिगत उदाहरणे सोडून ) करून पहिले तसेच खर्या लुळयाना किती संधी मुद्दाम नाकारल्या जातात हे ही पाहिले .. उत्तर मजेशीर होते

असो सहज सुचली म्हणून छापली वाद घालू नका . पोपकोरन खाण्यातच मजा आहे ( हो पोपकोरनच )

मांडणीविचार

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 1:36 am | उगा काहितरीच

सुज्ञजी , खरंच आवडलं लिखाण ! भावना अगदी व्यवस्थित पोचल्या . पण काय करणार ? "आमचे पूर्वज धडधाकट होते, पण आम्ही खरंच लूळे आहोत." असे म्हणणार्या लोकांनी बसमधे चढायचच नाही का ? आणी किती दिवस ?

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 1:58 am | संदीप डांगे

दुसरी बस पकडायला सांगा. बसचा काय तोटा नाय. एक गेली की दुसरी येते. आणि पॉपकॉर्न घ्या बरं इकडे. =))

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 2:17 am | उगा काहितरीच

नाय ओ सायेब ! बसची लै वानवा है बगा. पापकार्न नाय मक्याच्या लाया घ्युन बसतो . घ्या वाईच थोडूशा.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 2:31 am | संदीप डांगे

आपल्याला त्या बसंचं काय नाय बगा. आपण आपली सायकल उचलली कि निंगालो. मस्त हुरडा भाजलाय.. या शेकोटीला.!!!

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 2:44 am | उगा काहितरीच

तुमची गोष्ट निराळी ! सायकल आहे तुमच्याकडे . पण आमाले नाय ना ती सोय! अन् तुमच्याकडे मोप लै एस्ट्या असत्याल हो. पण आमच्या गावात येक येते पहाटे धुळडा उडवीत . मग समद्यायची झुंबड उडणारच नं .तीलेच धराले. अन् शेकोटी नको आता गप पडतो घराकडं जाऊन . पहाटेला हैच पुना एस्टी धराले झोंबाझोंबी करणं ! राम राम!

श्रीरंग_जोशी's picture

9 Feb 2016 - 2:37 am | श्रीरंग_जोशी

या रचनेमुळे धडधाकट लोकांना चिवट, राकट अन गरज पडल्यास टारगट बनण्याची संधी मिळते.

बसमध्ये जागा न मिळाल्यास बसच्या टपावर बसून प्रवास करणारा....
- टारगट रंगा

असो यावरून दहावी कुमारभारतीमधल्या एका पाठातले विनोबांचे वाक्य आठवले, "आपला आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधू".

नीलमोहर's picture

9 Feb 2016 - 5:52 pm | नीलमोहर

आवडली रूपककथा.

एक एकटा एकटाच's picture

9 Feb 2016 - 9:36 pm | एक एकटा एकटाच

रूपक कथा आवडली.