कका ची बाराखडी (भारूड)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
14 Sep 2008 - 4:28 am

चाल- काट्याच्या अणीवर वसले तीन गांव...

ककाच्या नांवावर काढल्या मालीका
ककाच्या नांवावर काढल्या मालीका
काही सूरू काही संपेचना

संपेचना ठार केले नायकाला
नायीका रडते व्हीलन बधेचिना

बधेचिना रीपीटले ब्राउन तुकडे
फॉरवर्ड करती प्रेक्षक बघेचिना

बघेचिना त्याचा केला पुनरजनम
पुनरजन्मानी नायीका तरुण पुन्हा

तरुण पुन्हा दादीचे केस काळे
डिस्को करते दादी खपेचिना

खपेचिना तिने मारल्या तीन थपडा
तीनदा लागल्या एपीसोड सरेचिना

सरेचिना टाकले कमरशीयल ब्रेक
चहा ढोसूनही प्रेक्षक टळेचिना

टळेचिना पाडल्या नवीन कहाण्या
वाढता वाढे बाराखडी संपेचिना

वाढता वाढे ककाराचा विकार
मूर्ख बघे टीव्ही सोडेचिना

अज्ञ अरुण म्हणे मालीकेचा अनुभव
सारखा देऊन एकता सोडेचिना

नांवावर ककाच्या काढतेय मालीका
नांवावर ककाच्या काढतेय मालीका

*********************************

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 9:24 am | विसोबा खेचर

वाढता वाढे ककाराचा विकार
मूर्ख बघे टीव्ही सोडेचिना

वा अरूणराव! मस्त कविता....

'क' च्या मालिकांना सह्ही हाणलं आहे! :)

तात्या.

अवांतर - ही कविता आमच्या मिपावरही टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद! :)

आपला,
(कट्टर मिपाकर) तात्या.

अरुण मनोहर's picture

14 Sep 2008 - 4:18 pm | अरुण मनोहर

अवांतर- तात्या, मिपा आणि इतर स्थळेही एकाच सरस्वती मातेची लेकरे आहेत. या ठिकाणी सरस्वती पुजनाचा प्रसाद देण्या घेण्याचे धन्यवाद कशाला?