सगळी कडे मिट्ट काळोख होता. दिनु आपल्याच नादात शेताला पाणी भरत होता .रात्रीचे ११ :४७ झाले होते .गावाकडे लाईट ऐन वेळी येते हे तर सर्वांना माहीतच आहे . दिनु ने खिशातुन माचिस काढली आणि जमलेल्या काड्या काटक्या आणि गवत पेटवले . , जानेवारीचा महिना होता त्यात रातची थंडी पण भयंकरच होती. वाफ्यातुन पाणी संथ गतीने वाहत होते. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. दिनु तसा धीट मुलगा होता . पण कधी कधी त्याची पण.... ची.
तो आजही पाणी भरायला येत नव्हता पण बापाने दोन कानाखाली वाजवल्या म्हणुन आला होता. शेजारच्या मित्राला ( रंजीत) विचारले चल शेतात मला जोडी तर तो म्हणाला आज १० वाजता सिआयडी चा मस्त एपिसोड आहे तो बघायचा आहे तु जा मला नाही जमणार यायला.
शेवटी दिनु एकटाच शेतात आला होता.
******
**********
******""""*****"""*******""********
आसपास कुणाचीच सोबत दिसत नव्हती . भिती घालवायची म्हणुन त्याने मोबाईल वर गाणे लावले. रंग दे तु मोहे गेरुऑ √√~
पण आजची रात्र ही दिनु साठी काळ रात्र ठरणार होती . हे त्याला पण ठाऊक नव्हते अचानक मोबाईल बंद झाला . दिनुने बघितले तर फोन ची बँटरी डाऊन पण येतांना तर फुल चार्ज होता मोबाईल तो विचारात पडला . ईतक्यात समोरुन एक सावली त्याच्या दिशेने येतांना दिसली . दिनु घाबरुन गावाकडे पळत सुटला पण त्या सावलीने त्याला शेवटी पकडलेच दिनुला आपल्या पाठीवर कुणाच्या तरी हातांचा स्पर्श झाला ... आणि आवाज पण आला
अभिजीत कुछ तो गडबड है!!
कोण असेल तो??????
प्रतिक्रिया
8 Jan 2016 - 1:27 pm | कविता१९७८
रन्जीत असेल
8 Jan 2016 - 2:02 pm | नाखु
इथे कोण होतं ते पाहू
मग बाकीचं
रतीबाचा गिर्हाईक नाखुस मिपाकरवाला
8 Jan 2016 - 2:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकीचं ठीक आहे, पण
रंग दे तु मोहे गेरुऑ √√~
यातलं ते शेवटचं "वर्गमूळ वर्गमूळ अंदाजे" चा अर्थ काय ???
8 Jan 2016 - 4:35 pm | उगा काहितरीच
लोल !
8 Jan 2016 - 4:40 pm | सस्नेह
गेरू (पक्षी गुरु ? ) हे वर्गमुळाच्या वर्गमुळात गेल्यावर काय होईल याचा अंदाज करा.
8 Jan 2016 - 5:34 pm | अजया
एकदम मूळावरच घाव =)))
8 Jan 2016 - 4:00 pm | मनीषा
दया म्हणायच्या ऐवजी चुकुन अभिजीत म्हणाला का तो आवाज?
8 Jan 2016 - 5:51 pm | अनुराधा महेकर
काहीही!
8 Jan 2016 - 6:44 pm | दिनु गवळी
आली होती मग कहर केला दिनुने
8 Jan 2016 - 7:07 pm | आनंद कांबीकर
ha
10 Jan 2016 - 1:15 pm | snehal salunkhe
एसीपी होता अन कोण होता म्हणे।