छंदाच्या पलीकडे

केतन बारापात्रे's picture
केतन बारापात्रे in जनातलं, मनातलं
31 Dec 2015 - 3:31 pm

अनेक भेटी पूर्ण झालेल्या किंवा न झालेल्या, अनेक संवाद झालेले किंवा न झालेले त्यांच्याशी अतुटपणे जोडल्या गेले असतात समाधान आणि असामाधान दोन्ही एकाच रथावर जुंपल्यासारखे त्यांच्यासोबत चालत राहतात, समाधान आणि असमाधान एकसोबत जुंपलेले असूनही त्यांच्या सुरात तालात कमालीची शांतता आणि धीर असतो आणि ते फक्त आणि फक्त अनुभवायच असत. गझल किंवा ठुमरी यांचं माझ्यासोबतच वेगळच नात आहे खरंतर त्यांच्याशी नात जुळायला वेळ लागत नाही हे अत्यंत हळवं आणि तितकच जिव्हाळ्याच असत, विशेष म्हणजे याला कसलीच बांधिलकी नसते,कुठले करार नाही,कुठलीच मागणी नाही हे नात फक्त देण्यासाठी असत. सहजच काल रात्री ठुमरी ऐकायची इच्छा झाली,थकव्यापेक्षा जास्त आलेला ताण, खोलीचा मंद प्रकाश आणि रात्रीला लाभलेली निरव शांतता अगदी पूरक वातावरण वाटत होत आणि शुभा मुद्गल च्या आवाजातली
बलम तेरे झगडे में रैन गयी
कहाँ गए चन्दा, कहा गए तारे
ही ठुमरी लावली. ठुमरी जरी शुभा मुद्गल गात होती तरी नेहमीच माझ्या कल्पनेत गाणारी मीराबाईच असते, प्रेमाने छळणाऱया कृष्णाकडे (त्रास देणाऱ्या नाही) घातलेल्या मागण्या असो वा तक्रार ह्या इतक्या उत्कट आणि खऱ्या वाटतात कि मिराबाइंच्या भावनेच्या प्रेमात पडल्याखेरीज होत नाही आणि मग त्यांच्या दूरही राहवत नाही पण ऐकण्याच्या मागे हे एकच कारण नसून यात माझं स्वार्थी कारणपण आहेच. असा संगीत ऐकणे हा फक्त छंद राहिला नाही आहेे ऐकायच्या मागचं कारण छंदाच्या पार पलीकडे कुठेतरी पोहोचलेलं आहे आणि का नसावं? लावलेली ठुमरी आता रंगात आलेली होती आणि तिच्या स्वभासारखी मंद मंद पुढे जात होती, रात्रीच्या आत सरोद, बासरी आणि तबल्याचे सुर अलगद उतरत होते आणि एक एक शब्द फक्त कानावर पडत नसून थेट मनाला जाउन भिड़त होते , बीछान्यावर मी पडून होतो, डोळे उघड झाप होताना लागणारी निमिशांची वेळ आणि घेतलेला एक एक श्वास पूर्णपणे मला जाणवत होते. बाहेरची निरव शांतता कधी माझ्यात गेली समजलच नाही अश्या अवस्थेत सगळं आपोआपच उलगडायला लागत आणि जर काहीस स्वतःशीच लपवून ठेवलेलं असेल तर तेसुद्धा सहज कधी बाहेर येत समजत नाही आणि असल्याहून अधिक नसल्याची, समधनाहून अधिक असमाधनाची जाणीव होऊनही स्वतालाचा स्वतःचा भला मोठा आधार वाटतो. अशी ती माझ्या हक्काची जागा मला ठुमरीच्या नादात सापडते आणि हेच माझं स्वार्थी कारण आहे. कदाचीत छंदाच्या पलीकडे हेच असावं.
जरी ठुमरी संपली तरीही रात्र तीचं गुंजन करतच असते, शांतता आणि प्रसन्नता बस इतकच त्या गुंजनांतून मिळत असत. अजून पाहिजे तरी काय?

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

पुजा गायतोंडे -एक ओडिओ टिव्ही रेकॅार्डींग -
जिस सावन में पिया घर नाssही, .m4a, size 5.3 MB, 3min 40sec

उगा काहितरीच's picture

1 Jan 2016 - 10:47 am | उगा काहितरीच

छान ! मला रात्री झोपताना राग निलांबरी ऐकायला आवडतो. ट्राय करून बघा.

मयुरMK's picture

1 Jan 2016 - 6:27 pm | मयुरMK

छान ''जिवंत'' लेखन
मी ऐकेन ''निलांबरी राग''

प्रमोद देर्देकर's picture

1 Jan 2016 - 6:35 pm | प्रमोद देर्देकर

मिसळपाववर स्वागत. लेख आवडला. येवुद्या अजुन.