आठवण....

सौरभ वैशंपायन's picture
सौरभ वैशंपायन in जे न देखे रवी...
11 Sep 2008 - 3:44 pm

आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली,
आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

प्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 3:52 pm | आनंदयात्री

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

चाफ्याचा गंध फिका पडला तर त्याने तुझा गंध चोरला !! वाह सौर्‍या वाह !!
काय कल्पना आहे ! निहायत खुबसुरत !!

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

काय बोलु ? साध्या शब्दात गुंफलेल्या साध्या साध्या सुरेख कल्पना.

ऋषिकेश's picture

11 Sep 2008 - 3:59 pm | ऋषिकेश

अतिशय सुंदर कल्पना आणि शब्द!! कविता खूप खूप आवडली :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

राघव's picture

11 Sep 2008 - 6:17 pm | राघव

असेच म्हणतो. खूप सुंदर लिहिलेत :)

मुमुक्षू

पिंट्या's picture

11 Sep 2008 - 7:57 pm | पिंट्या

छान कविता लिहिलिय..... =D>

प्राजु's picture

12 Sep 2008 - 1:08 am | प्राजु

सगळ्याच ओळी छान.
खास करून..

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४

एकदम सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

12 Sep 2008 - 3:46 am | शितल

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

मस्तच
:)

सौरभ वैशंपायन's picture

22 Nov 2008 - 12:47 pm | सौरभ वैशंपायन

धन्यवाद,

मध्ये काहि दिवस मि.पा वर नाहि येता आले.

कविता आवडल्याचे वाचुन छान वाटले.

अनंत छंदी's picture

22 Nov 2008 - 1:13 pm | अनंत छंदी

सौरभ
कविता आवडली! फ़ारच छान!