ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन...!

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
30 Dec 2015 - 12:23 pm

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं आहे. मनाचा ठाव घेणारे शब्द, प्रेमभावना ओतप्रोत भरलेलं काव्य अशी वैशिष्ट्य असणाऱ्या महाकवीने वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले. पाडगावकरांची काव्यवाचनाची विशिष्ट शैली अनेकांना भावत असे.

गाजलेल्या कविता :

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं सेम असतं

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा....!

शुक्रतारा, मंद वारा...!

श्रावणात घन निळा बरसला....!

सांग सांग भोलानाथ.....!

सावर रे, सावर रे, उंच उंच झुला.....!

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

मित्रहो's picture

30 Dec 2015 - 12:29 pm | मित्रहो

या जन्मावर प्रेम करावे, शतदा प्रेम करावे
अशा जन्मावर, जगण्यावर आम्ही शतदा प्रेन करीत राहू.
श्रद्धांजली

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2015 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. :(

चांदणे संदीप's picture

30 Dec 2015 - 12:35 pm | चांदणे संदीप

त्यांच्या या....

जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही!

ओळी मला कायमच स्फूर्ती देत आल्या आहेत.

कविवर्य मंगेश पाडगांवकरांना माझी श्रद्धांजली!! ___/\___

Sandy

मराठी कवितेला नव्या उंचीवर घेऊन जाणारा कवि आज आपणा सर्वांना सोडुन अनंताच्या प्रवासाला निघुन गेला!!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!

त्यांची "मी फुल तृणातील इवले" ही कविता मलादेखील प्रचंड आवडते.....

sagarpdy's picture

30 Dec 2015 - 12:43 pm | sagarpdy

पाडगावकरांना 'सलाम' :(

सुबोध खरे's picture

30 Dec 2015 - 1:07 pm | सुबोध खरे

गेय आणी कमी शब्दात खूप आशय असलेल्या आणी मनाला भिडणाऱ्या कविता लिहिणारा सरस्वती पुत्र कवी गेल्याचे अतीव दुःख होत आहे.
गदिमा, शांत शेळके आणी आता मंगेश पाडगावकर हे तिन्ही माझे अत्यंत आवडते कवी होते.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सुमीत भातखंडे's picture

30 Dec 2015 - 1:42 pm | सुमीत भातखंडे

भावपूर्ण श्रद्धांजली :(

प्रचेतस's picture

30 Dec 2015 - 1:59 pm | प्रचेतस

पाडगावकरांना आदरांजली.

कपिलमुनी's picture

30 Dec 2015 - 2:03 pm | कपिलमुनी

भावपूर्ण श्रद्धांजली!!

बंट्या's picture

30 Dec 2015 - 2:05 pm | बंट्या

श्रद्धांजली

होबासराव's picture

30 Dec 2015 - 2:10 pm | होबासराव

भावपूर्ण श्रद्धांजली!!

कधी कधी पहाटते उरी आगळी प्रचिती
जाळीमधुन धुक्याच्या तेज झिरपते चित्ती
जाचु लागते जिप्सी ला ज्ञात विश्वाची चौकट
आणि जाणवते काही गुढ..... अंधुक..... पुसट...!
खेळ मांडियेला सारा पुन्हा उधळाया सजे
आपणच निर्मीलेली आपणच मोडु धजे

गुढ अज्ञात धुक्यात आणि जातसे बुडुन
एक जिप्सी आहे, माझ्या खोल मनात दडुन.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Dec 2015 - 2:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कविवर्य मंगेश पाडगांवकरांना माझी श्रद्धांजली!! ___/\___

सचिन सुशील's picture

30 Dec 2015 - 2:14 pm | सचिन सुशील

भावपूर्ण श्रद्धांजली !!

किसन शिंदे's picture

30 Dec 2015 - 2:17 pm | किसन शिंदे

पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_

नाव आडनाव's picture

30 Dec 2015 - 2:17 pm | नाव आडनाव

श्रद्धांजली.

सन्दीप's picture

30 Dec 2015 - 2:26 pm | सन्दीप

सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम,
सलाम, भाई,
सबको सलाम.
वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद काढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैनों,
सबको सलाम.
ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों, सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणार्‍यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या,
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बाँम्ब फेकणार्‍यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
काळा बाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे सामान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लीडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.
या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखर कारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणूक फंडाला सलाम,
अदृष्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वाचणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.
सत्ता, संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील,
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम प्यारे भाइयों और भैनों, सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.
——————मंगेश पाडगांवकर
कविवर्य मंगेश पाडगांवकरांना माझी श्रद्धांजली!

माहितगार's picture

30 Dec 2015 - 2:44 pm | माहितगार

साहित्यिकांनी आपल्या प्रत्येक साहित्यावरच्या कॉपीराइटबद्दल आधीच सुस्पष्ट भूमिका घेऊन ठेवावयास हव्यात. पाडगावकर गेलेत म्हणुन आदराने दोन-चार ओळी लिहिणे ठिकच, साहित्यिकाने सुस्पष्टपणे मोकळीक दिली नसल्यास कॉपीराईटलाही कायद्यालाही सलाम करणे उत्तम असे वाटते. असो.

आमचीही मंगेश पाडगांवकरांना श्रद्धांजली!

विवेक ठाकूर's picture

30 Dec 2015 - 3:35 pm | विवेक ठाकूर

पाडगावकरांची एक उत्कृष्ठ कविता इथे देऊन व्यक्त केलेल्या आदरांजलीला सलाम.

(नको त्या वेळी नको तो मुद्दा काढून,
चांगला प्रतिसाद हुकवणार्‍यांनाही सलाम )

माहितगार's picture

30 Dec 2015 - 3:39 pm | माहितगार

:) वेगवेगळ्या मुद्यांवर काहीही झालेतरी आपलाच मुद्दा रेटणार्‍या कॉपीराइटवादी फंडामेटलीस्टांना सलाम =)) असे काही म्हणावयाचे आहे का ? स्वागत आहे आमचा सलाम करणार्‍यांना सलाम :)

नीलमोहर's picture

30 Dec 2015 - 2:28 pm | नीलमोहर

मंगेश पाडगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

तिमा's picture

30 Dec 2015 - 2:56 pm | तिमा

अत्यंत दु:खद अंतकरणाने श्रद्धांजली ! आज खरंच, उदास वाटताय.

लाडू's picture

30 Dec 2015 - 3:22 pm | लाडू

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती

मन्यु's picture

30 Dec 2015 - 3:37 pm | मन्यु

श्रद्धांजली.

उगा काहितरीच's picture

30 Dec 2015 - 3:42 pm | उगा काहितरीच

भावपूर्ण श्रद्धांजली !

मदनबाण's picture

30 Dec 2015 - 4:18 pm | मदनबाण

भावपूर्ण श्रद्धांजली...

अजया's picture

30 Dec 2015 - 4:33 pm | अजया

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |

दिलखुलास हसावं
न लाजता रडावं |

राग आला तर चिडावं
झालं-गेलं वेळीच सोडावं |

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |.....

लिहिणाऱ्या कवीला सलाम.
पाडगावकर कवितांमधून मराठी भाषा आहे तोवर अमर आहेत.

दिपक.कुवेत's picture

30 Dec 2015 - 5:17 pm | दिपक.कुवेत

भावपूर्ण श्रद्धांजली!!

अविनाशकुलकर्णी's picture

30 Dec 2015 - 6:00 pm | अविनाशकुलकर्णी

फेसबुकावर च्य्पो/पस्ते चा खच पडला आहे

अविनाशकुलकर्णी's picture

30 Dec 2015 - 6:00 pm | अविनाशकुलकर्णी

फेसबुकावर च्य्पो/पस्ते चा खच पडला आहे

विकास's picture

30 Dec 2015 - 6:05 pm | विकास

स्वातंत्र्याच्या मागे-पुढे ज्यांनी मराठी साहीत्यास अधुनिक समृद्धी आणली त्यातले पाडगावकर हे (खर्‍या अर्थाने) अजून एक साहीत्य रत्न होते... अशा साहीत्याने कळत-नकळत संस्कार केले आहेत... म्हणूनच कधी भेटलो देखील नसताना आज त्यांच्या निधनाची बातमी वाचून खूप वाईट वाटले.

त्यांच्या कविता आणि कवितांवर रचलेली गाणी खूपच आहेत. विडंबने आहेत, नवक्रांतीकारी वर्णनापासून ते प्रेमापर्यंत सर्व काही आहे. इतकेच काय अगदी लिज्जतपापडाच्या जाहीरातींसाठी देखील त्यांच्या कविता आहेत... पण त्यांनी भाषांतरीत केलेले महाभारताचेद द्विखंडीय पुस्तक देखील वाचनीय आहे.

पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली....

त्यांच्या कविता आणि कवितांवर रचलेली गाणी खूपच आहेत. विडंबने आहेत, नवक्रांतीकारी वर्णनापासून ते प्रेमापर्यंत सर्व काही आहे. इतकेच काय अगदी लिज्जतपापडाच्या जाहीरातींसाठी देखील त्यांच्या कविता आहेत... पण त्यांनी भाषांतरीत केलेले महाभारताचेद द्विखंडीय पुस्तक देखील वाचनीय आहे.

बायबल पण ना सुगम मराठीत? ह्याच्याबद्दल पाहिल्याचे आठवते.

विकास's picture

30 Dec 2015 - 8:30 pm | विकास

हे पुस्तक तुम्हाला म्हणायचे असावे. बायबल: नवा करार

मला आठवते त्याप्रमाणे त्यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर ह्या मुळच्या ख्रिस्ती धर्मातील होत्या. त्यांच्या प्रेमविवाहास त्या काळात अर्थातच विरोध झाला होता. त्यावेळच्या त्यांच्या (यशोदा पाडगावकरांच्या) ओढाताणीवरून मंगेश पाडगावकरांनी, "असा बेभान हा वारा..." हे काव्य लिहीले होते, जे गाणे म्हणून प्रसिद्ध झाले.

मुक्त विहारि's picture

30 Dec 2015 - 6:12 pm | मुक्त विहारि

भावपूर्ण श्रद्धांजली....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2015 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता करणे आणि ती कविता गात रसिकांना आनंद देण्याचं मोठं काम आयुष्यभर पाडगावकरांनी केलं.
भावपूर्ण श्रद्धांजली.

आवडत्या ओळी आणि गाणं सांगायचं तर... जेव्हा तुझ्या बटांना.
चार ओळी.

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या कुशीचा उगवेल सांग तारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा.

-दिलीप बिरुटे

अनंत छंदी's picture

30 Dec 2015 - 6:40 pm | अनंत छंदी

श्रद्धांजली!

राघव's picture

30 Dec 2015 - 6:46 pm | राघव

मोठा माणूस गेला.
असे सगळे लागोपाठ जायला लागलेत.. काटा येतो.. :(

भावपूर्ण श्रद्धांजली.. _/\_

अनिता ठाकूर's picture

30 Dec 2015 - 6:53 pm | अनिता ठाकूर

'उदासबोध'कार पाडगांवकरांना भावपूर्ण श्रध्धांजलि!

मोहनराव's picture

30 Dec 2015 - 7:46 pm | मोहनराव

भावपूर्ण श्रद्धांजली!!

सस्नेह's picture

30 Dec 2015 - 7:56 pm | सस्नेह

श्रद्धांजली !
काळाच्या अवकाशात हरवलेल्या कालातीत शब्दप्रभूला ..

पैसा's picture

30 Dec 2015 - 8:19 pm | पैसा

श्रद्धांजली! लिज्जत पापड आणि पावसाळ्याच्या कविता हा द्वंद्व समास आठवतो आहे.

विकास's picture

30 Dec 2015 - 9:21 pm | विकास

डिएनए इंडीया मधे आलेल्या बातमीतली काही रोचक माहिती

  1. गुलजार नी पाडगावकरांच्या साहीत्याचे भाषांतर केले आहे.
  2. रविन्द्रनाथ ठाकूरांनंतर भारतातील केवळ पाडगावकरच आहेत ज्यांनी भाषांतरीत केलेले रोमिओ ज्युलिएट, टेप्टेस्ट, तसेच ज्युलिएट सिजर ही (भाषांतरीत) पुस्तके लंडनच्या शेक्सपिअरच्या ग्रंथालयात ठेवली गेली आहेत.
  3. युएस लायब्ररी ऑफ काँग्रेसने त्यांची ४० पैकी ३१ प्रकाशने संग्रही ठेवली आहेत.
गामा पैलवान's picture

30 Dec 2015 - 9:21 pm | गामा पैलवान

मंगेश पा(प)डगावकरांना श्रद्धांजली. त्यांच्या वर्षाऋत्वारंभीच्या लिज्जतदार पावसाळी कविता वाचलेल्या आठवतात.
-गा.पै.

मोगा's picture

30 Dec 2015 - 10:55 pm | मोगा

श्रद्धांजली.

पिशी अबोली's picture

30 Dec 2015 - 11:07 pm | पिशी अबोली

श्रद्धांजली!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी त्यांनी चपखल कविता दिल्यायत. शाळेतल्या कविता अजून पाठ आहेत इतक्या सुन्दर वाटायच्या तेव्हाही..

चांदणे संदीप's picture

30 Dec 2015 - 11:42 pm | चांदणे संदीप

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधुनी
शीळ घालतो वारा...

ही कविता लगेच आठवली मला!

Sandy

नाखु's picture

31 Dec 2015 - 9:45 am | नाखु

श्रद्धांजली!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी त्यांनी चपखल कविता दिल्यायत. शाळेतल्या कविता अजून पाठ आहेत इतक्या सुन्दर वाटायच्या तेव्हाही..

"या जगण्यावर या जन्मावर"चा अस्सल प्रेमी नाखु

रामपुरी's picture

30 Dec 2015 - 11:24 pm | रामपुरी

विनम्र श्रद्धांजली!

दीपा माने's picture

31 Dec 2015 - 2:40 am | दीपा माने

श्री. मंगेश पाडगावकरांच्या निधनाची बातमी वाचून धक्काच बसला.
त्यांच्या काव्यांमुळे जसे ते प्रसिध्द होते तसेच त्यांच्या खट्टयाळ विनोदी स्वभावानेही असावेत. ह्या बाबतीतला स्वत:चा अनुभव आठवतो आहे, काही वर्शांपुर्वी भारतात त्यांची अचानक बहिणीच्या कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर भेट झाली असता बोलताना बहिणीने त्यांना सांगितले की 'ह्या (मी) पण कविता करतात' तर म्हणाले की 'तुमची एखादी कविता ऐकवा' नेहेमी प्रमाणे भारतात गेल्यावर माझा घसा सात आठ दिवस बोलायचा बंद होतो. तेव्हा बहिणीने त्यांना सांगितले की 'ह्यांचा (माझा) घसा बसल्याने त्या बोलू शकत नाहीत'. मी सुध्दा त्यांना खोटे वाटायला नको म्हणूण बोलण्याचा प्रयत्न करीत होते तर मला थांबवत ते माझ्या पतींकडे वळून म्हणाले, 'मला अगदी तुमचा हेवा वाटतो आहे' . त्यावर माझे पतीही त्यांच्याबरोबर मनोसोक्त हंसले. देव या माझ्यासकट आपल्या सर्वांच्या आवडत्या कवि आणि थोर आत्म्यास चिरशांती देवो.

विकास's picture

31 Dec 2015 - 5:52 am | विकास

पाडगावकर हे जसे नितांत सुंदर कवितांसाठी प्रसिद्ध होते तसेच वात्रटिका (का चावटीका?) आणि विडंबनासाठी देखील प्रसिद्ध होते. त्यांची अशीच एक अतिवात्रट चारो़ळी:

एक होती गाय, तिला कमी काय?
दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या!

---
(ऐकीव गोष्ट. गंभीर नाही, खेळीमेळीतलाच संवाद) एकदा बा.भ.बोरकर पाडगावकरांकडे आले होते. ते त्यांना म्हणाले, इतकी प्रगल्भ प्रतिमा असताना, असल्या कसल्या कविता करण्यामधे वेळ घालवतोस? त्यावर वाद घालण्याच्या मूड मधे असलेले पाडगावकर बोरकरांना म्हणाले, अशा वात्रटिका लिहायला पण स्पेशल प्रतिभा लागते! बोरकर म्हणाले, मी असल्या ढिगभर कविता करून दाखवेन... त्यावर, पाडगावकर आव्हान देत म्हणाले, मग मी अंघोळीहून येई पर्यंत करूनच दाखवा. त्यावर बोरकर म्हणाले तितका वेळ कशाला, ही घे एकः (कमरेला टॉवेल गुंडाळून अंघोळीला जाण्याच्या प्लॅन मधे असलेल्या "लंबोदर" पाडगावकरांना उद्देशून)

"एव्हढासा टॉवेल, त्यात कसा हा मावेल? "

पाषाणभेद's picture

31 Dec 2015 - 6:04 am | पाषाणभेद

भावपूर्ण श्रद्धांजली!

इंदूरात मंगेश पाडगावकरांना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. कान अन मन तृप्त झाले माझे.