निफ्टी डिसेंबर २००७ चे फ्युचर्स घ्या

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
21 Nov 2007 - 2:33 pm

नमस्कार मंडळी,

अपेक्षेप्रमाणे मार्केट खाली आले आहे.

ज्यांची धोका स्विकारण्याची तयारी आहे त्यांनी निफ्टीचे डिसेंबरचे फ्युचर्स ५५६० च्या आसपास विकत घ्यावेत.

डिसेंबरचे घ्यावेत नोव्हेंबरचे नव्हेत.

एका लॉटमागे कमितकमी ३०० रुपये १५/२० दिवसात निघतील असा अंदाज आहे.

यात बरीच रिस्क आहे. पन फायदा बी लईईईईईईईई.

ज्यांची ही रिस्क घ्यायची तयारी आहे त्यांनीच याच्या वाटेला जावे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी ह्या भानगडीत पडू नये, हे आग्रहाचे सांगणे.

आपला,
(सटोडिया) धोंडोपंत

गुंतवणूकविचार

प्रतिक्रिया

निफ्टीचे डिसेंबरचे फ्युचर्स ५५६० च्या आसपास विकत घ्यावेत

पंत,
म्हणजे नक्की कोणते शेअर्स घ्यावेत ते दिले तर मस्त होईल.
की निफ्टीचे स्वतः चे शेअर्स असतात? फ्युचर्स म्हणजे निफ्टीने रेकमेंड केलेले शेअर्स असा अर्थ मी समजत आहे
चुकत असेल तर कृपया सांगावे

सागर

विसोबा खेचर's picture

21 Nov 2007 - 4:03 pm | विसोबा खेचर

पंत निफ्टी फ्युचर्स म्हणजे फ्युचर्स ऍन्ड ऑपशन्स या सौद्यांबद्दल बोलत आहेत.

निफ्टी फ्युचर्सच्या एका कॉन्ट्रॅक्टमध्ये ५०समभागांचा लॉट असतो.

निफ्टीचे डिसेंबरचे फ्युचर्स ५५६० च्या आसपास विकत घ्यावेत

असं जेव्हा पंत म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ (५५६० * ५०) २७८००० एवढ्या किंमतीचे कॉन्ट्रॅक्ट विकत घ्या असा होतो. अर्थात, तुम्हाला संपूर्ण २७८००० इतकी रक्कम द्यावी लागणार नाही, तर त्याच्या साधारण २० % एवढी रक्कम मार्जिन म्हणून तुमच्या ब्रोकरकडे जमा करावी लागेल.

आपला,
(डब्बेवाला) तात्या.

धोंडोपंत's picture

21 Nov 2007 - 4:02 pm | धोंडोपंत

सागरराव,

शेअर्स नव्हे फ्यूचर्स . तेही डिसेंबरचे. नोव्हेंबराची एक्स्पायरी आली जवळ. म्हणून डिसेंबराचे. म्हणजे खेळायला काही दिवस मिळतील.

आपला,
(चतुर) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों