काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो.
संध्याकाळी तळ्यावर त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला,
"भाऊसाहेब आणि सर्व मंडळी देवळात गेली आहेत.मला पण बोलवत होती.पण मी तुम्हाला अगोदरच तळ्यावर भेटू म्हणून प्रॉमीझ दिलं होतं,म्हणून मी देवळात न जाता तुम्हालाच भेटायचं ठरवलं.
सकाळच्याच गप्पाचा विषय पुढे सांगत मला म्हणाला,
"कधी कधी मला वाटतं की मी पण इतरांसारखाच असावं.पण खरं नाही ते.मला वाटतं जे वेगळे असतील त्यांचा पण तेव्हडाच सन्मान ठेवला गेला पाहिजे.जगातला प्रत्येक जण जर का दुसर्यासारखाच असता तर ? प्रत्येक जण दुसर्यासारखच बोलला असता,वागला असता,तेच संगीत ऐकू लागला असता, तोच टी.व्ही. प्रोग्राम बघू लागला असता. असं झाल्यावर मग
मात्र सर्व जग अगदी निषक्रीय,निष्तेज वाटलं असतं.
मला वाटतं जसे लोक असतात तसाच त्यांचा स्विकार करायला हवा.प्रत्येकात असलेला फरक तसाच महत्वाचा असतो आणि त्याला मान दिला गेला पाहिजे. उदा.ईतिहासातल्या गोष्टी पडताळून पाहिल्यास जगातले महत्वाचे लोक एकमेकापासून वेगळे समजले जातात.
सांगायचं झाल्यास,महात्मा गांधी,अब्राहम लिंकन,माऒ-त्से-तूंग,लेनीन.आईन्स्टाईन वगैरे.ह्या महान व्यक्तिनी प्रचंड असं काही कार्य केलं.पण काही लोकाना वाटतं,हे लोक विक्षीप्त होते.पण त्यांना त्यांच्या कार्यावर विशेष भरवंसा होता.
ह्या वेगळेपणाचा संदर्भ देण्याचं कारण मला पण बरेच वेळा अशा प्रसंगाला तोंड द्दावं लागलं आहे.
हे सर्व माझ्या प्रायमरी शाळेतून सुरू झालं.माझ्या लक्षात आलं,मी इतरांसारखा नव्हतो.माझी आई मला म्हणायची की मी ठराविक गोष्टीचा ध्यास घेत रहायचो.कमनशिबाने,माझ्या ह्या विषयात इतर शाळेतल्या मुलांना दिलचस्पी नसायची.माझ्या गुरूजीना पण नसायची.
गम्मत म्हणजे माझे हे गुरूजी एकदा मला म्हणाले की," तू जर का साप आणि पालीचा आणखी एकदा उल्लेख केलास तर तुझ्यावर मी रागावणार.तुझं वर्गात लक्ष नाही असं ठरवून तुला मी शिक्षेला पात्र करणार."
आणि इथ पासून मला मुलांकडून चिडवण्याची छळणूक चालू झाली.
तिसर्या इयत्तेत,मला माझे गुरूजी म्हणाले की मला त्याच त्याच गोष्टी बद्दल परत परत बोलण्याची संवय लागली आहे.नंतर मी माझ्या आईला ह्या बद्दल विचारलं,त्यावेळी ती म्हणाली,
" डोळ्यांसमोर आडपडदा आणून मला एका वेळेला फक्त एकच गोष्ट दिसते आणि दुसर्या एखाद्दा गोष्टीवर फोकस करायला जमत नाही.जसं मी ज्याला त्याला टार्झनच्या मर्दुमकी बद्दल सांगत बसतो कारण टार्झनच्या मर्दूमकीचं मला विषेश आकर्षण होतं. आणि त्यावळी टार्झन ही व्यक्ति शाळेत विशेष प्रसिद्धीत नसताना माझं असं करणं मी मला स्वतःलाच चिडवून घेण्याचं लक्ष करीत होतो.
मी वेगळा वाटायचो कारण मला इतर मुलापेक्षा निराळ्या विषयात दिलचस्पी असायची.पण म्हणून माझ्याशी एव्हडं निष्टूर आणि हलक्या वृत्तिने वागण्याची त्याना जरूरी नव्हती.मला सर्वात जास्त विषय आवडतो त्याची ही मुलं जास्त टर उडवायची.
देवमासा,ज्वालामुखी,चक्रीवादळ असल्या विषयावर मला शास्त्रीय माहिती असल्याने त्या विषयाची लोक टिंगल करीत असत.कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊन मी असल्या विषयावर स्पर्धा जिंकली तरी मी जादा हुषार आहे म्हणून माझी अवहेलना व्हायची.
कुणास ठाऊक एखाद दिवशी मी इलेक्ट्रॉनीक इंजिनीयर होऊन टारझनचा एक रोबॉट पण बनवू शकेन.मला तसं स्वप्न पहाता येईल.नाही कां येणार?
कधी कधी मला वाटतं की मी पण इतरांसारखाच असायला हवा.पण खरं नाही ते.मला वाटतं जे इतरांसारखे नसतील त्यांचा पण तेव्हडाच सन्मान ठेवला गेला पाहिजे.कारण मला वाटत, आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो."
हे सगळं ऐकून मला त्या मुलाबद्दल आणि त्याच्या विचारा बद्दल खरोखरंच कुतुहल झालं होतं.
पुढल्या खेपेला मी जेव्हा भाऊसाहेबाना भेटलो त्यावेळी न विसरता ह्या मुलाचा विषय काढून त्याची जास्त चौकशी केली.
प्रो.देसाई म्हाणाले,
"अहो त्या मुलाला लहानपणी "Asperger's Syndrome " असल्याने तसं लहान असताना ह्या मुलाना त्यांच्या विषयी त्यावेळेला काय वाटतं ते तो सांगत होता. त्यांच म्हणणं त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर होतं.हळू हळू ती विकृती कमी होत जात ही मुलं नंतर नॉर्मल वागू लागतात."
भाऊसाहेबाना त्यांच्या नातवाने हे त्याच्या बद्दल सांगितलं होतं. ही लहानपणातली
विकृती असते.आता तो नॉरमल आहे."
श्रीकृष्ण सामंत