(पुण्याजवळच्या एका रम्य रिसॉर्टची सदस्यांना ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.)
परवा सकाळी वॉटस-अपवर अभिनंदनाचा मेसेज वाचला आणि कळलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. अधुनिक युगाला धन्यवाद देत म्हटलं, चला थोडक्यात वाचलो ! अर्धांगिनी नेहेमी प्रमाणे `बघू कधी लक्षात येतंय' अशा मूडमधे स्वयंपाकघरात काही तरी टिपी करत होती. तिला म्हटलं,
`आज तुला एक मस्त ऑफर आहे'.
`काय?'
`चल स्प्लेंडर कंट्रीला जाऊ'.
इतक्या स्पाँटेनियस ऑफरला तितकीच उत्साहवर्धक दाद मिळण्याची शक्यता वैवाहिक जीवनात तशी कमीच . पण तिचे अनेकविध सांसारिक प्रश्न, बुद्धिबळाच्या एंडगेमासारखे फटाफट सोडवून, शेवटी होकाराची विजयश्री खेचून आणली. वि.आ.बुवा नामक एका विनोदी लेखकानं म्हटलंय की रमणी जेंव्हा नको नको म्हणते तेंव्हा तिच्या मनात होकार असतो. अशा थोर विचारांचा मुबलक साठा असल्यानं प्रयत्नात कसूर होत नाही आणि गहन वाटणारे प्रश्नसुद्धा सहज सुटतात. थोडक्यात काय तर एका तासात बुकींग मिळवण्यापासून ते पार कपडे वाळत घालण्यापर्यंत सगळी कामं संपवून गाडीला स्टार्टर मारला. तेवढ्यात जिच्या दर्शनानं मी कायम कृतकृत्य होतो ती रोटीमेकर, साधना लेनमधे शिरत होती. पत्नीनं चेहेर्यावरचा आनंद लपवत अत्यंत गंभीरपणे, आम्हाला कसं अचानक निघावं लागतंय वगैरे सांगून तिला साद्यंत सूचना दिल्या आणि दार उघडून आत बसली. एसी चालू करत तिला म्हटलं
`आयुष्यात असे क्षण अत्यंत दुर्मिळ. आत्ता या क्षणी तुझी जी चित्तदशा आहे त्याला काय म्हणतात माहितीये?'
`काय '?
`निर्वेध चित्तदशा! थोडक्यात, काही क्षण का होईना, तुमचे सगळे प्रश्न सुटलेले असतात. आता घरचे सगळे विचार सोडून तू फक्त सहलीची मजा घे'
आपली मदिरा, आपली मदनिका आणि प्रणय या तीन गोष्टी एकत्र केल्या की हीच दुनिया जन्नत होते असा अनुभव असल्यानं मधे थांबून मदिराकुपी घेतली. आणि असा सगळा माहौल जमवून, पुढच्या एका तासात डेस्टीनेशनला पोहोचलो. तिथे सुहास्यवदनानं निलेश स्वागताला उभा होता.
‘वेल कम टू स्प्लेंडर कंट्री सर !’
स्प्लेंडर कंट्री क्लब हे आर्किटेक्ट इक्बाल चैनीचं अत्यंत मोहक डिजाईन आहे. डोंगराचा एक अतीप्रशस्त प्रभाग घेऊन त्यावर त्यानं फोर लेअर्ड अरेंजमंट केलीये. सुरूवतीला प्रवेश आणि रिसेप्शन, मग काही पायर्या उतरल्यावर अॅडवेंचर स्पोर्ट, तिथून खाली गेल्यावर डायनिंग आणि बेबी पूल, त्याच्या खालच्या लेवलला आकाशाशी संवाद साधणारा दिमाखदार स्विमींग पूल आणि बरोबर खडकवासला धरणाच्या बॅक-वॉटर लेवलला, गेम एरिया. गेम एरियात सिंग-अलाँग कराओके सिस्टम, टेबल-टेनीस, पूल टेबल, कॅरम आणि निवांत बसायला अनेक जागा आणि पहुडायला हॅमॉक्स आहेत. संपूर्ण क्लबचा कोपरान कोपरा वेगवेगळ्या झाडांच्या मोहक लॅंडस्केप्सनी बहरलेला आहे. अगदी सिक्योरिटी गेट पासून ते पार गेम एरिया पर्यंत एकेक स्पॉट निव्वळ जीवघेणा केला आहे. तुम्ही वेळेचं भान शून्य केलंत तर एकेका ठिकाणी तासंतास बसता येईल असा रम्य परिसर आहे.
रिसेप्शनमधून आत आल्यावर दिसणारा नज़ारा
इक्बाल चैनीच्या मोहक डिजाईनची झलक
डायनिंग एरियातून दिसणारं, निवांत पहुडलेलं खडकवासला बॅक वॉटर आणि दूरवर पसरलेले डोंगर. इथे जेवणानंतर किती तरी वेळ आम्ही नुसते शांत बसून असायचो.
अकाशात बादल आणि पाण्याच्या बिछान्यावर आपण असा; आपल्याला आकाशाशी समरूप करणारा स्वीमींग पूल
प्रशस्त प्ले एरिया. इथल्या सिंग अलाँग सिस्टमवर गातांना जो काय माहौल तयार होतो तो अवर्णनीय आहे.
क्लब समोरच्या इस्टेटमधे संपूर्ण डोंगरावर, एक्स्प्रेस हायवेच्या तोडीचा सात किलोमिटर रस्ता आहे. या रस्त्यावर फिरायला जाणं म्हणजे अद्वितीय मॉर्निंग वॉक...किंवा मग चितचोर चित्रपटासारखा इव्हिनिंग प्लेझर
मॉर्निंग वॉकला वहाणारं सुखद वारं. एकाबाजूला डोंगर, दुसर्या बाजूला अथांग पाणी आणि आजूबाजूला चौफेर मोकळं आकाश.
रूम्स क्लबच्या विरूद्ध दिशेला, पण समोरच अत्यंत निवांत वातावरणात आहेत. रूममधे तुम्हाला गर्द वनराईत असल्याचा फिल येतो. तिकडे नेणारा पाथ वे.
रूमच्या बाहेर असा सिटाऊट आहे. इथे सकाळ-संध्याकाळ कॉफी किंवा मदिरास्वाद घेत किती वेळ बसलोयं याचा हिशेब नाही.
दिवसाच्या कोणत्याही वेळी, तुम्हाला एकमेकात मिसळून जायला लावणारी ही रूम !
दुसर्या दिवशी सकाळी कॉफी आणि भन्नाट मॉर्निंग वॉक झाल्यावर पुन्हा कॉफी राऊंडसाठी सिटाऊटमधे बसलो होतो.
`पियू, वन मोर ऑफर फॉर यू'
`आता काय?'
`वी विल एक्स्टेंड द स्टे फॉर वन मोर डे !'
पुन्हा तिच्या निष्कारणाच्या नकारांचं निराकरण करणं आलं. एका मिनीटात आई आणि मुलाला फोन करून सगळं व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घेतली, त्यांना प्लान सांगितला आणि फोन तिच्याकडे दिला! जुजबी प्रश्नोत्तरांच्या संवादा नंतर तीनं सुहास्य होकार दिला आणि उभयतांनी स्वर्ग उपभोगायला पुन्हा नव्यानं सुरूवात केली.
प्रतिक्रिया
20 Dec 2015 - 7:11 pm | अभिदेश
मि.पा. वर अश्या जाहिराती करणे योग्य आहे का...
20 Dec 2015 - 7:14 pm | कंजूस
अति सुंदर!छान ओळख!
20 Dec 2015 - 7:31 pm | विवेक ठाकूर
हे सर्व फोटो वर्किंग डेला काढलेले आहेत. सुट्टीच्या दिवशी तिथे तुफान गर्दी असते. सगळा निवांतपणा, शांतता आणि उपभोग `दुनिया कामात आणि आपण स्प्लेंडर कंट्रीला' असतांनाच मिळू शकतो. आम्ही जातो तेंव्हा संपूर्ण क्लबमधे फक्त दोघं असतो. लेखात वर्णन केलेला माहौल वर्किंग डेला केलेल्या उनाडपणाचा आहे.
क्लब, रस्ता आणि खडकवासल्याचं बॅक वॉटर अशा विस्तीर्ण डोंगर उतरणीवर आहे त्यामुळे प्रत्येक जागा बेहद्द प्रशस्त आणि रमणीय असली तरी रिसेप्शन ते गेम एरिया जवळ जवळ एकशे पाच पायर्या आहेत. तस्मात, पुरेसा फिटनेस आवश्यक आहे. रूममधून डायनिंग एरियाला जायला पन्नासेक पायर्यांची चढ-उतर करायला लागते. जेवण रूममधे मागवता येतं पण जी मजा डायनिंग एरियात जेवण्याची आहे ती रूममधे जेवण्यात नाही.
गाणं, पोहोणं, टेबल-टेनीस, बिलीयर्ड्स, या सारखे छंद आणि रूममधे असतांना योगा (किंवा सहयोगा)-प्राणायाम अशा गोष्टींची आवड नसेल तर टिवी लावण्याशिवाय पर्याय राहात नाही. मग तो शांतता आणि प्रसन्नतेचा माहौल हरवून जातो.
वर्किंग डेला तिथे कमालीची शांतता असते. त्यामुळे प्रिय व्यक्तीचा सहवास आणि काहीही न करता एकमेकांसमवेत निव्वळ शांत बसण्याची सवय नसेल तर सहलीची मजा येण्याची शक्यता कमी. थोडक्यात, ही ग्रुप सहल नाही त्यामुळे तुमच्या उभयतांच्या व्यक्तिगत आवडीनुसार लेखातला पर्याय अनुभवावा.
20 Dec 2015 - 7:33 pm | अजया
हेवन हेवन तो हाच असावा!
20 Dec 2015 - 7:41 pm | यशोधरा
मला पाण्याचे फोटो आवडले.
पण माझी एक खरंच जेन्यूईन शंका आहे, ह्या रिसॉर्ट्साठी शेतजमिनींचा बळी गेला असेल का?
20 Dec 2015 - 9:19 pm | खेडूत
'बळी' हा बराच सौम्य शब्द ठरावा!
बाकी
एका रम्स रिसॉर्टची सदस्यांना ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.. वाचून वेग्ळंच काही असेल असं वाटलेलं.
20 Dec 2015 - 7:54 pm | गवि
उत्तम ठिकाण दिसतंय. धन्यवाद..
20 Dec 2015 - 7:57 pm | अभ्या..
रंग उडालेले एन्टरन्स गेट सोडले तर बाकी एक नंबर.
भारी आहे वातावरण.
बडे लोगा...बडी बाते....
20 Dec 2015 - 7:57 pm | अभ्या..
रंग उडालेले एन्टरन्स गेट सोडले तर बाकी एक नंबर.
भारी आहे वातावरण.
बडे लोगा...बडी बाते....
20 Dec 2015 - 10:16 pm | म्हसोबा
तुम्ही छिद्रान्वेशी दिसता. इतक्या नितांत सुंदर प्रकाशचित्रांमध्ये तुम्हाला रंग उडालेले एण्ट्रन्स बरे दिसले.
यावरून तुमची कोती मनोवृत्ती दिसून येते. लेखकाची रसिकता, त्याचा दर्दीपणा बरा नाही दिसला तुम्हाला?
यू सेड ईट. माणूस जिंदादील असला की त्याचं आयुष्यही जिंदादील असतं.
20 Dec 2015 - 7:59 pm | अभ्या..
रंग उडालेले एन्टरन्स गेट सोडले तर बाकी एक नंबर.
भारी आहे वातावरण.
बडे लोगा...बडी बाते....
20 Dec 2015 - 8:29 pm | कंजूस
गेटच्या आत काय असेल अशी उत्सुकता असणाय्रांसाठी आहे लेख.पावला.
20 Dec 2015 - 8:30 pm | अभ्या..
रंग उडालेले एन्टरन्स गेट सोडले तर बाकी एक नंबर.
भारी आहे वातावरण.
बडे लोगा...बडी बाते....
20 Dec 2015 - 9:48 pm | जातवेद
अरे किती रंग उडवशील?
20 Dec 2015 - 9:15 pm | पद्मावति
सुंदर ठीकाणाची तेव्हडीच सुंदर ओळख. लेख आवडला.
20 Dec 2015 - 9:55 pm | प्रचेतस
क्या बात है संक्षी.
इकडे हापिसच्या खर्चाने फुकटात जाउन आलोय. तीही मजा औरच. :)
20 Dec 2015 - 10:18 pm | म्हसोबा
आस्वाद घेणं काय असतं हे तुमच्यासारख्या फुकटयांना नाही कळणार.
हे वाचा:
आणि मग बडवा किबोर्डवर बोटे.
20 Dec 2015 - 10:24 pm | प्रचेतस
आपल्या मताशी सहमत आहे.
21 Dec 2015 - 4:15 pm | अनिरुद्ध.वैद्य
पण दोघांचे ६६०० एका दिवसाचे द्यायला लैच जिवावर येतंय ;)
21 Dec 2015 - 4:30 pm | प्रचेतस
म्हणून तर फुकटात खूप छान वाटतं हो. आणि अशा ठिकाणी इतके पैसे घालवणं मला खरंच परवडत नै.
21 Dec 2015 - 4:32 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
21 Dec 2015 - 5:24 pm | प्रसाद गोडबोले
आणि हे हॉटेल वाले तर दुरची बात पण आपले जिवश्च कंठश्च मित्र देखील आपल्याला "तु ये , तुला फुकट देईन " असेही म्हणत नाहीत !
21 Dec 2015 - 5:55 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
20 Dec 2015 - 10:10 pm | म्हसोबा
क्या बात हैं विवेकजी. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
आपल्या ठिकाणाच्या निवडीला दाद दिली पाहिजे. इतके नितांत सुंदर स्वर्गरम्य ठिकाण आपल्यासारख्या दर्दी रसिकच निवडू शकतो. या रम्य स्थळाचे फोटो पाहून मन अगदी प्रसन्न झाले.
या वाक्यातील "रम्स" ह शब्द "रम्य" असा असायला हवा का? तसं असेल तर संपादक मंडळास विनंती करून सुधारणा करून घ्या.
20 Dec 2015 - 10:58 pm | विवेक ठाकूर
शुभेच्छांबद्दल आणि सुरूवातीची छोटी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल .
20 Dec 2015 - 10:32 pm | एस
ठीकठाक आहे स्प्लेण्डर कंट्री. आताशा फारच बोर होतं तिथं जायला. असो.
20 Dec 2015 - 11:10 pm | श्रीरंग_जोशी
जवळपास ९ वर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या टिमचं पिकनिक स्प्लेंडर कंट्री रिसॉर्टमध्ये झालं होतं. आजवरच्या संस्मरणीय पिकनिक्सपैकी ते एक होतं. मी आयोजकांपैकी एक होतो. टिममधलं कुणीही तिथे पूर्वी गेलेलं नसल्याने प्रत्येकजण जागा पाहूनच खूष झाला.
तिथल्या इन्फिनिटी पूलमध्ये मी आयुष्यात प्रथमच पोहायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्विमिंगचा क्लास वगैरे लावला होता पण ते अर्धवट राहिलं. डोंगर उतारावर अन खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरच्या शेजारी एका अप्रतिम ठिकाणी हे रिसॉर्ट वसलं आहे. पुन्हा जायची इच्छा आहेच. बघु कधी योग येतो ते.
लेखन एकदम दिलखुलास वाटलं.
मी काढलेले दोन फोटोज.

इन्फिनिटी स्विमिंग पूल
तिथून दिसणारे बॅकवाटरचे दृश्य

20 Dec 2015 - 11:36 pm | विवेक ठाकूर
तो पूल इतका मोहक आहे की त्याच्या निवांत पाण्याला कमीतकमी धक्का लावत पोहायला ज्याम मजा येते. कित्येक तास पाण्याच्या बिछायतीवर पडून, गुरूत्त्वाकर्षणरहित शरीरानं, आकाशात खोल शिरतांना आणि ते देहात उतरवून घेतांना वेळ शून्य होऊन जाते.
इन्फिनिटी पूलची कल्पना इतकी भन्नाट आहे की तो सभोवतालच्या निसर्गाशी एकरूप झाल्यासारखा भासतो. इक्बाल चैनीच्या कल्पकतेचं सर्वात मनोहारी दर्शन म्हणजे तो पूल आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
21 Dec 2015 - 12:05 am | विवेक ठाकूर
सिटाऊटमधे बसल्यावर समोर दिसणारा निसर्ग
प्ले एरिया मधली निवांत सकाळ
आणि तिथली रम्य संध्याकाळ
21 Dec 2015 - 12:56 am | प्रसाद गोडबोले
सुंदर फोटो संक्षी सर !
21 Dec 2015 - 1:12 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर रिसॉर्ट, सुंदर फोटो !
21 Dec 2015 - 9:30 am | गवि
अधिक माहिती वाचली. जागेबद्दल मिक्स्ड रिव्ह्यूज दिसतात.
अनेकांना पूल अत्यंत स्वच्छ वाटला तर अनेकांना अत्यंत अस्वच्छ.
लोकेशन सुंदर याविषयी एकमत दिसलं. खाण्याची चव चांगली असल्याचंही.
अर्थात हे ठिकाण शुद्ध शाकाहारी आहे ही नोंद घ्यायला हवी.
त्यात वाईट काही नाही, पण माहीत पाहिजे.
21 Dec 2015 - 10:10 am | विवेक ठाकूर
बहुतेक सर्व रिव्यूज ग्रुपनी गेलेल्या आणि `डे आऊट' पॅकेजवाल्यांचे आहेत. त्यामुळे वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, वर्किंग डे आणि स्टे, दोघांना एकमेकांच्या सहवासात वाटणारा आल्हाद, कमालीच्या शांततेशी सहज एकरूप होण्याची आणि तिचा आनंद घेण्याची वृत्ती, विविध खेळ, संगीत, पोहोणं यात गती आणि फिटनेस या सर्व आवश्यकता आहेत. पूल इतका रम्य आहे की बोलता सोय नाही आणि फिल्टरेशन प्लांट नेहमी चालू असतो पण वीस-तीस लोक एकदम उतरले की सगळी मजा जाते.
जेवण फक्त वेज असतं हे नमूद करायच राहून गेलं. पण तिथला खानसमा ओळखीचा असल्यानं आणि आख्ख्या प्रॉपर्टीत आम्ही दोघंच गेस्ट त्यामुळे काय म्हणाल तो फर्माईशी बेत असतो.
21 Dec 2015 - 10:17 am | पिलीयन रायडर
स्प्लेंडर कंट्रीला गेले आहे. आम्ही सुट्टिच्या दिवशी गेलो होतो. बर्यापैकी गर्दी होती. मला तरी ते जास्त महाग वाटले. पुल खरंच सुंदर आहे. सगळा पैसा त्या व्ह्यु चा आहे. लोकेशन मस्त निवडलीये. जेवणही उत्तम होते. पण तय व्यतिरिक्त अॅक्टिव्हिटी साधारणच होत्या. टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन इ डिपोझिट देऊन खेळु शकता. काही पेड अॅडव्हेन्चर गेम्स पण आहेत. पण ते काही तेवढे भारी न वाटल्याने आम्ही ते केले नाहीत.
संक्षी म्हणतात तसं दोघांनीच वीकडेला जावं किंवा मग ग्रुपने दंगा करायला जावं. वीकांताला दोघांनी गेलात तर अवघड आहे.
(प्रतिसाद फार जास्त इंग्रजाळलेला आहे.. एकडाव माफी द्या!)
23 Dec 2015 - 1:20 am | विवेक ठाकूर
यासाठीच लेख लिहीलायं !
किंवा मग ग्रुपने दंगा करायला जावं
तो `डे आऊट' म्हणून योग्य पर्याय आहे पण `स्टे' साठी तितकासा चांगला नाही.
21 Dec 2015 - 10:32 am | सस्नेह
ठिकाण विशेष मेहनत घेऊन सजवलेले दिसत आहे. माहितीसाठी धन्यवाद.
अवांतर : आज पहिला ताम्हिणी घाटाचा धागा उघडला आणि दुसरा हा. नैसर्गिक आणि कृत्रिम हिरवाईतला फरक ठळकपणे डोळ्यात भरला !