वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
14 Dec 2015 - 6:15 pm

अरुण म्हणायचे सगळे,
पाळण्यातलं नाव 'श्रीकृष्ण'
श्रीकृष्ण केशव केतकर.

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असताना देवा घरी गेले.
तसा जरी मोठा असलो तरी नव्हतोच! अजून ही नाहिये…
एका मुलीचा बाप असून ही असं बोलतोय.
पण काय आपण खोट्या हुशार्या नाय मारू शकत!

बाबा होते एक सेलीब्रीटी, १४ वर्षे बाहेरगावी होते,
त्यामुळे दाढी मिशी वगैरे तांबुस, मस्त वळण असलेले केस!
बर्यापैकी हाईट, व्यवस्थित झीरो फ्येट शरीर, सरळ तरतरीत नाक,
बोरिवलीच्या आमच्या बिल्डिंग मध्ये एन्ट्री मारली
की पर्फूमच्या सुगंधांनी मजले बहरायचे!
आणि 'अरुण आला वाटतं' अशी कुजबुज सुरू व्हायची!
बदाम / पिस्ते / शर्टस / खेळणी आणि बरच काही घेऊन
ते सुपर ड्यूपर व्यक्तिमत्व दारात उभं राहिलं की
माझे डोळे बंद व्हायचे नावही घ्यायचे नाहीत!
१२०च्या स्पीड नी विदाउट ब्रेक्स धडक!
वर्षातून १-२दा वाट्याला यायचे!
मग नंतर मला ही बोलावलं क़तारला!
मे महिन्यात अर्धी सुट्टी गावाला आणि अर्धी दोहा क़तार…
फुल ओन कोंट्रास्ट!

मला जेवढं ओळखता आलं बाबांना त्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांचा स्वभाव!
सरळ मार्गी, कोणाच्याबद्दल कधी वाईट बोलायचे नाहीत आणि चिंतायचे तर मुळीच नाहीत,
अगदी नो एन्ट्री मधून गेले पोलिसांनी पकडलं तरी घूस वगैरे न देता पावती द्या दंड द्यायला तयार,
प्रचंड मैत्री जपणारे…
चहावाला असो, पंकचर वाला असो किव्वा कोणी मोठा बिजिनेसमन…
सगळ्यांशी समान, सर्व नातेवाइकांकडे आवर्जून जाणे, म्हातार्या लोकांसाठी आदर.
मला कधीच असं बाबांनी का केलं असेल असा प्रश्न पडलाच नाही!

चहा बाबांचा वीक पोइन्ट होता… रात्रीच्या ३वाजताही त्यांना तो चालायचा,
कोणाच्या घरी गेले कि स्वताहुन सांगायचे नाही मिळाला तर,
आणि ज्यांना माहित होता ते काही न विचारता आधी चहा करायला लागायचे!

गाड्यांचे जाम वेड… बाबांचे मित्र म्हणत... 'अरुण काय हुबेहूब चित्र काढायचा गाड्यांची'
१४वर्षात ७-८ गाड्या टोयोटा, डेट्सन, निस्सान, होंडा,
कंपनी च्या मोठ्या गाड्या!
जाम मजा यायची त्यांच्या बाजूला बसून वाळवंट बघायला!
खूप स्कॅल मोडेल्स पण घेऊन द्यायचे मला! एकूणच जाम लाड ह्या बाबतीत!
एके दिवशी मी जरा जास्तच गाडी गाडी करत होतो म्हणून सर्व गाड्या माळ्यावर ठेऊन दिल्या आईने!
तर मी छोटीशी पिन घेऊन त्यात शर्र्टचं बटण घुसवून खेळायला लागलो…
हा प्रकार बघून बाबांना दया आली आणि लगेच अख्खा गाड्यांचा खजाना आणून ठेवला माझ्या समोर.

भक्ती पण तेवढीच… देव धर्म, रोज सोहळं घालून पूजा,
क़तार मध्ये असताना तिथल्या धर्माचा आदर म्हणून नमाज पण करायचे,
सर्व मित्र होते, पाकिस्तानी, ब्रिटीश, अमेरिकन, फ्रेंच सर्वांशी अगदी उत्तम मैत्री
खूप फोटो आहेत त्यांचे, सुरुवातीला अल्जेरिया तिथून फ्रांस मग क़तार…
९२ साली बाबा कायमचे भारतात परतले, आम्ही बोरीवली सोडलं
कारण बाबांना 'पोलिसीस्टिक कीडणीस' नामक आजार डीटेक्ट झालेला,
म्हणून धकाधकीच्या जीवनातून शांततेसाठी 'पुणे' गाठले!

पुण्यात आल्यावर लुना मग स्कूटर, मला स्प्लेन्डर घेऊन दिली,
२००१ कीडनी फैल्युर नंतर डायेलीसीस, उपचार सुरु…
स्वत:ला एकटं डायेलीसीसला जाता यावं म्हणून ओम्नी पण घेतली
ह्या सर्व गदारोळात माझ्या चुलत आजीचा ९०वा वाढदिवसही साजरा केला आमच्या घरी.
आठवड्यातून २दा डायेलीसीसला जाणे, आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
आईची धडपड, गोळ्या औषधं, डायेलीसीस,
माझं शेवटचं वर्ष कोलेजचं
बेस्ट वर्कचं अवार्ड घेऊन घरी आलो
बाबांना धावत धावत सांगायला बेडरूम पर्यंत गेलो
थकले होते, म्हणाले उद्या बोलू…
ती शेवटची भेट.

अरुण म्हणायचे सगळे, पाळण्यातलं नाव 'श्रीकृष्ण'
श्रीयुत चे कै. श्रीकृष्ण केशव केतकर झालेले.

अजून ही अरुणच म्हणतात सगळे.


वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

#सशुश्रीके

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

14 Dec 2015 - 6:27 pm | कविता१९७८

मस्त आठवणी, तुमच्या बाबाना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2015 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृदयस्पर्शी मनोगत !

गवि's picture

14 Dec 2015 - 6:54 pm | गवि

काय बोलू?

तुमच्या कुटुंबात आल्यासारखं वाटलं क्षणभर.

हृद्य.

भारीच हो.
फोटो तर लै आवडला.

रेवती's picture

14 Dec 2015 - 7:08 pm | रेवती

लेखन आवडले.व

पैसा's picture

14 Dec 2015 - 7:38 pm | पैसा

मनातल्या आठवणी. इथे शेअर केल्यासाठी धन्यवाद, आणि तुमच्या बाबांना शुभेच्छा, हो शुभेच्छा च म्हणते. आधी कतारला होते, आता अजून जरा लांब गेलेत म्हणायचं. ...

प्रसाद भागवत's picture

15 Dec 2015 - 2:46 pm | प्रसाद भागवत

+१

जव्हेरगंज's picture

14 Dec 2015 - 10:31 pm | जव्हेरगंज

.

एस's picture

14 Dec 2015 - 10:42 pm | एस

हृद्य!!!

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 10:44 pm | श्रीरंग_जोशी

हृद्य!!!

साती's picture

14 Dec 2015 - 10:54 pm | साती

चांगला लेख!

पॉलिसिस्टीक किडनीज ( ए डी पी के डी- ऑटोसोमल डॉमिनेटींग पॉलिसिस्टीक किडनी डिसीज) हा आजार हेरेडिटरी म्हणजे वंशपपंपरागत असू शकतो हे आपल्या डॉक्टरांनी सांगितले असेलच.
तुम्ही सगळ्या भावंडांनी सुरूवातीस प्रायमरी फिजीशीयनला दाखवून रिनल फंकहन टेस्ट आणि स्क्रीनींग अल्ट्रासोनोग्राफी करून घ्या.
ए डी पी के डी च्या रूग्णाच्या प्रत्येक मुलात हा आजार असण्याची शक्यता ५० टक्के असते. (मात्र याचा अर्थ असा नाही की समजा दोन मुले असतील तर एकाला हा आजार असेल. दोन मुले असतील तर प्रत्येकाला हा आजार असण्याची शक्यता ५० टक्के!)

असा आजार नसेल तर प्रश्नच नाही पण जर सुरूवात असेल तर काही विशेष प्रिकॉशन्स घेऊन एंड स्टेज किडनी डिसीज पासून स्वतःला वाचवता/पुढे ढकलता येईल.

(खरे तर या सुंदर धाग्यावर हे लिहायला नको, पण त्या निमित्ताने सगळ्यांना एडीपिकेडी विषयी कळेल म्हणून लिहिले.)

उगा काहितरीच's picture

15 Dec 2015 - 12:00 am | उगा काहितरीच

...

मास्टरमाईन्ड's picture

15 Dec 2015 - 12:12 am | मास्टरमाईन्ड

खरंच!

बेस्ट वर्कचं अवार्ड घेऊन घरी आलो
बाबांना धावत धावत सांगायला बेडरूम पर्यंत गेलो
थकले होते, म्हणाले उद्या बोलू…
ती शेवटची भेट.

टोचलं

जिथे असतील तिथे.

पिलीयन रायडर's picture

15 Dec 2015 - 5:48 pm | पिलीयन रायडर

किती सुंदर हस्ताक्षर आहे!!

खुप छान लिहीलं आहे तुम्ही. तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चतुरंग's picture

17 Dec 2015 - 8:21 am | चतुरंग

किती सुंदर अक्षर आहे! अप्रतिम!! काळीभोर शाई आणि मोत्यांसारखे टपोरे अक्षर. बघत राहवे असे.

वाटोळे सरळे मोकळे| वोतले मसीचे काळे
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे| मुक्तमाळा जैशा||

समर्थांचे शब्दच आठवले! :)

सौन्दर्य's picture

15 Dec 2015 - 12:13 am | सौन्दर्य

आवडल्या तरी कसे म्हणू ? छान मनोगत.

रातराणी's picture

15 Dec 2015 - 12:16 am | रातराणी

.

चांदणे संदीप's picture

15 Dec 2015 - 7:44 am | चांदणे संदीप

त्यांच्या आठवणी असतात. काही कडू, काही गोड, काही चांगल्या काही वाईट. आणि अशा काही निमीत्तानेच त्या आठवणी फडताळातून बाहेर काढलेल्या जुन्या खेळांच्यासारख्या मांडून पुन्हा घटकाभर खेळून घ्यायच असतं. तेवढच आपल्या हातात असत म्हणून ते करायच असतं!

वेगळ्या पद्धतीने पण अतिशय परिणामकारक लिहिले आहे! सुंदर!

वरचा साती यांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आवडला!

तुमच्या बाबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा!
Sandy

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Dec 2015 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या बाबांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्च्छा.

पैजारबुवा,

जातवेद's picture

15 Dec 2015 - 12:32 pm | जातवेद

असच म्हणतो.

एकनाथ जाधव's picture

15 Dec 2015 - 11:56 am | एकनाथ जाधव

शेवटी लिहिता झालस तर मीपा वर!
चेपु वर वाचली होती आधी, सुन्दर आठवणी.

सस्नेह's picture

15 Dec 2015 - 12:07 pm | सस्नेह

साधे पण अतिशय हृद्य लेखन.

यशोधरा's picture

15 Dec 2015 - 12:44 pm | यशोधरा

असेच म्हणते.

अमोल खरे's picture

15 Dec 2015 - 1:12 pm | अमोल खरे

समीरचे बाबा व बाकी कुटुंब म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड. अतिशय डाऊन टु अर्थ व्यक्तिमत्व होतं. मी आणि समीर एकत्रच शाळेत जायचो. माझं पण त्यांना खुप कौतुक होतं. दुबई वरुन आले की माझ्या साठी चॉकलेट्स वगैरे घेउन यायचे. एकदा मस्त लाल रंगाची छ्त्री आणली होती. एक पिवळी छत्री पण होती. समीर ला छ्त्री देण्या आधी मला रंग निवडन्याचा चॉइस दिला होता. पुढे पुण्याला गेल्यावरही मुंबईला आले तर भेटत असत. काकु अजुनही भेटतात. एकंदरीतच मस्त माणुस होते.

शान्तिप्रिय's picture

15 Dec 2015 - 1:17 pm | शान्तिप्रिय

अतिशय मनापासुन लिहिलेला सुन्दर शुभेच्छालेख.
आमच्याहि शुभेच्छा, तुमच्या बाबाना.!

पद्मावति's picture

15 Dec 2015 - 2:44 pm | पद्मावति

अतिशय हृद्य मनोगत.
तुमची लेखनशैली तर अगदी समोरासमोर गप्पा केल्यासारखी सह्ज सुंदर आहे. तुमच्या बाबांना मन:पूर्वक शुभेच्छा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Dec 2015 - 2:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर लेख...

नाखु's picture

15 Dec 2015 - 3:00 pm | नाखु

अनंत शुभेच्छा....
लिहित रहा या आठवणीच तुमचा खजिना आहे आणि जगायला नव्याने शिकण्यासाठी एक प्रेरणा...

बाबांना पुन्हा शुभेच्छा.....

लेकाचा मित्र होण्याचा प्रयत्नार्थी नाखु

सुमीत भातखंडे's picture

15 Dec 2015 - 5:04 pm | सुमीत भातखंडे

खूप छान लिहिलय.

तुमच्या बाबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा...

सविता००१'s picture

15 Dec 2015 - 6:29 pm | सविता००१

तुमच्या बाबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा!

जेपी's picture

15 Dec 2015 - 6:53 pm | जेपी

..

वपाडाव's picture

16 Dec 2015 - 3:39 pm | वपाडाव

आमच्याही शुभेच्छा ...!

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Dec 2015 - 4:44 pm | लॉरी टांगटूंगकर

शुभेच्छा....

तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

हेमन्त वाघे's picture

17 Dec 2015 - 6:35 am | हेमन्त वाघे

आपण राहता त्या भागात ( कस्तूर पार्क , शिंपोली रोड ) मी अनेकदा मित्रांकडे येत असे ..
आपण समीप पाटील , समीर पाटील , राहुल वंजारे , अक्षय मुळे , रजिता , अतुल राणे ........... यापैकी कोणास ओळखता का ?
लेख आवडला ..... कोणीतरी ओळखीचे भेटल्यासारखे vatle

चतुरंग's picture

17 Dec 2015 - 8:13 am | चतुरंग

गहिवरलो! गप्पा मारल्यासारखे लिहिले आहेत तेही भावले..
तुमचा आणि बाबांचा फोटो छान आहे.
तुमच्या आठवणी अशाच ताज्यातवान्या राहोत अशा शुभेच्छा! :)

बोका-ए-आझम's picture

17 Dec 2015 - 8:38 am | बोका-ए-आझम

_/\_

प्रमोद देर्देकर's picture

17 Dec 2015 - 9:43 am | प्रमोद देर्देकर

मनस्पर्शी लेख. तुमच्या बाबांना शुभेच्छा!

एक एकटा एकटाच's picture

17 Dec 2015 - 10:16 am | एक एकटा एकटाच

भावस्पर्शी

नीलमोहर's picture

17 Dec 2015 - 10:35 am | नीलमोहर

तुम्ही वर्णन केल्यावर जशी व्यक्ति इमॅजिन झाली होती तसाच आहे त्यांचा फोटोही, छानच.

काही वर्षांसाठी का असेना वडिलांचा सहवास लाभला यातही आपण आनंद मानू शकता, काही लोक आपल्या
जवळच्या व्यक्तिंना फार लहानपणीच गमावून बसतात, त्यांच्याकडे तर फारशा आठवणीही नसतात सोबतीला..

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Dec 2015 - 10:56 am | llपुण्याचे पेशवेll

वडीलांच्या आठवणी छान. पण ते जरा नीट लिहा की मराठीत. घूस न देता वगैरे असले शब्द का बरे लिहीता. पुण्यात त्याला 'चहापाणी' किंवा लाच म्हणतात सरळ. घूस कुठून काढली? घूस मोठ्या आकाराच्या उंदराला म्हणतात.

गवि's picture

17 Dec 2015 - 11:16 am | गवि

अगदी अगदी.

लेखकाला केलेल्या या सूचनेबद्दल तुमचे धन्यवाद.

मिपावर त्यांनी हल्लीच लिखाण सुरु केले आहे. थोडा धीरज राखूया. प्रधानमंत्री मोदी यांनाही आपण समय देतोयच ना?

आपल्या दैनंदिन पत्राचारात मराठीचा तिच्या वास्तविक रुपात राखून सम्मान झाला पाहिजे या मताशी मात्र माझी सम्मती आहे.

मृत्युन्जय's picture

17 Dec 2015 - 11:22 am | मृत्युन्जय

अगदी अगदी. मिसळपाव आज दिनांक १७/१२/२०१५ रोजी रात्री २०.०० वा (भा.प्र.वे.) नियमीत देखभालीच्या कामाकरीता विश्रांती अवस्थेत जाईल तेव्हा त्यांना यावर चिंतन करता येइल.

चांदणे संदीप's picture

19 Dec 2015 - 2:20 pm | चांदणे संदीप

=)) =)) =))

तुफान हसलेला!
Sandy

छान लिहिलंय. साधं पण हृद्य ! तुमच्या बाबांना शुभेच्छा !

तुमच्या बाबांना शुभेच्छा !
उत्तम भावस्पर्शी लेखन

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Dec 2015 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! _/\_