कुणी नसावे दुरवर परी,
श्यामसखा जवळी असावा,
श्रावणधारांसवेच अलगद,
श्यामसखा बरसुनी जावा - १
श्यामसख्याच्या निळाईत अन मग,
गौरतनु हे रंगुन जावे,
वेणु त्याने लावताच ओठी,
सप्तसुरात दंगुनी जावे - २
श्यामसखा असा बरसता,
चंद्र लाजुनी चुरुन जावा,
सैलावल्या केसात अन मग,
स्पर्श जरासा उरुन जावा - ३
- सौरभ वैशंपायन(मुंबई).
प्रतिक्रिया
9 Sep 2008 - 11:20 pm | प्राजु
अतिशय सुरेख रचना..
श्यामसख्याच्या निळाईत अन मग,
गौरतनु हे रंगुन जावे,
वेणु त्याने लावताच ओठी,
सप्तसुरात दंगुनी जावे - २
क्या बात है!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Sep 2008 - 11:19 am | पावसाची परी
कस रे इतक छान सुचत तुला
सगळ्याच ओळी खुप खुप आवडल्या
"सैलावल्या केसात अन मग,
स्पर्श जरासा उरुन जावा - ३"
हे तर अगदी बेस्ट
मस्तच
-तुझी पन्खी
10 Sep 2008 - 11:30 am | विनायक प्रभू
छान आहे.
http://vipravani.wordpress.com/
10 Sep 2008 - 11:32 am | मनिष
फार सुरेख कविता!! सगळ्याच ओळी आवडल्या...
10 Sep 2008 - 12:08 pm | पद्मश्री चित्रे
शेवटचे कडवे सर्वात आवडले..