मुमुक्षु

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
1 Dec 2015 - 3:37 am

निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात
सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या
सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या
सगळ्यात शेवटच्या मजल्यावर
मुमुक्षु राहतो.

रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत
न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत
तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर.

ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन

बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

भानिम's picture

1 Dec 2015 - 4:40 am | भानिम

सुपर!

खाली शब्दार्थ पण टाकायचे ना.

पालीचा खंडोबा १'s picture

1 Dec 2015 - 11:21 am | पालीचा खंडोबा १

छान

अप्रतिम कविता
हजारो कविता नंतर येणारी एखादी ग्रेट कविता
या कवितेवरुन सर्वात अगोदर गालिब चा हा शेर आठवला
इमॉ मुझे रोके है तो खीचे है मुझे कुफ्र
काबा मेरे पीछे है तो कलीसा मेरे आगे
ग्रेट कविता खरचं इतक्या वेळा ती न्युरो वर्णने वाचलेली पण त्यातुन अशी एखादी कविता जन्माला येऊ
शकते असे कधीच वाटले नाही.
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
ही ओळ तर विलक्षणच म्हणावी ही ओळ वाचल्यावरच दोन चार डोपामाइनच्या उसळी आल्या उचंबळुन !
धन्यवाद नगरी निरंजन जी
अनेक धन्यवाद !

पैसा's picture

2 Dec 2015 - 5:16 pm | पैसा

वाचून माझ्या डॉक्यात केमिकल लोचा सुरू झालाय.

दमामि's picture

2 Dec 2015 - 5:19 pm | दमामि

तुम्ही शरदिनीला ओळखता का?:)

शिव कन्या's picture

3 Dec 2015 - 7:13 pm | शिव कन्या

संदर्भ कळायला जड गेले.... पण जे म्हणायचेय ते माझ्या परीने मला कळले.
ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.
हा कळसबिंदू.

जव्हेरगंज's picture

3 Dec 2015 - 8:10 pm | जव्हेरगंज

cells vs virus??

असंच काहीतरी असेल असं वाटतयं. पेशी आणि विषाणुंचे युध्द आपल्या शरीरात रोजच चालत असते. डिस्कव्हरीवर एक अत्यंत ऊत्कृष्ठ प्रोग्राम बघितला होता. त्याची आठवण झाली.

कविता आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Dec 2015 - 2:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

च्यायला त्या अभ्याच्या कवितेवरुन इकडे आलो आणि डोक्याची काशी झाली.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2015 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

न्युरोकेमिकल लोच्याची उत्कट अभिव्यक्ती !