✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुमुक्षु

न — नगरीनिरंजन, Tue, 12/01/2015 - 03:37
निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर मुमुक्षु राहतो. रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर. ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन हल्ला करतात अचानक दिसेल तिथे अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू. मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान. डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो. मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

प्रतिक्रिया द्या
3357 वाचन

💬 प्रतिसाद (10)

सुपर!

भानिम
Tue, 12/01/2015 - 04:40 नवीन
सुपर!
  • Log in or register to post comments

खाली शब्दार्थ पण टाकायचे ना.

जातवेद
Tue, 12/01/2015 - 09:44 नवीन
खाली शब्दार्थ पण टाकायचे ना.
  • Log in or register to post comments

छान

पालीचा खंडोबा १
Tue, 12/01/2015 - 11:21 नवीन
छान
  • Log in or register to post comments

आंतरीक संघर्षाची अदभुत अभिव्यक्ती

मारवा
Wed, 12/02/2015 - 17:08 नवीन
अप्रतिम कविता हजारो कविता नंतर येणारी एखादी ग्रेट कविता या कवितेवरुन सर्वात अगोदर गालिब चा हा शेर आठवला इमॉ मुझे रोके है तो खीचे है मुझे कुफ्र काबा मेरे पीछे है तो कलीसा मेरे आगे ग्रेट कविता खरचं इतक्या वेळा ती न्युरो वर्णने वाचलेली पण त्यातुन अशी एखादी कविता जन्माला येऊ शकते असे कधीच वाटले नाही. डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात ही ओळ तर विलक्षणच म्हणावी ही ओळ वाचल्यावरच दोन चार डोपामाइनच्या उसळी आल्या उचंबळुन ! धन्यवाद नगरी निरंजन जी अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सुपर!

पैसा
Wed, 12/02/2015 - 17:16 नवीन
वाचून माझ्या डॉक्यात केमिकल लोचा सुरू झालाय.
  • Log in or register to post comments

भारी!

दमामि
Wed, 12/02/2015 - 17:19 नवीन
तुम्ही शरदिनीला ओळखता का?:)
  • Log in or register to post comments

संदर्भ कळायला जड गेले.... पण

शिव कन्या
गुरुवार, 12/03/2015 - 19:13 नवीन
संदर्भ कळायला जड गेले.... पण जे म्हणायचेय ते माझ्या परीने मला कळले. ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन हल्ला करतात अचानक दिसेल तिथे अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू. मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान. हा कळसबिंदू.
  • Log in or register to post comments

cells vs virus??

जव्हेरगंज
गुरुवार, 12/03/2015 - 20:10 नवीन
cells vs virus?? असंच काहीतरी असेल असं वाटतयं. पेशी आणि विषाणुंचे युध्द आपल्या शरीरात रोजच चालत असते. डिस्कव्हरीवर एक अत्यंत ऊत्कृष्ठ प्रोग्राम बघितला होता. त्याची आठवण झाली. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

कं लिवलय....कं लिवलय...... कायबी कळल नाही.

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/05/2015 - 14:51 नवीन
च्यायला त्या अभ्याच्या कवितेवरुन इकडे आलो आणि डोक्याची काशी झाली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

न्युरोकेमिकल लोच्याची उत्कट

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/06/2015 - 18:52 नवीन
न्युरोकेमिकल लोच्याची उत्कट अभिव्यक्ती !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा