तुमुल कोलाहल कलह मे - एक अलौकिक काव्य.

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
30 Nov 2015 - 8:57 pm

काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः
जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम सन्गीत यामुळे ही कविता हिन्दि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे. रसिक मिपाकर ही कविता जरुर ऐकतिल असा माझा विश्वास आहे.

तुमुल कोलाहल कलह में, मैं हृदय की बात रे मन |

विफल होकर नित्य चंचल,
खोजती जब नींद के पल,
चेतना थक सी रही तब, मैं मलय की बात रे मन |

चिर विषाद विलीन मन की,
इस व्यथा के तिमिर वन की,
मैं उषा-सी ज्योति रेखा, कुसुम विकसित प्रात रे मन |

जहां मरू-ज्वाला धधकती,
चातकी कन को तरसती,
उन्हीं जीवन घाटियों की, मैं सरस बरसात रे मन |

पवन के प्राचीर में रुक,
जला जीवन जी रहा झुक,
इस झुलसते विश्व दिन की, मैं कुसुम ऋतु रात रे मन |

चिर निराशा नीरधर से,
प्रतिच्छायित अश्रु-सर से,
मधुप मुख मकरंद मुकुलित, मैं सजल जलजात रे मन |

ही कविता म्हणजे एका अशा सकारात्मक भावनेचे आत्मवृत्त आहे जी आपल्याला या जगातील सुन्न करणार्या घटनांना विसरून नव्याने जगण्याची उमेद देते.
_______________________________________________________________________________________
मी मनाच्या कोलाहलात आकंठ बुडालेल्या तुझी एक हळुवार समजूत काढणारी सखी आहे.
अपयशामुळे आणि कष्टामुळे थकलेल्या शरीराला जेव्हा झोपेची नितांत आवश्यकता असते त्यावेळची मी हळुवार सुंदर वाऱ्याची झुळुक आहे
व्यथेने गांजलेले मन जेव्हा अंधारात चाचपडत असते तेचा मी अचानक होणारी सुंदर फुलांची सुंदर पहाट आहे
वाळवंटातील धगधगत्या उन्हात तहानेने व्याकुळ होत असताना झालेली मी एक सुंदर बरसात आहे.
अशाच उन्हात जीवन जळत असताना या कठीण दिवसात अचानक होणारी मी एक गारवा देणारी सुंदर रात्र आहे.
______________________________________________________________________________________

हे गाणे ऐकत असताना एक्या वेगळ्याच जगात जातो आपण. शेवटच्या ओळीत अनुप्रास अलंकार वापरला आहे.

खरच हे गाणे ऐकताना कवी, गायिका,आणि संगीतकार यांच्या प्रतिभेचा सुंदर मिलाफ आपल्या थक्क करून टाकेल
आंतरजालावर या कवितेची फीत आपल्याला सहज मिळेल.

कविताप्रतिसाद

प्रतिक्रिया

वाह, सुरेख कविता! धन्यवाद इथे पोस्टल्याबद्दल.

अतिशय अप्रतिम गाणे आहे हे, आशा ताइंचे! !!!

मितान's picture

11 Dec 2015 - 7:29 am | मितान

+१
आज दिवसभर घुमत राहणार हे गाणं !
धन्यवाद !!

पद्मावति's picture

30 Nov 2015 - 10:15 pm | पद्मावति

अप्रतिम! इतकी अस्खलित, ठेठ हिंदी कमी ऐकायला वाचायला मिळते.
इथे शेअर केल्याबदद्ल धन्यवाद.

मारवा's picture

30 Nov 2015 - 10:47 pm | मारवा

कविता मेरे अंतरमन को छु गयी.
यह तुमुल कोलाहल शब्द मेरा विशेष रुप से प्रिय शब्द है.
अरुण साधु जी के ड्रॅगन जागा झाल्यावर इस ग्रंथ मे इसका प्रथम उल्लेख मैने पढा था.
एक प्रकरण का नाम था : सांस्कृतिक महाक्रांतीचा तुमुल कोलाहल :
धन्यवाद इस सुंदर भव्य कविताके लीए
सुमित्रानंदन पंत जी की भव्य शब्दो की स्मृतिया जगा गइ यह कविता
आपका नाम भी पुरातन लगता है.

शान्तिप्रिय's picture

1 Dec 2015 - 11:52 am | शान्तिप्रिय

धन्यवाद मित्रमैत्रीणीनो. आपल्या प्रतिक्रियान्बद्दल आभारी आहे.

विशाल कुलकर्णी's picture

1 Dec 2015 - 12:51 pm | विशाल कुलकर्णी

सुन्दर...
मन:पूर्वक आभार या रसग्रहणासाठी _/\_

पैसा's picture

10 Dec 2015 - 12:32 pm | पैसा

खूप आवडली कवितेची ओळख. असेच अजून लिहा!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2015 - 12:59 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो.. या केवळ अप्रतिम शेअरींग बद्दल!__/\__

चांदणे संदीप's picture

11 Dec 2015 - 6:33 pm | चांदणे संदीप

आजच पहिल्यांदा ऐकले! स्वत: म्हणताना मात्र 'कोलाहल' हा शब्द खूपच जड वाटला! जमला नाही. मग नाद सोडून दिला आणि मस्तपैकी आशाताईञ्चे गाणे एन्जॉय केले! :)
हाकानाका!

एका आगळ्या गाण्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
Sandy